नमस्कार,नमस्कार.....
काश्मिरमधल्या हींसाचाराची बातमी टीव्हीवर येत होती.हल्यात काहीतरी ४-५ माणसं मेली होती.हा आता काही गंभीर विषय राहीला नाही..असो.मला काहीतरी वेगळ बोलायच आहे.
मी आमच्या राजाधिराज,परमपुज्य बापुंबरोबर टीव्ही बघत होतो.बापु चहा फुकत टीव्ही बघत होते.
काश्मिरची बातमी आली.
मी(मनात) :च्यायला ह्या लोकांच्या!!! एक तर सोडुन द्या काश्मिर,नायतर मरा असेच कोंबडीसारखं!
मी(बापुंना उद्देशुन): काय करायचाय काश्मिर??....काय काश्मिरमधे फीरायला गेलेल्या पर्यटकांच्या पैशांवर आपला देश चालतो का?........द्या पाकला तो काश्मिर्,काय बिघडणार आहे!!........
बापुंमधला सैनिक जागा झाला.काश्मिरच्या फळांचा रंग ते आतंकवाद्यांशी झालेली मुठभेड असे सर्व कीस्से आम्ही कान पकेपर्यंत ऐकत आलो आहोत.पण आमचे बापु कधी सांगताना थकले नाहीत.पण आता मी कधी ते 'आर्मीपुराण' गायला लागले की 'माहीतेय हे मला,तुम्ही सांगितलय' अस बोलुन सुटका करुन घेतो.बापु गप्प बसले की हायस वाटत.
बापु('अरे मुर्ख बालक!' ह्या भावात):अरे वेडा आहेस का तु! मुसलमान व चीनी घुसतील ना बॉर्डरमधुन!!
मी: नवीन बनवा बॉर्डर,काय भितिंच बाधांयच्या आहेत ना?
बापु: अरे वेडा आहेस का तु?
मी(मनात):अहो मुद्याचं बोला ना,कशाला उगाच कान चावताय?
बापु:ते डोंगर व आजुबाजुच मौसम(ईथे भौगोलिक स्थीती असा अर्थ) आहे म्हणुन आपण टीकलोय.मिलिटरी आपली स्ट्राँग आहे.
मी(मनात):तरी बोललो अजुन बढाई कशी नाही मारली.
बापु:जर काश्मिर दीला,तर भारत संपेल.
मी: हॅ!!.............अस थोडीच आहे,मी तर हे अस काहीतरी पहील्यादांच ऐकतोय.अस काहीच नाहीये.(कार्ट मोठ झालं की अस सरळ मनातल बोलुन टाकत.)
बापु: नाहीतर काय तसच आहे,हे साले मीडीयावाले मुर्ख बनवतात.
मी:नाही तस काही नाहीये,कसले डोंगर नी काय!.....आता बेळगावच बघा.ज्यांना 'मराठी,मराठी' ओरडायला आवडतं ना तेच बोलतायत बेळगाव वेगळ करा म्हणुन नाहीतर सर्व ठीक आहे तिथे.आणि दीला आपल्याला बेळगाव तर कर्नाटकला काय फरक पडतोय.आणि नाही दीला तर महाराष्ट्राच काय बिघडणार आहे?
बापु:अरे आपली मराठे लोक आहेत तिथे परराज्यात!(हा मनसेच्या बातमीचा परीणाम)
मी:अहो त्यांना आरक्षण पाहीजे,आपल्याला ईथे जन्म घेउन चार आण्याचं तरी आरक्षण भेटलय का?
बापुंकडे बोलायला काहीच नव्हत्,माझा मुद्दा पटला म्हणुन बापु उठुन निघुन गेले.
मी चर्चा संपवल्याचा आनंद घेउन बाहेर गेलो.पण मनात तीच गोष्ट आली,"अरे देउन टाका तो काश्मिर पाकला आणि नको ते बेळगाव...च्यायला लो़कांचा त्रास तरी वाचेल!!"
नोंद :'स्वातंत्र बेळगाव'प्रेमींनी आम्ही काही चुकीचं लिहल असल्यास,थोडीशीच माहीती पुरवुन आमच्या अज्ञानात भर टाकावी.
जय हींद!!!!!
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 6:48 pm | अर्धवट
कोक, झाड आणि पॉपकॉर्न..
9 Aug 2010 - 6:50 pm | अवलिया
मालक.. थोडं घ्या सरकुन... भाजलेल्या शेंगा आणल्या आहेत
9 Aug 2010 - 6:53 pm | अर्धवट
नाना, सगळी झाडं रीजव करुन, ब्लॅक करावं का? चहापाणी सुटेल तेवढंच..
9 Aug 2010 - 6:57 pm | अवलिया
नग रे बाबा नग
आपल्यावालीच माण्स हायती..
चा द्या म्हटलं तर नक्की पाजतायत बग
नाई बी पाज्ला तर आपन पाजु की लेका
पण जास्ती ब्लॅक केलं तर रेड पडलं.. आपल्यावालं झाडं बी सोडावं लागलं
9 Aug 2010 - 7:06 pm | मितान
दिवे लागले !
ह्याप्पी गटारी हो शानबा !!!
9 Aug 2010 - 8:07 pm | अनिल हटेला
दिवे लागले !
--->इंडीकेटर लागले असं म्हणायचये का तुम्हाला ?
ह्याप्पी गटारी
+१
=))
9 Aug 2010 - 7:49 pm | वेताळ
आतापर्यत किती जण मेले ,किती पैसे खर्च झाले आणि त्यावर तु सांग द्या काश्मीर त्याना. हे गटारीची दारु जास्त चढल्याचा परिणाम आहे.आता काश्मिर आपल्या इज्जतीचा प्रश्न झाला आहे. काश्मीर जर पाक ला दिला तर लेह लडाख ज्याचा काश्मीरशी काही सबंध नाही तो भाग पण पाकला द्यायला लागेल. तसेच अरुणाचल ,आसाम व मणिपुर चीनला द्यावे लागतील.तेव्हा गटारीच्या दिवशी काश्मिरचा ईषय नको.
9 Aug 2010 - 8:14 pm | शानबा५१२
वेताळा, अरे काश्मिरने आपल्याला दील काय नी 'काश्मिर हवच' ह्या ह्ट्टाने आपल्याला कायकाय गमवाव लागल हे लक्षात घे जरा.
जरी आता हे शक्य नसल तरी हे फार पुर्वीच झाल पाहीजे होत.आणि आसाम वगैरे कस घेतील्?आपल सैन्य आहे ना !
अवांतर : बाकी मी दारु नाय पित बाबांनु,काल काय त व्हडका नावाचं शित्पेय पिल,तीन बाटल्या!
9 Aug 2010 - 7:57 pm | मेघवेडा
मस्त रे शानबा! तुला शांततेसाठीचं नोबेल दिलं पाहिजे.
टाळ्या!
9 Aug 2010 - 8:58 pm | Dhananjay Borgaonkar
किती सोप्पा उपाय मांडला. आपल सरकार उगाचच जवानांवर आणि सिक्युरीटीवर पैसे खर्च करीत आहे.
डोक असाव तर ५१२ सारख :P
9 Aug 2010 - 11:22 pm | बिपिन कार्यकर्ते
ही घ्या तुमच्या ज्ञानात एक भर... 'जय हींद' नव्हे, ते 'जय हिंद' असे आहे.
10 Aug 2010 - 1:48 am | बहुगुणी
शानबा,
"काथ्याकूट" या विभागात चर्चेसाठी हा विषय टाकता आहात, आणि 'इतिहास' हा लेखनविषय आणि 'विचार' हा लेखनप्रकार निवडलात, पण अशा चर्चेसाठी स्वतः काही वाचून तयारी केल्यासारखी वाटत नाही, नुसता काहीतरी टी आर पी वाढवणारा विषय काढुन 'कौल' मागता आहात असं वाटतं.
तुम्ही या आधी म्हातारा बाप, केक्युलेचे स्वप्न आणि बोल्ट्झमन - एक शापित विद्वान!' यांसारखे वाचनीय आणि (विचार करून लिहिलेले) लेख प्रसवले आहेत; तसेच आणखी लेख येऊ द्यात.
हे असले आगापीछा नसलेले धागे काढून तुम्ही स्वतःवर अन्याय करता आहात असं सांगावसं वाटतं, मनातील खळबळ बाहेर व्यक्त केल्याचं तात्पुरतं समाधान झालं, तरी यातून तुमची इतरांनी 'झाडावर चढून' 'पॉपकॉर्न' खात चेष्टा करावी हे तुम्हाला नक्कीच अभिप्रेत नसावं.