पितृपक्ष-२

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
26 Sep 2010 - 9:31 pm
गाभा: 

पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं.

मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते.

याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले.

जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते.
अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

26 Sep 2010 - 10:01 pm | शिल्पा ब

थोडसं गंभीरपणे : एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते? आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची?

अन जरी आत्मा वगैरे प्रकार असले तरी ते या पृथ्वीवरच राहतील हे कशावरून? टिळक असो कि आणखी कोणी त्यांनी हि मृत्युपक्षात योनी आहे वगैरे कशावरून ठरवले? काय पुरावा आहे? वाचायला अद्भुत असले म्हणजे ते सत्य असते असे नाही...किंबहुना खुपदा नसतेच.

पूर्वापार चालत आलेल्या रुढींना विचार न करता आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का?
मला व्यक्तीशः हे प्रकार पटत नाही...जिवंत असलेले राहिले बाजूला मेलेल्यांचे काय करत राहायचेय?

>> एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते?>>
कशावरून नसते?

>> आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची? >>
गरजवंताला मदत करा ना वर्षभर. वर्षातले १५ दिवस पितरांना देता येत नाहीत?

>> आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का? >>
आंधळेपणानी नाही स्वप्न आदिंचा इनेक्स्प्लिकेबल अनुभव!!!

शिल्पा ब's picture

26 Sep 2010 - 10:32 pm | शिल्पा ब

विषय तुम्ही काढलात...तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे...
स्वप्न म्हणजे आपण विचार करतो , पाहतो, ऐकतो वगैरे याची फलित असते..
आता तुम्ही म्हणता हि १५ दिवस (आहेत याची खात्री नसली तरी) पितरांना द्या....उद्या अजून काही कोणीतरी आहेच म्हणेल त्यांना पण द्या...याला काय अर्थ आहे..आणि ज्याचे अस्तिव आहे कि नाही याचा काहीच पुरावा नाही त्यासाठी एवढी यातायात? त्यापेक्षा जिवंत असतानाच चांगले वागा कि...

>> तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे >>

माझ्याकडे पुरावा नाही.

सूर्याचा गायत्री मंत्र सगळे म्हणतात त्यातही भु:, भुवः, स्वः या तीन लोकांचा उल्लेख आहे. कोणी पाहीलेयत हे तीनही लोक? पण आपण म्हणतोच ना गयत्री मंत्र?

शिल्पा ब's picture

26 Sep 2010 - 11:32 pm | शिल्पा ब

मग जे लोक भूत / पिशाच्च वगैरे मानतात अन त्यांच्यावर "जालीम " उपाय करतात त्यांना का अंधश्रद्ध म्हणून नावे ठेवायची?

प्रत्येकाची सीमारेखा अस्ते, मर्यादित अनुभवकक्षा असतात हे खरं. त्यानुसार तो श्रद्धेच्या मर्यादा ठरवतो.

चित्रा's picture

26 Sep 2010 - 10:28 pm | चित्रा

जीवात्मा आपण पाहिलेला नसतो, पाहिलेले लोकही माहिती नसतात.
अशावेळी या विषयावर आपला वेळ दवडण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मन लावले तर त्या वेळाचा आपल्याला आणि दुसर्‍यांनाही फायदा होऊ शकतो.


अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?

अश्रद्ध लोक कधी वाचून बोलतात, कधी न वाचता लोकांवर विश्वास ठेवून बोलतात. माणसे म्हटली, की विविध प्रकारची असतात. सर्वांना सरळसोट एकच समजणे गरजेचे नाही.

मुळात पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी असणे चांगले असते. या आधारे, एखादी कृती समाजाला सध्याच्या काळाला योग्य आणि जरूरीचे असे मार्गदर्शन करत असली, पुढे घेऊन जात असली तर पुरोगामी आहे, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगामी असण्याला विरोध नसतो. तुमचा विरोध पुरोगामी असण्यास नाही, पण पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणार्‍यांना आहे असे दिसते आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. शेवटी पुरोगामित्व हे कृतीने ठरणार आहे. आज इंटरनेटच्या जमान्यात काँप्युटर वापरायला शिकायचाच नाही, असा हट्ट धरून बसणार्‍याचे आजच्या जगात काय होईल? आणि एखाद्याने असा हट्ट धरला, म्हणून त्याचे सर्वच म्हणणे टाकाऊ, खुळचट आहे असे समजणे विवेकीपणाचे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा स्वत:साठी स्विकार किंवा अस्विकार करण्यासाठी अशा प्रत्येक विचाराचा वेगळा असा आढावा घेऊन स्विकार/अस्विकार करावा, हे धोरण योग्य ठरेल असे वाटते.

माझ्या मते पितृपंधरवड्यात आपल्याला हवी ती व्रते करणे, जेवण घालणे हे वाईट नाही. पूर्वजांची आठवण करणे हेही वाईट नाही. किंबहुना ती नेहमीच असावी. पण त्याचा संबंध जीवात्म्याशी लावणे हे गरजेचे नाही. कारणपरंपरा मागे नेणे अशा ठिकाणी थांबवावे, जिथपासून पुढे विश्वासार्ह डेटा मिळणे बंद होते. उदा. अलिकडे मी एकाजणांना म्हटले त्याप्रमाणे - मंगल पांडे यांनी १८५७ च्या बंडात/युद्धात चुकीच्या दिवशी पहिला वार केल्याने ब्रिटिशांना काहीतरी कारस्थान चालले आहे याची जाणीव झाली, आणि त्यांनी हे बंड मोडून काढले असे सांगितले जाते. याचा अर्थ मंगल पांडेचे डोके त्याच दिवशी का फिरले? त्या दिवशी त्याच्यावर काही ग्रहतार्‍यांचा परिणाम झाला होता का? बंडात सामील करून घेण्याआधी त्याची पत्रिका पहायला हवी होती का, अशा प्रश्नांची न मिळणारी उत्तरे शोधण्यापेक्षा मंगल पांडेला भडकवण्यासारखे काय झाले, ते व्हायला नको म्हणून काय करायला/सांगायला हवे होते जे केले/सांगितले गेले नाही, किंवा जे सांगण्याचा बंडाच्या नेतृत्वाकडून विचार झाला नाही, ते पाहिले पाहिजे. हे अवांतर वाटेल, पण तसे नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे, की पितृपंधरवड्यासाठीची कारणपरंपरा मागे नेताना जीवात्मा येतो म्हणून आम्ही पितृपंधरवडा करतो असे म्हणण्यापेक्षा हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल.

नितिन थत्ते's picture

26 Sep 2010 - 10:31 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

पैसा's picture

26 Sep 2010 - 11:48 pm | पैसा

सहमत आहे.

माझ्या वडिलाना जाऊन ३० वर्षे झाली. आम्ही कधीही त्यांचं श्राद्ध केलं नाही, पण त्यांची आठवण म्हणून गरजू मुलांना मदत करणे माझ्या आईने चालू ठेवलं आहे. त्यांची आठवण जागी ठेवणं हेच एक प्रकारे श्राद्ध आहे.

त्याचवेळी, माझ्या सासूबाई तेव्हाच गेलेल्या त्यांच्या सासूबाईंचं श्राद्ध अजून करतात, तर त्यालाही आम्ही विरोध करत नाही, फक्त रजा बिजा घेऊन येणं शक्य नाही हेही त्याना सांगितलंय.

शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाय मला असं वाटतं की "अंनिस" चा सुद्धा विरोध अंधश्रद्धेला आहे, कोणी सश्रद्ध असण्याला नाही.

ज्या लोकमान्यांबद्दल तुम्ही लिहिलंय ना त्यांचं स्वतःचं वागणं असल्या गोष्टीत एकदम practical होतं. समाजातले बहुमत बालवयातल्या विवाहाना अनुकूल होतं त्यांचा त्यानी विरोध केला नाही. त्याचवेळी स्वतःच्या मुलींची लग्नं लहान वयात केली नाहीत. समाजाबरोबर राहून, न बोलता आणि बहुमताला विरोध न दर्शवता, स्वतःच्या वागण्यातून समाजाला धडे कसे द्यावेत, हे शिकावं लोकमान्यांकडूनच. म्हणूनच, समाजाला आपल्याबरोबर नेण्यात ते आगरकरांपेक्षा यशस्वी ठरले.

शुचि's picture

26 Sep 2010 - 10:36 pm | शुचि

>> हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल. >>

मान्य!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2010 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है. नंबर एक प्रतिसाद.....!

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

26 Sep 2010 - 10:32 pm | मुक्तसुनीत

प्रेतयोनी , जीवात्मा वगैरे गोष्टी वाचून रंजन झाले. यापुढचा लेख काय गंडे दोरे ताईत भूतप्रेतादि गोष्टी यांवर येणार काय ? मग जारणमारण इत्त्यादि गोष्टी फार मागे नाहीतच.

या सर्व गोष्टींबद्दल लेख लिहिणे ही एक बाब झाली. परंतु या सर्व गोष्टींची भलावण करणे म्हणजे फारच झाले.

अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे?

या वाक्यातले कर्ता कर्म क्रियापद या सर्व गोष्टी , जत्रेत मुले माणसे हरवतात तशी हरवलेली दिसतात :-) (कर्टसी - पु ल देशपांडे)

परंतु या सर्व गोष्टींची भलावण करणे म्हणजे फारच झाले.

सहमत आहे.

अश्या गोष्टींबद्दल लिहायला सगळ्यांना स्वातंत्र्यच काय मुभा दिल्यासारखे वातावरण आहे त्याउलट एखादा प्रतिसाद त्याविरोधात लिहला की सामंजस्य दाखवा म्हणुन सुचना येतात हा विरोधाभास नमुद करावासा वाटतो.

काव्यवेडी's picture

26 Sep 2010 - 10:38 pm | काव्यवेडी

विषय नक्कीच गहन आहे. पण जिवन्त असताना माणसाशी नीट वागायचे नाही.
आणि मेल्यावर श्राध्द घालून मोकळे व्हायचे हे अजिबात योग्य नाही.
त्यापेक्शा माणसान्शी माणुसकीने वागून समाधान मिळ्वावे.असे
मला वाटते.

घुबडाचे डोळे जाळून त्याचे अंजन डोळ्यात घातले असता गुप्तधन दिसते.
कृपया आसपास घुबड दिसल्यास व्यनिने कळवावे.
डायरेक्ट डोळे काढून पाठवल्यास तर उत्तमच.
( स्वतःचे डोळे काढून जाळा वगैरे पीजे मारू नयेत.)

कवितानागेश's picture

26 Sep 2010 - 11:32 pm | कवितानागेश

पितरांचे श्राध्द घालणारे सगळे त्यांच्याशी जिवंतपणी वाइट वागून आता मात्र प्रेम दाखवतायत,
हा गैरसमज कुठून आला.
ज्याना श्रध्देनी, त्या निमित्तानी दान करायचे असेल, त्याना खुशाल करु द्यावे.
पित्रुऋण मानण्यात चुकीचे काय आहे???
ज्याची त्याची पध्दत वेगळी असू शकते,
एखादा वडलांच्या , आजोबांच्या, नावानी एखाद्या संस्थेला काहीतरी देतो, एखादा, ( कदाचित सेफ साईड म्हणून) पित्रुपक्षात जेवणावळी घालतो.
पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे... शिवाय पित्रुपक्षात फक्त ब्राम्हणाना जेउ घालायची पध्दत नाही. नातेवाइक, मित्रमंडळी व अंत्यज म्हणजे ( तळागाळातले लोक), यानाही जेवायला बोलवण्याची व दान देण्याची पध्दत आहे??
आपल्याला 'मोठ्या' लोकांची स्मारके चालतात, मग घरच्याच बिचार्‍या आजोबा पणजोबांची १ दिवसाची जेवणावळ अंगावर का येते?

( कुंपणावरुन आत उडी टाकलेली) माउ

जेवणावळच घालायची तर रोज घाला पण पितर बितर म्हणून घालतोय असे सांगायची काय गरज? हवं तर तुम्हीपण परसात एखादं स्मारक बांधा नाही कोण म्हणतंय?
आपल्या पूर्वजांचे ऋण ठेवायचे तर ठेवा अथवा नका ठेवू पण उगाचच अंधश्रद्धा कशाला पसरवायची? काय तर म्हणे पूर्वजांना जेवायला घालायचे !!! आनंद आहे.

तेव्हढीच कावळ्याची व इतर पक्षाची चांगली सोय होते.

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 11:47 am | कवितानागेश

इथे लोकांचे रुढी परंपरांचे फंडे फारच कच्चे आहेत! :-S
त्यामुळे काहीच पटेनासे होते......
नक्की 'कोण' जेवते, कावळा काय दर्शवतो, हे एकदा नीट महिती करुन घ्या!
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची 'सेन्सिटिविटी लेवल' वेगळी असते.
कुठल्यातरी महत्वाच्या श्राध्द्तिथीच्या सुमाराला/ पित्रुपक्षात साप-नागाची स्वप्न पडल्याचे मी अनेक लोकांकडून ऐकले आहे.
जर प्रत्येक वेळेस शुचीताइना हे स्वप्न पदत असेल, तर ती अंधश्रध्दा कशी?
आणी हा अनुभव शेअर करणे म्हणजे अंधश्रध्दा पसरवणे नाही.
आणी त्यानी शेअर केला नाही तरी लोकाना स्वप्न पडायची थांबणार नाहीत! ;)
माझा एक मित्र असाच प्रश्नकंटक नास्तिक होता.
त्यालादेखील अशीच स्वप्न पडली मध्ये.....
घरे सांगितल्यावर कळले, की त्याच दिवशी त्यच्या आजीची श्राध्द्तिथी येत होती.
घरी अनेक वर्षे कुणचही श्राध्द वगरै कही केले जात नव्हते.
याच्या नास्तिकपणाला घरातले एवढे टरकून असायचे, की त्याच्यासमोर, देवपूजेबद्दल सुध्दा कुणी बोलायचे नाहीत. त्यामूळे त्यानी घरात काही श्राध्दाबद्दल ऐकले असेही नाही.
त्यानी प्रत्यक्ष साप-नाग अनेक वर्षात पहिला नाही.
तो ढकल्पत्र वाचतच नाही. डिलिट मारतो, त्यामूळे असे उगीच कुठे चित्र पहायचा संबंध नाही.
शिवाय त्याला कुठल्याही प्राण्याची, सापानागासकट, भिती वगरै बिल्कुल नाही.
..पण हा योगायोग दिसला! :-O
ह फक्त एक किस्सा...
असे अनेक ऐकले आहेत.
....मला स्वतःला असा अनुभव नसला तरी इतरांच्या अनुभवावर, विश्वास ठेउन त्याचा आदर राखण्याइतका समजूतदारपणा नक्कीच आहे.मी लोकांची खिल्ली उडवत नाही, त्यामूळी मला अनेकजण सांगतात.

शुचि's picture

27 Sep 2010 - 7:46 pm | शुचि

माऊ धन्यवाद ग!!! मी खूप सेन्सिटीव्ह आहे या (स्वप्नांच्या) बाबतीत. तुला व्य नि करून एक गोष्ट सांगते.

शिल्पा ब's picture

27 Sep 2010 - 9:19 pm | शिल्पा ब

आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत...उगाच बुरसटलेले अन रुढींच्या नावाखाली असलेले विचार आम्हाला आवडत नाहीत..
आणि एवढेच आहे तर मंत्र तंत्र, जारण मारण, बळी देणे हे प्रकार जे लोक करतात त्यांचे पण काही फंडे असतात...काहीतरी प्रतीके असतात...त्यांना तुम्ही अंधश्रद्ध का म्हणता ? का त्यांना प्रश्नकंटक होऊन असे कशाला करायचे विचारता?

आणि तुम्हीच तर म्हणालात न कि पूर्वज जेवतात .... आमच्याकडचे पूर्वज मेलेले आहेत म्हणून मी आपले विचारले? मेलेल्यांना जेवायला घालायचे नाही हा आमचा फंडा आहे...तुमच्याकडचे पूर्वज असतील अजून जिवंत तर घाला खायला ...आमच्याकडे आणा आम्ही पण आदरातिथ्य करूच.

Nile's picture

27 Sep 2010 - 9:42 pm | Nile

आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत

होना, फक्त अंधश्रद्धच लोक कसे बुवा अश्या बाबतीत सेंन्सिटीव्ह असतात काही कळत नाही, अन विरोध केला की लगेच यांचे गळे काढणे सुरु.

>> आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत...

मुखपृष्टावर लावलेल्या कावळ्याबद्दल आपले काय मत आहे? तो काढुन टाकावा अशी सुचना करायची असा विचार तुमच्या मनात आला का?

मितान's picture

26 Sep 2010 - 11:40 pm | मितान

जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला विश्वास किंवा अविश्वास असलाच पाहिजे का ?

ज्या गोष्टीतले मला काहीच कळत नाहीत त्यावर मी विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे याला काही अर्थ नसतो. म्हणजेच ती गोष्ट चांगली किंवा वाईट म्हणण्यालाही अर्थ नाही.

पण इतर कुणी त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्यांच्या श्रद्धेला धक्का देण्याचे काही कारण नाही.

तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी.

पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

शुचि's picture

26 Sep 2010 - 11:49 pm | शुचि

>> पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. >>

मान्य

>> तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी. >>
दुखावली नाही ग जस्ट क्युरीऑसिटी की कोणी माझ्याइतकं श्रद्धाळू आहे का? मी खूप पॅशनेट आहे श्रद्धेच्या बाबतीत.... अनुभव आहेत तसे.

आंसमा शख्स's picture

27 Sep 2010 - 7:46 am | आंसमा शख्स

पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

पटले.

आंसमा शख्स's picture

27 Sep 2010 - 7:46 am | आंसमा शख्स

पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

पटले.

अडगळ's picture

26 Sep 2010 - 11:41 pm | अडगळ

>>पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे>>

( उडी मारून पळालेला अंत्य़ज) अडगळ

कवितानागेश's picture

26 Sep 2010 - 11:46 pm | कवितानागेश

फार पूर्वी ब्राम्हण केवळ भिक्षुकी करायचे...
त्याच दक्षिणेवर घर चालायचे......
तुम्ही गोष्टी वाचल्या नाहीत वाटते,... एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता........ वगरै

कानडाऊ योगेशु's picture

26 Sep 2010 - 11:57 pm | कानडाऊ योगेशु

एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता.

त्या गावाचे नाव आटपाट नगर असायचे.
हे आटपाट नगर काय आहे हे अजुनही मला कळले नाही.
आटपाट ह्याच अर्थ काय?

विजुभाऊ's picture

27 Sep 2010 - 5:21 pm | विजुभाऊ

आटपाट ह्याच अर्थ काय?

ज्या नगरात पाण्याचे पाट आठही दिशानी वहात असतात्...अर्थात पाण्याची रेलचेल असते. तेथे जीवन समृद्ध असते असे गाव म्हणजे आटपाट नगर.
आटपाट नगर हे नगर ( शहर) असते गाव नसते. तेथे उद्योग धन्दे पैसा मुबलक असतो.

अडगळ's picture

26 Sep 2010 - 11:58 pm | अडगळ

(दणद्णीत पुरव्याला घाबरून कुंपण तोडून लांब पळालेला) अडगळ

गोरिला's picture

27 Sep 2010 - 12:10 am | गोरिला

पण अजून हि ब्राह्मण लागतो ना सर्व कार्यांना
भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे .

अडगळ's picture

27 Sep 2010 - 12:14 am | अडगळ

या धाग्यातील गुप्तधन सापडले.

(अक्कल चोरिला गेलेला ) अडगळ

शिल्पा ब's picture

27 Sep 2010 - 12:34 am | शिल्पा ब

अतिशय जातीय विधान...ते कोण संभाजीब्रिगेडच्या बाजूने लिहितात त्यांच्यासारखेच..

विजुभाऊ's picture

27 Sep 2010 - 5:33 pm | विजुभाऊ

भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे .
साहेब आपले ३.१४ कुठे आहेत . एकदा दर्शन घ्यावे म्हणतो.
"जरी ब्राम्हण भ्रष्ट तिन्ही लोकी तो श्रेश्ठ"
या उक्तीवर फारच श्रद्धा दिसतेय .
अभ्यंकरानी चप्पलांचा कारखाना काढला , लागू बंधूनी सोनारकाम केले , चितळ्यानी गाईम्हशी पाळल्या , किर्लोस्करानी लोहारकाम केले ,

अंबेडकरानी भारताची घटना बनवली , भाऊराव पाटलानी शिक्षणसंस्था काढल्या , आण्णा भाउ साठ्यानी पुस्तके लिहीली ,
टाटानी हजारो लोकाना रोजगार दिला , ज्योतिबा फुल्यानी मुलींसाठी शिक्षणाची चलवळ राबवली
हे सारे जन्माने नव्हे पण कर्माने ज्ञानदान कार्य करीत होते

गोरिला's picture

27 Sep 2010 - 12:01 am | गोरिला

सर्व मिपा कराना एक विनिन्ति आहे कि ह्या धाग्या काही प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी हि विनंती .

जे दिसते ते नसते
आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत
काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना?

एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो

शिल्पा ब's picture

27 Sep 2010 - 12:11 am | शिल्पा ब

आमची कुवत नाही...तुम्हीच समजवा ना.

प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी
नाय बॉ आम्ही अज्ञानी आहोत. पण सामवेद आणि अथर्ववेदाचे पुस्तक कुठे उपलब्ध आहे ते सांगाल का.
आळंदीत एका ठिकाणी वेदमहाराज असे वेदांच्या पुस्तकांचे मंदीर होते. लोक त्याला हळदकुम्कू वहात होते . नमस्कार करत होते.
कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास असा करतात हे प्रथमच पाहिले.
असो.
विवेकानन्द म्हणतात की युरोप जेंव्हा औद्यगीक प्रगती करीत होता तेंव्हा भारतातील पुरोहीत आचमन करताना पळी डाव्या हातात की उजव्या हातात याची चर्चा करण्यात मग्न होते. जानवे उजव्या कानावर चांगले की डाव्या कानावर याचे चर्वण करत होते.
असो. पुराणकाळातील त्या काळातील गरजेनुसार ऋषीमुनीनी काही संशोधन केले ते कुठेतरी लिहून ठेवले.
आपण मात्र ममः आत्मनः म्हणत आचमने करीत बसलो त्यानी केलेल्या संशोधनाला पूर्णविराम दिला. खरा जिज्ञासू विद्याभ्यास बाजूलाच राहीला. फालतू सोवळ्याओवळ्याचे शुचितेचे नुसते स्तोम माजवत बसलो.
असो.
बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे की वेदांत बरेच ज्ञान आहे.
तुम्ही एवढा वेदाभ्यास केलेलाच आहे . मला काही सोप्या शंका आहेत त्या सोडवाल का? सोप्या मराठीत सांगा.
१)खगोलशास्त्रात सांगितलेला उर्टचा ढग पत्रीकेत कोणत्या स्थानात असतो. पत्रीकेचे थोडावेळ बाजूला ठेवा उर्टचा ढग आकाशात ( सूर्यमालेत)कोणत्या ग्रहानन्तर येतो.
२) वेदातील ज्ञानात गेल्या चारशे वर्षात कोणती नवी भर पडली आहे?
३) एका वैज्ञानीक प्रयोगानन्तर ओपेनहायमर ला भग्वतगीता आठवली होती . त्याचे वर्णन कोणत्या वेदात आहे?
४) तुम्ही सांगितलेल्या वेदांत नक्की कोणत्या प्रकारची महिती दिलेली आहे?
५) वेदांतील ज्ञान कधीच कालबाह्य कसे नाही ?

जे दिसते ते नसते
असू शकते.
आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत
नक्की काय आहे तेच कोणी सांगत नाही. तुम्ही सांगा ना.
काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना?
नाही हो. खरेच अज्ञानी आहे. पण आमचे अज्ञान दूर करायचे बाजूलाच उलट आम्हाला तुम्हाला काय यातले कळणार असे म्हणून बाजूला केले जाते आणि आम्ही अज्ञानीच रहातो
एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो

खर्‍या अभ्यासकाबद्दल नेहमीच आदर आहे. आम्हाला थोडे समजावून सांगा. आमची कुवत कमी असेल. पण म्हणून आम्हाला न हिणवता ;थोडेतरी सांगा.

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 12:12 am | कवितानागेश

अय्या,
मला माहितीच नव्हते, इथे कोर्ट भरलंय पुरावे घ्यायला!
मी काही आट्पाट नगरातल्या गोष्टी गंभीरपणे घ्यायला ७-८ वर्षाची मुलगी नाही.
पण गोष्टी सांगताना/लिहिताना एकंदर परिस्थिती भवतालच्याच समाजाचे चित्रण करणारी असते.

कोर्ट कशाला लागतंय..तुम्ही जर एखादी दिसत नसलेली अस्तित्व न जाणवणारी वस्तू आहेत असे म्हणताहात तर ते कशावरून हाच याचा अर्थ...पण अय्या तुम्हाला नाही समजलं? कमाल आहे!!

शुचि's picture

27 Sep 2010 - 1:04 am | शुचि

ज्या सर्वांनी या चर्चेत सहभाग घेतला त्यांची मी आभारी आहे.
गोरीला यांचे विशेष आभार कारण मला माहीत नसलेली माहीती कळली की साम आणि अथर्व वेदात उल्लेख आहे. मी जालावर शोध घेतला सापडलं नाही. भारतात कधी काळी जायला मिळेल वेदांचा अभ्यास होईल अशी आशा करते.
ज्यांना कोणाला श्राद्ध संकल्पाबद्दल माहीती हवी असेल त्यांनी पुढील साईट पहावी -
http://home.comcast.net/~p.kulkarni/SSfiles/ssindex.htm
ही माझ्या अतिशय आवडीच्या साईटींपैकी एक साईट.

पहिल्या धाग्यावर जो प्रतिसाद दिलाय तोच येथे परत देण्याचा मोह आवरला नाही -

सगळे शेवटी मानण्या - न मानण्यावर आहे.
मृत्यूनंतर काय होत असेल ह्यावर चर्चा करण्यार प्वॉईंटच काय ते मला कळत नाही. कारण त्यासाठी तो अनुभव घेऊन सांगणारा हवा. अन् त्यावर इतरांनी विश्वास ठेवायला हवा. त्यात पुन्हा विश्वास ठेवणारे (अंध)श्रद्धाळू अन् विश्वास न ठेवणारे विज्ञानवादी!
जे काय असेल ते.. माझे कुणी पूर्वज खरेच माझ्यासमोर येऊन उभे राहिलेत तर मी त्यांना नक्की नमस्कार करेन अन् मनापासून जेवायला वाढेन. ते नाही आलेत तरी गाईला जेऊ घातल्यानं त्यांना समाधान लाभलं असतंच या भावनेनं गाईलाही जेऊ घालेन. दररोज शक्य होत नाही म्हणून. नाहीतर तेही केलं असतं. शेवटी ज्याचे त्याचे लॉजिक. बाकी चालू देत.

योगप्रभू's picture

27 Sep 2010 - 9:19 am | योगप्रभू

मला लई जड विचार झ्येपत न्हाईत आजकाल. म्हनून म्या आपली येक वाचलेली गोष्ट सांगतु...

गुरु नानक एकदा काशीला गेले असताना तेथे घाटावर अनेक लोक पंड्यांकडून श्राद्ध, तर्पण करुन घेताना दिसले. असाच एक पोटार्थी पंड्या नानकांच्या मागे लागला. नानकांनी क्षणभर थांबून विचारले, 'तुम्ही दर्भाने पाणी सर्व दिशांना शिंपडता ते कशासाठी?' त्यावर पंड्या म्हणाला, 'त्यामुळे पितृलोकातील आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.' मग नानकांनी विचारले, 'हा पितृलोक किती दूर आहे?' त्यावर पंड्या म्हणाला, ' आपल्या पृथ्वीच्या वर आकाशात सप्तलोक आहेत. त्यात तो आहे.' नानक काही बोलले नाहीत. ते पाण्यात उतरले आणि ओंजळीने पाणी सगळीकडे फेकू लागले. त्यावर पंड्या म्हणाला, 'अरे हे काय करतो आहेस?' त्यावर नानक म्हणाले, 'तिकडे पंजाबात माझे शेत आहे. यंदा पाऊस पडला नसल्याने ते वाळून गेले आहे. मी येथून माझ्या शेताला पाणी देतो आहे.' त्यावर पंड्या उपहासाने म्हणाला, 'अरे वेड्या माणसा! इथून ओंजळभर पाणी फेकण्याने का तुझे शेत भिजणार आहे?' त्यावर नानक म्हणाले, ' का नाही बरे? जर तुमच्या चार थेंब प्रोक्षणाने पृथ्वीच्या वर असलेल्या लोकातील पितरांना पाणी मिळत असेल तर माझे शेतही नक्कीच भिजेल.'

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 2:35 pm | कवितानागेश

य गोष्टीमूळे 'पितर' नातातच हे 'प्रूव्ह' होत नाही.
यंत्रवत कर्मकांड केल्यामूळे त्याना काही मुक्ती वगरै मिळणार नाही, एवढेच 'प्रूव्ह' होते.
शिवाय गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात 'पुनर्जन्माबद्दल' लिहिले आहे असे हल्लीच मला एका अभ्यासू शिख मित्राकडून कळले.
हवे असल्यास मी विचारुन गुरुबानी मधल्या त्या ओव्या १-२ दिवसात इथे देउ शकते.

माऊ शीख लोकांचं सापडलं ग-

आवत हुकमि बिनास हुकमि आगिआ भिंन न कोइ ॥
आवन जाना तिह मिटै नानक जिह मनि सोइ ॥१॥

त्याच्या हुकमानुसार आपण येतो , त्याच्या हुकमानुसार आपण जातो, त्याच्या हुकमाबाहेर कोणी नाही. हे येण-जाणं (जन्म-मरणाचा फेरा) टळतं जेव्हा तुमचं हॄदय, मन पूर्ण त्याच्या स्वाधीन होतं.

विजुभाऊ's picture

27 Sep 2010 - 9:51 am | विजुभाऊ

श्राध पक्षात पितराना त्यांच्या नरकातल्या कामातून कॅज्यूअल लीव्ह देतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Sep 2010 - 4:22 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला इतकी खात्री आहे तुम्हाला तुमच्या पितरांबद्दल? आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे. ;)

विजुभाऊ's picture

27 Sep 2010 - 6:05 pm | विजुभाऊ

आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे
ती जिथे असतात त्यालाच स्वर्ग म्हंटले की झाले ..
हाय काय अन नाय काय

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:09 pm | गांधीवादी

हलके घ्या.
>>आमची पित्रे स्वर्गात आहेत
तिथले काही फोटू बिटू पाठवायला सांगा ना. तिथे इंटरनेट असतो का ?

नगरीनिरंजन's picture

27 Sep 2010 - 11:07 am | नगरीनिरंजन

छे छे पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हणणे अतिशय अयोग्य आहे. विशेषतः ज्या रुढींमुळे मस्त सोळा भाज्या, पुरणपोळी आणि पंचामृताचं जेवण जेवायला मिळतं त्या रुढींना खुळचट म्हणणे हाच खुळचटपणा आहे. :-)
तशा जेवणासाठी बाकी कोणी येत असेल किंवा नसेल पण मी मात्र मेल्यावरसुद्धा मस्त कावळ्यावर बसून येणार आहे. ;-)

वेताळ's picture

27 Sep 2010 - 11:35 am | वेताळ

बिपाशा आली होती. आता ह्याचा संबध कश्याबरोबर जोडावा ह्याबद्दल मिपाकर मला मदत करतील का?मी स्वप्नांच्या बाबत खुपच चोखंदळ आहे. असे किती मिपाकर चोखंदळ आहेत ते मला तपासायचे आहे.

विनायक प्रभू's picture

27 Sep 2010 - 11:38 am | विनायक प्रभू

म्हणाली का?
उत्तर मिळाल्यावर पुढील खुलासा.

संदीप चित्रे's picture

29 Sep 2010 - 12:46 am | संदीप चित्रे

>> बसु म्हणाली का !
फस्सकन हसलो ना ह्या सगळ्या गंभीर चर्चेत ;)

वेताळ's picture

27 Sep 2010 - 11:39 am | वेताळ

पण बसायच्या अगोदर कावळा ओरडला.

तिमा's picture

27 Sep 2010 - 7:10 pm | तिमा

ओरडला की शिवला ? दिशाहीन चर्चा! 'पितर' लाच इंग्रजीत पीटर म्हणतात काहो ?

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:11 pm | अवलिया

त्यांच्यात ओ रडत असेल. भावनाओंको समझो.. !

विनायक प्रभू's picture

27 Sep 2010 - 11:42 am | विनायक प्रभू

मग झाला की खुलासा.
असो.
ह्यालाच म्हणतात नसिब मे लिखा है दंड तो खायेगा कैसे श्रीखंड.

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 12:06 pm | इन्द्र्राज पवार

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते. पण असे असले तरी खुल्या मंचावर जाहीर चर्चा करताना 'आपली बाजू कुणी घेत नाही' याचे वाईट वाटून घेणे म्हणजे आपल्या मत प्रदर्शनाला महत्वच नाही असा अर्थ करून घेणे होय. दुसरा मुद्दा त्यांनी "कुंपणावर बसलेल्यांचा" घेतला आहे. मला कबूल करायला काहीच अवघड नाही की, मी या मुद्द्यावर कुंपणावर बसलो आहे....त्याला कारण परत तेच > मी ज्या समाजात राहतो, ज्या संस्कृतीविषयी मला आत्मियता आहे, तिच्यातील श्रध्दा फोल्डरमधील 'पॉझिटीव्ह/निगेटीव्ह' प्रतिमांशी जुळवून घेणे मला आवडते ~ फक्त जिथे आणि जेव्हा श्रद्धेच्या परीचे अंधश्रध्देच्या चेटकीणीमध्ये रूपांतर होण्यास सुरूवात होते त्या त्यावेळी परिणामकारक असा विरोध केलेलाच आहे.

~~ टिळकांच्या ज्या 'कर्मविपाका'च धागाकर्तीने उत्साहाने उल्लेख केला आहे, त्याचा अर्थ असा घ्यायचा का की, तो सिद्धांत म्हणजेच हिंदू तत्वज्ञानाचे ते सार आहे? कर्मविपाकाचा सोप्या भाषेत अर्थ असा की, 'तुम्ही या जन्मी जे काही आहात आणि जे काही भोगता ते कशामुळे? तर मागच्या जन्मीच्या पापामुळे किंवा पुण्यामुळे... तसेच या जन्मी तुम्ही ते काही कृत्य करता, त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे पुढच्या जन्मी... म्हणून आता जन्माला आलाच आहात तर पुढच्या जन्म चांगला जावो म्हणून या जन्मात सत्कृत्य करा...." [अजून बरेच लिहिता येईल कर्मविपाकाच्यासंदर्भात, पण स्थानभयास्तव थांबणे गरजेचे आहे, तसेच चर्चेच्या रोखाने इतपतच पुरे आहे.] ~~ इथे याचा मतलबी अर्थ इतपतच आहे की आपल्या पितरांच्या नावाचे गोरगरीबांना (किमान १५ दिवस) गोडधोड खायाला घाला आणि निश्चित रहा की, वर तुमचे पितर आनंदाने पुढचा जन्म चांगला मिळणार या कल्पनेत राहणार शिवाय असे पुण्यकर्म केल्यामुळे तुम्हाला जरी या जन्मी पुष्पक विमान न्यायला आले नाही तरी 'हेवन एंट्री' साठी 'टोल' बसणार नाही हेही तितकेच सत्य.

या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून एखाद्या 'अबक' ने 'मी मागील जन्मी पुण्य केले होते म्हणून...' तर एखादा 'कखग' भंगी झाला म्हणून 'नक्कीच त्याने मागील जन्मात महाभयंकर पाप केले असणार म्हणून...' अस रिडींग करता येईल का...या कर्मविपाकाच्या सिध्दांताच्या आधारे?

कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाकर' आज तळीरामाबरोबर बसला असला तरी सिंधूने ती प्रार्थना करायचीच. आहे हे मान्य आजच्या समानतेच्या युगात ? चला, वादाकरीता तेही मान्य करू या. पण ही सिंधू या आयुष्यात विपरित परिस्थितीतही पुण्यसंचय करीत राहिली आणि सुधाकरबुवा हमेशा झिंगलेल्या अवस्थेत येऊन हिला लाथा घालत बसला तर याच्या बँक अकौन्टवर कोणत्या प्रकारचे 'पुण्य' जमा होणार? उत्तर झीरोच असेल...मग असा गृहस्थ या जन्मातील अशा प्रकारच्या कृत्यामुळे मेल्यावर स्वर्गात जाईल की नरकात? स्वर्ग तर बंदच (कारण कर्मविपाक सांगते तशी पुण्याई या बाळकोबाकडे नाहीच...) मग नरकात जर याने अप्रेन्टिसशीप केली तर याचा पुढील जन्म मनुष्याचा नसून डुकराचा असणार...हेही कर्मविपाकात सांगितले आहे.

मग आता हयात असलेल्या याच्या पिलांनी 'पितृपक्षा' त १५ नाही तर १५० दिवस जरी गोडधोड करून सो-कॉल्ड गोरगरीबांना दानधर्म केला तर 'नेक्स्ट लाईफ ट्रान्सफॉर्मेशन' थांबणार असे मानायचे का?

थोडक्यात, कोणत्याही कारणाने आणि "अमुक एक होईल किंवा व्हावे" अशा स्वार्थी वृत्तीने केलेला दानधर्म फलद्रूप होईल असे समजणे ही स्वतःशीच फसगत केल्यासारखे आहे....आणि जर का निस्वार्थी हेतूनेच दानधर्म करायचा असेल तर मग 'पितृपक्षा'ची तर वाट का पाहावी?

इन्द्रा

नितिन थत्ते's picture

27 Sep 2010 - 12:47 pm | नितिन थत्ते

एवढेच नाही.

सिंधूने अमाप पुण्य केल्याने ती पुन्हा ब्राह्मण स्त्री म्हणून जन्मणार. तर सुधाकर हा पापांमुळे डुक्कर किंवा गेला बाजार शूद्र तरी होणारच.

पण सिंधूने जन्मोजन्मी हाच पती मागितल्याने तिला शूद्र सुधाकराशी विवाह करावाच लागनार आणि ती प्रतिलोम वर्णसंकराच्या पापात बुडून जाणार (डुकराशी लग्न केल्यास कोणत्या पापात बुडणार याची कल्पना नाही).

असो. लिहावे तेवढे थोडेच आहे.

Pain's picture

28 Sep 2010 - 2:05 am | Pain

हाहाहा... हा तर इन्फायनाईट लूप झाला :D

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 1:05 pm | कवितानागेश

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते.>>>>>
त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत!
"डीफेन्ड" करण्याचा प्रश्न कुठे येतो? 'पित्रुऋण' फेडण्यासठी दान करने हा गुन्हा आहे का?
कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाक........
हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे?
असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 1:40 pm | इन्द्र्राज पवार

"त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत!"

~~ अहो ताई, त्यांनी धाग्यात जरी 'धर्म' असा सरळसरळ उल्लेख केला नसला तरी ती भाषा धर्माचे आचरण करण्यासंदर्भातच आहे, हे तरी मान्य करू या ना. प्रत्येक वेळी तसे थेट म्हटले नसले म्हणजे प्रतिसाद देताना ती बाब लक्षात ठेवूनच लिखाण करावे असे नाही. शिवाय शुचिताईंनी सापाच्या स्वप्नाचा संबंध पितृपक्षाशी लावला व त्यानुसार जागेपणी पालन केले म्हणजे कोणतीतरी 'धर्मरिती' पाळली असे होते ना?

"हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे?"

~~ इथेही तेच. अमुक एक गोष्ट लोकमान्यांनी सांगितली तरच ती प्रमाणभूत मानावी असा काही दंडक आहे काय? कर्मविपाकाचा मी एवढ्यासाठीच उल्लेख केला की, त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके आहेत ती या श्रध्दा/अंधश्रद्धा चर्चेच्या निमित्ताने चर्चेत यावी. शिवाय ना गीतेत ना कर्मविपाकात राहू दे, अन्यत्र जर टिळकांनी एखाद्या 'सिंधू' ची 'सुधाकर' हाच नवरा पुढील जन्मी मिळो अशी प्रार्थना ऐकली असती तर तिचे त्यांनी शनिवारवाड्यावर बोलावून अभिनंदन केले असते का?

धर्म आचरणातील चांगल्या/वाईट रितीविषयी लिहिताना/बोलताना लिखित आणि मौखिक दोन्हीची संगत घ्यावीच लागते. "देवास काय आवडते ?" याची व्याख्या देवाने नसून खुद्द मनुष्याने केली आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे कारण याच मनुष्याने स्वतःला जे सुखदायी असेल तेच देवास आवडते अशी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे. [आता हे कर्मविपाकात टिळकांनी लिहिलेले नाही, म्हणून असत्य होते काय?]

"असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!"

~~ ठीक. मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने, मग तो वेडेपणा गीतारहस्यच काय पण खुद्द गीतेतही दिसला वा ना दिसला....काही फरक पडत नाही.

इन्द्रा

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 2:29 pm | कवितानागेश

त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके
कुठले धर्मग्रंथ?
तुम्ही कर्मविपाकाबद्दल बोलताय की धर्मग्रंथांबद्दल?
गीता हा धर्मग्रंथ नाही, गीतारहस्य हाही नाही.
(मधल्या काही शतकांमध्ये स्त्रियांवर धर्माच्या नावाखाली बंधने होती, त्याचे कारण वेगळे आहे, त्याची इथे चर्चा नको.)
त्यामूळे एकच काठी घेउन चुकीच्या परंपरांच्या नावाखाली,संपूर्ण धर्माला बडवणे योग्य नाही!
तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी केवळ 'रूढी' म्हणून केल्या जातात...
अशा रुढींमध्ये, समजांमध्ये 'काहीतरी' अर्थ आहे की काय, असे वाटावे, असे अनुभव, नेहमीच लोकाना येतात.
अशा वेळेस त्या अनुभवांकडे डोळसपणे न बघता, त्यातून 'चांगले' काही 'निष्पन्न' होत असेल तर ते न बघता, केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही.

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 3:07 pm | इन्द्र्राज पवार

"केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही....."

~~ माझ्या मूळच्या प्रतिसादात मी स्पष्टपणे म्हटले आहे की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा मी ओळखतो. कोणत्याही बाबीची मी कधीही 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली (इथेच काय, पण अन्यत्रही कुठे) उडवलेली नाही. फक्त देवधर्माच्या नावाखाली ज्या अनिष्ट रूढी, परंपरा येथील मातीत रूतून बसल्या आहेत (त्यातील बर्‍याचशा कालबाह्य झाल्या असल्या तरी...) त्यांचे पुनरूज्जीवन कोणत्याही निमित्ताने होऊ नये इतपतच.

सचिनला एरवी आम्ही डोक्यावर घेऊन नाचनाचनाचू पण खेळातील सातत्य कमी झाले म्हणून पाठीवर उठलेल्या कुठल्यातरी व्रणामुळे 'सर्पशांती' नावाचा यज्ञ करायला केरळाच्या मंदिरात जायाचे यासाठी त्या कृत्याची खिल्ली उडवलीच पाहिजे.

~~ तुम्ही आणि शुचिताई "स्त्री" आहात, मग एका स्त्रीची - त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी तिचे बालाजीला जाऊन "झाडा" च्या फांदीबरोबर लग्न लावून ते बाजूला नेऊन जाळायचे, मग तिला 'पवित्र' अशा दहा नद्यातील पाण्याने आंघोळ घालायची....., हुश्श... आता तिच्या डोक्यावरून 'मंगळ' गेला म्हणून बालाजीला ५५ लाखाचा मुकुट द्यायचा, नंतर तिचा त्या महान बच्चनच्या पुत्राबरोबर 'पुनर्विवाह' करायचा....ही बाब एक सुशिक्षित स्त्री म्हणून तुम्हाला खटकत नाही का? आणि जर खटकत असली तर मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही?

आता अशा प्रथेबद्दल संयत भाषेत टीका केली तर ती धर्माची खिल्ली कशी होईल?

इन्द्रा

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 3:50 pm | कवितानागेश

पुन्हा विषयांतर!!
अहो, चर्चा सुरु आहे, ती या न त्या कारणाने पित्रुऋण फेडण्याबद्दल,
आणी त्या अनुषंगानी घडणार्‍या काही योगायोगांबद्दल!

आणी तुम्ही एकट्यानी संयत भाषेत लिहून काय उपयोग?

शिवाय इथे सचिन आणी ऐश्वर्याचा काय संबंध?
(अवांतरः अशा 'अंधश्रध्दा'वाल्या गोष्टी फक्त भारतातच घडतात असे नाही!)

मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही? >>>>>>>
संपूर्ण ग्रंथ टाकाउ कसा असेल? प्रत्येक ग्रंथ त्या त्या काळाला अनुसरुन लिहिला गेला आहे, म्हणूनच भारताला 'स्पेसिफिक' धर्मग्रंथ नाही!

एखाद्या काळात जर मुलींना 'मंगळी' म्हणून, बिनलग्नाचे ठेवायला सुरुवात झाली असेल, तर हे सगळे असे 'शांती' चे उपाय कढून, मुलगी 'उजवण्याची' वाट मोकळी केली असेल, असे मला वाटते.
त्यात बिघडले काय?
स्वतःची उन्नती होणार असेल, तरच माणसाच्या हातून पैसा सुटतो!
हे एक बरे निमित्त आहे!
खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 4:04 pm | इन्द्र्राज पवार

विषयांतर नव्हते तर त्या विषयाचे दुसरे कंगोरे शोधण्याचा तो एक प्रयत्न होता.... पण आता राहू दे. [तिकडे शुचिताई माझ्या डोक्यात हाणण्यासाठी गदा शोधत आहे....]

"खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!..."
~~ चला, निदान इतपत तरी एकमत झाले ते छानच आहे...कारण खरंच हा "मंगळ्या" काय करतोय यावरही इथे एकदा नौबती झडल्या पाहिजेत. ते "रुपांगी" वाले प्रा.घैसास हा धागा वाचत असतील अशी आशा करु या. त्यांचा या बाबतीत अभ्यास असावा असा कयास आहे. ~ पण जर ते 'स्त्री' ने सुंदर कसे दिसावे ? यातच गुंतले असले तर कठीण आहे.

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2010 - 4:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी ...

त्या मंगळ-चंगळ आणि फनीशनीच्या गोष्टीत मला काही विंट्रेष्ट नाय! पण ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर आता बाँगाली बॉबू आणि भॉगिनींना तोंड द्यायला उभा रहा! (बसू या बॉंगाली आडनावावर फालतू जोक नकोयत!)

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 4:49 pm | इन्द्र्राज पवार

"ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर...."

~~ म्हणजे ? मी तो जादाचा 'चंद्र' चढविला आहे की काय तिच्या आडनावावर?
अगं, तो लिखाणातील सवयीचादेखील भाग असू शकतो. आपण नाही का, 'Principal' मराठीत लिहिताना 'प्रिन्सिपल....प्रिन्सिपाल....प्रिन्सिपॉल..." असे तीन विविध रूपे वापरलेली पाहतो; तद्वतच 'Rai' चे रॉय झाले माझ्याकडून.

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2010 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यांना कोणितरी अर्धचंद्र द्या रे.

पैसा's picture

27 Sep 2010 - 7:21 pm | पैसा

आता सगळे मंगलोरी कोकणी पण धावणार बघ तुझ्यामागे!

मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने,

कित्येक धर्म मानवाचे आजचे रुप हे अवनत असुन त्याच्या मुळ स्वरुपापासुन च्युत झाला आहे असे प्रतिपादन करतात. मुळचे अमृतमयी रुप म्हणजे मानवाचे दिसत असलेले रुप (दोन पाय दोन हात एक डोकं इत्यादी) अभिप्रेत नसुन त्याच्या अंतर्यामी असलेले ते चिरंतन नित्य चैतन्यरुप हेच सर्वात मोठे आहे ह्याचे प्रतिपादन केलेले असुन त्याच अनुषंगाने अमृताच्या पुत्रांनो जागे व्हा ही घोषणा आहे. उगाच काहीतरी कुठे तरी जोडून बोलु नका.

अवलिया's picture

27 Sep 2010 - 5:54 pm | अवलिया

कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे....

कशावरुन? संदर्भ द्या !

इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण नीट आठवत नाही पण इंग्रजी पुस्तकं काही आठवताहेत आणि एकामधे हे होतं की - एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही. जसं एकदा तुम्ही ५वीत असता मग तुम्हाला ४ थीत ढकलत नाहीत त्याचप्रमाणे.
सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही.

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:53 pm | गांधीवादी

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही
चला, (मला) आता निर्धास्त मरायला काही हरकत नाही.

हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार म्हटल्यावर निश्चिंत झाले तुम्ही !

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:59 pm | गांधीवादी

अहो, काय सांगू, एवढाली मोठ्ठी मोठ्ठी पापे केली आहेत. म्हणून जरा काळजीत होतो.
(स्विस माझ्यामुळेच तर चाललेली आहे.)

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:00 pm | अवलिया

हा हा हा गांधी नावात आहे म्हटल्यावर पाप बाय डिफॉल्ट असणारच आयुष्यात

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 7:01 pm | गांधीवादी

सहमत,
हे १०० टक्के खरं आहे, हे १०० टक्के खरं आहे,

नाना ते वरून गांधीवादी आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 7:58 pm | इन्द्र्राज पवार

"जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते."

~~ हे मान्यच आहे शुचिताई. कोणतीही गोष्ट स्वीकारताना तिची चिकित्सा करणे हे डोळसपणाचे लक्षण आहे. मग तुम्ही ते ज्ञान पुस्तकाद्वारे प्राप्त केलेले असो वा ज्याच्या शिकवणीविषयी तुमच्या मनात कोणताही संदेह नाही अशा गुरुतुल्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान असो. मी पुनश्च एकदा इथे सांगू इच्छितो की, मी कोणत्याही 'श्रद्धे' च्या विरूध्द नाही, फक्त तिच्या प्रवासाकडे लक्ष ठेवून त्या शुध्द झर्‍याचे अंधश्रद्धा नामक डबक्यात रूपांतर झालेले पाहू इच्छित नाही. आपल्या पूर्वजांच्या काळात अशी श्रद्धा होती की आपली पृथ्वी सर्व विश्वाच्या केंद्रस्थानी असून ३३ कोटी देव तिच्यावर वरदहस्त ठेवून आहेत. पण पुढे विज्ञानाने हेही सिद्ध केले की विश्वाच्या या महाप्रचंड उलथापालथीत सामील असलेल्या हजारो आकाशगंगापैकी एक व तिच्यातील सूर्यासारख्या दोनशे अब्ज तार्‍यांच्यापैकी एका सूर्यतार्‍याच्या कुळात आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे....ज्याचे आकारमान या जंजाळात सुईच्या अग्रावर कसेबसे मावेल इतपत आहे. ~ हे तरी आपण मानतोच ना? आणि जर याचे उत्तर 'होय' असेल तर मग कोणत्या गोष्टीवर कितपत श्रद्धा ठेवावी ही बाबदेखील विज्ञानाच्या कसोटीवरच प्रमाणभूत मानली पाहिजे.

"सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही."

~ ठीक आहे. तुमचा हा विश्वास सार्थ ठरो इतपतच म्हणतो. शेवटी या देशातील 'सिंधू' कुठल्यातरी जन्मी सुखी होणार असेल तर तुमचे वरील विधान मी कदापि खोडू इच्छिणार नाही.

इन्द्रा

नितिन थत्ते's picture

27 Sep 2010 - 8:38 pm | नितिन थत्ते

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही.
>>सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही

पहिले वाक्य बरोबर नाही. चौर्‍याऐशी लक्ष जन्म सायक्लिक असतात. त्यात शेवटचा जन्म नसतो. [मोक्ष प्राप्ती झाली तरच हे सायकल तुटते].

सुधाकरला डुकराचा जन्म मिळणार नाही या सुधारणेबद्दल धन्यवाद. चूकच झाली होती. ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. (बायकोला मारणे हा नवर्‍याचा लग्नसिद्ध अधिकार असल्याने त्याबाबत मनु:स्मृती काही म्हणत नाही. दारू पिऊन बायकोला मारणे यासाठी काही स्पेशल शिक्षा नाही).

स्त्री आणि कृमीकीटक यांचा विवाह पुढच्या जन्मी कसा होणार ते मला विचारू नका.

*पुढच्या जन्मी कीटक होऊन कुणाकुणाला चावायचे याची यादी करायला घेतली आहे.

(पितृपक्षात जन्मलेला)

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 9:03 pm | कवितानागेश

(पितृपक्षात जन्मलेला)

नितिन थत्ते
>>>>>>>>>>>
हॅप्पी बर्थडे थत्तेकाका!

ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. >>>>
पण ते शोधून कसे काढणार, अत्ताच्या डुकराला गदागदा हलवून विचारवे लागेल, "खरे बोल, कुणाला मारलस गेल्या जन्मी?" ;)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2010 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

**एकदा मी फिरायला बाहेर पडलो असताना मला प्रोफेसर धनुष्कोडी भेटले. रस्त्यातच थांबून आमच्या गप्पा सुरू झाल्या.... त्यांच्या आत्येसासूबाई वेलिंग्टनला असतात्.त्यांच्यासाठी बाकरवड्या घ्यायला ते आले होते असे त्यांनी मला सांगितले..... खूप ऊन असल्याने मी त्यांना म्हणालो, चला जरा चहा घेऊ. मग मी आणि प्रोफेसर चहा घ्यायला थांबलो. बाबल्याच्या दुकानात चहा छान मिळतो. मी प्रोफेसरांना बाबल्याची ओळख करून दिली. बाबल्याला आनंद झाला... "असे छोटे छोटे आनंद वाटायला हवेत " प्रोफेसर म्हणाले. मलाही खूप बरे वाटले. छोट्याछोट्या आनंदावरून आठवण झाली आणि मी प्रोफेसरांना म्हणालो," आपण मिसळपावावर असता की नाही?" त्यांना कळेना...

मी त्यांना मिसळपाव आणि खरडवही म्हणजे काय ते समजावून सांगितले.... त्यांना माझे म्हणणे पटले... बोलताबोलता खूप वेळ गेला होता. आम्ही आत्येसासूबाईंसाठी आणलेल्या सगळ्या बाकरवड्या संपवल्या.... मला अपराधी वाटले. पण ते म्हणाले, " छोटेछोटे आनंद वाटायला शिकले पाहिजे" मलाही आनंद झाला.... जाताजाता मी म्हणालो, " पितृपक्षावरील लेख चाळणे पितरांच्या आरोग्यास चांगले असते.." तेही हसून म्हणाले, " लेख चाळलेच पाहिजेत.. पितरांचे आरोग्य चांगले ठेवलेच पाहिजे"...**

**सौजन्य :- भडकमकर मास्तर.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2010 - 12:34 pm | बिपिन कार्यकर्ते

दण्णका!!!!!!! =))

नंदन's picture

27 Sep 2010 - 12:43 pm | नंदन





_/\_ हो परासेठ!
असो, अधिक काही लिहिले तर पराचा कावळा करण्याचा (तोही या 'पक्षी' :)) आळ यायचा, त्यामुळे लेखनसीमा.

मस्त कलंदर's picture

27 Sep 2010 - 2:36 pm | मस्त कलंदर

सही...
बाकी, पराच्या प्रतिसादावर कोकेंची अपेक्षित कोटी आल्याने धन्य झाले... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2010 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजचा दिवस कारणी लागला. भडकमकर मास्तर, परा आणि कोटीकेसरी नंदन एकत्र बसून बाकरवड्या खात कावळे हाकलत आहेत असं दृष्य डोळ्यासमोर आलं.

चतुरंग's picture

27 Sep 2010 - 8:21 pm | चतुरंग

खल्लास!! दिवाळीआधीच अ‍ॅटमबाँब फोडला पराने!!! =)) =))

(प्रो.कुंभकोणम्)चतुरंग

अविनाशकुलकर्णी's picture

27 Sep 2010 - 1:37 pm | अविनाशकुलकर्णी

आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो, यासाठी या आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांच्या बद्दलचा कृतज्ञभाव व्यक्त करणारा हा पितृपक्ष.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञ भावाला फार महत्त्व आहे. जिथे प्रेम आहे, तेथे कृतज्ञता आहे आणि कृतज्ञताभाव हा ऋणमोचना भाव आहे. कारण आपल्या पूर्वजांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे आणि ते उभ्या जन्मात फिटू शकत नाही, त्यासाठी हा पितृ पंधरवाडा निर्माण झाला.
या निमित्ताने आपण आपल्या वाडवडिलांची आठवण करतो. त्यांचा आदर्श, शिकवण, त्यांचं मोठेपण आठवतो आणि पुन्हा पुन्हा हे व्हावं यासाठी दरवर्षी पितृपक्ष नेमाने येतो.

आम्हि पण हा विधि सश्रद्ध मनाने करतो..आम्ही धार्मिक प्रवृत्तिचे असलो तरी कर्म कांडाचा फाफट पसारा पासुन आम्हि दुर रहातो..महत्वाचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे..ज्या आई वडिल.. आजी आजोबांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो..ज्यांचे बोट धरुन शाळेत गेलो..ज्यांच्या त्यागावर व श्रमावर आज आपण सुसंस्कारित व ्समृद्ध जिवन जगत आहोत त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला पाहीजे..आज ते कुठल्या जगात आहेत हे आपणास हि ठावुक नाहि पण त्यांचे आशीर्वाद व मायेचा अखंड वर्षाव आपल्यावर होतच आहे...त्या साठी हा कृतज्ञ भाव....

वेताळ's picture

27 Sep 2010 - 5:14 pm | वेताळ

पण आपल्या श्रध्दा आपण चार भिंती आड ठेवल्या पाहिजेत .त्याचे चव्हाट्यावर प्रदर्शन मांडणे योग्य नाही.जिथे कावळ्याचा फोटो दिला आहे तिथेच ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज ह्याचे देखिल फोटो आहेत. त्यानी देखिल अश्या किती तरी खुळचट कल्पनांवर टिका केली आहे. जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.

अवलिया's picture

27 Sep 2010 - 5:53 pm | अवलिया

देव कशावरुन आहे?

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 5:56 pm | गांधीवादी

३३ कोटी देव कशावर न कशावरून असतातच.
उदा. गणपती उंदरावरून आहे.

देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.पण मी देव आहे असे एक बापु ओरडुन सांगतात असे मी वाचले आहे. हवतर तुम्ही त्याचे वानर माफ करा शिष्य व्हा,तुम्हालाही संधी मिळेल देव पहाण्याची.

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:04 pm | गांधीवादी

चला,चला ५ का दस, ५ का दस, लॉट का माल , लॉट का माल
देव बघा , देव बघा, चला,चला लवकर लवकर.
हि संधीपू न्हायेणार नाही.

अवलिया's picture

27 Sep 2010 - 6:06 pm | अवलिया

>>>देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही

मग

जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.

हे तुम्ही कसे काय म्हटले आहे?

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:12 pm | गांधीवादी

आयल कस्ला पॉयन्ट मदि पकडलाय

वेताळ's picture

27 Sep 2010 - 6:19 pm | वेताळ

वापरले ते माझ्या आसपास असणार्‍या देवांच्या मंदिरावरुन मांडले आहे. आमच्या भागात प्रत्येक गल्ली बोळात देवाची मंदीरे उभी आहेत. त्यातली मुर्ती म्हणजे देव आहेत व ते लोकांच्या पापापुण्याचा फैसला करतात असे पुर्वी पासुन सांगितले असल्यामुळे मी तसे म्हणालो.
नाना ह्या उपर मला देवांबद्दल माहिती नाहीतेव्हा ह्या पामराला क्षमा कर.

अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव असे करतो असे प्रतिपादन आजुबाजुच्या समाजाकडे पाहुन केले. किमान समोरच्याला सांगण्यापुरते तरी तुम्ही क्षणभर देवाचे अस्तित्व मानीव का होईना गृहित धरुन सांगितले याच न्यायाने मग जर कूणी आजुबाजुच्या समाजानुसार परंपरा रुढी जतन करुन पितरांविषयी काही भावना जपत असतील, कदाचित पूर्वायुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे मनात किल्मिष असेल त्याचे निराकरण या आधाराने करत असतील आणि पुन्हा आयुष्याला धडाडीने सामोरे जात असतील तर त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. होय की नाही ? हा प्रश्न केवळ तुम्हाला एकट्यालाच आहे असे नाही आणि कुणालाही विशिष्ट उद्देशुन नाही. शेवटी काय आहे भारत हा अनेक विचारधारांचा देश आहे. समोरच्याची खिल्ली उडवणे हेच अनेकांना जमते बाकी जमत नाही. शेवटी ज्याची त्याची जाण, समज हेच खरे.. !! असो.

यानिमित्ताने या जन्मातील तसेच (असल्यास) मागील सर्व जन्मांतील सर्व बांधव, आप्त, मित्र, पितरांना विनम्र अभिवादन !

वर जे लिहले ते बरोबर आहे,मग आपल्या पितरांचे कौतुक घरी करावे असे वाटते.

अवलिया's picture

27 Sep 2010 - 6:42 pm | अवलिया

अवघे विश्वची माझे घर

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:43 pm | गांधीवादी

'हि विश्वची माझे घर' असे कोण समजत असेल तर ?

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2010 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते

देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.

तुम्ही असा माणूस शोधायचा प्रयत्न केला आहे का?

असल्यास : कधी? कसा? किती?
नसल्यास : प्रयत्नच नाही केला तर अपेक्षा का?

पैसा's picture

27 Sep 2010 - 7:28 pm | पैसा

एक कौल फोडा!

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:30 pm | अवलिया

>>>एक कौल फोडा!

पैसे पडतात.

पैसा's picture

27 Sep 2010 - 7:33 pm | पैसा

आपल्याकडे आहेत पैसे आणि ढब्बू पैसे!

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:34 pm | अवलिया

हिरवे की लाल?

पैसा's picture

27 Sep 2010 - 7:36 pm | पैसा

काळे पांढरे आणि पिवळे सुद्धा!

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:37 pm | अवलिया

चान चान

विनायक प्रभू's picture

27 Sep 2010 - 5:25 pm | विनायक प्रभू

म्हणुनच कावळा ओरडायच्या आधी संधी साधुन घ्यावी वेताळा.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2010 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

प्रभुगुर्जींना आवरा !!

नगरीनिरंजन's picture

27 Sep 2010 - 7:32 pm | नगरीनिरंजन

ओरडायच्या आधी की शिवायच्या आधी ;-)

वेताळ's picture

27 Sep 2010 - 5:40 pm | वेताळ

ते पण खर आहे मास्तर्.....पुढच्या वेळी चान्स सोडत नाही.

अवलिया's picture

27 Sep 2010 - 5:49 pm | अवलिया

उद्या आणि परवा मोकळा आहे, कूणाला ब्राह्मण मिळाला नसेल तर मी उपलब्ध आहे.

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 5:52 pm | गांधीवादी

मी ह्या शनिवारी (२ ऑक्टोबरला) जोश मध्ये येणार आहे.

विनायक प्रभू's picture

27 Sep 2010 - 6:09 pm | विनायक प्रभू

ब्राम्हण का?
कशावरुन?

अवलिया's picture

27 Sep 2010 - 6:12 pm | अवलिया

गळ्यात जेव्हा हवं तेव्हा पुडीच्या दोरापासुन जानवं तयार करुन वेळ निभावुन नेऊ शकतो. रामरक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटत जोतीष्टोम आणि पुर्णदर्शाच्या यागाची मंत्र म्हटल्याचा आभास उत्पन्न करु शकतो.. इत्यादी सॉफ्ट स्किल्स आहेत त्यामुळे ब्राह्मण !

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:15 pm | गांधीवादी

दक्षिणा दुप्पट करून मागता येते का ?

अवलिया's picture

27 Sep 2010 - 6:18 pm | अवलिया

आम्ही अ‍ॅडव्हान्स घेतो रोकड... आणि ऐनवेळी परत १०१, ५०१, १००१.... ****१ समोरच्याच्या ऐपतीनुसार घेतोच घेतो..

आणि हो जाण्यायेण्याचे रिक्षाचे भाडे स्वतंत्र... परगावी शिवनेरीचे भाडे जाउन येऊन

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 7:14 pm | गांधीवादी

credit card , master card, सोडेक्सो कुपन्स, चेक्स, स्वीकारता का ?
आणि हो परदेशी आमंत्रण असेल तर हवाई प्रवासा साठी कोणता क्लास मागता, बिसनेस कि इकोनोमी चालतो.(काये इथे मिपावर बरेचशे परदेशी आहेत, त्यांना उपयोगी होईल हि माहिती)

अवलिया's picture

27 Sep 2010 - 7:14 pm | अवलिया

कॉन्टॅक्ट माय सेक्रेटरी.. मिस्टर परा. ते आपल्याला सर्व बाबी व्यवस्थित समजावुन सांगतील.

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 7:17 pm | गांधीवादी

जेन्ट्स सेक्रेटरी, आम्ही आतापर्यंत फकस्त ********** पोरीच बघितल्या आहेत सेक्रेटरी म्हणून.
तुमचा बिसनेस खालावतोय असे दिसतंय.

चुकीचे आकलन. अनेक फटाकड्या पोरी आधी सेक्रेटरी म्हणुन ठेवल्या होत्या.. दोन महिन्यात चार जणींचे लग्न मलाच लावुन द्यावे लागले माझ्या क्लायंटमधल्या होतकरु उपवर तरुणांशी... ते ही विना दक्षिणा.. ! तेव्हापासुन पराला ठेवले (सेक्रेटरी म्हणुन) आहे. तुम्हाला पोरीमधेच विंटरेश्ट असेल तर आमचे मित्र आहेत, ते दुबैतुन हल्लीच पुण्याला आले आहेत.. म्हणत असाल तर रुजवात घालुन देतो. कळवा !

विनायक प्रभू's picture

27 Sep 2010 - 6:16 pm | विनायक प्रभू

अशी भांजगड अस्ते ब्राम्हण म्हणजे काय?
कशावरुन म्हणजे वाहन कोणते?
आजकाल पुजा सांगणार्‍या ब्राम्हणाकडे पण पॉश गाड्या असतात म्हणे.
तुमच्याकडे कुठले वाहन?

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:21 pm | गांधीवादी

M80

अनिल २७'s picture

27 Sep 2010 - 6:26 pm | अनिल २७

ब्राह्मण या विषयावर बोलायचं काम नाय ! नही तो 'गोरिला' आयेगा !!

'गोरिला' आयेगा
त्याने आपल्या पितरांच्या स्मृतीला जागून त्यांचे नाव घेतलय.
का उगाच त्या नावाला छळता

वेताळ's picture

27 Sep 2010 - 5:51 pm | वेताळ

त्याची तर माहिती द्या.

सुहास..'s picture

27 Sep 2010 - 6:20 pm | सुहास..

व्वा !! अतिशय संमजस आणी माहीतीपुर्ण त्रागा ..आपल हे धागा !!

इंटरनेटस्नेही's picture

27 Sep 2010 - 7:14 pm | इंटरनेटस्नेही

मला जर कोणीही देव दाखवल्यास मी 'पाणी' पिणं सोडुन देईन!

(पाणी म्ह्णजे काय ते संबंधितांना कळं असेल्च)

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 7:33 pm | कवितानागेश

मी दाखवून देइन! >:)
पण तुम्ही ओळखणार कसे की हाच/हीच देव आहे?
तुम्हाला काही खाणखुणा तरी माहीत आहेत का?B-)

(देवाला ओळखणारी) ;)

गोरिला's picture

27 Sep 2010 - 8:37 pm | गोरिला

मस्त एक खड़ा मारला अणि नेमका कावला जख्मी जाला बिचारा
सॉरी हा परत पुढल्या वर्षी जरा मोठा खड़ा / पत्थर मारींन .

आता कावला कोण ते विचारू नका कारन कावला काला असला तरी ............ आहे.

गणेशा's picture

27 Sep 2010 - 9:12 pm | गणेशा

काहिच भाग वाचला ..
--------------

माणसाने माणसाच्याच स्वार्थासाठी देव, पुजा, मुर्ती , दान ,पद्धती , रुढ केल्या आहेत .

जेथे देवच माणसाने बनवले आहेत, तेथे स्वर्ग .. नरक माणन्यात असे काय जास्त तारे तोडावे लागतात ?.

कुठलीही पुस्तके, वेद आणि अन्य काही शास्त्र मानव सोडुन कोणी लिहिलेले नाही . त्यामुळे कोणाचे लिखान वाचायचे कोणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न ..

आणि कोणी म्हणुच नये या देवाने हे लिहिले आहे.
मग मला कळत नाही देव काय फक्त भारतातल्या लोकांसाठी होता का ?

जाउद्या .. एक भावनांच नात म्हणुन काही दुसर्याचे वाचुन - बघुन केले तर ठिक आहे .. पण तेच कसे चांगले वगैरे सांगण्यात काही उपोयोग नाही.
आपण ज्यावर श्रद्धा ठेवतो .. अआणि काही वाचुन वगैरे विश्वास ठेवतो .. ते वाचलेले किंवा श्रद्धा ठेवलेले खरेच हा अट्टाहास करणे चुकीचे आहे.
जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 10:09 pm | कवितानागेश

जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..>>>>>
हे मात्र खरे आहे.
जिची परिणती चांगली, उपयोगी, ती श्रध्दा, जी त्रासदायक, ती अंधश्रध्दा!

( रिझल्ट ओरिएंटेड)
माउ

गोरिला's picture

27 Sep 2010 - 11:24 pm | गोरिला

मी एक फक्त दगड मारला आणि अगदी बरोबर बसला बिचारा कावळा जखमी झाला

शमा असावी कि आपण फार दुखी आहात पण काही केल्या आमची खोड जात नाही रे बाबा पुढील वर्षी धोंडा मारणार कृपया चिडू नकोस

आता विचारू नका कि मी कोणत्या कावळ्या बद्दल बोल्तोई

ज्या साठी लिहितो आहे तो नक्कीच सुजाण आहे

ब्राह्मण असून हे कृत्य केला ह्या बद्दल शमस्व.

पण कावळा जाक्मी मात्र झाला .............

वरील सर्व चर्चाकारांनी The Hidden Forces of Life - collection from the works of Sri Aurobindo and The Mother , edited by Mr. A S Dalal हे पुस्तक जरुर वाचावे. हे पुस्तक मी पॉण्डीचेरीच्या श्री अरविंद आश्रमात घेतले आहे. अन्य कुठे मिळते माहीत नाही. पण हे पुस्तक जरुर जरुर वाचावे.

शुचि जी, आपण मांडलेला विषय दुस-यास पटवणे खरेच अवघड आहे.

ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा |
इतरा सांगावा | कळो न ये ||

ह्रदयांतरात | राहे आत्माराम |
परि त्याचे प्रेम | उमजे ना ||

ज्याची त्याची जैसी | माती घडविली |
मति ही बनली | बहुविध ||

वृथा वाद चर्चा | नको अनुभवा |
त्याचा साक्षी रावा | अंतरीचा ||
-- सागरलहरी.

शुचि's picture

28 Sep 2010 - 12:17 am | शुचि

अननुभूत सुंदर कविता. धन्यवाद.

गणेशा's picture

28 Sep 2010 - 1:54 pm | गणेशा

अभंग जबरदस्त आहे .. आवडला

मूकवाचक's picture

28 Sep 2010 - 6:04 pm | मूकवाचक

सुरेख काव्य.

>> आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो <<

एखाद्याही अपत्याने "मला तुमच्या पोटी जन्माला यायचेच आहे" असा हट्ट आई-वडीलांपुढे धरला होता असे काही ऐकीवात नाही. कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हा निर्णय अपत्याचा नक्कीच असू शकत नाही;कारण जन्मापूर्वी अस्तित्वच नसणार ना ....

कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा

(पूर्वजन्मविस्मृत) चिकित्सतर्कट

गांधीवादी's picture

29 Sep 2010 - 8:07 am | गांधीवादी

पुढे मोठी झाल्यावर मुले असे म्हणतील हे जर का पालकांना अगोदरच समजले तर अर्ध्याहून अधिक पालके आपल्या मुलांना जन्मच देणार नाहीत.