धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
17 Aug 2010 - 11:22 am

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५

पहिल्याच दिवशी जंगलात घुसल्या घुसल्या, चक्रधराशी संवाद सुरू केला. तो बिचारा गेले दोन दिवस एका जपानी ग्रूप बरोबर सगळं अभयारण्या पालथं घालत होता. सगळे प्राणी दिसले पण जंगलचा राजा काही दर्शन द्यायला तयार नव्हता.. त्यानं मला खुप वैतागुन हे सांगितलं.. माझा चेहराच पडला, त्यानं ओळखलं असावं काय ते.. तो पुढे काहीवेळ इकडे हत्ती दिसतील, हरणं दिसतील, तिकडे हिप्पो असतात वगैरे सांगुन सारवासारव करायचा प्रयत्न करत होता. मी मात्र हिरमुसला होउन, त्याच्या बडबडण्याकडे सरळ दुर्लक्ष करून, छतातून बाहेर तोंड काढुन उभा राहिलो..

पुढचा काही काळ त्याच पोझिशन मधे सावरून उभं रहाण्यातच गेला. तेवढ्यात चालकानं गाडीला एकदम ब्रेक लावला.. मी खाली वाकुन त्याला काही बोलणार एवढ्यात त्याने डावीकडे बोट दाखवून 'सींबा' 'सींबा' असं हळुच सांगीतलं..

चालक अनुभवी होता. त्यानं गाडी बंद केली लगेच.. मला आधी त्या पिवळ्या गवतात काहीच दिसेना, पण डोळे पिवळ्या छटांच्या बारकाव्याला सरावल्यावर हालचाल दिसु लागली... संथ, लयदार्...गवतासारखीच, पण थोडी वेगळी..

हळुहळू त्या पिवळ्या पार्श्वभूमीवर ८-१० मुर्तीमंत रुबाब नजरेला पडले... आमच्या डाव्या बाजुला ८-१० सींहांचा एक समूह, आपल्याच लयीत, डौलदारपणे, आमच्या वाहनाला समांतर चालत होता... तेच त्या वनराजांच पहिलं दर्शन... अस्सल कलावंताचं दर्शन असंच व्हावं नाही का... अचानक, उत्कट आणि उत्फुल्लही...वाह.. वनराजांच दर्शन तर अगदी यथोचीत झालं, तेही अगदी ध्यानीमनी नसताना... हा राजा अगदी खर्‍या सम्राटासारखा वागला.. मनातली इच्छा अगदी पुर्ण केली...

लयदार, दमदार पावले टाकत.. रुबाब म्हणजे काय.. सींहावलोकन म्हणजे काय.. ह्याचे जणु प्रत्येक पावलाला वस्तुपाठच देत तो जथ्था चालला होता.. हळुहळू गवतातून एकेक जण बाहेर येत होता, आमच्यामधलं अंतर कमी कमी होत होतं... काहीवेळ समांतर चालल्यावर त्यांच्यातल्या नायीकेने दिशा बदलली, आणि रस्त्याच्या दिशेने संथ पावले पडायला लागली... हळुहळू त्या सगळ्या काफिल्याचं नेतृत्व करत... केवळ नजरेनं जरब बसवत ती आम्हाला सामोरी आली.. मी सगळं विसरून एकटक पाहात होतो... हातातला कॅमेरा हातात तसाच राहिला होता...

संमोहीत झालो होतो त्या नजरेने... केवळ ३-४ सेकंद रोखुन पाहिलं तिने आणि काय वाटलं सांगु... भीती... केवळ प्रचंड भीती.. स्वत:च्या जिवाची नाही... नाहितर आम्ही खिडक्या लावल्या असत्या... गाडीत दडी मारून बसलो असतो... आम्ही समोरासमोरच पाहात होतो एकमेकांना... पण ती भीती अनामीक होती.. शब्दातीत होती... आदीम होती... अथांग होती ती नजर... 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव सुखे मरणांचा हो पुढे'...

भान आलं तेव्हा ती नायीका शांतपणे आमचा रस्ता अडवून ठिय्या देउन बसली होती.. अवघ्या ७-८ फुटांवर.. तीची एकेक हालचाल.. कटाक्ष... जणु पटवून देत होते तिचा जंगलातला अधिकार.. न बोलता पण ठामपणे.. हातातल्या कॅमेर्याची आठवण झाल्यावर काही फोटो काढले पण ती जरब, ती नजर काही पकडता आली नाही..

तब्बल १०-१५ मिनिटांनी सगळा गोतावळा पलीकडे गेल्यावर ती शांतपणे उठली.. आणि पुन्हा एकदा तो भेदक कटाक्ष टाकून शांतपणे चालती झाली पलिकडच्या गवतात... आयुष्य म्हणजे तरी काय.. असल्या जिवंत, चेतनादायी क्षणांची मालीकाच नाही का.. एरवीचे प्रेतक्षण कशाला मोजायचे..

"धीस इज अ लकी डे". माझा चालक सांगत होता. एरवी इवढ्या जवळुन दिसत नाहीत सींबा. रस्त्यावर तर अजिबात येतच नाहीत. पुढचे दोन दिवस, अनेक गाड्या भेटत होत्या, सींबा दिसला का असं विचारत होत्या आणि चालक अभिमानानं सांगत होता कुठे दिसला ते.. नंतर दोन दिवस काही दर्शनाचा योग नाही आला.

दुसर्‍या दिवशी फेरी संपवून परतीची बस पकडण्यासाठी जंगलातून परतीच्या रस्त्याला लागलो होतो.. तेवढ्यात एका गाडीवाल्यानं सागीतलं, पलिकडच्या दिशेला काही अंतरावर एक सींहीण आहे.. झुडूपात लपलिये पण झोपलेली आहे त्यामुळे लगेच गेलात तर दिसू शकेल.. लगेच गाडी फिरवली.. जवळजवळ १०-१२ किलोमीटरची रपेट केल्यावर त्यानं सागितलेल्या ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या आणि मी एकदम ओरडलो... चालकाला दिशा दाखवली.. आणि सावकाश, आवाज न करता त्या ठिकाणी जाउन पोचलो..

आजचा रंग निराळाच होता.. दुपारी बाराचा सुमार.. डोक्यावर उन.. गारवा मिळवण्यासाठी, सावलीला आरामात राणीसाहेब पहुडल्या होत्या... दोन मोठ्या गाड्या सहा फुटांवर येउन थांबल्या तरी एका डोळ्याने पाहिल्या न पहिल्यासारखं करून पुन्हा आपल्या निद्रासाधनेत मग्न...

आम्हीही मग शांत उभे राहीलो.. काहीही आवाज न करता.. दहा-पंधरा मिनिटे गेल्यावर.. पोझ बदलून, आळोखे पिळोखे देउन, मातीत गडाबडा लोळणं, सुरू झालं... चार पाय वरती करून पाठीवर लोळणारं ते अजस्त्र जनावर खुप लोभसवाणं दिसत होते... नुसतं बघत रहावं असंच वाटत होतं.. उन्हानं होणार्‍या त्रासापासुन वाचण्यासाठी, सावलीत पाठ, पोट, जमिनीला घासून थंडावा मिळवण्याचा प्रयत्न चालला होता.

ते राजस रूप डोळे भरून पाहिल्यावर हळुहळू आवाज न करता मागेमागे होत नजर सींहीणीवरच ठेउन मागे सरकलो.. त्यांच्या वामकुक्षीमधे अधिक व्यत्यय न आणता.. त्यांच्या सार्वभौमत्वाचा मान ठेउन आम्ही हळुच काढती चाकं घेतली...

काही क्षण टिपलेत.. हे घ्या..

देशांतरलेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2010 - 11:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शब्द संपले ...

अनुराग's picture

17 Aug 2010 - 6:26 pm | अनुराग

अदिती शी सहमत.

बेसनलाडू's picture

18 Aug 2010 - 5:14 am | बेसनलाडू

(नि:शब्द)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

17 Aug 2010 - 11:26 am | स्वाती दिनेश

जंगलाच्या राणीने दर्शन दिले तर...
स्वाती

विलासराव's picture

17 Aug 2010 - 11:37 am | विलासराव

वनराजांच दर्शन तर अगदी यथोचीत झालं, तेही अगदी ध्यानीमनी नसताना..

आपले आनी आमचेही नशीब जोरावर आहे असे दिसतंय.

मस्तच लिहीताय......आगे बढो.

तुमचा हेवा वाटत आहे :-)
प्रवास वर्णन आणी फोटोस एकदम मस्त.

--टुकुल

प्रियाली's picture

17 Aug 2010 - 5:39 pm | प्रियाली

हेवा वाटण्याशी +१.

भाग आवडला.

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2010 - 11:45 am | नगरीनिरंजन

वा! सफारी कारणी लागली तर!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

अफ्रिकन सफारी एकदमच सुपर्ब हो अर्धवटराव.

सफारीचे वर्णन आणि फोटु देखील अप्रतीम :)

अवांतर :- च्यायला येवढे सुंदर फोटु बघितल्यावर आमच्या हिणकस मेंदुला पहिल्यांदा अजय देवगणच्या काल ह्या भयानक थरारक विनोदी शिणीमाची आठवण झाली.

आणि ह्या भयंकर विनोदी दृष्याची तर सगळ्यात आधी :-

स्वाती दिनेश's picture

17 Aug 2010 - 12:30 pm | स्वाती दिनेश

परा, मी काल जर्मन मध्ये सहन केलाय,
हे असले सिनेमे इथे दाखवले की मग अजून तुमच्याकडे रस्त्यांवरुन वाघ,हत्ती,साप,नाग असतात का / असल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देताना पुरेवाट होते.
वाघांची संख्या कमी होते आहे हे सांगून पटत नाही ,
स्वाती

सहज's picture

17 Aug 2010 - 12:30 pm | सहज

मस्त!

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Aug 2010 - 1:33 pm | बिपिन कार्यकर्ते

लेका अर्ध्या... बसवला टेंपोत... लै हेवा वाटला हे घासून गुळगुळीत झालं लेका. तुझ्या नावानं ४-५ प्रेमळ श्या हाणल्या बघ. जबरी अनुभव आणि ते कथन पण एकदम परिणामकारक. लेखणीत गंमत आहे ब्वॉ तुमच्या...

तू जे नजरेचं वर्णन केलंस ना... अगदी सेम आणि तसाच अनुभव मला नैरोबी नॅशनल पार्कात चीत्ता मांडिवर डोकं ठेवून झोपला होता आणि अचानक त्यानं डोकं वर उचलून अगदी एखाद फूटावरून नजरेत नजर रोखून बघितलं तेव्हा आला. विलक्षण गूढ आणि अथांग हिरवे डोळे होते ते. मी तो अनुभव कधीच विसरू शकलेलो नाहीये. मरे पर्यंत ते डोळे आठवतील. अगदी ५-१० सेकंदच का होईना पण ते डोळे माझ्यावर रोखले गेले. चीत्त्याच्या सगळ्या हापचाली अतिशय चपळ असतात. केवळ अर्ध्या सेकंदात माझी मान त्याच्या जबड्यात गेली असती. पण अगदी निरखून बघितल्यावर मालक परत मांडीवर डोकं ठेवून शांत पडले. त्या ५-१० सेकंदात मला ब्रह्मांड दिसलं. लिहिलंय त्या बद्दल.... http://www.misalpav.com/node/3888

अर्धवट's picture

17 Aug 2010 - 4:39 pm | अर्धवट

आत्ताच वाचला.. विडु पण पायला.. एक नंबर..

कानडाऊ योगेशु's picture

17 Aug 2010 - 2:03 pm | कानडाऊ योगेशु

डिस्कव्हरीवर सिंह/सिहिंणींना बघताना सुध्दा मंत्रमुग्ध व्हायला होते तुम्ही तर प्रत्यक्षच पाहुन आलात.भाग्यवान आहात.

संमोहीत झालो होतो त्या नजरेने... केवळ ३-४ सेकंद रोखुन पाहिलं तिने आणि काय वाटलं सांगु... भीती... केवळ प्रचंड भीती.. स्वत:च्या जिवाची नाही... नाहितर आम्ही खिडक्या लावल्या असत्या... गाडीत दडी मारून बसलो असतो... आम्ही समोरासमोरच पाहात होतो एकमेकांना... पण ती भीती अनामीक होती.. शब्दातीत होती... आदीम होती... अथांग होती ती नजर... 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव सुखे मरणांचा हो पुढे'...

हे आवडले.
एका क्षणात काळजाचा ठाव घेणारी नजर/क्षणार्धात नागडे करुन टाकणारी नजर ती हीच.
लहान मुले (३-४ महीन्यांची) सुध्दा इकडे तिकडे नजर फिरवाताना क्षण-दोन क्षण आपल्या नजरेला नजर मिळवतात तेव्हाही असाच अनुभव येतो.पण त्यावेळी भीती न वाटता वात्सल्यभाव दाटतात.
- (संमोहीत) योगेशु

बा अर्धवटा सफारी मस्तच झाली.
वर्णन आणि फटु लाजवाब!!!!!!!!!!!!

तर्री's picture

17 Aug 2010 - 5:22 pm | तर्री

"आयुष्य म्हणजे तरी काय.. असल्या जिवंत, चेतनादायी क्षणांची मालीकाच नाही का.. एरवीचे प्रेतक्षण कशाला मोजायचे.. "झक्कास्.खल्लास.

शैलिदार व ओघवते वर्णन.
सहाही भागांचे परत परत वाचन व पुढच्या भागांची प्रतिक्षा सुरु आहे.

सुनील's picture

17 Aug 2010 - 5:25 pm | सुनील

हा भागही छानच!

श्रावण मोडक's picture

17 Aug 2010 - 5:37 pm | श्रावण मोडक

कधी परतणार आहेस? तुझे दर्शन घ्यायचे आहे. म्हणजे कसं की, पंढरीहून आलेल्या वारकऱ्याचं दर्शन घेतलं जातं "माऊली" असं म्हणत. असं मानतात की, त्यातूनच विठ्ठलाचं दर्शन होतं. तसंच तुझं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे, त्या सिंहीणीचं दर्शन झालं असं म्हणता येईल.

मस्त कलंदर's picture

17 Aug 2010 - 5:40 pm | मस्त कलंदर

मस्त झालाय हा ही भाग. यावरून मला काही वर्षांपूर्वी बोरीवलीच्या पार्कातली सफारी आठवली. तिथे तिकिट काऊंटरलाच "सफारीमध्ये वाघ दिसतीलच याची आम्ही खात्री देत नाही. त्यांची मर्जी आणि तुमचे नशीब!!!" असे बोर्ड लावले होते.
त्यादिवशी मात्र आमचे नशीब जोरावर होते अथवा त्यांची आमच्यावर खफ मर्जी झालेली नसावी, आम्हाला वाघ-सिंह पाहायला मिळाले!!

मेघवेडा's picture

18 Aug 2010 - 2:58 am | मेघवेडा

घ्या.. आफ्रिकेतून तडक बोरिवलीत! =)) =))

अर्धवट्राव.. काय लिहिता क्काय लिहिता! मस्तच! येक्दम झब्बर्दस्त!

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2010 - 5:50 pm | इंटरनेटस्नेही

ग्रेट!

वा!! तुम्ही भाग्यवान आहात!
या भागात फोटू आणि वर्णन अगदी सही झालय.

अनिल हटेला's picture

17 Aug 2010 - 7:12 pm | अनिल हटेला

सुरेख सफर चालू आहे !!

सारे भाग पून्हा एकदा वाचले !!

पू भा प्र.... :)

शिल्पा ब's picture

17 Aug 2010 - 7:15 pm | शिल्पा ब

मस्त...यापुढे काय बोलणार..फोटो अप्रतिम..हेवा वाटला

चतुरंग's picture

17 Aug 2010 - 8:17 pm | चतुरंग

सिंह म्हणजे वनराज का ते समजतेच. संमोहित करणारी नजर असते हे अगदी खरे. हरणं त्या नजरेनं संमोहित होतात आणि जागच्या जागी खिळू राहतात समोर साक्षात काळ आलेला आहे हे समजूनही त्यांच्या हालचाली थिजून जातात आणि जेव्हा ती पळायला सुरुवात करतात तोपर्यंत उशीर झालेला असतो.

तुम्ही भाग्यवान आहात. हेवा वाटतोय तुमचा. मला मोकळ्यावरची जनावरे बघायचीच आहेत. कधी योग येतोय माहीत नाही.
मागल्या वर्षी सॅन दिएगो झू मधे वनराजाची छबी टिपली. मोकळेच होते पण जाड काचेमागे असूनही त्याने वळून बघितल्याक्षणी काळजाचा ठोका चुकला!

चतुरंग

निशदे's picture

17 Aug 2010 - 8:39 pm | निशदे

खूपच भारी....................नुसत्या एका लुक मधून माज दाखवायची ताकद या एकाच प्राण्यात आहे.......

स्वाती२'s picture

17 Aug 2010 - 9:28 pm | स्वाती२

काय भाग्यवान आहात ! लेख, फोटो दोन्ही झकास!

नंदन's picture

17 Aug 2010 - 10:25 pm | नंदन

हाही भाग मस्तच. फोटोजबद्दल तर प्रश्नच नाही!

ऋषिकेश's picture

17 Aug 2010 - 11:03 pm | ऋषिकेश

नशीबवान आहात. वर्णनही फारच छान.. व्याघ्रदर्शनावर धडा होता एक शाळेत त्याची आठवण झाली.
लिहित रहा वाचतो आहोतच!

भाग्यश्री's picture

17 Aug 2010 - 11:17 pm | भाग्यश्री

खूपच भारी!!

चित्रा's picture

18 Aug 2010 - 4:54 am | चित्रा

आयुष्य म्हणजे तरी काय.. असल्या जिवंत, चेतनादायी क्षणांची मालीकाच नाही का.. एरवीचे प्रेतक्षण कशाला मोजायचे..

उत्तम लिहीत आहात.

केशवसुमार's picture

18 Aug 2010 - 7:07 pm | केशवसुमार

अर्धवटशेठ,
एकदम जबर्‍या फोटो आणि वर्णन.. नॅशनल जिओग्राफी बघतो आहे असे वाटले..
(वाचक)केशवसुमार
बेंगलोरला बनरगट्टा नँशनल पार्क मध्ये असेच बस (जाळ्या लावलेली)मधून फिरवतात आणि बाहेर १०-१२ वाघ/ सिंह सोडलेले असतात.. बस एका ठिकाणी थांबतात आणि जंगालात सोडलेले वाघ/सिंह यायची वाट पहातात.. गाईडने जनवर उजवी गेले आहे तिकडूनच येईल म्हणून सांगितले होते आणि आम्ही सगळे उजवी कडे वाकून वाकून बघत होतो.. आणि तेव्हढ्यात डाव्या कानापाशी एक डरकाळी ए़कायला आली.. दचकून बघितले तर एक सिंह बस वर पुढचे दोन पाय ठेऊन खिडकीतून माझ्याकडे बघत होता.. त्याचा जबड्या आणि माझ्या मध्ये ती जाळी आणि खिडकीची काच ... त्या डरकाळीच्या १०० पट जोरात मी ओरडलो होतो.. दोन दिवस झोप लागली नव्हती..आता ते आठवून पुन्हा घाम फुटला..
(घाबरट)केशवसुमार

कर्ण's picture

24 Aug 2010 - 1:51 pm | कर्ण

अर्धवट आणि विलासराव हे नविन लेखक मिपा ला मिळाळे आहे. यान्चि ले़खन शैली खुप छान आहे..

गणेशा's picture

31 Aug 2010 - 6:47 pm | गणेशा

वाचत आहे.
निशब्द