काल रात्री सापाचं सौम्य स्वप्न पडलं. सकाळी लक्ष दिलं नाही. पण मिपावर लॉगिन झाले आणि कावळ्याकडे लक्ष गेलं मग कळलं अरे पितृपक्ष सुरू झाला आहे आणि मी चमकले. तुम्ही म्हणाल मी वडाची साल पिंपळाला लावते आहे, अंधश्रद्धाळू आहे. म्हणायचं ते म्हणा बापडे पण गेले ४ ते ५ वेळा हा अनुभव मी घेत आले आहे की सापाचं स्वप्न आणि पितृ पक्षाची सुरुवात यांची एकच गाठ पडते.
मग मला चैन पडलं नाही. मी देवळात गेले आणि भटजींना शिधा , दक्षीणा दान केली. भटजींनी देखील मुख्य गाभार्यात या गोष्टी घेतल्या नाहीत तर गाभार्याबाहेर हॉलमधे व्यवस्थित मंत्र म्हणून आणि गेल्या तीन पूर्वज पीढ्यांमधील कर्त्या पुरुषांचा मंत्रामधे उच्चार करून त्यांनी हे दान स्वीकारलं. मला नंतर हात, पाय धुवून मगच देवळात यायला सांगीतलं.
घरी आल्यावर जालावर माहीती वाचली. खूप माहीती सापडली. त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात. आपण दिलेले मुख्यत्वे अन्न, पाणी ते ग्रहण करतात म्हणून अन्न पाणी यांचे दान या पक्षात खूप महत्वाचे असते. या पंधरवड्याच्या शेवटी केले जाणारे महालय श्राद्ध हे त्यादृष्टीने विशेष महत्त्वाचे असते. या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात.
मी दरवर्षी माझ्या परीने हा पक्ष पाळत आले आहे कारण मी भले विश्वास ठेवत असेन बाकीच्या घरच्यांनी विश्वास ठेवणंही गरजेचं असतं. असो. कोणाला अधिक माहीती असल्यास या धाग्यावर जरूर सांगावी. आपले अनुभव नमूद करावे ही विनंती.
प्रतिक्रिया
26 Sep 2010 - 6:51 am | गांधीवादी
माझी आजी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी छान छान मलिदा करते. तसा मलिदा अजून पर्यंत माझ्या आईला आणि सौ. ला जमला नाही. तो मलिदा मला खूप आवडतो. त्यामुळेच पितृपक्ष लक्षात आहे. आणि पितृपक्षात movies release होत नाही, एवढेच माहित आहे.
26 Sep 2010 - 4:17 pm | पैसा
"मलिदा" हा फक्त एक वाक्प्रचार आहे असा माझा आतापर्यंत समज होता. जर तो खराच खायचा पदार्थ आहे, तर कृपया त्याची पाककृति (त्या विभागात) द्या ना !
26 Sep 2010 - 4:22 pm | इंटरनेटस्नेही
+१
असेच म्हणतो.
('मलिदा' खाण्यास उतावळा) इं. स्नेही.
26 Sep 2010 - 4:32 pm | मस्त कलंदर
अगं, पोळी कुस्करून अगदी बारीक करायची. शक्यतो मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये केल्यास छान चुरा होतो. त्यात तूप, गूळ आणि वेलची घालायची. की झाला मलिदा तयार. पीरांना हिंदू-मुस्लिम दोघेही मानतात. पीराच्या उरूसात मलिदा हाच प्रसाद असतो. क्वचित भाकरीचा मलिदाही करतात.
26 Sep 2010 - 4:35 pm | पैसा
माझी आजी याचे लाडू करायची. आजीच्या हातच्या लाडवाची चव कशालाच नाही हे बाकी खरं!
26 Sep 2010 - 4:40 pm | गांधीवादी
हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला नाय्ये, जेणेकरून मला हे असला स्वयंपाक/पाककृती वगेरे येत असायला, मला फक्त खायचे माहित आहे. जेवणाचे ताट रोज आयते पुढे येते.
थोडे खासगी अवांतर : (सुदैवाने) आमच्या सौ. पण IT वाल्या नाहीयेत. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाक घरात पाय न ठेवणे हा आमच्या घरचा (अलिखित) नियम आहे. त्यात आमच्या सौ. मिपा वाचत नाहीत, मी मिपावर ह्या ID ने लिहितो हे देखील सौ. ला माहित नाही. त्यामुळे (आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे) हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ.
तरी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन, आजीकडे गेलो कि तिला विचारून टाकीन ह्याची पाककृती.
रवा, गुळ आणि अजून काहीतरी पासून बनवितात एवढेच माहित आहे. खूप मस्त लागतो.
मलिदा खाण्यासाठी पितृपक्षाची वाट बघत असतो.
27 Sep 2010 - 8:21 am | llपुण्याचे पेशवेll
अमसूलाची चटणी हा एक अनवट पदार्थ पण पितृपक्षात हमखास खायला मिळतो. कारल्याचे पंचामृत पण असेच.
26 Sep 2010 - 7:04 am | अरुण मनोहर
सिंगापूरला राहून एका चिनी प्रथेची माहिती झाली. आपल्या पितृपंधरवाड्याच्या सुमारासच चिनी लोक पितरांची शांती करतात. पोर्णीमेच्या रात्री खास, मोठ्या प्रमाणावर आणि त्या पंधरवाड्यात रोज रात्री, पितरांना प्रसाद अर्पण केल्या जातो. चिनी कालगणने प्रमाणे हा सातवा महिना मोजल्या जातो. ह्या उत्सवाला छिंगमिंग उत्सव म्हणतात. ह्या पंधरवाड्यात, रोज रात्री पुर्वजांचे आत्मे नातलगांच्या घराजवळ गिरट्या घालतात. त्यांच्या साठी रोज रात्री उदबत्या, मेणबत्या पेटवल्या जातात. डुकराचे वा कोंबडीचे मांस अर्पण केले जाते. पुर्वजांना मिळावे म्हणून कागदाच्या वस्तु, जसे बंगले, कार, खोटे पैसे, म्हणजे 'हेल मनी' च्या नोटा हे सगळे जाळले जाते. धुरांमधून पुर्वजांना ते मिळते अशी समजूत आहे. हा महिना भुतांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ताओईझम मधून ही पद्धत आलेली आहे.
26 Sep 2010 - 8:04 am | प्राजु
माहीती चांगली आहे .
:)
26 Sep 2010 - 8:15 am | प्रकाश घाटपांडे
मला मागच्या आठवड्यात नागाचे स्वप्न पडले. त्या आठवड्यात पंचमुखी नागाचे एक चित्र सकाळ मधे वाचकांच्या पत्रात आले होते ते कुठतरी सुप्त मनात नोंदलेले असावे त्याचा हा परिणाम अशी संगती मी त्याची लावली.
26 Sep 2010 - 4:22 pm | शुचि
मी देखील असा कार्यकारणभाव तपासून पहाते. पण मला तो ना यावेळी सापडला ना गेली कित्येक वर्ष पितृपक्ष सुरु होताच सापाचं स्वप्न पडतं तेव्हा सपडला आहे.
26 Sep 2010 - 10:27 am | नितिन थत्ते
प्रेतयोनीत पूर्वजांचे काय भटकत असते?
शरीरे तर आपण जाळलेली असतात.
आत्मे म्हणाल तर त्या आत्म्यांनी दुसरा जन्म घेतला असणार ना, चौर्याऐशी लक्षांपैकी एक?
की शरीर आणि आत्मा यांखेरीज तिसरे 'काहीतरी' असते जे भटकत असते?
फार तर नुकताच मृत्यू झालेल्याचा आत्मा अजून राहिला असेल जन्म न घेतलेला.... पण आजोबा, पणजोबा, वगैरे पण अजून भटकतच?
(अवांतर : अरेरे, कालच मी माझ्या खोलीतल्या बर्याच मुंग्या मारल्या. अन्नपाण्याच्या आशेने आलेले माझे पूर्वज असतील तर....... )
टीप : वरील प्रतिसादाचा हेतू खिल्ली उडवण्याचा नसून, लेख वाचणार्या इतरांना "विचार करण्यास उद्युक्त" करण्याचा आहे.
26 Sep 2010 - 4:12 pm | शुचि
होय हे जे दान करतात तेदेखील गेल्या (रिसेंट) ३ पीढ्यांनाच जातं. त्यांचेच आत्मे प्रेतयोनीमधे भटकत असतात. बाकीच्यांचं माहीत नाही.
26 Sep 2010 - 5:29 pm | नितिन थत्ते
किती काळानंतर पुढचा जन्म मिळतो. तीन पिढ्या प्रेतयोनीत म्हणजे माझ्या पणजोबांचा पण अजून पुढचा जन्म मिळाला नाही?
तुमच्या म्हणण्यावरून असे दिसते की मी मरेपर्यंत (इनफॅक्ट माझ्या पिढीतले सगळे चुलत भाऊ मेल्याशिवाय) पणजोबांना पुन्हा जन्म मिळणार नाही.
26 Sep 2010 - 6:59 pm | गांधीवादी
आमच्या पितरांनी, महान भारतची सद्य परिस्थिती लक्षात घेता पुढचा जन्म कुठे(कोणत्या देशात) घेऊ अशी विचारणा BULK SMS द्वारे नुकतीच केली आहे.
थत्ते काका , कृपया जरा मदत करता काय ? कोणता देश सुचवू त्यांना ? चीन, अमेरिका, कि अजून कोणता.
26 Sep 2010 - 9:18 pm | नितिन थत्ते
१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे कधी आले होते? कारण २९ तारखेपर्यंत बल्क एसेमेसना बंदी आहे.
२. परतचा जन्म माणसाचा मिळत नसून कुठल्यातरी प्राण्याचाच मिळतो. तो या मानवजन्मात केलेली पापे आणि पुण्ण्ये पाहून मिळतो. तेव्हा अनुकूल देशातले हवामान पाहून जन्म मिळेल.
३. तुम्हाला भारतात जे वाईट आहे असे वाटते आहे ते माणसांसाठी लागू आहे. कुत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आणि मनेकाबाईंचे खास संरक्षण आहे. त्यामुळे कुत्र्याचा जन्म भारतात घ्यायला काही हरकत नाही. २९ तारखेनंतर बल्क एसेमेस करून पूर्वजांना कळवावे.
27 Sep 2010 - 5:47 am | गांधीवादी
आपल्या अमुल्य सल्लाबद्दल धन्यवाद.
>>बल्क एसेमेसना बंदी आहे.
१) अहो ह्या बंदी वगेरे शुद्र मानवांसाठी, पितरांना नाही.
२) आमच्या पूर्वजांनी बरीच पुण्याची कामे केली आहेत, त्यांचा पुण्याचा घडा भरलेला आहे. मला पुणे-मुंबई सोडून जगातले दुसरे कुठलेच हवामान माहित नाही. त्यामुळेच तर विचारणा केली होती. असू दे मीच जरा गुगलतो.
३) 'भारतात माणसांपेक्षा कुत्री बरी' हे माहित आहे. आणि त्यामुळेच जिकडे तिकडे कुत्र्यांचे फोफावले आहे. त्या फोफावलेल्या कुत्रांच्या जमातीती जर का जन्म घेतला तर एका दिवसांत सगळे पुण्य खतम होईल. अशी भीती आमच्या पितरांना आहे. बघू मीच काहीतरी आयडिया काढतो. आणि २९ नंतर त्यांना BULK SMS करतो. (आम्हाला मात्र सध्या BULK SMS बंदी आहे. शेवटी आम्ही काय, एक शुद्र मानव)
27 Sep 2010 - 7:39 am | आंसमा शख्स
तुम्ही लोक या विषयाची खिल्ली का उडवत आहात? पटले नाही.
28 Sep 2010 - 4:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
मिसळपाव वर स्वागत आहे. सवय करून घ्या अशा खिल्लींची. हळूहळू त्याचे काही वाटेनासे होईल (आंतरजालीय प्राथमिक) आणि मग एके दिवशी तुम्हीच अनाठायी खिल्ली उडवू लागाल (आंतरजालीय माध्यमिक). पुढील स्टेप्स बाकीचे जुने आणि जाणते सांगतीलच हळूहळू.
(आंतरजालीय प्राथमिक मध्ये शिकणारा) वि. मे.
26 Sep 2010 - 10:55 am | राजेश घासकडवी
मी पितरांचे आत्मे याकडे रूपक म्हणून बघतो. हिंदू संस्कृतीत पितृऋण मानलं गेलेलं आहे - याचा अर्थ मी आपल्या पितरांनी जसा आपल्याला जन्म दिला तसा जर आपण कोणाला जन्म दिला तर आपल्या मुलांचं प्रेमाने संगोपन करून त्यांना उत्तम व्यक्ती बनवण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असा मी लावतो. यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही.
26 Sep 2010 - 1:35 pm | इन्द्र्राज पवार
"यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही."
~~ नेमके हेच माझे मत आहे; आणि यात एकच वाक्य वाढवितो : मात्र जे ही रूढी पाळतात त्यांच्या भावनांना माझ्या मतामुळे धक्का लागणार नाही किंवा ते दुखावले जाणार नाहीत, इतपत पाहतो.
शेवटी मी समाजप्रिय आहेच, सबब वेळप्रसंगी तत्वाला मुरड घालायलादेखील शिकलो आहे.
इन्द्रा
26 Sep 2010 - 10:59 am | शिल्पा ब
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?
काळजीग्रस्त (रोज जेवणारी ) शिल्पा
26 Sep 2010 - 4:23 pm | इंटरनेटस्नेही
+१ लोल्स!
असेच म्हणतो.
26 Sep 2010 - 11:13 pm | कवितानागेश
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?>>>
तुमच्यात रोज चित्राहूती ठेवत नाहीत का?
26 Sep 2010 - 11:30 pm | शिल्पा ब
आमच्यात फक्त जिवंत असलेल्यांनाच खायला घालायची पद्धत आहे.
27 Sep 2010 - 10:55 pm | उपेन्द्र
इथे जिवंत माणसांना खायला पुरेसं अन्न नाही आणि मेलेल्यांची काळजी कशाला.. ? पितृपंधरवड्यात शुभकार्य करायचं नाही असं मानतात.. तर.. श्वास तरी का घेतात.. ते तर जगायला आवश्यक असलेलं सगळ्यात महत्वाचं शुभ कार्य आहे.. नाही का?
27 Sep 2010 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?
तुम्ही रोज करून घालात तर रोज येतील. :) बाकी पितर बितर वर्षातून एकदा नाही २दा जेवतात. १ ज्या दिवशी गेले त्या तिथिला आणि २ ज्या तिथीला गेले ती तिथी पितृपक्षात. बाकी हॅलोवीन मला रोज करायला आवडतो पण बाकी कोणालाच आवडत नाही. :(
(हॅलोवीनप्रेमी) पेशवे
26 Sep 2010 - 11:13 am | jaypal
>>या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात...........
मी गेली केत्येक वर्षे मुद्दमच या पंधरवड्यात खरेदी करतो किंवा शुभ कार्ये करतो अजुन तरी माझे काहीही वाईट झाले नाही. मी माझ्या पुर्वजांना अमंगल/अभद्र मानत नाही म्हणुनच मी त्यांना वाळीत टाकत नाही. उलट पक्षी त्यांना माझ्या आनंदात सहभागी करतो. माझ्या आनंदात त्याचा देखिल आनंद नक्कीच असणार. माझे आजी/ आजोबा, पणजी /पणजोबा ई. माझ्या वर जळतील शक्यच नाही.
थत्ते काकांशी १००००००००........% सहमत.
खुळचट कल्पनांना थारा देउ नका. दिवसा भरपुर अंगमेहनत घ्या .झोपताना पाणि प्या ,सैल कपडे घाला व आराम दाई बिछान्यावर झोपा म्हणजे असली स्व्प्न पडत नाहीत (जमल्यास उशाशी एक पुंगी व पेटारा ठेवा )
26 Sep 2010 - 4:24 pm | शुचि
पूर्वज अमंगल नव्हते पण आता ज्या योनीत ते आहेत ती अमंगल गणली जाते.
27 Sep 2010 - 8:29 am | llपुण्याचे पेशवेll
जयप्या काहीही लिहीतोस काय रे???
आराम दाई बिछान्यावर .
हे काय नवीण बॉ? तू मास्तरांसारखा लिहू लागला आहेस? ;)
27 Sep 2010 - 10:57 pm | उपेन्द्र
+१००
आपण थोर अहात..
26 Sep 2010 - 11:29 am | अवलिया
पितृपक्षानिमित्त सर्व पितरांना विनम्र अभिवादन..
26 Sep 2010 - 12:13 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
जयपाल ची सैल कपड्याची कल्पना आवडली.
26 Sep 2010 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात'' अशा गोष्टींवर आपला काही विश्वास नाही. पण, आमच्याकडे 'पितृपक्ष' उत्सवात साजरा केला जातो. आमच्या पूर्वजांना काय काय आवडत होते ते आठवून जसे, [बीडी काडी] पान, पेग वगैरे, दाखवून आम्ही तो दिवस इंजॉय करतो. आठवणीत काढतो. या दिवशी आमच्याकडे सर्व प्रकारचे नैवद्य असते. उदा.मासे, मटन,चिकन, पुरण-पोळी, कुरडाया,पापडं,भजी,कढी, आमटी,खीर,वरण-भात, पुर्या, सर्व प्रकारच्या भाज्या काय नी काय असते जेवायला सॉरी नैवद्य दाखवायला....! :)
-दिलीप बिरुटे
26 Sep 2010 - 12:59 pm | योगप्रभू
एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय? :)
26 Sep 2010 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय ?
कधीही या....! स्वागत आहे. :)
-दिलीप बिरुटे
26 Sep 2010 - 4:27 pm | इंटरनेटस्नेही
बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण! तेवढीच आपल्या पुर्वजांना शांती, काय?
(प्यार्टी प्रेमी) इंटरनेटस्नेही!
26 Sep 2010 - 12:23 pm | मितान
इथे बेल्जियम मध्ये पण याच सुमारास अशाच प्रकारच्या रुढी पाळल्या जातात. १५ ऑक्टो ते ३१ या पंधरवाड्यात आपल्या सर्व आप्तेष्टांना ( जिवंत ! ) वॅफल्स खाण्यासाठी बोलावतात. ( चंगळ असते आमची पण ! ) मग १ नोव्हे ला सर्व संत दिवस ! त्यादिवशी सिमिट्रीत जाऊन सर्व पूर्वजांच्या कबरींवर फुलं वहायची आणि वाईन चा नैवेद्य (!) दाखवायचा. म्हणजे सर्वपितरी अमावास्या :)
बाकी या काळात होणार्या कार्यांबद्दल, खरेदी विक्री वगैरे बाबत काही वेगळा अनुभव नाही. माझ्या लग्नाची खरेदी याच काळात केली होती. बाजारात गर्दी कमी असते म्हणून !
26 Sep 2010 - 12:28 pm | अनिल २७
>>त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात
मोक्ष म्हणजे काय?
26 Sep 2010 - 12:45 pm | शिल्पा ब
<<<मोक्ष म्हणजे काय?
जो दुपारच्या जेवणाने (तासभर का होइना) मिळतो तोच...म्हणूनच या पितरांना गिळायला घालत असावेत... ही ही ही
26 Sep 2010 - 12:56 pm | अनिल २७
शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?) करणे यावर तुमचे मत काय ?
28 Sep 2010 - 4:13 am | विश्वनाथ मेहेंदळे
टोकाचे :-)
28 Sep 2010 - 4:42 am | शिल्पा ब
आता मेलेल्यांना खाऊ घालण्याविषयीचे विचार टोकाचेच असणार...एकतर टोकाचे किंवा पकडीचे...
त्यात आम्ही टोकाचे...कारण हा विषय पकडीचा वाटत नाही..
28 Sep 2010 - 9:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शिल्पाताई, बाकी तुम्ही परत आलात हे पाहून आनंद झाला. बरेच दिवस तुमचे फक्त "आवडले", "छान आहे" असेच प्रतिसाद येत होते. तुम्ही परत फार्मात आलात हे बघून बरे वाटले.
26 Sep 2010 - 4:00 pm | विसोबा खेचर
पितृपक्षात कावळ्याचं चित्र लावायची पद्धत मिपावर रूढ केली होती ती तशीच पुढे सुरू ठेवली आहे..
(रुढी-परंपरावादी) तात्या.
26 Sep 2010 - 4:08 pm | शुचि
चांगली पद्धत आहे.
26 Sep 2010 - 5:45 pm | वेताळ
प्राप्त होते असे मी एकले आहे ते खरे आहे का?
आमचे पितर आता कोणत्याही योनीत फिरत नसलेमुळे ह्या सणाचा आम्हाला उपयोग होत नाही.
26 Sep 2010 - 7:09 pm | गांधीवादी
भूत जमातींची एका 'रामगोपाल वर्मा' नामक व्यक्तीशी मैत्री आहे, त्यामुळे जर का आपले (म्हणजे सगळ्यांचे ) पितर भूत जमातीतील असतील असे आपल्याला वाटत असेल तर 'त्या' व्यक्तीला घरी बोलून जेवायला घातले कि सर्व भूत जमात संतुष्ट होईल आणि त्यांना कायमची मुक्ती मिळेल.
~~गांधीवादीदेव बाबा ~~
26 Sep 2010 - 7:22 pm | मदनबाण
सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला आणणार्या भगिरथाचे पुर्वज किती काळ ताटकळतं बसले होते कोणास ठावुक ? ;)
बाकी या आत्मा बित्मा गोष्टीला अपुन सॉलिट्ट मानतो !!! ( न मानुन रिस्क क्वोन घेणार ? ;) )
काय ते लोक असेल तिथे सुखामंदी असुदे !!! लफडा नको साला !!! ;)
26 Sep 2010 - 7:30 pm | गांधीवादी
मीबी मान्तो.
मी त्यांच्या पत्ता पण हुडकून काढलाय.
हिथ रहातात ते.
http://en.wikipedia.org/wiki/Genie
26 Sep 2010 - 7:34 pm | मदनबाण
हल्लीच हेन्री बाबाचे भूत पाहिलं व्हत... ;)
26 Sep 2010 - 8:31 pm | विजुभाऊ
पितरांचे आत्मे नक्की किती पिढ्या ताटकलत असतात?
जर आत्मा अविनाशी असतो तर मग त्याला मुक्ती मिळते म्हणजे काय होते?
आत्म्याला जर काहीच होत नाही तर तो अतॄप्त कसा रहातो?
27 Sep 2010 - 1:49 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म... भुतांना / पितरांना पण इंटरनेट एक्क्सेस असतो का? नसल्यास, नाहीतर सदर चर्चा ही एकतर्फी होईल!
(रामशास्त्री)
27 Sep 2010 - 2:44 am | शिल्पा ब
नाही, पण त्यांच्या वतीने गोरीला आहेत ना..
27 Sep 2010 - 7:58 pm | मेघवेडा
वादविवादात समोरच्या पक्षाची खिल्ली उडवणे, त्यांच्यावर विषयास धरून नसलेले व्यक्तिगत हल्ले करणे हे प्रकार सध्या सर्वमान्य झाले आहेत वाटतं?
27 Sep 2010 - 10:37 pm | शिल्पा ब
हो ना...असं दिसतंय खरं..
{हे ही दिवस जातील}
27 Sep 2010 - 2:48 am | राघव
सगळे शेवटी मानण्या - न मानण्यावर आहे.
मृत्यूनंतर काय होत असेल ह्यावर चर्चा करण्यार प्वॉईंटच काय ते मला कळत नाही. कारण त्यासाठी तो अनुभव घेऊन सांगणारा हवा. अन् त्यावर इतरांनी विश्वास ठेवायला हवा. त्यात पुन्हा विश्वास ठेवणारे (अंध)श्रद्धाळू अन् विश्वास न ठेवणारे विज्ञानवादी!
जे काय असेल ते.. माझे कुणी पूर्वज खरेच माझ्यासमोर येऊन उभे राहिलेत तर मी त्यांना नक्की नमस्कार करेन अन् मनापासून जेवायला वाढेन. ते नाही आलेत तरी गाईला जेऊ घातल्यानं त्यांना समाधान लाभलं असतंच या भावनेनं गाईलाही जेऊ घालेन. दररोज शक्य होत नाही म्हणून. नाहीतर तेही केलं असतं. शेवटी ज्याचे त्याचे लॉजिक. बाकी चालू देत.
27 Sep 2010 - 8:46 am | केशवसुमार
शुचितै, तुम्हाला सापाच स्वप्न पडल आणि कॉमनवेल्थ गेम व्हिलेज मध्ये साप निघाला..
काय योगायोग आहे ना..
(योगायोगी)केशवसुमार
श्रावणात सुरु झालेली गुर्जी लोकांची कमायी, गणपतीनंतर दसर्या पर्यंत बंद होते त्या १५ दिवसात त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार?..म्हणुन हे सगळे पितर वगैरे.. अस आपले स्पष्ट मत आहे...
(स्पष्ट)केशवसुमार
बाकी चालू दे..धाग्यात शेन्चुरीचे पोटेंशीयल आहे..
नेहमीचे यशस्वी (धाग्या चा खफ करणारे) अजून आलेले दिसत नाहीत इकडे.. का ह्या १५ दिवसात त्यांच्यात प्रतिसाद देत नसावेत बहुदा..
27 Sep 2010 - 10:52 am | जिन्क्स
पितृपक्ष पंधरवड्याच्या सर्वान्ना हार्दिक शुभेच्चा
27 Sep 2010 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
हडळ चेटकिणी स्वप्नी पाहूनी विचार सुचती सुंदर छोटे
मिपावर जाऊनि लेख पाडता होती ते भलेमोठे
27 Sep 2010 - 1:39 pm | अविनाशकुलकर्णी
आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो, यासाठी या आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांच्या बद्दलचा कृतज्ञभाव व्यक्त करणारा हा पितृपक्ष.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञ भावाला फार महत्त्व आहे. जिथे प्रेम आहे, तेथे कृतज्ञता आहे आणि कृतज्ञताभाव हा ऋणमोचना भाव आहे. कारण आपल्या पूर्वजांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे आणि ते उभ्या जन्मात फिटू शकत नाही, त्यासाठी हा पितृ पंधरवाडा निर्माण झाला.
या निमित्ताने आपण आपल्या वाडवडिलांची आठवण करतो. त्यांचा आदर्श, शिकवण, त्यांचं मोठेपण आठवतो आणि पुन्हा पुन्हा हे व्हावं यासाठी दरवर्षी पितृपक्ष नेमाने येतो.
आम्हि पण हा विधि सश्रद्ध मनाने करतो..आम्ही धार्मिक प्रवृत्तिचे असलो तरी कर्म कांडाचा फाफट पसारा पासुन आम्हि दुर रहातो..महत्वाचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे..ज्या आई वडिल.. आजी आजोबांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो..ज्यांचे बोट धरुन शाळेत गेलो..ज्यांच्या त्यागावर व श्रमावर आज आपण सुसंस्कारित व ्समृद्ध जिवन जगत आहोत त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला पाहीजे..आज ते कुठल्या जगात आहेत हे आपणास हि ठावुक नाहि पण त्यांचे आशीर्वाद व मायेचा अखंड वर्षाव आपल्यावर होतच आहे...त्या साठी हा कृतज्ञ भाव....
27 Sep 2010 - 2:43 pm | Nile
अंधश्रद्धाळुंची पीतरं खायचं शोधतं हिंडत असतात. माझा सारख्यंच्यांची पीतरं स्वर्गात मजा करत असतात असं एका मराठी संस्थळावरच्या प्रसिद्ध बाबाने मला सांगितलं. खरं आहे का हो शुचि काकु?
आल्सो, तुम्ही प्लांचेट करता का हो शुचि काकु? आम्हाला पण शिकवा ना.
27 Sep 2010 - 7:50 pm | पैसा
एका दिवसात २ धागे! एकाने शंभरी पार केली, दुसर्याने पन्नाशी. शुचि आणि इतर सगळे प्रतिक्रिया "खरडणारे" यांचं अभिनंदन!