नीलहंस यांची 'उभी भिंत डागाळलेली छताशी' ही भेदक कविता वाचून आमच्या डोळ्यांसमोर वेगळेच रंगीत चित्र उभे राहिले! ;)
किती रंगल्या पानपिंका मुखाशी, खुजे देव भिंतीवरी मांडलेले
उभी भिंत डागाळलेली मुळाशी, वळे ना कधी पोळ निर्ढावलेले
कुठे कनवटीचीच काढून चंची लावीत तांबूल होते सुखाने
कुठे चार लुंग्या वरी-सावरुनी जणू रंगवीती सडका रसाने
कळकून गेली दशा फत्तराची वहाती पुटे सोबतीला रसीली
दिशा कोंदल्या, सूचना फाटलेल्या आणि एक गोळी जिभेखालि गेली
मुखी राहतो ओरडा फक्त आता, कधी हासती हे मलाही नव्याने
तरी शोधतो, मोजतो मी तरीही - पुरावे किती ठेवले कोडग्याने
चतुरंग
प्रतिक्रिया
23 May 2008 - 7:15 am | अरुण मनोहर
चतुरंगा किती विदारक चित्र रंगवलेस!
>> किती रंगल्या पानपिंका मुखाशी, खुजे देव भिंतीवरी मांडलेले
ही दशा आणणार्यांचे थोबाड रंगवता आले पाहीजे.
देव देखील खुजे भासतात ही समस्या सोडवायला!
अवांतर>>> ही समस्या फक्त भारतातच नाही. तैवान सारख्या समृद्ध देशात औफिसेस मधे पण हा गचाळ रंग पहायला मिळतो.
23 May 2008 - 8:56 am | विसोबा खेचर
कुठे कनवटीचीच काढून चंची लावीत तांबूल होते सुखाने
कुठे चार लुंग्या वरी-सावरुनी जणू रंगवीती सडका रसाने
वा! मस्त रे रंगा... :)
आपला,
(निवांतपणे तांबूल लावणारा) तात्या.
23 May 2008 - 9:02 am | बेसनलाडू
फार आवडले. चित्रदर्शी आहे ;)
(प्रेक्षक)बेसनलाडू
23 May 2008 - 9:41 am | केशवसुमार
रंगाशेठ,
जबर्या
फार आवडले. चित्रदर्शी आहे ;)
(प्रेक्षक)केशवसुमार
23 May 2008 - 10:00 am | चेतन
वास्तवदर्शी विडंबन. आवडलं
अवांतरः दशा फत्तराची मधील फत्तरचा अर्थ कायं ?
23 May 2008 - 4:20 pm | चतुरंग
चतुरंग
26 May 2008 - 8:25 am | आजानुकर्ण
रंगराव, रंगीत विडंबन आवडले.
(तांबूलभक्षक) आजानुकर्ण
26 May 2008 - 8:07 pm | चतुरंग
चतुरंग