धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
30 Aug 2010 - 8:44 am

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७

इथे येण्याआधी आंतरजालावर खोदकाम करताना इथल्या गुन्हेगारीविषयी माहिती वाचली होती. पोलिसांच खोटं आयकार्ड दाखवून पर्यटकांना लुटण्याचे दोनतीन किस्सेही ऐकुन होतो. मागच्या सफारीच्या वेळचा किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिला.

त्या अभयरण्यातुन बसनेच परत येत होतो. त्या सकाळच्याच उबुंगो बसस्थानकावर उतरलो तेव्हा संध्याकाळचे आठ-साडेआठ वाजले असावेत. दमलो होतो खुप. सामान काही नव्हतंच बरोबर. एक सॅक होती पाठीला फक्त. त्या स्थानकाचं रूप वेगळंच भासत होतं रात्री. इकडे सात वाजताच सगळी दुकानं बंद होतात. आठपर्यंत सगळा शुकशुकाट होतो. रस्त्यावर तुरळक येजा होती. एक टॅक्सी बघितली. त्या ड्रायवरशी पैसे ठरवले आणि त्यानं थोडं दुर एका कोपर्‍यात टॅक्सी उभी केली होती तिथपर्यंत चालत निघालो.

जवळ पोचलो न पोचलो तेवढ्यात एक माणुस आडवा आला. त्यानं हात आडवा करुन मला थांबवलं. खिशातुन आयकार्ड काढुन 'मी पोलीस आहे' असं सांगीतलं. त्यानं मला अडवताच मी एकदम अलर्ट झालो होतो. दिसायला साधा वाटत होता. कपडेही ठिकठाक पण गणवेष नव्हता. मी आयकार्ड बघितल्यासारखं करुन त्याला परत दिलं. त्या कार्डला असंही त्या ठिकाणी किंमत नव्हतीच. ते खरं की खोटं मला अजिबात कळणार नव्हतं. तो तोडक्यामोडक्या इंग्रजीत मला बरंच काही सांगायला लागला.

त्याच्या मागुन त्याचे अजुन दोनतीन साथीदार आले. सगळेजण काहीतरी आपापसात बोलु लागले. मी नजरेनं एकवार परिस्थीतीचा अंदाज घेतला. अंधारा, अनोळखी रस्ता जवळजवळ निर्मनुष्य. सगळी आवष्यक कागदपत्रे, पासपोर्ट अर्थात माझ्या सॅकमधेच होते. त्या चारपाच जणांच समाधान व्हावं एवढे पैसे स्थानीक चलनातही होते आणि डॉलरमधेही. प्रश्न होता तो फक्त ते खरे पोलीस आहेत की नाहित याचा. आणि हे प्रकरण केवढ्यावर संपणार याचा...

अर्थात अशा वाटाघाटींची माझी पहिलीच वेळ होती असं नाही. असल्या प्रसंगातुन याआधीही गेलो होतोच. त्यानं मला पहिल्यांदा हटकलं तेव्हाच वेगानं विचारप्रक्रिया चालू झाली होती. सावध पवित्रे आपोआपच पडले होते. त्याच्याशी पहिलं वाक्य बोलतानाच, मी टॅक्सीला पाठ चिकटवुन, त्या सर्वांकडे तोंड करुन, सॅक खांद्याला लावुन, दोन्ही हात मोकळे ठेउन, पण कुठेही आक्रमकता न दाखवता उभा होतो. करु काहीच शकणार नव्हतो. ते चौघे होते, मी एकटा. फक्त काही हालचाल करायला पुरेसा वेळ मिळाला असता एवढंच.

त्यानं माझा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे मागितली होती. मी त्यांना सांगितलं की मला एक मित्र न्यायला येणार आहे तो आला की मी सगळी कागदपत्रं दाखवतो कारण ती घरी आहेत. तो लगेच म्हणाला मग टॅक्सी कशाला थांबवलिये. मी सांगितलं की त्याला यायला उशीर झाला म्हणुन मी कंटाळुन टॅक्सी केलिये. माझे सगळे कागद आणि पैसे त्याच्याकडे घरी आहेत असं सांगितल्यावर थोड्या वाटाघाटीनंतर तो मला फोन करू द्यायला तयार झाला. मी लगेच माझ्या मोबाइलवरुन माझ्यासाठी युनिवर्सीटीनें जो अधिकारी नेमुन दिला होता (इमॅन्युअल त्याचं नाव) त्याला फोन केला. त्याला सगळी परिस्थीती समजावुन सांगितली. हेही स्पष्ट सांगितलं की मी माझा पासपोर्ट तो येइपर्यंत कोणाकडेही देणार नाहिये. आणि त्याला लगेच त्याठिकाणी येण्याची सूचना केली. तो ही लगेच निघतो म्हणाला. आता फक्त तो इथे येइपर्यंत वेळ काढायचा होता.

तेवढ्यात टॅक्सीवाला धंदा बुडतोय म्हणुन गडबड करायला लागला. त्याला मी तुझा वेटींग चार्ज देतो तु चिंता करू नको म्हणुन समजावुन सांगितलं. इमॅन्युअल यायला जसाजसा वेळ लागत होता तसेतसे ते तथाकथीत पोलीस गडबड करायला लागले. मी 'प्लॅन बी' मघाशीच बनवून ठेवला होता. त्यांना सांगितलं की कुठलेही कागद आणि पासपोर्ट माझ्याकडे आत्ता नाहित हवंतर आपण पोलीस स्टेशनला जाउया. तिथे मी सगळे कागद मागवुन घेतो.

पुन्हा थोडं समजावल्यावर ते तयार झाले. त्यांच्या गाडीकडे बोट करू लागले. पण मी आग्रह करून टॅक्सीवाल्यालाच त्या पोलीसस्टेशनला न्यायला सांगितलं. शेवटी त्यातला एक अधिकारी पुढच्या सीटवर आणि मी मागच्या सीटवर बसलो आणि पाचच मिनिटात गाडी तिथल्या पोलीसस्टेशनच्या आवारात शिरली. मी आधीच तसा मेसेज इमॅन्युअलला केला होता. पोलीसस्टेशनचा बोर्ड वाचुन माझी चिंता अर्धी कमी झाली होती.
गाडितुन उतरलो आणि समोर पाहिलं तर इमॅन्युअल तिथल्या गणवेषवाल्या पोलिसांबरोबर बसुन हसत गप्पा मारत होता. मग मी पुर्ण निश्चींत झालो.

माझा पासपोर्ट आणि इतर कागद सॅकमधुन काढुन इमॅन्युअलच्या हातात दिले तेव्हा माझ्याबरोबरचा पोलीस खाउ का गिळु अशा नजरेनं पाहात होता माझ्याकडं. बाकी काही प्रॉब्लेम नव्हताच कागद सगळे पुर्ण होतेच. तरीही इमॅन्युअल ला जास्त वाद घालावा लागला. एकतर मी त्या पोलीसांच्या पोलीसपणावर विश्वास न ठेवल्यामुळे ते जास्त चिडले होते आणी त्यांची त्या रात्रीची वरकमाई पण मी बुडवली होती.
इमॅन्युअलच्या गाडीतुनच घरी आलो व त्याला लैवेळा धन्यवाद म्हणुन मॅगी खाउन शांत झोपलो.

माझ्या अदमासे एक महिन्याच्या वास्तव्यात ह्या इमॅन्युअलने कुठलंही काम वेळेवर आणि अचुक केल्याचा हा पहिलाच आणि शेवटचा प्रसंग. पण त्यानंतर मी बाकी सगळे प्रसंग अजिबात आरडाओरडा न करता त्याला सपशेल माफ करून टाकले हे वेगळं सांगायला नकोच.

आपण नेहेमी खूप 'प्रोटेक्टेड चॅनल' मधुन सगळीकडे प्रवास करतो म्हणुन कदाचित आपल्याला या स्थानीक समस्यांची म्हणावी तेवढी कल्पना येत नसेल. पण कधितरी एखाद्या प्रसंगी ते सगळं वास्तव त्या क्षणिक प्रकाशात लख्ख दिसुन जातं.

ता.क. - परत येताना माझ्या फ्लाइट मधे एक पुण्याचा तरुण होता. तो झांजीबार येथे एका हॉटेल मधे बल्लवाचार्य म्हणुन नोकरीला आला होता काही महिन्यांपुर्वीच. त्याच्या शेजारच्याच खोलीत दिवसाढवळ्या एकाचा खून झाला. ह्यानं तो प्रकार स्वतःच्या कानानं ऐकला होता दुपारी जेवताजेवता. हा बिचारा घाबरून परत निघाला होता. "साब, मै कैसा तो दो दिन रूका उधर, लेकिन नौकरी छोडके आया हू अभी. जान बची तो पैसा किधरबी मिलेगा, साब"

.
.
अवांतर - या भागात ही लेखमाला संपवायचा विचार होता, परंतु हा प्रसंग सांगायचा राहिला होता म्हणुन आज टाकलाय. माझे टुकार लेख वाचायला लावुन तुमचा अधिक अंत पहात नाही, पुढच्या भागात संपवतो. :)

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

30 Aug 2010 - 9:12 am | ऋषिकेश

बापरे! अंगावर येणारा प्रसंग!
चांगले प्रसंगावधान दाखवलेत

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Aug 2010 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म्म. रसरशीत अनुभवातून वाचलेला माणूस नंतर विद्वान म्हणून आम्हाला वंदनीय ठरतो आणि त्याचं भक्ष्य ठरलेला मूर्ख म्हणवला जातो.
अर्धवटरावा छान लिहीले आहेस. अर्थात नेहेमी लिहीतोसच. तुझ्या अनुभवामुळे आमचेही ज्ञान थोडे वाढते नेहेमी.

कर्ण's picture

30 Aug 2010 - 11:29 am | कर्ण

खरच तुम्ही खुप छान लिहिता .... :)

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2010 - 11:34 am | स्वाती दिनेश

ते खरेच पोलिस होते म्हणून बरं.. एकदा पोलिसांना तोंड द्यायचा प्रसंग आम्हालाही फ्रांकफुर्टात आला. एकदा असेच मित्रांकडून रात्री १ च्या सुमाराला पार्टी करुन आम्ही शेवटची सबवे पकडायला हवी म्हणून घाई करत स्टेशनकडे चाललो होतो. सब वे कडे जाणारे सगळे जिने रात्री ११ नंतर सुरु न ठेवता एखादाच रस्ता चालू ठेवतात आणि बाकीचे बंद करतात त्यामुळे आम्ही जिने उतरत होतो,परत चढत होतो. ते गस्तीच्या पोलिसांनी पाहिले असावे. त्यातले दोघे आमच्यामागे येऊन आम्हाला गाठून आउसवाइस बिटं.. म्हणजे ओळखपत्राची विचारणा केली. अर्थात रात्री १ वाजता आमच्याकडे कुठले पासपोर्ट असायला? आम्ही सांगितले, घरी आहेत. आत्ता आमच्याजवळ नाहीत. आमची शेवटची गाडी गेली तर पंचाइत होईल. रात्रभर स्टेशनात सुध्दा बसता येणार नाही. आमच्या घरी चला आणि पासपोर्ट बघा. त्यांच्या गस्तीच्या गाडीतून घरी जाण्याची कल्पना काही वाईट नव्हती.कारण मध्ये २ तास स्टेशनही बंद करतात. ते ऐकायला तयार होईनात. शेवटी जन्मतारीख आणि पत्ता विचारला.कुठेतरी एक फोन केला तेथे आमच्या जन्मतारखा आणि पत्त्यावरुन त्यांना सगळी कुंडली मिळाली. मग आता जा, म्हणाले. मग आम्ही आवाज केला.. आता आमची गाडी गेली असेल तर आम्ही काय करायचं? मग ते दोघं आम्हाला एस्कॉर्ट करायला आले.:)
स्वाती

रणजित चितळे's picture

30 Aug 2010 - 12:14 pm | रणजित चितळे

काय भयंकर प्रसंग बेतला होता. वर्णन पण आवडले. प्रसंग निघुन गेल्यावर चघळायला बरे पण त्या वेळेस बोंब होते.

शिल्पा ब's picture

30 Aug 2010 - 12:14 pm | शिल्पा ब

बापरे....भयंकर प्रसंग होता...आणि अशावेळी तुम्ही प्रसंगावधान दाखवून निभावलेत.
आणि तुमचे हे लेख अजिबात बोअर नाहीत तेव्हा लिहित चला..

विलासराव's picture

30 Aug 2010 - 12:18 pm | विलासराव

विविध अनुभव घेतलेत तुम्ही आफ्रिकन सफारीत.
ग्रेट आहात.

आम्ही एकदा कलकत्त्याला रात्रि ११ वाजता लोकल रेल्वे स्थानकात उतरलो. येथुन २०-२५ मिनीटाचा टॅक्सीने प्रवास करुन महाराष्ट्र भवनला पोहोचायच होतं. मी, मित्र,मित्राची बायको आनी दोन लहान मुली. थोडेसेच प्रवासी होते ते पटापट आपापल्या मार्गाने निघुन गेले. स्टेशनमधे एकदोन जणांकडे चौकशी केली तर " एवढ्या रात्री कशाला बाहेर फिरायच. त्यात बरोबर लेडिज. हा भाग तसाही सुरक्षित नाही. बघा बाबा तुमचं तुम्ही." असले सल्ले मिळाले.
म्हनुन तिथे एका पोलिसाकडे चौकशी केली. तर त्यानेही तेच ऐकवले. त्याला बाहेर येऊन टॅक्सी करुन देण्याची विनंती केली तर त्याने नकार दिला.वरुन काऴजी घ्या असा सल्ला द्यायला विसरला नाही. शेवटी बाहेर येऊन टॅक्सी शोधली, संपुर्ण प्रवासात मी टॅक्सी ड्रायवर कडे संशयाने पहात होतो कारण रस्ता माहीतीचा नव्ह्ता, हा माणुस नेमकं कुठे घेऊन चाललाय ते कळायचाही काही मार्ग नव्हता आणि एकदाचे आम्ही महाराष्ट्र भवनला पोहोचलो
कुठलाही वाईट प्रसंग न घडताही फार मोठ्या थरारक प्रसंगातुन सुटल्यासारखे वाटले.

श्रावण मोडक's picture

30 Aug 2010 - 12:24 pm | श्रावण मोडक

हुश्श! लेखमाला संपल्याबद्दल नव्हे, तुझी सुखरूप सुटका झाल्याबद्दल. आणखी लिहा वेगळं काही आता.

टुकुल's picture

30 Aug 2010 - 2:20 pm | टुकुल

अजुन येवुद्यात.

--टुकुल

चिंतामणी's picture

30 Aug 2010 - 12:27 pm | चिंतामणी

बर्याच दिवसांनी आलेला आठवा भागसुध्दा वाचनीय आहे.

बंद नका करू लिखाण. अजून येउ द्यात.

समंजस's picture

30 Aug 2010 - 1:44 pm | समंजस

एकंदरीत रोमांचकारी झाली ही आफ्रिका प्रवासवर्णनमाला :)
येउद्यात आणखीही काही अनुभव

मृत्युन्जय's picture

30 Aug 2010 - 2:03 pm | मृत्युन्जय

संपली मालिका? मॅगीच्या तडाख्यातुन सुटलात म्हणायचे तुम्ही. मात्र लेखमालिका एकदम सुंदर होती. नर्मविनोदी शैलीतले तुमचे लेखन आवडले. येउ द्यात असेच.

संपली नाहिये अजुन. पुढचा एक भागच शेवटचा.

यशवंतकुलकर्णी's picture

30 Aug 2010 - 4:18 pm | यशवंतकुलकर्णी

मागच्या भागातला ते छत्रपती शिवाजी वाला शिद्दी जौहर लई भारी आणि जसं मांडलत ते तर लईच भारी!!!!!
मी तर हसलोच पण ज्यांना दाखवले/लिंक दिली ते पण हसले.

अवांतर: हे हबशी लोक उगाच भयंकर वाटतात. कुणीही बघा - सतत आतून काहीतरी टोचत असल्यासारखा वाकडा-तिकडा होत असतो. पोरी सुध्दा.
अतिअवांतर: हे लोक सूटाबूटात असले तर सूट कधीच मापात नसतो - एक कॉलर खाली, एक वर (पाहा: २०१२ मधला ओबामा)

रेवती's picture

30 Aug 2010 - 6:46 pm | रेवती

चांगलीच सुटका करून घेतलीत.
वाचताना अजिबात कंटाळा येत नाही.
तुम्ही पुन्हा मॅगीच खाउन झोपलात म्हणून मजा वाटली.
माझी एक मैत्रिण तीन वर्षे साउथ आफ्रिकेत राहिली होती.
ती आम्हाला कधीकधी तिकडच्या गोष्टी सांगते.
तिची मोलकरीण ही घराची मालकिण असल्यासारखीच वागायची.
त्या बाईच्या घरी जे जे सामान नसेल ते हिच्या घरून खुशाल घेउन जायची.
लहान मुलीला वरणभातासाठी म्हणून नेलेली मैत्रिणीची चांदीची वाटी त्या बाईला आवडली म्हणून सरळ आपल्या पिशवीत घालून घेउन गेली.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Aug 2010 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार

मालक हुषार आहात बॉ ;)
लेखन नेहमीप्रमाणेच खिळवुन ठेवणारे..

(तुम्ही खरे तर लेखमाला संपवायची म्हणत आहात, पण ती येवढ्यात संपू नये असेच वाटत आहे)

निखिल देशपांडे's picture

30 Aug 2010 - 8:31 pm | निखिल देशपांडे

(तुम्ही खरे तर लेखमाला संपवायची म्हणत आहात, पण ती येवढ्यात संपू नये असेच वाटत आहे)
खरयं राव..
पण शेवटचा भागा नंतर पुढची लेखमाला कधी सुरु करताय???

पैसा's picture

30 Aug 2010 - 8:36 pm | पैसा

तुमच्या पोतडीत सगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले आहेत. विनोद आहे, करूण रस आहे (जेवणाचे हाल झाल्यामुळे), आता भीतीचाही अनुभव आला. आणि आलेल्या प्रसंगातून चातुर्याने सुटका करून घेतलीत हे महत्त्वाचं. या विविधरंगांच्या अनुभवात आम्हालाही सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद! छान! असेच लिहिते रहा. आणि आम्हाला उत्तम लेखांची मेजवानी द्या!

अनिल हटेला's picture

30 Aug 2010 - 8:45 pm | अनिल हटेला

सहज, सुंदर आणी लयीत जाणारी मालीका एवढ्यात संपवु नये असे वाटते..

परदेशात तसं कुणावरही पटकन विश्वास बसत नाही ,अगदी पोलीस असला म्हणुन काय झालं? ;-)

असो..

पू भा प्र... :)

गणेशा's picture

31 Aug 2010 - 7:42 pm | गणेशा

प्रसंगावधान राहैलात हे छान वाटले.
पण त्यावेळेसची परिस्तथीती खुप भयानक असते

वाचत आहे