गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून, हे साधन वापरून, कोडींग अथवा टेस्टींग चे रिक्वायरमेंट्स बरोबरचे कव्हरेज बर्याच अंशी साध्य करता येते.
या साधनाचे काही गुणविशेष हे की -
(१) आकर्षकता
(२) फ्री फॉरमॅटींग
(३) मुख्य शब्द (की वर्ड्स) सहज सापडणे
(४)महत्वाच्या मुद्द्यावर भर (एम्फसिस)
यामधे एक मध्यवर्ती नोड असतो आणि त्या नोडला फांद्या फुटून चाइल्ड नोड फुटतात. चाइल्ड नोड ला , सिबलिन्ग नोड असू शकतो अथवा चाइल्ड नोड. अशा रीतीने एखादी कल्पना मूळ गाभ्यापासून फांद्या फुटत विकसीत होते.
हे इथे सांगायचं कारण की हे साधन लहान मुलांकरता देखील अतिशय उपयोगी आहे. तसे सर्वांकरताच आहे. माईंड मॅप चे संशोधक टोनी बुझान यांनी लहान मुलांकरता लिहीलेले एक पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. मुलांना तर जरूर या साधनाची सवय आणि वळण लावावं.
टोनी बुझान यांची पुढील चित्रफीत पहाण्याजोगी आहे. अप्रतिमच आहे.
प्रतिक्रिया
3 Dec 2010 - 7:38 am | ए.चंद्रशेखर
ट्राय करण्यासारखे दिसते आहे. डाऊनलोडचा दुवा दिल्यास बरे पडेल.
3 Dec 2010 - 7:41 am | शुचि
http://freemind.sourceforge.net/wiki/index.php/Main_Page
हे बरच बेसिक आहे. बाकीची मी वापरली नाही आहेत. हेच वापरलं आहे. खूप फायदा होतो.
3 Dec 2010 - 6:03 pm | प्रियाली
नॉन-लिनिअर इन्फो (विशेषतः डोळ्यांसमोर दिसणारी) अनेकदा उपयोगी पडते असा अनुभव आहे. वरील टूल वापरून बघता येईल. ऑफिसच्या लॅपटॉपवर डाउनलोड करणे शक्य नाही. :) परंतु घरी करून घेतले आहे.
माहितीसाठी धन्यवाद!
3 Dec 2010 - 9:02 am | मिसळभोक्ता
विचार तंतू जुळवण्यासाठी आधी विचार हवेत.
3 Dec 2010 - 9:22 am | शुचि
विचार पाहीजेत हे मान्य. पण एकदा प्रकल्पाचं बीजारोपण झालं की, -
रिक्वायरमेंटस - क्लायंटला काय पाहीजे ते बी ए ने लिहीलेल्या असतात. त्या डेव्हलपर्स समजऊन घेऊन कोडींग करतात. टेस्टर्स त्या सर्व गदारोळातून "टेस्टेबल" वर्कफ्लोस डिराइव्ह करतात. या चारही समूहांच्या विचारांमधील गॅप या माईंड मॅपच्या तंत्राच्या सहायाने सांधता येते. अतिशय प्रभावी टेक्निक (तंत्र) आहे.
3 Dec 2010 - 9:41 am | मिसळभोक्ता
समजा वर्कफ्लो सिस्टमच हा ग्राफ समजवून घेणारी असली तर ?
लहान मुले, अगदी आपली हुशार मुले, ह्या गोष्टी हमखास करत असतात. एक गोष्टीविषयी आपल्या भारतीय पॅरेंट्सची परवानगी घेण्यापेक्शा अनेक गोष्टींविषयी एकत्रित परवानगी घेतात. आता ह्या क्लस्टर्ड वर्कफ्लो विषयी विचार करा. हा अशा प्रकारचा वर्कफ्लो अधिक महत्वाचा आहे. तुमचा माइंडफ्लो सपोर्ट करेल॑ असे पॅटर्न्स कदाचित. पण करेल, नक्की ?
3 Dec 2010 - 10:23 am | शुचि
सुंदर!!!
लेट्स से आय हॅव्ह अ रिक्वायर्मेन्ट. मला त्या सेन्ट्रल नोड्ला कमीत कमी ४ अॅक्सीस हवेत.
हाऊ अ क्लायन्ट पर्सीव्ह्स इट, हाऊ अ बी ए परसीव्हस इट, हाऊ डेव्हलपर हॅज कोडेड इट अॅन्ड हाऊ टेस्टर इज प्लॅनींग टू टेस्ट इट.
आणि माझं ध्येय हे की A,B,C,D,E,F वगैरे सर्व समान असावे शेवटी.
3 Dec 2010 - 9:08 am | आनंदयात्री
ओह्ह एक्सलंट. माहितीसाठी धन्यवाद.
3 Dec 2010 - 10:30 am | वेताळ
अप्रतिम....वाचनिय व अनुकरणिय व जपुन ठेवण्यायोग्य माहिती.
3 Dec 2010 - 10:30 am | सूर्य
माईंड मॅप बद्दल ऐकले आहे पण वापरले नाहीये अजुन. माहीतीबद्दल धन्यवाद.
- सूर्य.
3 Dec 2010 - 10:37 am | नगरीनिरंजन
फार छान आणि उपयोगी माहिती! हे वापरून पाहतो आता.
3 Dec 2010 - 10:50 am | विजुभाऊ
माइन्ड मॅप्स नीत वापरता यायला उजवा मेन्दू स्ट्रॉन्ग ( वेल देव्हलप्ड) असावा लागतो
3 Dec 2010 - 5:12 pm | शुचि
आपल्या बोलण्यात तथ्य असावे. कारण linearity, lists या डाव्या मेंदूच्या क्षेत्रांच्या जागी माईंड मॅप, कल्पकता, मीती, रंग आदि गोष्टी वापरतो.
___________________________________________
डावा मेंदू पुढील गोष्टी समर्थ हाताळतो - शब्द, तर्क, नंबर, sequence, analysis, linearity, lists
उजवा मेंदू पुढील गोष्टी समर्थ हाताळतो - ताल, spatial awareness (space related), gestalt (wholeness), कल्पकता, दिवास्वप्ने,रंग, मीती
बर्याच लोकांना प्रश्न पडेल gestalt (wholeness), म्हणजे काय तर - जेव्हा आपण १,२,३ वाचतो तेव्हा आपल्याला ४ म्हणण्याची हुक्की अनावर होते.
तर दुसरं उदाहरण हे की - एक माणूस आपल्याला सांगतो "मी तुला एक मस्त गोष्ट सांगणार आहे" आणि दुसर्या क्षणी तो म्हणतो की "अरे मला आत्ता आठवलं की मी कोणाला ती गोष्ट सांगू शकत नाही" तेव्हा तुम्ही खूप व्याकुळ होता, अधीर होता ती गोष्ट ऐकण्याकरता आणि तुम्हाला हे कळत नाही की असं का होतं. एकंदर अपूर्णता पूर्ण करण्याचा ध्यास.
ही २ उदाहरणं झाली gestalt (wholeness) ची.
3 Dec 2010 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
मग शुचि मामीचा लेख येवढ्या बोजड शब्दांनी का सजला आहे बरे ? लेख अंमळ जास्तीच तांत्रीक झालाय ग. थोडे सोपे शब्द वापरुन सामान्य लोकांना अजुन आवाक्यात येईल अशा शब्दात सांगता येणार नाही का ?
उदा :-
हे वाक्य किती लोकांच्या डोक्यात शिरेल ? थोडे सोपे करा.
3 Dec 2010 - 5:10 pm | शुचि
थोडा तांत्रीक आहे जास्त खरा.
3 Dec 2010 - 3:45 pm | आत्मशून्य
पण नवीन काय ? तसबी इतर Work flow Editor वापरले हायेतच की...
3 Dec 2010 - 4:09 pm | शुचि
बरोबर यु एम एल, ई आर डायग्रॅम्स , फ्लो चार्टीन्ग हे काही प्रकार झाले. यांचा एक तोटा(डिसअॅडव्हान्टेज) म्हणजे फ्री फॉर्मॅटींग नसणे. त्यामुळे आणि रंग अगदीच करडे, काळे असल्याने मेंदूला चेतविण्याची शक्ती यांच्यात नसणे. टोनी बुझान चे म्हणणे पहाल तर - डावा आणि उजवा मेंदू दोन्ही माईंड मॅप ऑप्टीमम वापरतो.
दुसरा महत्वाचा फरक आहे वरील सर्व सधने "लिनीअर" आहेत. आपला मेंदू "नॉन्-लिनीअर" रीतीने काम करतो. मध्यवर्ती गाभ्यापासून अनेक संदेशांचे जाळे फुटते. इट रेडीएट्स. इट एक्स्प्लोड्स. चित्रफीतीत सांगीतल्याप्रमाणे पारंपारीक "टिपणे" (नोटस) काढण्याची पद्धत कंटाळवाणी आहे, काऊंटर प्रॉडक्टीव्ह आहे.
3 Dec 2010 - 4:33 pm | रन्गराव
>>दुसरा महत्वाचा फरक आहे वरील सर्व सधने "लिनीअर" आहेत. आपला मेंदू "नॉन्-लिनीअर" रीतीने काम करतो.
इथ "नॉन्-लिनीअर" नक्की कोणत्या संदर्भात लिहले आहे ते समजलं नाही. :( म्हणजे त्याला जर "function of input senses" गृहित धरलं तर ते function नॉन्-लिनीअर आहे अस म्हणायचं आहे का?
3 Dec 2010 - 4:57 pm | शुचि
खालील माईंड मॅप (साभार जाल) पहा -
मध्यवर्ती नोड हा डोळ्यात भरतो, काही महत्वाचे मुद्दे (की वर्ड्स) लक्षात रहातात आणि माहीती ही नॉन -लिनीअर रीतीने ग्रहण केली जाते. डावीकडून उजवी कडे, अथवा वरून खाली नाही. मला स्वातंत्र्य आहे.
हेच जर मी नोटस घेतल्या असत्या तर अथवा हेच विचार फ्लो चार्ट मध्ये मांडले असते तर मी डावीकडून उजवीकडे/वरून खाली स्कॅन केले असते. कारण त्याला एक सिक्वेन्स असता.
3 Dec 2010 - 7:16 pm | रन्गराव
हमम. दोन एक वर्षापूर्वी डेटा मायनिंग मध्ये असलच काही तरी वाचल होत. ते प्रॉब्लेम लिनियर अल्जीब्रातल्या पद्धती वापरून सोडवायचे अस काही पूसटस आठवतय. त्यामुळे गोंधळ झाला. बाकी स्पष्टीकरन दिल्याबद्दल धन्यवाद.
3 Dec 2010 - 5:04 pm | धमाल मुलगा
हे भारीए की.
शिवाय सोर्सफोर्जचं आहे म्हणजे चकटफु! :)
आता नव्या कामांसाठी हेच वापरुन पाहतो आणि सांगतो गं रिझर्ल्ट्स कसे आहेत ते.
3 Dec 2010 - 5:09 pm | शुचि
जरूर !!
3 Dec 2010 - 5:17 pm | मदनबाण
माझ्या बझ सवंगड्यांपैकी एकाचा याच मॅपा मॅपी बद्धल सुंदर ब्लॉग आहे... :)
http://thelife.in/
बाकी मी असल्या भानगडीत पडत नाय बाँ...च्यामारी आधीच सालां आपलं टाळकं हाय लयं सटक... फुकट साला भल्याच पत्यावर जायच मॅप बघुन !!! ;)
बाकी चालु द्या... ;)
3 Dec 2010 - 6:08 pm | स्वानन्द
चांगला दुवा आहे!
3 Dec 2010 - 6:56 pm | स्वाती२
छान माहिती!
3 Dec 2010 - 7:56 pm | सुधीर कांदळकर
माझे एक स्नेही श्री. निरंजन मिरासदार आहेत ते भरवतात. मी एका कार्यशाळेला उपस्थित राहिलो आहे. टोनी बुझान यांच्या संस्थेतून त्यांनी BLI म्हणजे बुझान लायसेन्सिएट इन्स्ट्रक्टर हा अधिकृतपणे माईंड मॅपिंग शिकवण्याचा परवाना म्हणजे लायसेन्स घेतले आहे.
मी बुझान यांचे माईंड मॅपिंगवरचे एक पुस्तकही घेतले आहे. पण ते फार क्लिष्ट आणि अनाकर्षक आहे. वर किंमत आहे ९.९९ पाउंड. अजून पूर्ण वाचून झाले नाही.
परतु मिरासदार यांची कार्यशाळा मात्र आवडली. ५वीतल्या मुलांपासून रिटायर्ड माणसे यांना उपयुक्त आहे. शिक्षण घेण्याची एक आनंददायक पद्धत असे माझे मत झाले. प्रत्यक्षात एड्यूकेशन + एंटरटेनमेंट = एड्यूटेनमेंट हे मिरासदारांचे सूत्र आहे. तसे त्याबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. मिरासदार यांची परवानगी मिळाल्यास मी सविस्तर लेख वगैरे टाकेन. ते पीएमपी नामक एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटवरचा कोर्स देखील शिकवतात.
ई मेल आहे venkatesh.edutainment@gmail.com
लौकरच त्यांचे माईंड मॅपिंग या विषयावरील एक पुस्तकही मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांत येत आहे.
मला माईंड मॅपिंगचे पारंपारिक अध्ययनपद्धतींत नसलेले खालील फायदे दिसले.
१. एका कागदावर आपण जास्त व्यापक किंवा विस्तीर्ण माहिती नोंदवू शकतो.
२. महत्त्वाच्या दृष्टीने मुख्य मुद्दे, उपमुद्दे, अशी पहिल्या, दुसर्या, तिसर्या इ. क्रमांकाची वर्गवार प्रतवारीची उतरंड प्रत्यक्ष दिसते.
३. प्रतिमा वापरल्यामुळें शब्दसंख्या कमी होते. मुद्दा मनावर खोल ठसतो व दीर्घ काळ स्मरणांत राहातो.
४. शतिमा (शब्द + प्रतिमा, Word + Image = Wimage), वापरल्यामुळें मुद्दा मनावर खोल ठसतो व दीर्घ काळ स्मरणात राहातो.
५. प्रतिमा, शतिमा, कळीचे शब्द - key-words आणि लघुरूपे - abbreviations - वापरल्यामुळें जो मुद्दा शब्दात मांडता येत नाही तोही आकृतीच्या वा प्रतिमेच्या साहाय्यानें मांडता येतो त्यामुळे अमूर्त संकल्पना व त्या संकल्पनेची रचना समजणें सोपे जाते.
६. विविध रंग वापरल्यामुळें रचना सुगम होते; त्याबरोबरच सारख्या वाटणार्या दोन संकल्पनातील व मुद्द्यांतला फरक स्पष्ट होतो. त्यामुळे संदिग्धता टळते, सरमिसळ होत नाहीं आणि मनातला गोंधळ दूर होतो.
७. प्रतिमा, शतिमा, रंगांचा वापर, वृक्षरूप वा चाकाच्या अरीसारखा मध्यवर्ती गोलकेंद्रापासून दूर जाणारा - Radial - आकृतीबंध, विविध रंगांचा वापर यामुळें क्लिष्ट विषय सोपा होतो, विषयाचे भय कमी होते आणि मांडणी आकर्षक होते.
८. शब्दसंख्या कमी झाल्यामुळें वेळ वाचतो आणि टिपणें त्वरित काढतां येतात, कमी वेळांत जास्त अभ्यास.
९. आकर्षक मांडणी, चित्रे, प्रतिमा, शतिमा यांच्या वापरामुळें विषय जास्त सोपेपणाने आणि नेमकेपणानें मांडला जातो आणि विषयाची गोडी निर्माण होते.
१०. विषयाची गोडी लागल्यामुळें आत्मविश्वास वाढतो. ‘इमोशनल इंटलिजन्स’कार डॅनिअल गोलमन म्हणतात त्याप्रमाणें आत्मविश्वास आणि प्रसन्न मनस्थितीमुळे प्रत्येकाची बौद्धिक तसेंच शारीरिक कार्यक्षमता वाढते.
११. आत्मविश्वास वाढल्यामुळे सर्वंकष अध्ययनप्रक्रिया सुधारते.
१२. शब्दांबरोबरच प्रतिमा, आकृत्या, कळीचे शब्द, लघुरूपे, शतिमा, विविध रंग इ. चा वापर तसेंच उमलता आत्मविश्वास यामुळें नैसर्गिक वा उपजत प्रतिभेला वाव मिळतो व नवनवीन संकल्पना सुचत जातात, एका प्रश्नाला अनेक प्रकारें समस्या शोधता येतात त्यामुळें खास करून व्यवस्थापन तसेंच प्रशासनात निर्णयाच्या निवडीला जास्त पर्याय उपलब्ध होतात.
व्यवहारांतील उपयोग:
१. शालेय, महाविद्यालयीन, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणार्यांना टिपणे काढायला पारंपारिक पद्धतीपेक्षा कमी वेळ, कमी कागद, जास्त नेमकेपणा असलेली, समजायला जास्त सोपी अशी पद्धत मिळते.
२. कमी जागेत जास्त मजकूर राहात असल्यामुळे मानसिकदृष्ट्या अभ्यास फारसा नाहीं असे वाटते व परीक्षा जवळ आल्यावर कमी वेळेचा ताण येत नाही.
३. केलेल्या अभ्यासातील अत्यावश्यक असे बारीकसारीक तपशील परीक्षेंत विसरण्याची शक्यता या पद्धतींत फारच कमी होते.
४. सर्जनशीलतेला जास्त वाव मिळाल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन प्रकल्पांत तसेच संशोधनक्षेत्रात कामगिरी जास्त प्रभावी होते.
५. माईंड मॅप टिपणे हाताशी असल्यावर प्रेझेंटेशन सोपे होते आणि जास्त प्रभावीपणे करता येते.
६. व्यवस्थापनात समस्यानिवारण निवडीला जास्त पर्याय उपलब्ध होतात.
सुधीर कांदळकर
3 Dec 2010 - 8:10 pm | शुचि
सुधीर साहेब आपण फारच सुरेख आणि अगदी व्यवस्थित आढावा घेतला आहेत.
_________________________________________
मी माईंड मॅप "टेस्टेबल" वर्कफ्लोज कागदावर मांडण्याकरता करते.
(१) रिक्वायरमेंट सेशन होतात. रिक्वायरमेंट मध्ये गृहीतके आणि मूळ रिक्वायरमेंट्स असतात.
(२) या सोबत आम्हाला इतकी भारंभार माहीती तीदेखील विस्कळीत रुपात मिळते - सिस्टीम वर्कफ्लोज, युझर स्टोरी डायग्रॅम्स वगैरे
(३) या ३/४ मोठ्ठ्या डॉक्युमेंट्मधून "टेस्टेबल" वर्कफ्लोज काढून ते डेव्हलपर्स आणि बी ए तसेच नेटवर्क ग्रूप वगैरे या लोकांपुढे आम्ही माईंड मॅप च्या रूपामधे मांडतो.
(४) या मॅपस वर खूप "ब्रेन स्टोर्मींग" सेशन होतं. गॅपस सापडतात. आणि सगळ्यांना समाधानकारक असं वाटेल इतपत पूर्ण कव्हरेज शोधलं जातं.
(५) नंतर या मॅपस वरून टेस्ट सिनॅरीओज्/टेस्ट केसेस लिहील्या जातात.
ही पद्धत अतोनात उपयुक्त ठरली आहे. टेस्टेड अँड १००% प्रूव्हन!!!
3 Dec 2010 - 8:19 pm | धमाल मुलगा
>>मिरासदार यांची परवानगी मिळाल्यास मी सविस्तर लेख वगैरे टाकेन.
सुधीरकाका, लवकरात लवकर मिरासदारांशी संपर्क करुन परवानगी घ्या आणि नक्की लिहा. :)
आम्ही वाट पाहतो.
9 Dec 2010 - 4:37 am | निनाद मुक्काम प...
सुधीर शाहेब हि कार्यशाळा तुम्ही अटेंड केल्याचा फायदा तुमच्या मुद्देसूद लेखनातून पहिला मिळाला आहे .मला से विचारायचे आहे कि .मी सध्या जमानीत नवीन म्हणजे सहा महिन्यापासून राहत आहे .येथे जर्मन भाषा येणे आवश्यक आहे .(जर्मन बायको व सासू सासरे असल्याने अनिवार्य ) आहे .तेव्हा ह्या पद्धतीचा नवीन भाषा शिकायला कसा फायदा होईल ह्यावर सल्ला हवा होता .बाकी तुमच्या पुढच्या लेखाची वाट पाहतोय .
10 Dec 2010 - 7:38 am | सुधीर कांदळकर
आहेच. माझ्याकडे तसे उत्तर तयार आहेच पण आणखी माहिती गोळा करतो आहे. रविवारी इथे उत्तर देतो आणि बहुतेक लेखही टाकतो.
धन्यवाद
9 Dec 2010 - 10:45 am | टारझन
वाचणखुण साठवली आहे. माझ्या मुलांसाठी खुपंच उपयोगी पडेल हे. धन्यवाद.
-(पालक) पनीर
14 Dec 2010 - 7:22 am | सुधीर कांदळकर
माईंड मॅपिंगचा उपयोग:
यासाठी माईंडमॅपिंगबरोबर व्यावहारिक चातुर्य किंवा कॉमन सेन्स वापरणे जास्त जरूरीचे आहे.
भाषा म्हणजे माहिती, ज्ञान आणि भावना यांची देवाणघेवाण करण्याचे साधन असे ढोबळपणे म्हणता येईल. माईंडमॅपिंगच्या साहाय्याने आपण एका कागदावर जास्त माहिती जास्त प्रभावीपणे मांडूं शकते हे आपण पाहिले आहे. भाषेसंबंधीची माहिती काय असू शकेल तर विविध शब्द, शब्दांचे प्रकार, उदा. नाम, सर्वनाम क्रियापद, त्यांचे अर्थ, वगैरेवगैरे.
एखादी भाषा आपण किमान एक भाषा येत असतांना शिकतो म्हणजे काय तर ज्ञात भाषेतील शब्दांना, वाक्यांना, वस्तूंना व अनुभवांना नवीन भाषेतील प्रतिशब्द, वाक्ये वगैरे जाणून घेतो.
नवीन भाषेतील शब्द ही संकल्पना घेऊन आपण एक माईंड मॅप काढूं शकतो. त्यात विविध प्रकार आणि त्यांचे अर्थ आले. इथे आपण सूर्य हा शब्द न लिहिता सूर्याचे चित्र काढू शकतो. वर्तुळ हा शब्द न वापरता प्रत्यक्ष वर्तुळ रेखू शकतो. माईंड मॅपमध्यें जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण ज्ञात भाषेतील शब्दांऐवजी प्रतीके, प्रतिमा आणि चित्रे वापरू शकतो. उदा. फुलपाखरू हा शब्द न वापरता साधेसोपे चित्र पटकन रेखू शकतो. त्यापुढे शब्द त्या भाषेच्या लिपीत लिहावा आणि त्यापुढे आपल्या समजेल असा देवनागरीत किंवा रोमनमध्ये उच्चार लिहावा.
क्रियापदांच्या बाबतीत मात्र माझ्या मते चित्रे वापरण्याला बर्याच मर्यादा येतील. त्यामुळे चित्रे प्रतीके वगैरे जिथे जास्त सोयीची पडतील तिथेच वापरावीत.
नाम, सर्वनाम असो वा क्रियापद. चित्रे प्रतीकेच हवीत असा अट्टाहास नसावा. शब्द, चिन्ह वा चित्र जे रेखण्यास सोपे, अचूक, नेमके आणि सोयीचे असेल तेच वापरावे. माईंड मॅप हे विषय सोपा करण्यासाठीच वापरायचे साधन आहे, साध्य नव्हे. सोलापूरला सहादेगाव नावाचे एक गाव आहे. तिथे जाणार्या एसटी बसवर ६ देगाव असे लिहिलेले असते. नाशिकहून चाळीसगावला जाणार्या एसटीवरही मी काही वर्षापूर्वी ४० गाव असे वाचलेले आहे.
वाक्यांचे वेगवेगळे प्रकार करावेत. उदा. रोजच्या व्यवहारातली तुझे नाव काय, माझे नाव, पत्ता अमुक अमुक वगैरे वाक्ये, दुकानात वापरायची वाक्ये, रेल्वे स्टेशन, बस, विमानतळ वगैरे ठिकाणी वापरायची वाक्ये, अमुक ठिकाणी कसे जायचे, डावा = ?, उजवा = ? अगोदर दुसरे डावे वळण मग तिसरे उजवे वळण हे कसे विचारावे, मुख्य म्हणजे, कृपया, धन्यवाद वगैरे जादुई शब्द ठळक, अधोरेखित करावेत आणि नंतर या वाक्यांचा एक माईंड मॅप काढावा.
सर्वांत उत्तम म्हणजे फ्रीजवर, कॅलेंडरखाली, घड्याळाखाली, टेबलावर काच असल्यास काचेखाली अशा विविध ठिकाणी सतत दिसतील असे हे माईंड मॅप नोटीस बोर्डावरच्या कागदासारखे लावावेत व जातायेता उजळणी करावी. विशिष्ट भाषेला विशिष्ट संस्कृती असते. एखाद्या संस्कृतीत आपल्या भाषेतील शिष्टसंमत शब्द अशिष्ट समजले जातात. असे शब्द ठळकपणे शेवटी लिहून त्यावर फुल्या मारून ठेवाव्यात.
शेवटी भाषा हे बोलणे हे महत्त्वाचे नव्हे का? त्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे जरूरीचे आहेच.
14 Dec 2010 - 8:53 am | आंसमा शख्स
माईंड मॅप हा प्रकार आवडला, करून पाहतो.
उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद.