बाल कविता
वाघाची मावशी
वाघाची मावशी, ए मनी मावशी
वाघाला आण ना घरी एके दिवशी
तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई,
वाघ काही इथं या गावात रहातगावात!
मग कुठे? लांबलांबच्या तिथे
तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात!
जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती?
छे रे बाळा! आता मी थकले आहे किती?
उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत?
तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत
कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी?
म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी
शर्थ झाली बाई! तुला खोटं वाटतं का रे?
वाघाची आई माझी बहीण आहे बरे!
भेटायला तिला तू का नाही जात?
जंगल आहे दाट, तिथं सापडत नाही वाट
अंधार म्हणतो मी अंधार म्हणतो मी
त्यात जरा अलिकडं दिसतं मला कमी
बरं का रे बाळा,
जंगलातल्या वाघोबाची सूरु असेल शाळा
सूट्टी लागली ना, की मग आणीन मी घरी
नसत्या उठा ठेवी याला काय बाई तरी!
कवी
- अज्ञात(किंवा तूर्तास माहीती नाही!)
----------------------------
ही कविता लहान मुलांना आवडते.
कविता चालीत, ठेक्यात म्हणायला खूप मजा येते!
(तात्या कदाचित संगितही लावू शकतील.)
पण येथे ऑडियो फाईल लोड करण्याची सोय नाही, त्यामुळे चाल ऐकवायची, कशी हा प्रश्न आहेच.
मात्र याचे कवी कोण आहेत, हे माहीती नाही. कुणाला माहीत असेल तर द्या,
शिवाय ही कुठे प्रसिध्द वगैरे झाली आहे का हे ही माहीत नाही. पण मला तरी मिळाली नाही.
-निनाद
>>>कवी
- अज्ञात(किंवा तूर्तास माहीती नाही!)
मात्र याचे कवी कोण आहेत, हे माहीती नाही. कुणाला माहीत असेल तर द्या,
शिवाय ही कुठे प्रसिध्द वगैरे झाली आहे का हे ही माहीत नाही. पण मला तरी मिळाली नाही. <<<
मिपाच्या धोरणांचा आदर केल्याबद्दल अनेक धन्यवाद! :)
हे लेखन मिपावर राहण्यास आमची हरकत नाही परंतु मिपावर मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन वरचेवर प्रकाशित करण्यास आमची नक्कीच हरकत असेल याचीही कृपया नोंद घ्यावी...
जनरल डायर.
प्रतिक्रिया
15 May 2008 - 5:47 am | निनाद
कृपया,
तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई,
वाघ काही इथं या गावात रहातगावात!
हे
तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई,
वाघ काही इथं या गावात रहात नाही!
असे वाचावे!
-निनाद
15 May 2008 - 10:55 am | आनंदयात्री
>>टंकमुद्रा राक्षस
लै भारी .. कविता पण छान .. गेय आहे :)
15 May 2008 - 10:00 am | ऋचा
आमच्या लहानपणी आम्ही असंही म्हणायचो.
वाघाची मावशी आहे मोठी हौशी
उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी
:SS
15 May 2008 - 4:23 pm | प्राजु
आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 May 2008 - 6:03 pm | शितल
छान आहे बालकविता.
16 May 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
मस्त आहे बालकविता..! :)
तात्या.