१. माझी मुलगी ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
26 Nov 2010 - 3:25 pm

माझी मुलगी
तीच का ही ?
माझ्या पदराला धरून
लुटूलुटू मागे येणारी
लाघवी गोड हास्याने
माझे सर्वांग उत्तेजीत करणारी ...

कीती बदललेत ना दिवस ?
आज एक मुलगा येणार आहे पहायला ...

साडी नाही नेसणार
मॅचींग बीचींग नाही पाहणार म्हणतेय
तीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला
अगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी
नेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी

पण कायमच्या नाटकाला अता कंटाळली आहे बिच्चारी
आणि मी तरी काय करू ?
मुलीच्या बाजाराचे स्वागत ही आनंदानेच करु ?

अगदी कॉलेजला जायला लागली
तेंव्हा ही काळजी वाटायची
आणि आता .. आता भिती वाटते..
वाटते उगाच संस्कृतीने असे धिंदोडे काढले आहेत
भावनांचे, मनाचे.... आणि शरीराचेही

नाही तर काय, उगाच काही ही विचारायचे
वरुन खाल पर्यंत स्कॅनिंग करायचे
आणि खोट काढायची बस्स ..

येव्हडे कष्ट घेतलेत कशासाठी
स्वतंत्र विचार करता यावा ,
स्वताच्या पायावर उभे रहाव यासाठीच ना
मग असे वाटते आहे आता
का आपणही असे सामिल होतोय या बाजरात
आणि बैलाला जसे वेसन बांधुन उभे करतात विक्रीला
तसे समाजाच्या, घराच्या प्रतिष्टेचे वेसन बांधुन
आपनच आपल्या मुलीला असे मनातून खच्ची करतोय

---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन )

बिभत्सकवितासमाजरेखाटन

प्रतिक्रिया

पियुशा's picture

26 Nov 2010 - 4:28 pm | पियुशा

मस्त मस्त मस्तच!

प्रकाश१११'s picture

26 Nov 2010 - 4:30 pm | प्रकाश१११

साडी नाही नेसणार
मॅचींग बीचींग नाही पाहणार म्हणतेय
तीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला
अगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी
नेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी

हे अगदी मनापासून पटले. वास्तववादी चित्रण .छान .आवडले.

काल परवा एवढीशी असलेली
बघता बघता लग्नाच्या वयाची होते

सुंदर कवीता

गंगाधर मुटे's picture

26 Nov 2010 - 9:58 pm | गंगाधर मुटे

खरे आहे अगदी.

सुंदर कविता. डोळ्यात पाणी आलं.

sneharani's picture

27 Nov 2010 - 11:07 am | sneharani

मस्त कविता!

Pain's picture

27 Nov 2010 - 1:15 pm | Pain

लग्न हे मुलगा आणि मुलीच्या परस्परसंमतीने ठरते. मुलगा भेटायला येतो, ते दोघं आणि घरची मंडळी आपापसात आणि नंतर आपापल्यात चर्चा करून निर्णय घेतात. नावडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा घोळ घालण्यापेक्षा नकार दिला हेच चांगले . तसेही मुलीला तर तयार होउन घरीच बसायचे असते. मुलाकडच्यांना तिच्या घरी जावे लागते. वारंवार हे करून ते कंटाळले तर समजण्यासारखे आहे.

या साध्या जनरितीला अत्याचार किंवा बैलबाजार म्हणू नये. अजून खर्‍या अत्याचाराचा अनुभव किंवा गेला बाजार माहितीही नसल्याचे दिसते.

या नैसर्गिक, सुसंबद्ध, परस्परसंमत पद्धतीला इतका आक्षेप आहे तर तुमच्या मते लग्न जुळवण्याची योग्य पद्धत कोणती?

गणेशा's picture

29 Nov 2010 - 1:32 pm | गणेशा

प्रिय मित्र pain

वरील कविता हि एका आईच्या मनाचे प्रतिनिधित्व करत आहे, आणि त्या आईची मनाची घालमेल टीपताना तिच्या भावनांना कुठला विचार स्पर्ष करतो आहे हे दाखवले आहे ..

सगळीकडची परिस्थीती कींवा जनरीत या विरुद्ध ही कविता नसुन एका आईचे मन येथे दाखवले आहे.
सर्व आईंचे असे मत असेल असे नाही, प्रत्येकाचे विचार करणे वेगळे तसे हे ..
---------
तरीही भावना दुखावल्या असल्यास शमस्व .........
-----------

अवांतर :
>> अजून खर्‍या अत्याचाराचा अनुभव किंवा गेला बाजार माहितीही नसल्याचे दिसते.
कृपया वयक्तीक लेवल वर येवु नये .. तुम्हाला काही अक्षेप असतील तर नक्की सांगा .. प्रत्येकाच्या विचाराचा आदर मी नक्की करतो .. परंतु विनाकारण वयक्तीक बोलणे मला आवडत नाही ..

शमस्व

तरीही माझी कविता वाचल्याबद्दल आपले आणि सर्वांचे मनपुर्वक आभार

त्या आईची मनाची घालमेल टीपताना तिच्या भावनांना कुठला विचार स्पर्ष करतो आहे हे दाखवले आहे ..

नाही, ही घालमेल नाही. हे एका साध्यासोप्या, तर्कसुसंगत आणि फेअर* पद्धतीवर उगाच केलेले आरोप आहेत. त्याला घालमेल म्हणत नाहीत. घालमेलीचे उदाहरण हवे असल्यास शुचि यांचा लेख वाचा. त्यातील व्यक्तिरेखा मुलाला भेटण्यासाठी जात असताना तिच्या मनात जे होताना दाखवले आहे, त्याला घालमेल म्हणतात.

प्रत्येकाचे विचार करणे वेगळे तसे हे
विचार, दृष्टिकोन, भावना वेगवेगळ्या असू शकतात, वस्तुस्थिती नाही.

तरीही भावना दुखावल्या असल्यास शमस्व
नाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.

कृपया वयक्तीक लेवल वर येवु नये .. तुम्हाला काही अक्षेप असतील तर नक्की सांगा .. प्रत्येकाच्या विचाराचा आदर मी नक्की करतो .. परंतु विनाकारण वयक्तीक बोलणे मला आवडत नाही ..

इथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल? एखादा मुद्दा पटवून देताना जर दोघांनी साधारण सारखे अनुभव घेतले असल्यास आपले विचार पटवून देणे, समजावून सांगणे सोपे जाते. उदा. तुम्ही एखाद्या परदेशी माणसाला खमंग थालीपीठ म्हणजे नक्की काय ते समजावून सांगू शकत नाही. तसे मी तुम्हाला अनुभव समजावून सांगू शकत नाही, तुम्हाला आले असतील तरच काही बोलता येइल/ बोलावे लागणार नाही.

उत्तर द्यावे की नाही या मन स्थीती मध्ये होतो .. पण आपलेही मत स्पष्ट सांगणे योग्य या मुळे पुन्हा लिहित आहे (मनाविरुद्ध आहे हे ..).
आपले मुद्दे वाचले .. तुम्ही तुमचे म्हणने मांडले त्याबद्दल राग आला नाही , मात्र वाईट वाटले ..
कारण ...

"माझी मुलगी
तीच का ही ? "

अशी सुरुवात केली असल्याने .. कुठली तरी आई स्वताच्या मुली बद्दल बोलते आहे हे स्पष्ट दिसते आहे.. तरीही "समाजातील मुली " असा अर्थ येथे घेवु नये असे वाटते ...

त्यानंतर तुम्ही म्हणता की विचार, दृष्टिकोन, भावना वेगवेगळ्या असू शकतात, वस्तुस्थिती नाही.
माझे म्हनने आहे वस्तुस्थीती वेगळी असु शकत नाही का ? .. तीच्या मुलीचे लग्न लवकर होत नसेल .. आणि बघायला येणार्या लोकांच्या अनुभवाने नकोनकोसे झालेली मुलगी पाहुन त्यांना या प्रथेचाच राग येवु लागला असेल तर त्या स्वताच्या मनाशीच काय बोलत आहेत हे लिहिले तर तशी वस्तुस्थीती नसतेच असे कसे म्हणु शकता आपण ?

तुम्ही जे पुढे वयक्तीक बोलण्याचे समर्थन करताना जे लिहिले आहे की
इथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल
हे अजिबात पटले नाही, त्या पेक्षा तुम्ही वयक्तीक बोललो असल्यास पुन्हा तसे होणार नाही असे तरी सौदार्ह्य दाखवावयास हवे होते ..
आणि एक.. तुमच्या म्हणन्याप्रमाणे येथे जर वयक्तीक अनुभव बोलत आहोत तर तुम्ही उगाच समाजाच्या प्रथे ला मग उगाच्च का मधेय आणत आहात ???

तरीही भावना दुखवल्यास शमस्व हे लिहिले असल्यानंतर ही आपण लिहिले आहे की

नाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.

जेंव्हा एखादा माणुस त्याची चुकी नसताना नी चुकुन जरी भावना दुखावल्यास शमा मागत असेन तरीही त्याला २ शब्द ऐकावयचेच असल्यास .. आपण मुद्द्यांना धरुन नाही तर विनाकारण वाद करण्यासाठी बोलत आहात असे वाटते ..
हे आवडले नाही ..
समाजातील रुढी परंपरा आणि वस्तुस्थीती यावर बोलणार्या माणसांनी निदान ओपन बोलताना या गोष्टीचे तरी भान ठेवले पाहिजे होते असे वाटते

..
असो मला वाटते यापुढे आपणास मला काय बोलायचे/समजावयचे असल्यास आपण वयक्तीक संदेश करुन बोलावे ..
कारण व्यर्थ येथे बोलणे मला योग्य वाटत नाही ..
आणि तरीही जास्तच रुढीला मी धक्का लावला असेन तर माझा नं देतो डायरेक्ट बोला ..
असे विनाकारण ओपन्ली शब्दांचे खेळ नाही आवडत मला
माझा नं : ९९८७६७३३३२

ज्ञानराम's picture

29 Nov 2010 - 5:52 pm | ज्ञानराम

मि तुमच्याशि सहमत आहे..... कारण मि.... स्वत...या गोष्टितून गेले आहे..............

प्राजु's picture

29 Nov 2010 - 11:02 pm | प्राजु

छान आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Nov 2010 - 11:10 am | अविनाशकुलकर्णी

ये मिपा. है गणेशा...मिपा...

कविता छान आहे... आणि खरी आहे........

तुम्ही जे पुढे वयक्तीक बोलण्याचे समर्थन करताना जे लिहिले आहे की
इथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल
हे अजिबात पटले नाही, त्या पेक्षा तुम्ही वयक्तीक बोललो असल्यास पुन्हा तसे होणार नाही असे तरी सौदार्ह्य दाखवावयास हवे होते ..

पतुम्हाला माझे म्हणणे कळले नाही आणि मी यापेक्षा स्पष्ट करू शकत नाही. प्रत्येक वेळेला वैयक्तिक म्हणजे वाईट असे नसते.

तरीही भावना दुखवल्यास शमस्व हे लिहिले असल्यानंतर ही आपण लिहिले आहे की
नाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.
जेंव्हा एखादा माणुस त्याची चुकी नसताना नी चुकुन जरी भावना दुखावल्यास शमा मागत असेन तरीही त्याला २ शब्द ऐकावयचेच असल्यास .. आपण मुद्द्यांना धरुन नाही तर विनाकारण वाद करण्यासाठी बोलत आहात असे वाटते ..
हे आवडले नाही ..
समाजातील रुढी परंपरा आणि वस्तुस्थीती यावर बोलणार्या माणसांनी निदान ओपन बोलताना या गोष्टीचे तरी भान ठेवले पाहिजे होते असे वाटते

आपण इथे तुम्ही मांडलेल्या विचारांबद्दल बोलत आहोत. भावना दुखावणे आणि क्षमा मागणे याचा इथे संबंध नाही. उगाच वेळ आणि बँडविड्थ वाया घालवण्यापेक्षा मुद्द्याचं बोलूया असे मला वाटते.

आणि एक.. तुमच्या म्हणन्याप्रमाणे येथे जर वयक्तीक अनुभव बोलत आहोत तर तुम्ही उगाच समाजाच्या प्रथे ला मग उगाच्च का मधेय आणत आहात ???
शेवटी आलात मुद्द्यावर एकदाचे. तुमच्या कवितेत "वैयक्तिक गोष्टीत सर्वमान्य आणि फेअर* पद्धतीला मध्ये" आणण्यात आले आहे आणि त्यावर दोषारोप झाले आहेत. त्याला माझा आक्षेप होता. तुम्हीच आता तसे म्हणत आहात म्हणजे तुम्हालाही पटल्याचे दिसते. विषय संपला.

Bhakti's picture

4 Jul 2021 - 8:59 pm | Bhakti

आज पुन्हा वाचली
मुलीच्या आईच्या मनातील घालमेल आजही तशीच आहे.काळ बदलला तरी कोणत्याही पिढीतली आई तशीच असते.
सध्या एक काकू अशाच कायम फोन करतात, दोन मुली आहेत, हुशार आहेत पण दिसायला,वागायला खुप साध्या आहेत.मला त्यांचं councilling कर सांगतात.मी काकूंची काळजी समजू शकते.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा

आईची काळजी व्यक्त करणारी साधी सोपी सुंदर कविता.
लग्न या विषयावर आपली आपल्याला उपाय योजना सापडत नसेल तर जनरितीप्रमाणेच लग्न करणे भाग पडते.
अर्थात वस्तू प्रमाणे बाजारात प्रदर्शन करणे मुलींसाठी नापसंतीचे, आणि हे प्रदर्शन वारंवार करावे लागत असेल तर क्लेशदायकच !
आजकाल यावर "कॉफी शॉप" भेट असे काही प्रयोग होताना दिसतात !
काही मोजके अनुभव वाईटही असतील पण बहुतांशी लग्ने या "दाखवणे-पाहणे" या पारंपारिक सिस्टिमने होतात, लोक आयुष्यात सेटल होतात.
ही सिस्टीम कोण कशी एक्सप्लॉईट करतो या वर यश अवलंबून आहे.