वर्तुळ.. गती..परीघ
काय बोलतेय मी ?
नाही नाही, भूमिती.. भूगोल नाही
हे शब्द आहेत निगडीत माझ्या अस्तित्वाशी,
माझ्या आयुष्याशी
आयुष्य .. ? आता त्याला आयुष्यच म्हणायच..
जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये
फरफटलेले हे जीवन
अन समाजाची गती घेवून
घुसमटलेले हे आयुष्य
गती.. गती म्हंटल की छान वाटतं नाही ?
अहो पण ही गती लादलेली
अन लादलेल्या गोष्टीमूळे
जीवन कसे वाकलेले असते..
नाही पटत ?
पृथ्वीच पहा ना आपली.. गती आहे.. पण लादलेली
नेहमी तेच वर्तुळ..तीच गती..
कंटाळलेली कदाचीत
म्हनुन आसाभोवती वाकलेली
तसच .. अगदी तसच माझ आहे
मग त्यापुढे ईतिहास, भूगोल.. निसर्ग ही अवाक झाले आहेत ..
का?
अहो रोजच्या पिठाच्या गिरणीसम हे आयुष्य
आणि समाजाच्या गतीबरोबरच
त्यांच्या भेदक आसुसलेल्या नजरा
अतिनिल किरणांपासून वसुंधरेस निसर्गच वाचवतो
पण ह्या नजरा .. अगबाईSS बस्स..
असंख्य बाण लागून पार्थाचा रथ ही जळाला
होता कृष्ण म्हनुन पार्थ वाचला
पण असेच या आयुष्यात समाजाच्या निर्घून प्रथा
आणि सोबतीला आसुसलेल्या नजरा
यामुळे कधी एकदा आयुष्य खाक होईल सांगता येत नाही..
का आहे ईतिहासा प्रमाणे
येथे कोणी या राधेचा परम सखा कृष्ण ?
माहीत नाही...
का आहे असेच माझे आयुष्य
भिष्मासारखे व्याकुळलेले.. शरपंजरी.. ?
-------- शब्दमेघ (" स्त्री .. भावनांचा प्रवास" मधुन)
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 5:22 pm | प्रकाश१११
गती.. गती म्हंटल की छान वाटतं नाही ?
अहो पण ही गती लादलेली
अन लादलेल्या गोष्टीमूळे
जीवन कसे वाकलेले असते..
नाही पटत ?
पटते ..एकदम. मस्त मस्त आवडली.
माझीच कविता माझ्या कवितेपेक्षा मस्त !!.
8 Dec 2010 - 9:33 pm | प्रकाश१११
का आहे ईतिहासा प्रमाणे
येथे कोणी या राधेचा परम सखा कृष्ण ?
माहीत नाही...
का आहे असेच माझे आयुष्य
भिष्मासारखे व्याकुळलेले.. शरपंजरी.. ?
हे मला खरेच आवडले .छानच आहे !!