'ह्या' विषयातला पहीलाच लेख असल्याने,मला ही कल्पना सुचवणा-या बि.का ह्यांना समर्पित......आणि हो अर्थातच केक्युलेला.
"सफरचंद खालीच का पडल?" हा प्रश्न कोणात्या संशोधकाला पडला होता?ह्य प्रश्नाच उत्तर सर्वांनाच माहीती असेल........हो,isaac newton.मग त्याने 'गुरुत्वाकर्षण' ही कल्पना पुढे आणली व त्यावरुन कीतीतरी शोध लागले,ब-याचश्या प्रश्नांना उत्तर भेटली.'न्युटन' व 'सफरचंद' हे शब्द डोळ्यासमोर आले की हे सर्व लक्षात येत.
'केक्युलेचे स्वप्न' हे असच काहीतरी आहे.ऑरगॅनीक केमीस्ट्रीमधे ह्याच कुतुहल वर्षांनुवर्षांपासुन आहे.'केक्यलेचे स्वप्न' हे दोन शब्द लिहले की दोन चित्र डोळ्यासमोर येतात...........'बेन्झीन(benzene)' व 'साप'.
ही काय भानगड आहे?कोण केक्युले??बेन्झीन म्हणजे??साप????
ह्यानंतर मी 'बेन्झीनचे स्ट्रकचर'(benzene's structure) हा शब्द वापरेन.पण ह्याचा व स्वप्नाचा संबंध काय्?व त्या स्वप्नाचं महत्व काय??
सर्व क्रमानुसार समजुन घेउ.
Friedrich August Kekule von Stradonitz (August Kekulé) (7 September 1829 – 13 July 1896) एक German organic chemist आणि Benzeneच्या structure चा शोध लावणारा.अजुन काही लिहल तर लेख लांबेल.आपण 'केक्युले केक्युले' करतोय तो हा आमचा Kekule!!
बेन्झीन(Benzene) : एक विषारी रसायन,पाण्यासारख दीसत.पुढच इथे वाचा(लेखासाठी त्याची गरज नाही).
बेन्झीनच स्ट्रक्चर :
"
हे बेन्झीनच स्ट्रक्चर आहे,more correctly Benzene's chemical structure.का structure महत्वाच?सांगतो,अगदी मजेशीर उदाहरणांबरोबर,
आपण नेल पॉलीश रेमुव्हर वापरतो,त्यात acetone असत.हे आहे acetone च स्ट्रक्चर.......
३ कार्बन,६ हायड्रोजन व १ ऑक्सिजन आहे स्ट्रक्चरमधे.हे आपल्या नेल पॉलीशमधे असत.मग '३ कार्बन,६ हायड्रोजन व १ ऑक्सिजन' असणार दुसर केमीकल घेउ,स्वस्त पडेल तर बघु की!
आहे ना तस Prop 2-en-3 ol ,ह्याच chemical structure हे आहे,
CH2=CH-CH2-OH
हे नेल पॉलिश मधे वापरु शकत नाहीत कींवा जर वापरले तर नेल पॉलिश तयार होणार नाही.
CH3-CH2-CH2-OH म्हणजे Propanol घेतल तर?जास्त फरक कुठे आहे स्ट्रकचरमधे?
पण Acetone फक्त रंग घालवत व Propanol फक्त drying agent म्हणून काम करत.म्हणजे स्ट्रक्चर बदलल की कार्य बदलत.आता जरा स्ट्रक्चर व कार्य ह्यातले जालीम फरक बघु.
हे Ethambutol ह्या Anti-tuberculotic agent(खाली अर्थ स्पष्ट होइल)च स्ट्रकचर आहे.
दोन स्ट्रकचर मधे एवढाच फरक आहे की एकात CH2OH आपल्या उजव्या बाजुस आहे(R-isomer ) व दुस-यात तो डाव्या बाजुस आहे(L-isomer).
(Discussion about the concept of isomers is out of scope of this लेख).मग त्यात काय फरक पडतो structure मधे एवढाच फरक असला तर?
The (S, S)-form of ethambutol is a tuberculostatic agent(बॅक्टेरीआ मुळे प्राथमिकता फ्फुफुसाला येणारी सुज कमी करणारा)but the (R, R)- form causes optical neuritis that can lead to blindness (डोळ्यांची जळजळ होते जी वाढुन आंधळेपणा येतो.)
(अधिक माहीती : शुद्ध स्वरुपात असताना हे केमीकल दोन्ही R व S forms च मिश्रण असत ते नंतर वेगळ करुन फक्त S form वापरतात)
ह्यावरुन आपल्याला एखाद्या केमीकलच्या chemical structure च महत्व समजत....................हुsssssश दमलो!!!!!
'डेवार'ने बेन्झीनच स्ट्रक्चर अस आहे असा दावा केला होता,
"
हे स्ट्रकचर खुप वादात सापडल्,कोणत्या मुद्दयांवर ते......out of scope............बर का!
मग सगळे बेन्झीनच स्ट्रकचर शोधायच्या मागे लागले.आपला केक्युले भलताच गुंतला होता.अगदी वेडा झाला,सारखा तोच विचार करुन करुन.फक्त स्ट्रकचरच नाही तर आपल्या स्ट्रकचरला आधार देणारे पुरावे पण गोळा करायचे होते.केक्युले आपल्या जिद्दी व मेहनती स्वभावासाठी त्याच्या ओळखीच्या लोकांत प्रसिद्ध होता.त्याने आपले सर्व निष्कर्ष पनाला लावले,बेन्झीनच 'खर' स्ट्रकचर शोधण्यासाठी.
शेवटी देवाने 'ते' श्रेय त्याच व्यक्तीच्या पारड्यात पाडल जीने सर्वात जास्त मेहनत केली होती.अर्थात केक्युलेच्या पारड्यात.देवाने दील? हो देवानेच...का बर?
"I turned my chair to the fire and dozed. Again the atoms were gamboling before my eyes. ... My mental eye... could not distinguish larger structures, of manifold conformation; long rows, sometimes more closely fitted together; all twining and twisting in snakelike motion. But look! What was that? One of the snakes had seized hold of its own tail, and the form whirled mockingly before my eyes. As if by a flash of lighting I awoke... "
"Creativity, Beyond the Myth of Genius"
by Robert Weisberg
1992
हे मला लिहायला कंटाळा आला होता म्हणून copy-paste केल्,पण Morrison-Boyd ह्या(नाव वेगळ आहे मी त्याला असच म्हणतो)पुस्तकातला परीच्छेद जरा मोठ आहे.पुस्तकातल केक्युलेची 'त्या' स्वप्नाबद्दलची काही वाक्य मराठीत भाषांतर करुन लिहतोय......
मी घरी आल्यावर (केक्युलेच्या हे चित्र पहील्यांदा त्या दीवशी संध्याकाळी बसमधे बसलेला असताना डोळ्यासमोर आल होत)...पुर्ण रात्रभर मी 'ती' स्वप्नातली चित्र पेपरावर रेखाटत होतो.......
A.Kekule ,1890.
केक्युले बसमधे असताना तो विचार करता करता स्वप्नाअवस्थेत गेला व तो घरी आल्यावर 'ती स्वप्नचित्रे' आठवु लागला आणि त्याच रात्री बेन्झीनच्या स्ट्रकचरचा शोध लागला!!
म्हणजे केक्युलेला बेन्झीन स्वप्नात साप म्हणुन दीसल!!त्याला तोंडांत शेपुट घेतलेला साप बेन्झीनच स्ट्रकचर सुचवुन गेला!!!!! आहे की नाही अजब!
अजब कींवा असाधारण अस नाही वाटत?? अच्छा,आहेत उदाहरण हे का अजब आहे ते सांगायला.पुराव्यानिशी साबित करीन!!
आज एखाद्या केमिकलच स्ट्रकचर शोधणे म्हणजे लहान मुलांचा खेळ आहे.केमीकल घ्या टाका यंत्रात दाबा २-४ बटन,५-१० मिनीट वाट बघा आणि घ्या आल नाव लिहलेल!!उदा. IR spectra,NMR specta,Mass Spectroscopy इत्यादी.
पण केक्युलेच्या वेळी काय होत्??फक्त कल्पनाविश्व......त्याची अस्तित्वाशी जुळलेली स्वप्न!!
केक्युलेने तेव्हा सुचवलेल बेन्झीनच स्ट्रकचर आज ह्या विसाव्या शतकातही कोणी नाकारु शकल नाही,अहो त्याला आव्हान पण नाही देउ शकले.
E = mc2 ला आव्हान देणारे काम करत आहेत.
केक्युलेने आपल्या कल्पना शक्ती पुढे सर्वांना झुकायला,मानायला लावल!!!
आज यंत्राच्या जगात ही अशी cholesterol ची स्ट्रकचर्स शोधली जातात्,
पण केक्युलेला अशी कल्पनाशक्ती लाभली होती की सर्वच नगण्य त्यासमोर!!!
नंतर काही संशोधकांनी ह्याला एक रंजक कहानीच म्हटंल.पण ..........हत्ती...कुत्रा.......हां तशी गोष्ट आहे ही.
केक्युलेची कीर्ती,फक्त त्याच्या स्वप्नांच्या जोरावर नाही,इतकी अफाट आहे की सर्व टीका त्याच्या समर्थानातच उभ्या राहतात.
आम्ही कीत्येक वर्षांपासुन त्याच्यासमोर नतमस्तकच आहोत.
असा हा आमचा हीरो...........August Kekule त्याच्या स्वप्नातल्या चित्राबरोबर....
प्रतिक्रिया
23 Jun 2010 - 2:48 am | इंटरनेटस्नेही
अतिशय अभ्यासपुर्ण व माहितीपर लेख. पुलेशु.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
23 Jun 2010 - 4:10 am | वाचक
वा शानबा - झकास लेख
केमिस्ट्री मधे ह्या धड्यांनी वात आणला होता - असे कोणी समजावून सांगितले असते तर ?
अवांतर: थोड संपादनाकडे पण लक्ष द्या म्हणजे बांधीव होईल लेख.
अधिक अवांतर: हा शानबा लेकाचा आत्तापर्यंत 'इतरच' का लिहित बसला होता ? :)
23 Jun 2010 - 7:51 am | मदनबाण
अशीच वेगळी माहिती वाचायला आवडेल...
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson
23 Jun 2010 - 7:33 am | निरन्जन वहालेकर
छान अभ्यासपूर्ण लेख.ही माहिती माहित नव्हती.नवीन विषय समजला.अजून असेच येवू देत.आमच्या ज्ञानात भर पडेल
23 Jun 2010 - 7:41 am | II विकास II
अरे न दिसणार्या प्रतिमा आधी ठिक कर.
23 Jun 2010 - 8:40 am | राजेश घासकडवी
मुळे लेख आवडला. असंच आणखी लिहित जा.
- RR व SS आयसोमरमधला फरक कळला नाही. RR जर स्वतःभोवती १८० डिग्रीम्ध्ये गोल फिरवला तर SS सारखाच दिसणार नाही का?
हे आलंकारिकरित्या म्हटलं आहे असं गृहित धरतो. दिवसभर टेट्रिस खेळल्यावर झोपतानासुद्धा डोळ्यासमोर ते तुकडे पडत राहातात...
23 Jun 2010 - 9:10 am | शानबा५१२
Enantiomers are two stereoisomers that are related to each other by a reflection: they are mirror images of each other, which are non-superimposable. Human hands are a macroscopic example of stereoisomerism. Every stereogenic center in one has the opposite configuration in the other. Two compounds that are enantiomers of each other have the same physical properties, except for the direction in which they rotate polarized light and how they interact with different optical isomers of other compounds. For this reason, pure enantiomers exhibit the phenomenon of optical activity and can be separated only with the use of a chiral agent. In nature, only one enantiomer of most chiral biological compounds, such as amino acids (except glycine which is achiral), is present. As a result, different enantiomers of a compound may have substantially different biological effects.
काही कळल का? नाही??
solution मधे हे दोन्ही forms असतात.डावा व उजवा हात अस त्या दोन molecules मधे संबंध असतो.
तस ह्या दोन हातात काही फरक नसतो(म्हण्जेच त्या molecules च्या chemical व physical properties सारख्याच असतात),पण हस्तांदोलनाच्या वेळी फरक पडतो.(म्हणजेच हे दोन्ही molecules जेव्हा एखाद्या chiral substance शी प्रक्रीया करतात्,तेव्हा ते दोन्ही molecules असे दोन केमीकल तयार करतात्,ज्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात.),अगदी त्यांची solubility सुध्दा वेगळी असते.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 9:36 am | राजेश घासकडवी
आयसोमर्स, कायरॅलिटी म्हणजे काय ते माहीत आहे. तुम्ही दाखवलेल्या चित्रात ते दोन्ही सुपर इंपोजेबल दिसतात इतकंच.
23 Jun 2010 - 11:22 am | शानबा५१२
ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत आणि म्हणुन enantiomers आहेत.जर isomers व chirality माहीती असेल तर सोप जाइल समजायला..
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 9:05 am | sur_nair
आर्कीमिडीस आणि युरेका सारखी हि सुद्धा कथा प्रसिद्ध आहे. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर कशात काय दिसेल काय सांगता येत नाही. मग एखादा शास्त्रज्ञ असो नाहीतर कवी/लेखक व कुठलाही कलावंत असो.
23 Jun 2010 - 11:31 am | शानबा५१२
केक्युलेची तुलना फक्त न्युटनशी होउ शकते.(म्हणजे फक्त ह्या प्रसंगाबद्दल्,साम्य आहे म्हणुन)
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 9:37 am | पाषाणभेद
गोष्ट माहीत होती पण एका वाक्यातली होती ती. तुमच्या गोष्टी एवढा व्यापकपणा त्यात नव्हता. विज्ञानावरच्या किर्तनात सांगण्यासारखी गोष्ट आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
23 Jun 2010 - 9:38 am | टारझन
हा हा हा ..... बिकांना साष्ठांग दंडवत =)) लेख टाकायची युआरएल चुकीची दिली बहुतेक त्यांनी =))
बाकी लेख "पाहुन" उपक्रमावर आल्यासारखेच वाटले , चालु दे शाणबा :)
- (अॅसिटाल्डिहाईड) टारझन
23 Jun 2010 - 9:51 am | नितिन थत्ते
>>बाकी लेख "पाहुन" उपक्रमावर आल्यासारखेच वाटले , चालु दे शाणबा
खालच्या प्रतिक्रिया वाचून मात्र मिपावरच असल्याची खात्री पटली.
नितिन थत्ते
23 Jun 2010 - 9:49 am | सहज
बिकांना साष्ठांगच!
असेच लिहत रहा.
आणी हो, उपक्रमावर जरुर लिहा हा लेख.
23 Jun 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
सुचवीन कल्पनाकर्ते ह्याना शि.सां. न.
Newton never had marijuana, he tought us gravity.
बाकी चालु द्या...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Jun 2010 - 10:44 am | रामदास
सुरेख लेख . आता, असेच काहीतरी मनोरंजक आणि माहीतीपूर्ण लिहीत रहा.
23 Jun 2010 - 11:52 am | वेताळ
कॉलेजात हे होते पण त्यावेळी ते मार्कासाठी वाचत व लिहित असे. :D
पण केकुल्येची तुलना न्युटन बरोबर करण्याचा अट्टाहास का?न्युटनचे शोध खुप महत्वाचे व क्रांतीकारक होते व त्याचा वापर रोजच्या जीवनात होणारा आहे. केकुल्येचा शोध पण महत्वाचा आहेच .पण न्युटन हा न्युटनच आहे.
वेताळ
23 Jun 2010 - 11:52 am | वेताळ
कॉलेजात हे होते पण त्यावेळी ते मार्कासाठी वाचत व लिहित असे. :D
पण केकुल्येची तुलना न्युटन बरोबर करण्याचा अट्टाहास का?न्युटनचे शोध खुप महत्वाचे व क्रांतीकारक होते व त्याचा वापर रोजच्या जीवनात होणारा आहे. केकुल्येचा शोध पण महत्वाचा आहेच .पण न्युटन हा न्युटनच आहे.
वेताळ
23 Jun 2010 - 12:07 pm | शानबा५१२
While visiting the baths, Archimedes suddenly awoke to a significant principle that would enable him to measure the volume of an object based upon the amount of water it displaced. At the time he had been wrestling with a royal problem. The ruler Hiero suspected that he had been cheated by the goldsmith who had crafted his crown. Archimedes' job was to determine the volume of the crown, so as to learn, from its weight, whether or not it had been made of pure gold. The Roman architect Vitruvius recounts the eureka moment of Archimedes' discovery:
When he went down into the bathing pool he observed that the amount of water which flowed outside the pool was equal to the amount of his body that was immersed. Since this fact indicated the method of explaining the case, he did not linger, but moved with delight he leapt out of the pool, and going home naked, cried aloud that he had found exactly what he was seeking. For as he ran he shouted in Greek: eureka, eureka!
कोणाचीच तुलना कोणाबरोबर होउ शकत नाही ते सर्व आपापल्या क्षेत्रात श्रेष्ट होते.
__________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 12:13 pm | रानी १३
छान लेख ... Purity of drug is very important.... plz check this case if interested (thalidoamide case) http://en.wikipedia.org/wiki/Thalidomide
Whenever new drug comes into market, that compound must satisfy many physical and chemical properties.....
बापरे...नाही लिहिता येणार मराठी मधे..........हुश्श्स्श्श्स........
23 Jun 2010 - 12:32 pm | शानबा५१२
फार विचित्र आहे हे!!
त्या ड्रगच्या वापरात फक्त purity नाही तर optical purity पण ,भले दोन्ही १००% असले तरी,उपयोगाची नाही/नव्हती.
Thalidomide is racemic – it contains both left- and right-handed isomers in equal amounts. The (R) enantiomer is effective against morning sickness but the (S) is teratogenic and has been proposed to cause birth defects although this has never been proven experimentally. The enantiomers can interconvert in vivo.
therefore, administering only one enantiomer will not prevent the teratogenic effect.(जन्मत:च निर्माण होणारे शारीरीक दोष)
अस ड्रग बाहेरच्या देशात कस काय वापरल गेल ह्याच आश्चर्य वाटत.पण आज हे शक्य नाही,अमेरीकेत आपल्यकडच्या काही रंग बनवणा-या कंपनीज् "carcinogenic(कॅन्सर होण्यास कारणीभुत)" substance वापरतात म्हणुन कायमची ban केल्या आहेत. व काही देशात आपल्याकडे करोडोमधे कमावणारे शितपेये ban आहेत.
आज भारतात ही एखाद औषध बाजारात यायला कमीत कमी ५-६ वर्ष लागतात.
लिंकद्वारे नवीन माहीती दील्याबद्दल धन्यवाद!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 1:24 pm | रानी १३
आज भारतात ही एखाद औषध बाजारात यायला कमीत कमी ५-६ वर्ष लागतात.
नाही..... कमीत कमी १० -१२ वर्ष लागतात....if u calculate from basic reasearch to clinical trlals.....
शानबा५१२ , you are genius.....you can write chemistry in मराठी .....
23 Jun 2010 - 1:32 pm | II विकास II
>>शानबा५१२ , you are genius.....you can write chemistry in मराठी .....
आता बिपीनचा फोटो पाकीटात ठेव. तु genius झालास.
हलकेच घ्यारे दोघांनी.
23 Jun 2010 - 1:41 pm | गणपा
वाह!!
अतिशय अभ्यासपुर्ण लेख वाटतोय. वरवर चाळला.
सवड काढुन परत एकदा नीट वाचीन म्हणतो.
23 Jun 2010 - 1:55 pm | ऋषिकेश
लेख चाळला.. छान लिहिलं आहे
मला ह्या विषयात तितकासा रस नसल्याने याआधी याबद्दल वाचले नव्हते त्यामुळे त्यातील माहिती माझ्यासाठी नवीनच आहे
धन्यवाद
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
23 Jun 2010 - 2:46 pm | निखिल देशपांडे
छान लेख रे शानबा..
खुप दिवसांनी केमिकल स्ट्रक्चर पाहिले
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
23 Jun 2010 - 4:18 pm | मेघवेडा
असेच म्हणतो!
आणिन लायनीवर्ते यांचे अभिनंदन आधी! ;)
शान्या मेल्या ते कोणत्या सीरीयलवर, 'मी कसा एकटा आहे' वगैरे विषयांवर धागे काढून लोकांची सहनशक्ती पाहण्यापेक्षा हे असे अभ्यासपूर्ण धागे काढणं खूपच बरे, नाही का? मस्त! :)
23 Jun 2010 - 4:39 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद सुशांत. लेख आवडला. बाकी बोलूच.
बिपिन कार्यकर्ते
23 Jun 2010 - 6:57 pm | प्रभो
चांगला लेख रे....
23 Jun 2010 - 7:57 pm | केशवसुमार
मला चिमटा काढा.. मी हे काय पाहतो आहे.. विदागारात काही गडबडतर नाही.. लेखक आणि लेख अदलाबदल तर झाली नाही ना..
(वाल्या )केशवसुमार
शानबाशेठ,
अतिशय उत्तम लेख.. १२वी नंतर चेमिस्ट्री सोडली ते एकदम २४ वर्षानी अत्ता वाचली..(आपला आय्डी पहिला आणि ह्यात काही चावट पणा नाही ना हे बघण्यासाठी लेख वाचावा लागला म्हणाना..) महाविद्यालयातील दिवस आणि चेमिस्ट्रीचे अध्यापक असे बरेच स्मृतीरंजन झाले.. धन्यवाद..
(आभारी)केशवसुमार
आपल्या लेखनातला हा बदल स्तुत्य आहे.. अभिनंदन.. असेच माहितीपर लेख आपल्याकडून वाचायला मिळोत..
(आशावादी)केशवसुमार
स्वगतः बिकाला अजून ३-४ जणांची सुपारी द्यायला हवी म्हणजे सार कसं शांत शांत होईल..
23 Jun 2010 - 8:07 pm | चतुरंग
एका उत्तम लेखाबद्दल शानबांचे मनापासून अभिनंदन.
चेमिस्ट्री आम्हाला कधीच तितकीशी समजली नाही पण केक्यूलेचे हे स्वप्न मात्र एक गोष्ट म्हणून आवडीने वाचल्याचे आठवते.
(खुद के साथ बातां : सदस्यांना समजावून जिथे इतर संपादक थकतात तिथे आमचे बिका सुरु होतात!)
चतुरंग
25 Jun 2010 - 12:27 am | भडकमकर मास्तर
केसु आणि रंगाशी सहमत..
बारावीत ते सी आणि एच चे बंध कसेबसे जमवले...
यानंतर हा लेख वाचतानाच थेट त्यांच्याशी झगडलो....
बिका आणि शानबांचे अभिनंदन...
बिकांनी आधी केलेल्या काही कौन्सेलिंगबद्दल ऐकून आहे.. ;)
23 Jun 2010 - 10:30 pm | II विकास II
>>स्वगतः बिकाला अजून ३-४ जणांची सुपारी द्यायला हवी म्हणजे सार कसं शांत शांत होईल..
मला तर बिका रत्नपारख्याच्या रुपात दिसु लागला आहे.
23 Jun 2010 - 11:07 pm | टारझन
=)) बाकी ह्यावरुन एक किस्सा आठवला , एकदा मी एका हॉटेलात जेवायला गेलो. जेवण संपवुन बिल द्यायला गल्ल्यावर गेलो तर हॉटेल मालक गायब. वेटर ला विचारलं तर तो म्हणाला "मालक शेजारच्या हॉटेलात गेलेत जेवायला... येतीलंच इतक्यात" :)
23 Jun 2010 - 7:58 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तंच रे शानबा. छानच केलं आहेस रे वर्णन.
१२वीत शिकलेले बाँड वगैरे पुन्हा आठवून गेले. केमिस्ट्रीत विनासायास ८०च्या वर मार्क मिळवित असे. पण प्रयोगशाळा नावाचा उकीरडा कंटाळवाणा होई. आमच्या कॉलेजात एक एम एस्सी वाल्यांसाठी वेगळी प्रयोगशाळा होती. मस्तं होती ती. पण आम्ची प्रयोगशाळा एकदम भंगार. कदाचित म्हणूनच केमिस्ट्रीपासून दूर राहीलो. :(
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
23 Jun 2010 - 8:33 pm | वेताळ
चोरुन जात असो.. बाहेर ठेवलेल्या पात्रातील हायड्रोजन स्ल्फाईट
आम्ही हळुच सोडत असु. त्याचा सडक्या अंड्यासारखा वास सगळ्या व्हरांड्यात पसरला खुप दंगा होत असे.
वेताळ
23 Jun 2010 - 11:14 pm | प्रियाली
मनी वसे ते स्वप्नी दिसे ही केक्युलेची कहाणी चांगली सांगितलीत.
अरेरे! या माणसाकडे (शानबाकडे) लिहिण्याची क्षमता असताना याने मिसळपावावर इतका वेळ वाया घालवला.
असो. देर आये दुरुस्त आये.
बिका, प्रभूसरांच्या जोडीने समुपदेशन सुरु करा.
शानबा आणि बिका दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन.
24 Jun 2010 - 12:55 am | शानबा५१२
ओssssssssव!!!!!
हा लेख खरच आवडला तुम्हाला!!
अरे मित्रांनो केक्युलेची ही गोष्ट तर खुपजणांना माहीती असते,आपल्यापाशी 'पुराव्यानिशी साबित' करण्यासारख्या केमीस्ट्रीच्या शास्त्रज्ञांच्या काही रोचक कथा,अनुभव आहेत.(इं.नेट वर काही अर्थहीन व १००% काल्पनिक गोष्टी आहेत,जरी कमी प्रमाणात असल्या तरी)..........त्यातल्या कुठल्या कीती ख-या हे मला सुदैवाने सांगता येत कारण माझे अनुभवी,जिज्ञासु प्राध्यापक व अमुल्य अशी माझी पुस्तक!
प्रतिसाद देणा-या प्रत्येकाचे सर्वांचे अगदी मनापासुन आभार मानतो......अर्थात 'रसायनशास्त्रावर लिहा' अस सांगणा-या बिपीन ह्यांना सर्व श्रेय जात.
माझ्या 'शोधक' प्रव्रुतीला ज्याच्याबद्दल 'खर' समजल्यावर धक्का बसला तो Boltzmann.......परत एक जर्मन माणुस.......ह्याच्याबद्दल मी ३-४ भले मोठे लेख लिहु शकतो(नाही,नाही लिहणार,ओके?)....त्यातले २ तर एकही ओळ लिहताना काहीच संदर्भ न वाचता.
Boltzmann बद्दल पुढच्या लेखात वाचु.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.........सवडीने व्ययक्तीक उत्तर देइन..........आता आम्ही Boltzmannपुराण आठवण्यात दंग आहोत...त्तेव्हा मित्रांनो भेटु.........
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
24 Jun 2010 - 12:59 am | बिपिन कार्यकर्ते
वाट बघतोय.
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2010 - 8:02 pm | अवलिया
छान !
बिकापासुन जपुन राहिले पाहिजे असा संदेश मिळाला.
--अवलिया
24 Jun 2010 - 11:27 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद नॅन्स!!!
बिपिन कार्यकर्ते