कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
15 Dec 2010 - 5:01 pm

समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल ..

कहाणी .. १.

म्या एक चौथीतली पोर
बा न शाळा बंद केलीया
आता उजवायच म्हन्तुया मला
कोपर्‍या वरचा हात भट्टीवाला बबन
मागणी घालतुया मला

मायेसSन पुसल म्या
लगीन म्हंन्जी ग काय ?
चींगीचा भाउला अन माझी बाहुली
तसच हे असतय काय ?

बा माझा येडा हाय
रातच्याला लय पिऊन येतो
मायेसSन अन मला रग्गड शिव्या देतो
एक पैका पण घरात ठेवत नाय

मायेच्या जीवाला खुपच घोर
उन्हातान्हात मर मर मरती
रातंदिस काम करुनश्यान
कस बस जगती .. रडतकडत माझ्यासाठी

अशीच म्या एक अभागी पोर
काय सांगू अजून माझी कहानी
म्या नाही कुणी थोर
म्या एक चौथीतली पोर .. अभागी

बालकथाजीवनमानरेखाटनप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कहाणी २

आपुण बोले तो बंम्बया बॉय
मुन्नाभायच्या गाडीवर प्लेट विसळायला हाय
ना घराचा पत्ता अन
ना आय-बापाचा ठीकाना हाय

जे पाहीजे ते करायच
आजू बाजू मे मस्त माहोल
तरी आपल
तेच जग समजुन मस्त रहायच
पडेल ते काम अन मिळेल ते खायच
शेजारच्या फ़ुट्पाथ वर मस्त रात्री झोपायच

ना गॉड फ़ादर कोणी
रॉकी,जॉकी,चींगी,छोट्या बस्स
हेच आपल टोळक ..जवळच हाय
मस्त संध्याकाळी बीच वर फ़िरायच
जमलच काही विकायला तर
सरळ दुप्पट पैशाला विकायच

ना विचारणारं कोणी
ना बोलणार कोणी
आकाशाची चादर अन
जमीनीच अंथरुन , बाकी
सग़ळ जगच आपुन का बस्स
आपुण बोले तो एकदम बंम्बया बॉय

गणेशा's picture

15 Dec 2010 - 5:05 pm | गणेशा

कहाणी ३

hi मी बंटी
आज रविवार, उशिराच उठलो
घरात कोणीच नाही, मोलकरणी शिवाय
मॉम-डॅड केंव्हाच शॉपींग ला गेलेत
संध्याकाळी पार्टी आहे कुठेतरी

मी असाच सगळे असुनही एकटा
गजाआडचे माझे आयुष्य.. खुरटलेले
ना सामान्य मित्र मला
ना खेळ त्यांच्या सोबत ना बाहेरची भेळ

फ़्रीज़ मध्ये सग़ळे एकदम कुल .. साठवलेले
घरातील प्रेम ही आमचे असेच गारठ्लेले
TV , COMP, video Games आहेत माझे मित्र
चस्म्याशिवाय अंधारलेले माझे नेत्र

कधी कधी मग बाहेरचे साधे जग अन
प्लॅस्टीक बॉल वर क्रिकेट खेळनारे ही
खुप छान वाटते अन
रागवणारी त्यांची आई पाहिली
तरी खुप छान भासते
आपण बरच काही मीस करतोय
अस पुन्हा एक वार पटते

गणेशा's picture

15 Dec 2010 - 5:07 pm | गणेशा

कहाणी -४

शेजारील ६.०० चा भोंगा वाजला
तडकण जाग आली
स्वप्नातील सुंदर राज्यातून
पुन्हा, दरिद्री समाजाच्या बंदराला ही नाव थडकली

नाजायज नाजायज म्हणुन
समाजाने अवहेलना केली
आई-बाप असूनही उकीरड्यावर पडलो
म्हनुन किड्या मुंग्यापेक्षा बेहत्तर हालत झाली

उचलले म्हनुन त्याने
सांगीतले की बुट पॉलीश करायचे
सांगीतले की भीक मागायची
मनाला मारुन , पोटाला बांधुन
गप्प शरमेने मान खाली घालून
लाचारासम जगायचे .. बस्स

कधी वाटत
माणसाने माणसासाठी केलेला हा समाज
की पशुतुल्य माणुसकीचा बाजार
नाजायज मी ? की हा समाज माझ्या साठी ?
की ते ? ज्यांनी जन्मताच सोड्लेला माझा विचार .

चला काय बोलत राहिलो आहे मी
६.१५ झाले, रेल्वे स्टेशनजवळ
बुट पॉलीशला बसायचे आहे
bye bye

गणेशा's picture

15 Dec 2010 - 5:08 pm | गणेशा

कहाणी -५

मी राजु, इयत्ता ५ वी अ
शाळेतुन सुटतो, लगेच दुकानात कामाला जातो
रात्री आईला पिठ दळायला मदत करतो
रात्री थोडा अभ्यास, सकाळी उठल्यावर पेपर टाकतो
तसाच शाळेत जातो...

माझ घर ... घर ?एक झोपडीवजा जागा
आई अन मी, ती माझ्यासाठी अन मी तिच्या साठी बस्स
माझ्या शाळेसाठी खुप कष्ट घेते
बा नसला तरी कमी पन नाय भासू देत

मी पण बरेच शिकनार आहे
बॅरिस्टर होऊन आईला बंगल्यात आणणार आहे
आता बरच काम करतो
तेंव्हा काम करणार्यांना एकाच घरात आणनार आहे
छात्रालय बांधुन सगळ्यांना फ़ुकट शाळेत धाडणार आहे

चला दुकानात जायचे आहे
काम नाय केले तर
मोठ्ठा माणुस कसा बननार आहे ?

गणेशा's picture

15 Dec 2010 - 5:10 pm | गणेशा

कहाणी -६

मी एकदम सुखी कुटुंबात जन्मलेलो
मस्त घर, आई बाबा , शाळा मित्र सर्व काही मस्त
पण नियतीच्या मनात वेगळेच होते
त्या बाँब स्पोटामध्ये माझ आयुष्यच कदाचीत ब्लास्ट झाल होत

ना कोणी आता, ना आई ना बाबा
काका कडे कसे बसे घास गिळतो
काही कामाचा नाही अस एकत
सगळी घरातील कामे मीच करतो

सवय नसल्याने कामाची
शरीर अगदी थकुन जाते
हातावरचे फ़ोड तसेच ठेवून
मन कोडग्यागत करुन तेथेच रहातो

जूनीच पुस्तके,जुनेच कपडे
जुनीच नाती .. विस्कटलेली
ना बाहेर मनसोक्त बागडणे
ना कधी मस्त लगोरी खेळणे
आयुष्याच्या ठीगळाला पुन्हा
आसवांनी शिवणे आणि
काहीच बोलता येत नाही
म्हणुन निमूट्पणे गप्प बसणे..

------ शब्दमेघ ....
---------------------------------

सर्वच्या सर्व प्रकटणे/ कविता खूपच उत्कट आहेत..
वेगवेगळे अनुभव टिपण्याचा बारकावा विशेष आवडला :)
भावना पोचल्या.

अवांतर : आपन काय करू शकतो :(

सर्व रिप्लाय देणार्यांचे प्रथमता आभार.
------------
यशवंत जी ,

आपण काय करु शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर खुप व्यापक आहे.
प्रत्येक माणुस खुप वेगवेगळ्या पद्धतीने वागतो .. कोणी मदत करतो .. कोणी बालकामगारांवर अन्याय होउ नये म्हनुन लढा देतो कोणी त्यांच्या साठी शाळा काढतो ..

माझ्या कविता ह्या अश्या लोकांसाठी नाहिच .. या कविता आहेत सामाण्य माणसासाठी तुमच्या -माझ्या सारख्या लोकांसाठी .. समाजसेवा म्हणजे डायरेक्ट समाजात उतरुन , पैसे/टाईम खर्चुन काही तरी भव्यदिव्य करणे असेच फक्त नाही असे माझे मत आहे. उदा. आपल्या घरात काम करणारी आई/ बहिन घेतली तर त्यांना असे समजाबद्दल वाटले तरी घरातले काम सोडुन त्या वेळ देवु शक्तीलच असे नाही .. हे एक उदाहरण दिले फक्त

त्यामुळे आपण काय करु शकतो .. तर निदान आपण दृष्टीकोण तर बदलु शकतो आपला.
ह्या मुलांना पाहताना निदान आपल्याला हे जाणवले की, नाही ह्यांच्या परिस्थीतीचे हे शिकार आहेत तरी खुप आहे ..

उदा. एखादा माणुस /किंवा मुलगा भिक मागत आला तर आपल्याला आवडत नसले तरी आपण १ रुपया टाकतो बर्याचदा का तर ते आपल्या मागे लागतात आणि आजुबाजुला आपले मित्र असतात म्हणुन बोलण्यासआठी किंवा काही कारणासाठी आपण रुपया देतो .. माझ्या कविता ह्या भिक मागणार्यांसाठी नक्कीच नाही ..

काही तरी काम करणारी आजुबाजुची मुले पाहिली की मन हेलावते ..
एखादा फुल विकत असएल तर मी तरी त्याचा गुच्छ मला लागत नसला तरी विकत घेतो ..
चहा देणारा कँटीनचा मुलगा पाहिला की मी त्याला कधीच मोठ्या आवाजात बोलत नाही .. आदबिने वयक्तीक बोलतो ..
माझ्या कॉलेजला कँटीन मध्ये राजु नावाचा लमानी मुलगा काही दिवस कामाला होता.. तो त्याची आई त्त्यांचे फिरने ह्या बद्दल आम्ही खुप बोलायचो .. का तर तो लमानी होता आणि टेबल पुसायचा तरी तो माणुस होता म्हणुन मैत्री केली होती..

दृष्टीकोण बदलला की आपोआप पुढील मार्ग स्पष्ट दिसतात असे माझे मत आहे. अआणी त्यातुनच भव्यदिव्य काही तरी करण्याची उमेद ही उभी राहते असे वाटते .. सुरुवात दृष्टीकोणाने व्हावी ही साधी अपेक्षा बाकी काही नाही...

होप तुम्हाला म्हणने कळाले असेन ..
काही जास्त बोललो असेन तर शमस्व

- गणेशा

गांधीवादी's picture

16 Dec 2010 - 11:10 am | गांधीवादी

आपल्या विचारांना आणि आचारांना सलाम.

>>सुरुवात दृष्टीकोणाने व्हावी ही साधी अपेक्षा बाकी काही नाही...
जरूर जरूर.

>>एखादा फुल विकत असएल तर मी तरी त्याचा गुच्छ मला लागत नसला तरी विकत घेतो ..
कष्ट करून कमाई करण्याची भावना नक्कीच वाढीस लागेल. हे नक्की.

यशोधरा's picture

15 Dec 2010 - 6:47 pm | यशोधरा

खरच छान लिहिलं आहे.

बॉंब स्फोट ची वाचून तर रडूच आलं :
सर्व कविता करुण ......

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Dec 2010 - 7:24 pm | निनाद मुक्काम प...

समाजातील सर्व स्तरीय मुलांचा भावविश्वाचा एवढ्या उत्कृष्टरित्या आढावा घेण्यात आला आहे .कोणताही वाचक नक्कीच एकातरी कवितेतील पात्रा शी स्वताला रिलेट करेन.

स्वैर परी's picture

15 Dec 2010 - 8:44 pm | स्वैर परी

.

पैसा's picture

15 Dec 2010 - 10:15 pm | पैसा

प्रत्येक कवितेतली कथा वेगळी आहे, पण व्यथा एकच आहे. यातलं कोणत्याच प्रकारचं बालपण कोणाच्याही वाट्याला येऊ नये.
गणेशा, जमलेल्या कविता, नेहमीप्रमाणेच.

सर्व कविता वास्तवदर्शी चित्रण करतात.

- पिंगू

रेवती's picture

15 Dec 2010 - 11:54 pm | रेवती

वाचवत नाही अगदी!

पियुशा's picture

16 Dec 2010 - 10:31 am | पियुशा

या सर्व कविता मनाला खुप भावल्या मस्त हो गनेशाजि

sneharani's picture

16 Dec 2010 - 10:38 am | sneharani

मस्त कविता ,व्यथा प्रकटन अगदी योग्य शब्दात!

सर्व कविता वास्तवाचे दर्शन घडवतात...

उल्हास's picture

16 Dec 2010 - 2:26 pm | उल्हास

प्राणने कुठल्यातरी चित्रपटात ( बॉबी ? ) म्हटलेले वाक्य आठ्वले
"कुछ बच्चे बचपनसे सीधा बुढापेमे कदम रखते है जवानी जीनके नसीबमे नही होती"

अतिशय मार्मीक कवीता

सर्व वाचक मित्रांचे मनपुर्वक आभार