धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
आपल्याकडे व्हॉल्वोचा सुकाळ होण्याआधी, खाजगी लक्झरी बस जशा असायच्या, तशा थाटाची ती बस, फक्त विडीओकोच सेवा नव्हती हे सुदैव. सुरूवातीला जरा स्थिरस्थावर झाल्यावर, मी शेजार्या्शी संवाद वाढवण्यासाठी शब्द जुळवायला सुरूवात केली, पण थोडं अंतर गेल्यावर डायवर सुराला लागला. मला कंडक्टरची पेशल शीट मिळाल्याने, माझी अवस्था मात्र केवीलवाणी झाली होती, मला सगळ्या प्रवासात सारखा एका डोळ्यानं डायवरपुढचा वेगमापक (स्पिडोमीटर) दिसत होता.. मी आख्ख्या प्रवासात त्यावरून नजर काढली नाही.
सगळा मिळुन सव्वादोन लेनचा तो हायवे. दोन्ही बाजुला सुसाट वेगाने जाणारी वाहने या सगळ्यात हा पठ्ठ्या काही शंभराच्या खाली यायला तयार नव्हता. जरा रस्ता रिकामा दिसला की लगेच १२०-१३० प्रतीतास. माझी गाडी मला खूप वेगाने चालवता येते हा माझा समज त्या जाता-येतानाच्या दहा तासाच्या प्रवासात त्याने समूळ नष्ट केला.
वार्याच्या वेगाने गाडी पळत होती, शहरातून बाहेर पडेपर्यंत दर १५-२० मिनिटांनी शीटा भरल्या जात होत्या, बहुतेक सगळे टिकटी रिझव केलेलेच असावेत. मधे एका थांब्यावर एक बाइ एकदम अस्सल मालवणी आवेशात कंडाक्टर आणि किन्नरची आयमाय काढुन गेली, कारणही अगदी तेच, तिच्या मुलाला बॅग डिकीत ठेवायला लावली, गाडीत बरोबर घेउ दिली नाही म्हणुन. वाटेत वाड्या वस्त्या लागत होत्या, मला सारखी कोकणातल्या रस्त्यांची आठवण होत होती.
वाटेत २-३ ठिकाणी पोलीस चेकपोस्ट लागले, पोलीस गाडीत चढुन सगळीकडे नजर फिरवून गेला, एकदा सगळ्यांना सीट-बेल्ट लावा असा हावभाव करून सांगुन पण गेला. प्रत्येक चेकपोस्ट वर गाडी नंबर ची नोंद होत होती, चेकपोस्ट ओलांडलं की ड्रायवर गाडी सुसाट पळवायचा.. निम्मं अंतर गेल्यावर एका चेक्पोस्ट वर गाडीत दोन पोलीस आणि एक महिला पोलीस चढले, त्यांनी ड्रायवर ला खाली उतरवलं.
हा काय नवीन प्रकार म्हणुन मी चिंतेत पडलो. तर तेवढ्यात त्या पोलिसानं मला अगम्य भाषेत काहीतरी पटवून द्यायला सुरूवात केली. पोलीस काहीही म्हणाला तरी त्यांचच बरोबर असतं हा धडा आपल्याकडे अनेक प्रसंगातून शिकलो होतोच म्हणुन काहीच कळेना तरी मी मान डोलावली.. त्यानंतर तो अजुनच पोटतिडिकीनं माझ्या खांद्याला हात लावुन काहीतरी सांगायला लागला, आणि काही वेळानं हताश झाल्यासारखा चेहेरा करून खाली उतरला.
नंतर मी शेजार्याला विचारल्यावर असं कळलं की ड्रायवरनं गाडी वेगात चालवल्यामुळं त्याला खोपच्यात घेतला होता, आणि तो पोलीस मला समजावून सांगत होता की 'तुम्ही प्रवाशांनी सांगायला हवं त्याला, वेगाबद्दल. शेवटी तुमच्या जिवाचा प्रश्न आहे.....'
मग आपल्या ड्रायवरनं खाली उतरून त्यांना काय सांगितलं या जिज्ञासेला पैसे मोजल्याची खुण करून त्यानं उत्तर दिलं आणि मी अत्यंत अजाणतेपणाचा हावभाव करून पुढचा प्रवासभर गप्प बसलो.
वाटेत खूप प्रसीद्ध किलिमांजारो पर्वत लागला, म्हणजे तसा समज माझा मीच करून घेतला. अगदीच काही 'ऑल्सो रॅन' नव्हता, चांगला मोठाबिठा होता तसा. गणेशोत्सवात आपल्याकडे कैलास पर्वत करतात तसा दिसत होता थोडासा.. धुक्यातून डोकावणारी शिखरं, उनसावलीचा लपंडाव ह्या सगळ्यात आपल्याच धुंदीत हरवल्यासारखा वाटत होता.
एक हरीण वाहनाची धडक बसून मेलं होतं. कुणी त्याकडे ढुंकूनसुधा बघितलं नाही, माझा मात्र जीव हळहळला. ते सुंदर मखमली कातडं रस्त्याला चिकटलेलं बघुन खुप गलबलून आलं. कुत्रं मेलेलं दिसतं तेव्हा एवढा विचार करतो का हो आपण?
प्रवासात आवर्जून जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, मोबाइल क्रांती ह्या देशात अगदी शेवटपर्यंत पोचली आहे. अर्थात या एवढ्या दुर्गम देशात अत्यावश्यकच आहे म्हणा ते.. अगदी छोट्या वाड्या वस्त्यांवर सुधा प्लॅस्टीकच्या रंगीबेरंगी कापडाचे मोबाइल कंपन्यांचे स्टॉल, आकर्षक कॉल रेट्स च्या जहिराती, आणि गाडीत फेरीवाल्यांबरोबर विकायला येणारी रीचार्ज वाउचर्स. भारतातल्या सारखेच उदंड मोबाइल आहेत. बहुतेक सर्व व्यवहार प्रीपेड पद्धतीवर चालतो. आपल्या भारती ग्रूपनं नुकत्याच घेतलेल्या झेन टेलीकॉमचं वर्चस्व आहे.
दुपारी बाराच्या सुमारास मिकूमी अभयारण्याच्या मुख्य फाटकापाशी पोचलो. ३२३० वर्ग किलोमीटरचा एकुण आवाका, आणि त्याला मधोमध दुभागणारा हायवे...
तिथल्या अधिकारणीपाशी चौकशी केली आणि लहानपणापासून पिच्छा पुरवणारा एक ड्वायलॉग कानात घुमायला लागला. "तुझ्या टाळुवर कुणी तेल घातलय की नाही कुणास ठाउक. सारखं नन्नाचाच पाढा..."
(छोटे भाग टाकल्याबद्दल क्षमस्व, पुढचे जंगलातले दोन भाग येकदम टंकतोय.. होतच आलेत.. जास्त वाट पहावी लागणार नाही.)
त्या प्रवासात काही टिपलय.. हे घ्या
प्रतिक्रिया
16 Aug 2010 - 3:54 pm | स्वाती दिनेश
मस्तच आहे हा भाग सुध्दा,
अतिअवांतर- तुमचा पाक -प्रश्न सुटला की नाही?
स्वाती
16 Aug 2010 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या भागातच प्रतिक्रिया देईन! ;-)
स्वातीताई, पाक-प्रश्न नसून नापाक प्रश्न आहे बहुदा आपल्या पुराणिकबुवांचा!
16 Aug 2010 - 3:55 pm | रश्मि दाते
म्स्त झालेत सर्व भाग अजुन येउ द्या,बाकी रस्ते छान दीसत आहेत
16 Aug 2010 - 3:56 pm | घाशीराम कोतवाल १.२
झक्कास जमलाय हा भाग
16 Aug 2010 - 3:57 pm | सुनील
टांझानियात आहात तर!
हा भागदेखिल मस्तच. फोटो जरा जास्त टाका.
16 Aug 2010 - 4:00 pm | निखिल देशपांडे
हा पण भाग मस्तच..
आता लवकर पुढचा भाग टाकाच
16 Aug 2010 - 4:20 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त. पुढे लवकर सरका.
आफ्रिकेतले रस्ते (कमीतकमी पूर्व आफ्रिकेतले तरी..) लहान असले तरी एकदम चांगले असतात. खड्डे वगैरे नसतात फारसे. त्यामुळे वेगात गाडी आपोआप जाते. :)
16 Aug 2010 - 4:20 pm | चिंतामणी
फोटो आणि मजकूरसुध्दा जरा जास्त टाका.
16 Aug 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार
वाचतोय मालक..
पुढचे भाग (१+१) लवकर यु द्या आणि फोटु सुद्धा टाकाच.
16 Aug 2010 - 4:42 pm | श्रावण मोडक
१+१ ची वाट पाहतोय.
16 Aug 2010 - 4:43 pm | अभिरत भिरभि-या
वाचतोय ..
या देशातला छोटासा पण बिनखड्डी हायवे पाहून किमान आफ्रिकन देशापेक्षा आपण पुढारलेले आहोत असा सुस्काराही टाकता येणार नाही. सगळे रस्ते असेच आहेत काय ?
16 Aug 2010 - 5:13 pm | ऋषिकेश
हा भागही चांगला आहे. बाकी स्थानिक भाषेत किलीमांजारोला तेच नाव आहे का वेगळं म्हणतात काही? नाहि तुम्हाला अॅझ्युम करावं लागलं म्हणून विचारतोय
16 Aug 2010 - 6:11 pm | धमाल मुलगा
ब्वाना....
येवा, आफ्रिका आपलीच असां :D
16 Aug 2010 - 6:16 pm | रेवती
विंटरेष्टींग आहे.
16 Aug 2010 - 6:20 pm | प्रियाली
भाग मोठे आणि फोटो जास्त टाका.
16 Aug 2010 - 6:25 pm | स्वाती२
सगळे भाग आवडले.
16 Aug 2010 - 6:38 pm | अनिल हटेला
मजा येतेय वाचायला!!
अजुनही थोडे मोठाले भाग आणी भरपूर फोटोज च्या प्रतीक्षेत !! :)
16 Aug 2010 - 10:54 pm | विलासराव
प्रवासवर्णन आवडतय.
बाकी एकटयाने फिरण्याच्या तुमच्या धाडसाचं कौतुक.
17 Aug 2010 - 11:27 am | टुकुल
सर्व भाग आता अधाश्यासारखे वाचुन काढले..
एकदम मस्त लिहित आहात, अजुन येवुद्यात.
--टुकुल
31 Aug 2010 - 3:34 pm | गणेशा
पहिल्या फोटोत ड्रायवर कडे लक्ष न जाता, रस्त्याच्या कडेला चरणारी हरणे पाहुन छान वाटले ..
लेख आवडला असे सारखे म्हणत नाही बसत ..
पुढे लगेच वाचत आहे. ..
31 Aug 2010 - 3:50 pm | गणेशा
आणि हरणाच्या पुर्ण कळपाचा फोटो बसच्या वेगामुळे काढता आला नाही , म्हणुन द्रायवर वर मनातल्या मनात तुम्ही २ शिव्या दिल्या अस्तील किंवा पुढच्या फोटो साठी खुप लांबुन्च तयारी ठेवली असेल असे कालप्निक चित्र ही डोळ्यापुडे आले.
- शब्दमेघ