सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E.
त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते. बाबा वर त्यांचि एवढि भक्ति जडलि आहे कि ते जे करतात ते सर्व काहि त्यांना गोड वाटते. इथे पहा http://www.youtube.com/watch?v=r9H7k16RRmM&feature=channel
एखादा शिष्य तुम्हाला भेटला तर तो तुम्हाला ताण दुर करण्यासाठि बेसिक कोर्स लावावयास तयार करेन. तिथे तुम्हाला सुदर्शन क्रिया शिकवन्यात येते. हि क्रिया प्राणायामचा एक प्रकार आहे. ताण निर्माण झाला कि आपला शासोच्छवास आपोआप वाढतो यावर आधरित क्रिया आहे. शास्त्रिय द्रुष्ट्या याला आधार आहे. http://en.wikipedia.org/wiki/Hyperventilation
हि क्रिया अति आनि अयोग्य रितिने करताना हाताला कंप सुटतो, डोके चक्रावते, मुर्च्छा हि येवु शकते, क्वचित म्रुत्यू हि होउ शकतो. म्हनुण हि क्रिया गुरु कडुनच शिकावि व इतर कुणाल शिकवु नये असे वदवुन घेतले जाते. शरिरातिल अति ओक्सिजन मुळे डोके शांत वाटते, विचार प्रक्रिया मंद होते व तान दुर झाल्याचा भास निर्माण होतो ( बहुदा सिगारेट च्या विरुध्ध्द) अशा रितिने रोज सकाळि हि क्रिया करन्याचे व्यसन लागते.
शिष्यांचे मन गुरुजिंनि का पछाडुन जाते ते मात्र कळले नाहि, त्यावर सध्या अशा शिष्या सोबत चर्चा चालु आहे, इथे कुणि असेल तर थोडा प्रकाश टाकावा हि विनन्ति.
गुरुजिंच्या विधायक कार्यास आमचा विरोध नाहि.
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 9:02 am | येडबंबू
काय कल्पना नाही बुवा.
>>> हि क्रिया अति आनि अयोग्य रितिने करताना हाताला कंप सुटतो, डोके चक्रावते, मुर्च्छा हि येवु शकते, क्वचित म्रुत्यू हि होउ शकतो. म्हनुण हि क्रिया गुरु कडुनच शिकावि व इतर कुणाल शिकवु नये असे वदवुन घेतले जाते.
मग पैसे कसे मिळनार बाबांना ?
12 Aug 2010 - 9:37 am | नगरीनिरंजन
अशक्तराव, तुम्हालापण शतक मारायची इच्छा आहे काय?
ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.
12 Aug 2010 - 5:05 pm | अशक्त
नाहि राव , अस काहि नाहि
12 Aug 2010 - 11:06 am | दिपाली पाटिल
हे हे हे मला वाटलं कुणी जगन नावाच्या माणसाची कला नावाची बायको/प्रेयसी आहे आणि त्यांची कथा आहे की काय... :D :D :D
12 Aug 2010 - 11:10 am | दिपाली पाटिल
त्या लोकांनी म्हणे पेटंट घेतलंय सुदर्शन क्रियेचं...
12 Aug 2010 - 5:04 pm | अशक्त
हो खर आहे