नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी.
- डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले.
- एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना.
- तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
- फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं.
- डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते.
- डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात.
- पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत.
- पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.
- तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात.
- डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात.
- रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
प्रतिक्रिया
13 Oct 2010 - 12:35 pm | छोटा डॉन
२ प्रश्न आहेत.
१. मिपावर स्वतःचा आयडी रद्द करुन घेण्याची प्रोसिजर काय आहे ?
२. मिपावर दुसर्याचा आयडी रद्द करण्याची मागणी करण्याची प्रोसिजर काय आहे ?
तज्ज्ञांनी योग्य तो प्रकाश टाकावा.
धन्यवाद
- छोटा डॉन
13 Oct 2010 - 1:20 pm | रन्गराव
डॉन्राव, तुमच्या नावावर धागा काढून लोकांनी तुमचा महत्वच सिद्ध केल आहे. " they might not love you or hate you. But they can't ingore you for sure!" प्रसिद्धी झोताचा आनंद लुटा. टीका व्हायला ही काही तरी लायकी लागते. माप निघायला आधी काही तरी असावा लागता. मी मिपा वर नवीन असल्यामुळे आपणाबद्दल जास्ती माहीती नव्हती. पण आता उत्सुकता लागून राहिली आहे जाणून घ्यायची. आहे की नाहे फायदा? कवी साहेब धागा काढल्याबद्दल धन्यवाद ;)
13 Oct 2010 - 2:12 pm | llपुण्याचे पेशवेll
कडवींच्या नावातला ड सायलंट आहे माहीत नव्हतं. :)
13 Oct 2010 - 2:18 pm | रन्गराव
"कवी" मध्ये ड सायलेंट असतो हे मला पण माहित नव्हत ;)
13 Oct 2010 - 2:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव, द छोटा संपादक यांच्याबद्दलच्या धाग्यात तुम्ही दोघांनी आमचे पूज्य गुर्जी श्री.श्री. पूजावाले घासकडवी यांच्याबद्दल लिहून अवांतर करू नये अशी विनंती.
(डान्रावांची राको आणि गुर्जींची लेको)
13 Oct 2010 - 12:37 pm | Nile
डान्रावांच्या केसाला झिरो मशीन लावले की ते मशीन फेकुन द्यावे लागते कारण त्याची धारच जाते.
डान्रावांच्या किबोर्डावर प्रत्येक बटन ५ वेळा आहे, कारण त्यांच्या टंकायच्या वेगासाठी एक बटन वापरुच शकत नाही.
13 Oct 2010 - 10:08 pm | ब्रिटिश टिंग्या
डानरावांचे बिग बॉसच्या घरात आगमन होते........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुढच्या दिवशी सकाळी स्पीकरवरुन घोषणा होते...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डानराव चाहते है की बिग बॉस कन्फेशन रुम मे आ जायें!
13 Oct 2010 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
13 Oct 2010 - 12:39 pm | Nile
डान्रावांसाठी कुठलाच स्पेलचेकर काम करत नाही, कारण एक शब्दातील चुक शोधेपर्यंत मेगाबाईटी प्रतिसाद टंकुन झालेला असतो.
डान्रावांचा एक केस एका वादळात तुटुन उडाला तर तीन दिवस बंगळुरात अंधार होता.
14 Oct 2010 - 7:07 am | नंदन
निळोबा आधी चमत्कारांच्या विरोधात होते. मग त्यांची डान्रावांशी भेट झाली.
14 Oct 2010 - 7:39 am | प्रभो
=)) =)) =)) =)) =))
13 Oct 2010 - 12:40 pm | केशवसुमार
लेख आहे.. अजून पंच यायला हवे होते..चोता दोन यांच्या कर्तुत्वाच्यामानाने पंच कमी वाटले..
-तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
ही दोन्ही वाक्यापैकी एकच शक्य आहे असे वाटले..
रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत... हे हुच्च आहे..
बाकी चालू दे..
13 Oct 2010 - 12:42 pm | Nile
एकदा चुकुन डान्रावांच्या केसाने शॉर्टसर्कीट झाले तर भारतातील एक आख्खी ग्रीड कोसळली.
तुम्ही डान्रावांबद्दल ही एक ओळ वाचेपर्यंत डान्रावांनी एक आख्खे संपादकीय (ते ही कानडीत) टंकुन झालेले असेल.
13 Oct 2010 - 12:42 pm | Pain
हाहाहा :D
13 Oct 2010 - 12:45 pm | Nile
दोन वर्षांपुर्वी गुगलने डान्रावांच्या केसांत लपवलेला फुटबॉल शोधायची मोहिम हाती घेतली, शोध अजुन सुरुच आहे.
14 Oct 2010 - 6:55 am | मिसळभोक्ता
वाल्डो ही डानरावाच्या केसात शिरलेली ऊ आहे.
14 Oct 2010 - 7:39 am | गांधीवादी
असहमत,
वाल्डो नाही गॉडजिला.
13 Oct 2010 - 12:46 pm | मस्त कलंदर
गल्लत होते आहे..
डॉनरावांच्या केसांत मुंबईचे एका दिवसाचे वडे तळून होतील इतके तेल असते!!!
13 Oct 2010 - 12:47 pm | Nile
दुसर्या महायुद्धात जपान-जर्मनी हरले कारण त्यांनी अॅटम बाँब चुकुन डान्रावांच्या केसात फोडला.
13 Oct 2010 - 12:51 pm | Nile
पुर्वी निबंध स्पर्धेत किती ओळी/पानं/शब्दं असावेत असा नियमच नव्हता, पण एक दिवस डान्रावांनी स्पर्धेत भाग घेतला.
13 Oct 2010 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll
खल्लास. :)
13 Oct 2010 - 1:09 pm | नंदन
जबरी!
13 Oct 2010 - 2:08 pm | नगरीनिरंजन
हे मुक्ताफळ लईच जबर्या झालं.
13 Oct 2010 - 6:37 pm | प्रभो
बाजार उठला रे.. =)) =)) =))
13 Oct 2010 - 12:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
-- प्रकाशाचा वेग कोणीही पार करू शकत नाही, पण डान्राव बोलायला आणि/किंवा टंकायला लागले आणि जनरल रिलेटीव्हीटी खोटी ठरली.
15 Oct 2010 - 3:20 am | राजेश घासकडवी
प्रत्येक कणाच्या, अवकाशाच्या, काळाच्या लघुत्तम पातळीला गेलं की विश्व धाग्यांनी बनलेलं आहे असं स्ट्रिंग थिअरी सांगते - ते धागे दुसरं तिसरं काही नसून डान्रावांचे केस आहेत. ते २७ डायमेन्शन्समध्ये कर्ल झालेले आहेत. जनरल रिलेटिव्हिटीचं काय घेऊन बसली आहेस?
13 Oct 2010 - 1:02 pm | सहज
डोनराव एकदा भराभरा बोलू लागले तर नासावाल्यांनी त्या दिवशी आवाजाचा वेग प्रकाशापेक्षा जास्त मोजला! मग डोन्राव दात घासुन हसले प्रकाशाचा वेग पूर्ववत झाला.
डोन्रावांनी एकदा केस कापले ते तिरुपतीच्या एक आठवड्याच्या कलेक्शनपेक्षा जास्त भरले.
13 Oct 2010 - 12:59 pm | नावातकायआहे
डान्रावांच्या मशिनला किबोर्ड फु़कट बदलुन मिळतात कारण किबोर्ड Distruction Testing साठी आणलेले असतात.
13 Oct 2010 - 1:01 pm | अवलिया
आमचे परममित्र डान्राव यांचा बाजार उठलेला पाहुन डोळे पाणावले. असो.
आमची भर - कॅम्लिन कंपनी काळी शाई करतांना डान्रावाच्या रंगाशी तुलना करुन काळा रंग जमला की नाही ठरवते.
13 Oct 2010 - 1:01 pm | llपुण्याचे पेशवेll
-डानराव तोंडाने टंकतात.
13 Oct 2010 - 1:32 pm | मराठमोळा
>>डानराव तोंडाने टंकतात
टंकतात ऐवजी, थुंकतात असे वाचले... =))
मला वाटलं, असेल ब्वॉ, थुंकुन पण एखादा मेगाबायटी प्रतिसाद तयार होत असेल..
13 Oct 2010 - 1:03 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रत्येकाची नाडीपट्टी कशी अस्तित्वात असू शकेल? हा प्रश्न त्या डॉनरावांनी टंकल्या आहेत हे कळल्यावर निकाली निघाला.
13 Oct 2010 - 1:03 pm | Nile
जगातील सर्वात बेस्ट फिशिंग नेट्स डान्रावांच्या केसांपासुन बनतात. त्या नेट्स बनवणारी कंपनी बंदच पडली, कारण एकदा नेट घेतलेल्या गिर्हाईका पुन्हा नेट विकत घेण्याची वेळच आली नाही.
13 Oct 2010 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगायायाया ... पारच बाजार ... ;-)
13 Oct 2010 - 5:15 pm | पर्नल नेने मराठे
दॉन्याची पॉलीईथिलिन न पॉलीप्रोपिलिन बनवण्याची फॅक्टरी आहे. दॉन्याचे गळणारे केस हे प्रोसेस करुन केसातुन पॉलीईथिलिन न पॉलीप्रोपिलिन मिळते व ते नेट बनवणार्याना रॉ मटेरिअल म्हणुन विकले जाते.
13 Oct 2010 - 1:07 pm | मराठमोळा
ठ्ठो!!!
गुर्जी, ह. ह. ह. पु. वा.
=)) =))
मला वाटलं होतं की बिग बेसिनमधली झाडे मोठी आणि लांबलचक आहेत, डॉनरावांचे प्रतिसाद त्याहुन मोठे आणि लांबलचक असतात हे विसरलो होतो. ;) तिथल्याप्रमाणेच फादर ऑफ द प्रतिसाद्स असा मान सर्वात मोठ्या प्रतिसादाला मिळायला हवा.. =)) =))
13 Oct 2010 - 1:12 pm | Nile
समुद्रमंथनाच्यावेळी वसुकी(?) नाग वापरला ही एक मोठी गैरसमजुत आहे, खरं तर ती डान्र्वांची एक बट होती.
13 Oct 2010 - 1:22 pm | मस्त कलंदर
ठ्ठोssssssssss
13 Oct 2010 - 1:15 pm | कानडाऊ योगेशु
एकाच म्यानात दोन तलवारी (डॉन तलवारी असे वाचावे) राहु शकणार नाहीत असे डानरावांनी रजनीकांतला बजावले.रजनीकांत गपगुमान आपले चंबुगबाळे आवरुन तामिळनाडुत गेला.
13 Oct 2010 - 1:17 pm | Nile
'तुम मेरा एक बाल भी बाका नही कर पाओगे' ही म्हण डान्रावांच्या केसांमुळेच निर्माण झाली.
13 Oct 2010 - 1:22 pm | Nile
डान्रावांचा पत्ता गुगलमॅप दाखवुच शकत नाही कारण त्यांचे केस आख्खी पृथ्वी व्यापुन उरतात.
13 Oct 2010 - 1:31 pm | आदिजोशी
१.
डान्रावांना दारू चढत नाही, डान्राव दारूवर चढतात.
२.
डान्राव सिगारेट ओढत नाहीत. सिगारेट स्वतः डान्रावांच्या ओठात येते.
३.
डान्राव गजर वाजल्याने उठत नाहीत. डान्राव उठल्याचे पाहून गजर वाजतो. (दुपारी २-३ वाजता वगैरे)
४.
डान्राव कपडे घालत नाहीत. त्यांच्या बॉडीला घाबरून लोकंच त्यांच्यावर कपडे चढवतात.
५.
डान्राव अंघोळ करत नाहीत. पाणीच त्यांच्यावरून घसरून स्वत:ला स्वच्छ करून घेतं.
६.
डान्रावांनी कुणाला पटवलं नाही. कारण डान्रावांचं पटेल असं जगात कुणीच नाही.
७.
डान्रावांनी उपास केल्यास जगभरातल्या गरीबांना पुरेल इतकं अन्न उरतं. आणि कमी दारू पहिल्यास कंपन्यांचा शेअर्सचा भाव पडतो.
८.
डान्राव नोकरी करत नाहीत. कंपनीला डान्रावांनी नोकरी दिली आहे.
९.
डान्राव भांग पाडत नाहीत. कारण त्यांचे केस सरळ करेल इतका मजबूत कंगवाच नाही.
१०.
डान्राव लवकरच लग्न करणार आहेत. अनेक मुलींचे पालक निश्वास सोडणार आहेत.
.
डान्राव हमारा नेता है, सबका..................................
13 Oct 2010 - 1:34 pm | मराठमोळा
=)) =))
कहर झाला... फुटलो पार...
बाजार...... =)))
13 Oct 2010 - 1:35 pm | सुहास..
अॅड्याSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS!!
कहर आहेस ! (ईथे एक साष्टांग दंडवत घालणारी स्मायली कल्पावी.)
13 Oct 2010 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅड्या, लै भारी रे!!
कहर आहे हा!
13 Oct 2010 - 2:20 pm | टुकुल
अॅड्याआआआआआअ, लेका काय हे? कस सुचत?
चोता दोनची बिना पाण्यानी सुरु आहे :-)
--टुकुल
13 Oct 2010 - 1:33 pm | Nile
पुढे रशियाने त्रास दिला तर न्युक्लीअर बाँब ऐवजी डान्रावांनाच रशियावर सोडणार आहेत.
13 Oct 2010 - 1:34 pm | Nile
अमेरीकेत हॅलोवीनला डान्रावांच्या केसांच्या स्टाईलची कॉपी करतात.
13 Oct 2010 - 1:40 pm | Nile
भारतीय उत्खनन संस्थेला गेल्या वर्षी जगातील सर्वात लांब मुळ सापडले, नंतर कळाले की तो डान्रावांचा गळालेला केस होता.
13 Oct 2010 - 2:26 pm | सहज
पतंग काटाकाटी चँपीयनशीप मधे विजेत्या स्पर्धकाचे रहस्य - मांजा म्हणुन डोन्रावांचे गळलेले केस वापरले होते!
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, क्रिकेटमधे बॉल टँपरिंग टाळण्याकरता, चेंडूची शिवण आता डॉनरावांच्या केसाने शिवली जाणार आहे.
13 Oct 2010 - 1:43 pm | गांधीवादी
सर्वात जास्त वेगाने प्रतिक्रिया आलेला धागा.
डॉन राव जितक्या वेगाने प्रतिक्रिया लिहितात, त्याच्या पेक्षा जास्त वेगाने त्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया येतात.
13 Oct 2010 - 1:45 pm | Nile
जपान ते इंग्लड अशी समुद्राखालुन ऑप्टीक फायबर जेव्हा घालायची होती तेव्हा मोजणी साठी डान्रावांचा एक केस वापरण्यात आला. पण ऑप्टीकफायबरची लांबी फक्त २८ हजार किमी असल्याने त्यांना शेवटी डान्रावांच्या केसाचे अनेक तुकडे करुन लहानसा तुकडाच पुरला.
13 Oct 2010 - 1:49 pm | छोटा डॉन
चालु द्यात तुमच्या गमजा ...
पाहिन पाहिन आणि एक दिवस ... ( बाकी तुम्हाला आमच्या पावर माहित आहेतच ) ;)
असो, हुच्च धागा आहे !
ह्यातल्या प्रत्येक प्रतिसादाची मी ( डॉन, डॉन्राव आदी शब्द वगळुन ) मज्जा घेतली आहे.
- छोटा डॉन
13 Oct 2010 - 1:55 pm | वाहीदा
डॉनराव तुम्ही तुमच्या आयाळ / केसांसाठी कुठ्ला तेल , शैम्पू वापरता ??
केसगळती वर काही घरगुती उपाय सांगणार का ??? ;-)
त्यावर एखादा धागा टाका ना प्लीज
13 Oct 2010 - 2:01 pm | ब्रिटिश टिंग्या
डानरावांचे केस इतके लांब आहेत की नुकतेच त्यांना तेल लावता लावता डानराव बंगळुरातुन पुण्यात येऊन पोहोचले आणि इथलेच झाले :)
13 Oct 2010 - 2:05 pm | Nile
एकदा डान्रावांनी "न्हायचं" मनावर घेतलं अन जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण झाला.
13 Oct 2010 - 2:07 pm | आदिजोशी
(तिच्यायला ही क्रमशःची सवय लई बेकार बघा. असो.)
.
११.
डान्राव बंगळूरात राहत नाहीत. डान्राव राहतील त्या शहराचं बंगळूर होतं.
१२.
डान्राव बार मधे जात नाहीत. डान्राव जातील त्या जागेचा बार होतो.
१३.
डान्राव डेटींग करत नाहीत. कारण डान्रावांना तोडीस तोड एकच व्यक्ती जगात आहे - खुद डान्राव.
१४.
डान्राव कात्रीने केस कापत नाहीत. डान्राव केसाने कात्री कापतात.
१५.
डान्रावांच्या केसात उवा नाहीत. उवांच्या केसांत डान्राव आहेत.
१६.
डान्राव साबण वापरत नाहीत. कारण डान्रावांच नुस्तं नाव ऐकून पाण्यालाच आपोआप फेस येतो.
१७.
डान्रावांना स्वप्न पडत नाहीत. स्वप्नांना डान्राव पडतात.
१८.
डान्राव कधीच ओरडत नाहीत. कारण डान्राव कधीच "रडत" नाहीत.
१९.
डान्राव रात्री झोपत नाहीत. डान्राव झोपले की रात्र होते.
२०.
डान्राव ह्यांव डान्राव त्यांव डान्राव म्हणजे ट्यांव ट्यांव
.
डान्राव हमारा नेता है, सबका..................................
13 Oct 2010 - 2:20 pm | सुहास..
अॅड्या ,
मारशील लेका हसवुन !!
13 Oct 2010 - 2:23 pm | टुकुल
>>डान्राव ह्यांव डान्राव त्यांव डान्राव म्हणजे ट्यांव ट्यांव <<
हे सर्वात बेस्त
--टुकुल
13 Oct 2010 - 2:11 pm | विजुभाऊ
डान्रावानी त्यासाठी एक ऑईल कंपनी सुरु केली.
13 Oct 2010 - 2:19 pm | नगरीनिरंजन
माझीही उगीचच काही भर...
१. डान्रावांच्या एका प्रतिसादातल्या अक्षरांची पुनर्रचना केली तर त्यातून चारी वेद आणि महाभारत, रामायण वगैरे काव्य लिहून काही अक्षरं उरतात.
२. डान्राव लेखन करणार असतील त्यादिवशी इतर लोकांसाठी लोडशेडींग असते.
13 Oct 2010 - 2:20 pm | विजुभाऊ
केसांच्या बाबतीत रजनीकांतला गरीबांचे छोटे डॉन असे म्हणतात
13 Oct 2010 - 2:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वच बाबतीत रजनीकांतला गरीबांचा छोटा डॉन असे म्हणतात.
13 Oct 2010 - 2:23 pm | केशवसुमार
13 Oct 2010 - 3:02 pm | ब्रिटिश टिंग्या
>>डॉनराव पँन्टीला सस्पेंडर लावत नाहीत ते त्याच्या एवजी स्वतःच्या बटाच वापरतात
डानराव पँटी घालतात?
13 Oct 2010 - 3:05 pm | राजेश घासकडवी
त्यांच्या मजबूत बटांमुळे त्यांच्या पॅंटी जागेवर घट्ट राहातात...
13 Oct 2010 - 5:42 pm | सुहास..
त्यांच्या मजबूत बटांमुळे त्यांच्या पॅंटी जागेवर घट्ट राहातात >>>
चुकुन बटांमुळे एवजी 'बटाट्यांमुळे' वाचल ना गुर्जी ..ठ्या करुन फुटलो![](http://l.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/24.gif)
14 Oct 2010 - 11:19 am | विजुभाऊ
डानराव पँटी घालतात?
टिंग्या तू बर्रोब्बर ओळखलस रे .... डान्राव प्यान्ट घालतात
अर्थात ते जे कपडा घालतात त्याला प्यान्ट म्हणतात
14 Oct 2010 - 11:22 am | नगरीनिरंजन
गल्लत होतेय.
14 Oct 2010 - 3:02 pm | केशवसुमार
चोता दोन हे विजुभौ चे खास मित्र आहेत.. ;)
13 Oct 2010 - 2:25 pm | नंदन
१. डान्राव चेल्सीला पाठिंबा देत नाहीत. खुद्द रोमन अब्रामोविच आणि चेल्सी डान्रावांना सपोर्ट करतात.
२. डान्रावांमुळेच कानडीत 'विविक्षित' आणि 'गल्लत' ह्या दोन शब्दांची भर पडली आहे.
३. गिरीश कुबेर आणि शिरीष कणेकर ह्या दोन लेखकांची कारकीर्द डान्रावांमुळे घडली आहे.
13 Oct 2010 - 2:32 pm | नगरीनिरंजन
३. डान्राव आपल्या एका प्रतिसादाचे दोन तुकडे करून दोन घाग्यांवर मारतात ते पाहूनच रजनीकांत बंदुकीच्या गोळीचे दोन तुकडे करुन मारायला शिकला.
13 Oct 2010 - 2:39 pm | छोटा डॉन
खास इथे भरभरुन लिहणार्या आमच्या काही मित्रांसाठी आमचेही २ कोट्स :
१. लोकांना भले मोठ्ठे प्रतिसाद लिहण्यासाठी काही मिनिटे लागत असतील तर तेच प्रतिसाद उडवायला डॉन्रावांना काही सेकंद पुरतात.
२. मिपावरचे सदस्यत्व मंजुर होण्यासाठी कदाचित काही आठवडे लागत असतील पण डॉन्राव तेच अॅक्टिव्ह सभासद काही क्षणातच ब्लॉक करु शकतात.
बाकी चालु द्यात ;)
- छोटा डॉन
13 Oct 2010 - 2:47 pm | ऋषिकेश
आयला काय खत्तरनाक धागा आहे. डॉनयज्ञात आमच्याही समिधा:
१. दोन नवी पुस्तके येत आहेत: "हा (केसांच्या) तेलाचा इतिहास आहे" आणि "एका केसियाने"
२. दोन नव्या कविता येत आहेतः "न्हालेल्या ह्या डॉनरावसम..." आणि "ह्या केसांच्या रंगकोशी.."
३. दोन नवे चित्रपट येत आहेतः "केस बाय केस" आणि "पुणे-बंगळूर-पुणे एक लांबलचक प्रवास"
४. मंगळागौरीच्या गाण्यांवरही डॉनचा प्रभावः
"केस बाई केस, डॉन्याचे केस,
लांबसडक केस, तोंडास फेस...आणून सोड बाई आणून सोड"
13 Oct 2010 - 2:48 pm | गांधीवादी
डॉन राव जिथे बॉल फेकतात तिथे त्रिफळा आपोआप जातो,
डॉन राव एकदा रेल्वे रुळाच्या मध्य भागी उभे राहिले, आगगाडी डॉन रावांना भेदत पुढे गेली, आणि तिचे दोन तुकडे झाले, एक तुकडे उजवीकडे, एक डावीकडे.
डॉन राव ज्या विमानात बसतात, त्याला इंधनाची गरजच भासत नाही, डॉन राव विमानाच्या इंजिनात बसून फक्त फुंकर मारत राहतात.
डॉन रावांना एकाला मारायचे असले तर ते त्याचे सगळे अणु रेणू, प्रोटोन, nutron वेगळे करतात.
डॉन राव पाण्यात श्वास घेत नाहीत, H2O घेतात, आणि H2 सोडून देऊन फक्त O ठेवतात.
13 Oct 2010 - 3:18 pm | मनि२७
डॉनराव काय हो हे...
पार आठवडी बाजार पण उठाव्लाय तुमचा...!!
बाकी लई मज्जा येतेय वाचायला...
तसा धागा अखंडच राहील...!!! अर्थात तुमच्या कृपेने...
13 Oct 2010 - 3:19 pm | गांधीवादी
डॉन राव जेव्हा चालतात, तेव्हा खरेतर ते चालत नाहित, जमिन मागे सरकते.
13 Oct 2010 - 3:22 pm | गांधीवादी
डॉन रावांचा जन्म होन्याअगोदर इथे एक ब्लॅक होल होते. डॉन राव आल्या नंतर त्यांनी ते ब्लॅक होल दुर फेकुन दिले
13 Oct 2010 - 3:30 pm | नगरीनिरंजन
४. डान्रावांना आंघोळीला दोन टब लागतात. एका टबात ते स्वतः आणि दुसर्या टबात त्यांचे केस.
13 Oct 2010 - 3:38 pm | गांधीवादी
डान्राव जेवत नाहित, त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात.
13 Oct 2010 - 3:52 pm | गांधीवादी
डान्राव सॅटेलायीट हाताने अवकाशात फेकुन देतात, आणि ते सुद्धा इतके अचुक फेकतात कि ते बरोबर योग्य जागी जाउन स्थिर होते.
escape velocity ची गणित मनातल्या मनात करतात.
13 Oct 2010 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो!
13 Oct 2010 - 4:01 pm | छोटा डॉन
>>डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो!
तेवढे चालुन जाते हो "गांधीवादा"त, तुम्ही नका टेन्शन घेऊ राको.
13 Oct 2010 - 4:04 pm | गांधीवादी
अहो ताई, ते मनातल्या मनात पक्कि गणिते करुनच फेकतात असे मला बापड्याला सांगायचे व्हते.
(नक्कि कुठलि गणिते करतात ते माहित नाहि, मनात करतात ना)
आणि हो, त्या सॅटेलाईटच्या तुकड्याला कोणत्याहि वेगाने फेका हो, त्याची काय बिशाद आहे पृथ्वी सोडुन जान्याची. डान्रावांना तुम्हि काय नासा समजले काय ?
अपमान घोर अपमान. कुठे डान्राव आनि कुठे ते फडतुस नासा शास्त्रज्ञ.
13 Oct 2010 - 4:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
काहीही!
13 Oct 2010 - 3:55 pm | गांधीवादी
डान्राव शिंकले की कतरिना (कैफ नव्हे) वादळे येतात.
14 Oct 2010 - 11:24 am | विजुभाऊ
डान्राव शिंकले की कतरिना (कैफ नव्हे) वादळे येतात.
हा हा हा या वरून मिपाच्या एका सदस्याने केलेली " वारा ( णे ) आणि हिमवादळे अशी एक गल्लीच्छा कॉमेन्ट आठवली
13 Oct 2010 - 4:18 pm | मितभाषी
चोता दोनने केसुचे इन्जिन डिझाइनले
13 Oct 2010 - 4:19 pm | मितभाषी
चोता दोन जिथे जातात तिकदे भारनियमन होते
13 Oct 2010 - 4:55 pm | अब् क
कोन डॉन राव फोटो टाका ना अम्हालाहि दर्श् न घेउ दे!!!!!!!!!