५ : मी ..एक स्त्री

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
9 Dec 2010 - 7:50 pm

४: वर्तुळ ..गती.. परीघ

मी गीत मी प्रीत
मी साद मी हाक
मी शब्द मी व्यक्त
अखंडीत !!

मी राधा मी मीरा
मी शक्ती मी भक्ती
मी अणु मी रेणू
समाजात!!

मी सल मी बळ
मी खोल मी पंख
मी धरा मी नभ
संभ्रमात !!

मी धुंद मी गंध
मी नशा मी फ़ुल
मी सुध मी शेज
जन्मजात !!

--- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

कविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

9 Dec 2010 - 8:01 pm | टारझन

स्त्रीया फार आत्मकेंद्रीत ( मराठीत सेल्फ सेंटर्ड) असतात , असं का सुचवायचंय तुम्हाला ?
बाकी ह्यात जेवढी "मी"आहेत तेवढे "ला"खर्‍यांच्या कवितेत पण नव्हते ;)

बाकी ह्यात जेवढी "मी"आहेत तेवढे "ला"खर्‍यांच्या कवितेत पण नव्हते

खर्यांची "ला" असलेल्या कविता माहित नाही पण तरीही ह्या रिप्लायमुळे खरे सांगतो हसलो ...

टारझन भाउ , बाकी उद्देश असे आत्मकेंद्रित दाखवण्याचा नव्हता हो .. पण पहिलाच रिप्लाय असा आला की सगळे आता असेच बोलणार वाटते ..

च्याआयला .. "मी पुरुष बिच्चारा" लिहिले तरी राग आणि "मी .. एक स्त्री" लिहिले तरी रागच ..

" भगवंता जगु कसा रे बाबा"

प्रकाश१११'s picture

9 Dec 2010 - 8:28 pm | प्रकाश१११

मी गीत मी प्रीत
मी साद मी हाक
मी शब्द मी व्यक्त
अखंडीत !!

मी राधा मी मीरा
मी शक्ती मी भक्ती
मी अणु मी रेणू
समाजात!!

निराळी वाटली कविता .पण छान म्हणजे मस्त लय पकडली आहे.
कोठेही शब्द ठेचकाळत नाही. हे फार आवडले.

स्पंदना's picture

10 Dec 2010 - 8:54 am | स्पंदना

आवडली.