मास्तरांची पेन्सिल स्केचेस

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
16 May 2008 - 9:33 am

इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत.
ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले...

हे काका शाहिदचे बाबा आहेत... पंकजराव कपूर

आणि हे सुबोध भावे आणि डॉ.गिरिश ओक...
अवंतिका मालिकेच्या शूटिंगला जाताना म्हटले त्यांना दाखवावीत , आणि ( त्यांना त्यांच्यावर येणारा प्रसंग कळला की काय कोण जाणे)नेमके हे दोघे तिथे नव्हतेच...
( आम्ही अवंतिकेत दोन पाच ओळींचे फुटकळ काम केले हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाही हे आम्ही जाणून आहोत, त्याबद्दल आमचे कान धरू नका आधीच सांगतोय... :) शूटिंग च्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन) )

कलाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 9:37 am | भडकमकर मास्तर

सहज's picture

16 May 2008 - 9:37 am | सहज

तुम्ही पण चित्रकार.

मला वाटते बहुतेक एक वेगळा चित्रकला विभाग निघणार मिपावर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2008 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही पण चित्रकार.

मला वाटते बहुतेक एक वेगळा चित्रकला विभाग निघणार मिपावर

असेच म्हणतो !!! :)

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 9:50 am | भाग्यश्री

अफलातून आहेत हो!! गिरीश ओकांचे सगळ्यात जास्त आवडलं, मग सुबोध भावे.. फारच छान!!

मदनबाण's picture

16 May 2008 - 9:50 am | मदनबाण

छान चित्रे आहेत.....
का ते माहित नाही पण वरील सर्वच चित्रांचे डोळे (बाहुल्या) मला जरा वेगळ्या वाटल्या.....

मदनबाण.....

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 9:54 am | भाग्यश्री

तू म्हटल्यावर मला पण जाणवलं.. बहुधा, काळ्या बुब्बुळांमधे पांढरा डॉट असतो, इथे जरा उलटं आहे म्हणून का?
पंकज कपूरच्या चित्रात कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार कशाने आणली मास्तर??

मदनबाण's picture

16 May 2008 - 9:58 am | मदनबाण

इथे जरा उलटं आहे म्हणून
बहुधा त्यामुळेच मला तसे वाटत असावे.....

मला पण गिरीश ओकांचे चित्र जास्त आवडलं.....

मदनबाण.....

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 10:03 am | भडकमकर मास्तर

कोणास ठाउक कसे असते?,.. फोटोत दिसते तसे काढायचा प्रयत्न तरी करतो ... :)

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 9:58 am | भडकमकर मास्तर

कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार
आता नक्की आठवत नाहीये...वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या, वेगवेगळी खोडरबरे वापरून पाहिली...पण जमेना...
मग एका खोडरबराला टोक काढले पेन्सिलसारखे... त्यानेच जमले असावे

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 10:06 am | विसोबा खेचर

सुंदर रेखाटने! पंकजकपूर आणि डॉ ओक यांची रेखाटने मस्तच आली आहेत!

मास्तर, आपल्याला दंडवत!

अवांतर - च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! :)

तात्या.

मनिष's picture

16 May 2008 - 12:23 pm | मनिष

च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! Smile

मी पण असेच म्हणतो. सतलज - मी तर तुझा पंखा झालोय! :)
अवांतर - अरे-तुरे चालेल ना? मला शेठ, पंत नकोसे वाटते!

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 1:39 pm | भडकमकर मास्तर

बिन्धास्त अरे तुरे कर ...
धन्यवाद...

आनंदयात्री's picture

16 May 2008 - 10:23 am | आनंदयात्री

सगळ्यात छान जमलेत .. बाकिचे पण मस्त !

मनस्वी's picture

16 May 2008 - 10:56 am | मनस्वी

गिरीश ओक आणि पंकज कपूर मस्तच.
सुबोध भावे चटकन ओळखू येत नाही.
पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते.
मास्तर.. रेखाटनांचे क्लासेस कधी सुरु करताय.. :)

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 1:45 pm | भडकमकर मास्तर

पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते.
मलाही आत्त तसेच वाटतेय... :)) :)) हो त्या फोटोमध्येही तसाच प्रकाशझोत येत होता... : ).
कसे काय जमते बुवा यांना...

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 May 2008 - 9:28 pm | डॉ.प्रसाद दाढे

पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते
:) :) नशीब नाका॑त कापूस घातल्यासारखे नाही वाटले.. :) :)

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 11:04 am | धमाल मुलगा

मास्तर....यू टू ????

पंकज 'करमचंद' कपूर आणि डॉ.ओक बढिया....

आयला, तात्याबा म्हनत्यात ते माझ्याशाठी काय चपखल बसतंय बॉ...

च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत,
की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे!

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 11:34 am | स्वाती दिनेश

अरे व्वा,मास्तर,तुम्ही सुध्दा चित्रकार तर !.. सुंदर रेखाटने!

आंबोळी's picture

16 May 2008 - 2:07 pm | आंबोळी

या दिवसात मिपावर खुपच रेखाटने येउ लागली आहेत. त्यावरुन ८ वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली.
नुकताच इंजिनीयरींगला प्रवेश घेउन मी सोलापुरला होस्टेलवर रहायला गेलो होतो. सुरवातीच्या दिवसात आसपासच्या रूम मधील सगळ्यांशी जुजबी ओळख झाली. सगळेच नविन. कॉलेजही निट सुरु झाले नसल्याने आम्ही चकाट्या पिटत ओळखी वाढवत होतो. त्यातला असाच एक मुलगा अधुन मधुन चित्रे काढून आम्हाला दाखवायचा. त्याच्या रूमपार्टनेरशी माझी समान शीले व्यसनेशु न्यायाने बरी ओळख झाली होती. तर एक दिवस मी त्याच्या रुममधे गेलो असता त्या चित्रकाराने हाक मारुन मला एक चित्र दाखवले. ते चित्र लांब टेबलावर ठेउन मी यायच्या आधी ते दोघे त्याचे रसग्रहण करत होते. मी आयताच सापडलो त्याच्या तावडीत. छातीपासुन वर एका व्यक्तीचा चेहरा स्केच केला होता. माझ्या अल्पबुध्धीला आणि कलाकारी आंधळेपणा असल्याने तो कोणत्या व्यक्तीचा चेहरा आहे हे ओळखता आले नाही. वर तो चित्रकार कुठलाही तपशील न पुरवता फक्त "कसे आहे?" येवढेच विचारत होता. कोट, टाय, गोबरे गाल यावरुन मला ते बाबासाहेबांचे स्केच वाटले. मग मी पण कौतुक सुरु केले. "वा ! सुंदर!! मस्तच काढलयस!! अगदी हुबेहुब आलय स्केच.... तू चित्रकलेच्या परिक्षा दिलेल्या आहेस का?" त्या चित्रकाराचा चेहरा माझ्या एक एक शब्दानीशी फुलत होता. डोळ्यातून कृतकृत्य झाल्याचे आणि अभिमानाचे भाव ओसांडून वहात होते. आणि त्याचवेळी मला पुढचा प्रश्न टाकायची दूर्बुध्धी झाली. "आरे पण तू बाबासाहेबांना चष्मा का नाही काढलास?". टाचणी लागून फुगा फुटावा तसा त्याचा चेहरा खरर्रकन उतरला. त्यात आगीत तेल म्हणून मागे बसलेला माझा मित्र फ्याकन हसला. "का रे? काय झाले?" परिस्थीतीची जाणीव होउन मी विचारले त्यावर "काही नाही. तू जा", येवढच तो चित्रकार तुटकपणे म्हणाला. मी तेथून सटकलो आणि माझ्या रुम मधे येउन बसलो. १० मिनीटानी तो मित्र हसत हसत रुम मधे शिरला. मला टाळी देउन म्हणाला"काय राव तू तर पारच मारून ठेवलीस त्याची. तू यायच्या आधी आम्ही त्या चित्रावरच चर्चा करत होतो. मी आगोदर लै कौतुक करुन ठेवले होते त्या चित्राचे. तू फारच मारलीस. तू गेल्यावर चित्रकार मला शिव्या देत होता की तू खोटे का बोललास? आगोदरच का नाही सांगीतलेस स्केच भंकस आलय म्हणून? असे म्हणून त्याने ते चित्र फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि खिडकीतून फेकुन दिले."
मी : आरे पण येवढे चिडायला काय झाले त्या चित्रकाराला? आणि ते चित्र नक्की कुणाचे होते?
मित्र : दिलीपकुमारचे काढल होत त्याने चित्र.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:11 pm | भडकमकर मास्तर

भावना पोचल्या... =)) =))

मनस्वी's picture

16 May 2008 - 2:14 pm | मनस्वी

:))
:))

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:09 pm | भडकमकर मास्तर

ही थोडी तिरळी वाटणारी तै कोण बरं असावी?

मनस्वी's picture

16 May 2008 - 2:13 pm | मनस्वी

मला नाही तिरळी वाटत.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:48 pm | भडकमकर मास्तर

तुम्हाला तर लगेच ओळखली की... मलाच नीट कळेना मगाशी...

ऋचा's picture

16 May 2008 - 2:11 pm | ऋचा

बिपाषा बासु

:)) :)) :))

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:12 pm | भडकमकर मास्तर

प्रियाली's picture

3 Jun 2008 - 5:16 pm | प्रियाली

आवडल्या. स्मितहास्य असलं तरी नजर काहीतरी शोधते आहे हे डोळ्यांतील भाव आणि कपाळावरील आठ्या दाखवतात.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:14 pm | भडकमकर मास्तर

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 2:21 pm | विसोबा खेचर

माफ करा मास्तर, परंतु कुसुमाग्रज अंमळ कॉमिकच दिसताहेत! :))

आपला,
तात्याग्रज.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:36 pm | भडकमकर मास्तर

;) ;)

ऋचा's picture

16 May 2008 - 2:14 pm | ऋचा

मास्तर तुमी तर लै भारी निगाले की वो!!!!!!!!!!

=D>

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:15 pm | भडकमकर मास्तर

हा पोरगा बराच बरा जमलाय असं मला वाटतंय..

छोटा डॉन's picture

16 May 2008 - 6:23 pm | छोटा डॉन

आरारा ... अरे माझे चित्र !!!
अहो भडकमकर मास्तर, खरं सांगा आपण कधी भेटलो होतो का ?
अगदी हुबेहुब "मीच की तो " ...

अशेच वाढलेले केस, चेहर्‍यावर सदा हास्य आता फक्त एक स्टायलीश चष्मा चढवा म्हणजे झाले ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 2:18 pm | धमाल मुलगा

आबाबाबाबाबा.....

येक म्हराठी नाटकं करणारा, चित्रकार असलेला, 'डेंटल सर्जन' ? ओ मास्तर, च्यायला, एकदा नीट वाचून बघा ही ओळ...आम्हाला वाचायला पण झेपत नाय, तुम्हाला एव्हढं सगळं करायला कसं जमतं हो?

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:46 pm | भडकमकर मास्तर

बास काय? इव्हेन्ट मॅनेजमेंट करायला घेताय काय आमची?
...
संवाद...
" कसं काय बुवा जमतं तुला हे?
खरंच हे लोकांपुढे आलं पाहिजे...
आपण प्रदर्शन लावूयात का? तू बोलूच नकोस्..लावूयातच...
मस्त मोठ्या कलादालनात लावू...
बघायला रांगा लागतील रांगा...
पेपरा बिपरात छापून आणू...तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्‍या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात.......
एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ...
हुसेन बिसेनला बोलवू, त्याच्या हस्ते तुझा सत्कार करू... तो नको म्हणतोस? बरं.... अरे पण तो आला तर पब्लिसिटी केवढी मिळेल...
काही विचार करू नकोस, तू सगळं माझ्यावर सोड...
तू प्रसिद्ध चित्रकार झालासच म्हणून समज..."
.........

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 3:28 pm | धमाल मुलगा

आम्हीच सापडलो परत!

=))

बाकी ही प्रदर्शनाची कल्पना मस्त आहे ;) गर्दी खेचायला 'बुश,लिंकन,उंट,कुत्रा आणि थांब लक्ष्मी कुंकू लावते' चा एक अंक फुकट दाखवू...तेव्हढीच त्या नाटकाची पण जाहिरात होईल.

तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्‍या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात.......

=)) =))
जब्बरान् !!!! च्यायला, काय भारी दिसेल नै?

हुसेन बिसेनला बोलवू,

हॅट्ट....ते थेरडं माझ्या समोर जरी आलं ना तर नागडा करुन वेताच्या ओल्या फोकानं सडकून काढेन त्याला..सीतामाई आणि बजरंगबलीची नागडी चित्रं काढतंय, दळभद्री सालं.

बाकी आपण इव्हेंट एकदम झकास जमवू....त्याची काळजी नको..मागं रंगपंचमीला राजुआन्ना शेट्टी भेटला होता, त्याला सांगून आपण गावभर फलक पण लावून टाकू...एकदम जंक्शान करु पोग्रॅम....तेव्हढं.....१,५१,०००/- चेक धाडून द्या हापिसात म्हणजे लागतो लगेच तयारीला ;)

-(इव्हेंट म्यानिजर) ध मा ल.

ऋचा's picture

16 May 2008 - 2:18 pm | ऋचा

is he lionardo dicaprio ???? :W

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:23 pm | भडकमकर मास्तर

होय होय, लिओ आहे तो

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:19 pm | भडकमकर मास्तर

घड्या पडून आणि डाग पडून थोडं खराब झालेलं चित्र... या तै कधी पसरट चेहर्‍याच्या वाटतात, कधी बरोबर चेहर्‍याच्या दिसतात.....

मदनबाण's picture

16 May 2008 - 5:34 pm | मदनबाण

ओ मास्तर जबरदस्त की हो !!!!!
एका पेक्षा एक.....
दात तर फारच सुरेख आले आहेत या चित्रात.....

मदनबाण.....

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 5:45 pm | भडकमकर मास्तर

दात काढताना ( ! ) मी विशेष काळजी घेतो.... :)) :)) :))

मदनबाण's picture

16 May 2008 - 6:09 pm | मदनबाण

दात काढताना ( ! ) मी विशेष काळजी घेतो....
=)) =)) =)) =)) =))

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:22 pm | भडकमकर मास्तर

हा भौ कॅसेट कव्हर वरून डायरेक्ट चितारलाय...

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 2:24 pm | भडकमकर मास्तर

सिनेमा पहायला सारख्या कानला जाणार्‍या ताई...

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 2:26 pm | भाग्यश्री

:| याला टॅलंट म्हणायचं की काय म्हणायचं आता.. बोलती बंद केलीत तुम्ही!! मला तरी एकाही चित्रात खोड काढावी असे काहीही दिसले नाही.. अमेझिंग पर्फेक्शन ! मानलं!

तिमा's picture

16 May 2008 - 4:01 pm | तिमा

तुमी तर जबरी कलाकार अहात म्हना की. लाईकनेस मधे मास्टर! पन् खरं सांगू ? कल्पनेतून चित्रं काढणारा खरा ! कापी करनं दुय्यम! तवा तुमची मेम्री ड्राईंग दाखवा राव!

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 5:27 pm | भडकमकर मास्तर

कल्पनेतून चित्रं काढणारा खरा ! कापी करनं दुय्यम!
खरं बोललात..
ही कॉपी काय कोणीही एका चित्रावर जरा ३ - ४ तास कष्ट केले तर करू शकतो...
तवा तुमची मेम्री ड्राईंग दाखवा राव
.. आपण मेमरी ड्रॉईंग केलेच नाही कधी..मला माणसांची चित्रे लै आवडतात... फोटोवरून काढायला... त्यात लाईकनेस जमला की बेष्ट वाटते....
जे आवडतं ते करत बसतो... सध्या अँड्र्यू लूमिस नावाचा कोणी एक बाबा होता त्याने फिगर ड्रॉईंग वर पुस्तक लिहिलंय ते जालावर सापडले त्यावरून फिगर ड्रॉइंग शिकतोय, सराव चालू आहे...
..पण पोर्ट्रेट ची मज्जा नाय ना राव त्यात...

गणपा's picture

16 May 2008 - 4:05 pm | गणपा

मास्तर एका पेक्षा एक वरचढ रेखाटने.

आणि मिपा वरची सगळी रेखाटन पाहुन वाटते की एक से बढकर एक रेखाटनकार.
काँपिटिशन भलतीच रंगली आहे.
लगे रहो........

चतुरंग's picture

16 May 2008 - 4:43 pm | चतुरंग

जबराट चित्रे!
पंकज कपूर, गिरीश ओक आणि डि कॅप्रिओ एकदम फिट्ट!
किरण बेदी आणि कुसुमाग्रज यांचा लाइकनेस चांगला आलाय.

(स्वगत - मास्तुरे, बाकी हातात जादू आहे हो तुमच्या! कोणा चित्रकार पेशंटला दाखवू नका, नाहीतर काँपिटिशन आली म्हणून तुमच्यावर 'दात धरायचा'! ;))

चतुरंग

शितल's picture

16 May 2008 - 4:53 pm | शितल

तुम्ही तर अफलातुन माणुन आहात, मान गये उस्ताद आपको.
स्केचेस ही सही आहेत.

वरदा's picture

16 May 2008 - 5:26 pm | वरदा

कुठे असता तुम्ही मास्तर
येऊन पायाशी लोटांगण घालावं म्हणते...काय सह्ह्ही आहेत सगळीच चित्र..मला सगळ्यात जास्त ऍश आवडली......

ते तात्याबा म्हनत्यात ते माझ्याशाठीबी काय चपखल बसतंय बॉ.......

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 5:47 pm | भडकमकर मास्तर

हे शेवटचे..

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 6:05 pm | धमाल मुलगा

आर्रतिच्या...

समोर बसवून काढलं की काय हे रेखाचित्र?
बेष्ट..बेष्ट!

चांगलेच छुपे 'रुस्तुम-ए-हिंद' निघाला की मास्तर तुम्ही!

मनस्वी's picture

16 May 2008 - 6:14 pm | मनस्वी

समोर बसवून काढलं की काय हे रेखाचित्र?

तुम्ही रेखाचित्र काढणार या कल्पनेने चिंतातूर झालेल्या दिसतायत स्मिताकाकू :SS

:)

मुक्तसुनीत's picture

16 May 2008 - 5:35 pm | मुक्तसुनीत

सलाम ! खल्लास चित्रे !! फारच सुरेख. आणि त्यांच्या कॅप्शन्स ! ;-)

वेताळ's picture

16 May 2008 - 6:11 pm | वेताळ

रेखाटने आहेत मास्तर तुमची. आवडली बुआ आपल्याला सगळी.

की वेताळाच्या प्रतिक्रियेत अत्यानदांमुळे अनुस्वाराचीं घसरगुडिं झाली आहे! ;)

चतुरगं

स्वाती राजेश's picture

16 May 2008 - 6:39 pm | स्वाती राजेश

रेखाटन आहेत...
ऐश्वर्या चे सुंदर...
शेवटचे तर फारच छान.....
टायटॅनिक हिरो...Leonardo Dicaprio..ओळखतो लगेच....

हेरंब's picture

16 May 2008 - 8:24 pm | हेरंब

मास्तर,
तुमची सर्व चित्रे व त्यावरील सर्व अभिप्राय वाचले. मला आवडली चित्रं. पण मास्टरपीस आहे तो स्मिता तळवलकरांच्या चित्राचा! लाईकनेस तर आहेच पण एक्सप्रेशन लाजवाब!! खरे कलाकार आहात, मान गये.

बेसनलाडू's picture

16 May 2008 - 8:52 pm | बेसनलाडू

गिरीश ओक, स्मिता तळवलकर आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ सर्वोत्तम वाटलेली चित्रे.
(आस्वादक)बेसनलाडू

देवदत्त's picture

16 May 2008 - 9:22 pm | देवदत्त

सुरेख.. सर्वच चित्रे मस्त आहेत.
त्यातील स्मिता तळवळकर ह्यांचे स्केच सर्वात जास्त आवडले मला.

देवदत्त's picture

16 May 2008 - 9:28 pm | देवदत्त

अवांतर: अरेच्च्या, मिपा वर मध्ये विडंबने, नंतर पाककृती आता रेखाटने ओसंडून वाहत आहेत.
त्यातल्या त्यात लोकमत चे संकेतस्थळ उघडले तर तिथेही संशयितांची रेखाचित्रे एकदम पहिली बातमी.
(स्वगतः आज रात्री सी आय डी मध्ये ही आता कुणाचे स्केच काढताना दाखवायचे :) )

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 May 2008 - 9:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

सर्वच चित्रे सु॑दर आहेत.. मला वाटत॑ मी जे॑व्हा तुझ्या घरी आलो होतो ते॑व्हा काही पाहिली होतीच.. गिरीश ओक आणि स्मिता तळवलकर सगळ्यात मस्त जमली आहेत..
खरा कलाकार आहेस..

वरदा's picture

16 May 2008 - 11:48 pm | वरदा

मस्तच काढलंय स्मिता काकुंचं चित्र

भडकमकर मास्तर's picture

3 Jun 2008 - 3:53 pm | भडकमकर मास्तर

माझ्या काही आवडत्या प्रकाशचित्रांपासून काही समूहचित्रे ( कोलाजेस) बनवली आहेत त्यावरूनही काही पेन्सिल स्केचेस पुढे बनवेन ...
हे स्कार्लेटबाई जोहान्सन यांचे... या बाई अभिनय कशा करतात ते माहित नाही, पण यांचे फोटो मात्र सुंदर असतात...

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/