कोणा व्यक्तीच्या विचाराने भारावून जायला ती व्यक्ती हयात असावी लागते का?........
नाही असं माझं उत्तर!
तसंच भारावून टाकणारं जीवन जगला बोल्त्झमान!!! हा माणुस फिजिसिस्ट व गाजलेला तत्वज्ञ. त्याचे रसायनशास्त्रातले काम भौतिकशास्त्रामधल्या संकल्पनांवर आधारलेलं होत. पण आम्ही त्याला एक रसायनशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखत आलो, अर्थात पुस्तकात. पण ह्या माणसाकडे खिळुन ठेवेल अस खुप ही आहे सांगायला!
आज त्याची केमीस्ट्रीमधली गाजलेली संकल्पना 'एंट्रॉपी' व त्याचे 'शापित' आयुष्य ह्याबद्दल वाचू व समजू. (एंट्रॉपी ही संकल्पना मांडणारा बोल्त्झमान हा काही पहिलाच संशोधक नाही. पण त्याची थियरी प्रमाण मानली जाते).
एंट्रॉपी म्हणजे विचार करायला लावणारं एक कोडं!!!
चला समजुन घेउ एंट्रॉपी म्हणजे काय ते. (आताच कंटाळालात तर बस करा :) पुढचं लिखाण वाचताना ते समजून घेणं अपेक्षित आहे).
एंट्रॉपी म्हणजे सुरळीत अवस्थेतुन विस्कटलेल्या, सुरळीत नसलेल्या / कमी सुरळीत असलेल्या अवस्थेत जाणे. इथे 'रेणूंमधील सुरळीतपणा' असं अपेक्षित आहे. (सांगायला उशिर झाला का? :) नाही,समजेल) सुरळीतपणा कमी झाला की एंट्रॉपी वाढली असं म्हणतात व सुरळीतपणा वाढला की एंट्रॉपी कमी झाली असं म्हणतात.
आता याचं एक उदाहरण पाहू.....
बर्फाचा एक चौकोनी खडा डोळ्यासमोर आणा, त्यातले पाण्याचे रेणू सुरळीत, ज्याला ऑर्डर्ड स्टेट असेही म्हणतात, असतात. जेव्हा बर्फाचे पाणी होते, तेव्हा हे रेणु विखुरतात, म्हणजेच डिसॉर्डर्ड स्टेटमधे जातात. म्हणजे बर्फाचं पाण्यात रुपांतर होत असताना सुरळीतपणा (रेणूंमधील) कमी झाला, म्हणजेच एंट्रॉपी वाढली. जर एखाद्या रुपांतरावेळी एंट्रॉपी वाढत असेल, तर तशी रुपांतरे ही (त्याच पदार्थाच्या) इतर रुपांतरांपेक्षा वेगाने होतात. बर्फापासुन पाणी बनताना एंट्रॉपी वाढते म्हणून बर्फाचे पाणी लवकर होते, पण पाण्याचा बर्फ त्याच वेगाने होत नाही किंवा कमी वेगाने होतो.
ISN'T IT GREAT EXPLANATION TO YET ANOTHER NATURALLY OCCURRING PHENOMENON?
ही संकल्पना सोप्पी करणारा बोल्त्झमान. अर्थात एंट्रॉपीचे गणिती रुप भयानक आहे. असो.
तर आज आपण रंग, वास, पाण्यातल्या पदार्थाच्या क्रीया इत्यादींचे निरिक्षण करतो, पण पदार्थाच्या रेणुंमधे रिअॅक्शन होताना झालेले बदल, त्यांची स्थिती, हालचाल ह्याबद्दल विचार करायला, अंदाज बांधायला, शक्यता वर्तवायला (सर्व सिद्धांत पाळुन) बोल्त्झमान वा तत्सम असावं लागतं!!
का हा असा शापित?
बोल्त्झमानला आपल्या आवडीच्या स्त्रीशी लग्न करायला मिळाल. तीन मुली व दोन मुलगे असं कुटुंब झालं. विज्ञानाच्या ज्या विषयांत त्याला आवड होती त्यात त्याला आदर व नाव भेटलं. पण हा असा बोल्त्झमान आत्महत्या करून मरण पावला!! आत्महत्या!!!! बोल्त्झमानसारख्या व्यक्तीने करावी? ज्याने तत्वज्ञानाची व्याखानं देऊन अशी किर्ती मिळवली की त्याच्या व्याखानाला उपलब्ध असलेल सर्वात मोठ सभाग्रुह निवडल तरी गर्दी आवरत नसे!! अशी तत्वज्ञान सांगणारी व्यक्ती आत्महत्या नाही करणार असं वाटतं ना? कशाच्या तरी प्रभावाखाली होता का तो? ... होय!!
बोल्त्झमानचा मुलगा अॅपेंडिसायटीसच्या विकाराने मरण पावला व हे कारण झाल बोल्त्झमानला दु:खी बनवायला. तो व्हिएन्ना विद्यापीठात असताना त्याच्या सिध्दांतांवर इतरांनी मिळवलेल प्राधान्य (म्हणून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल संशय घेउ नये, त्याला स्वःताला कमीपणाची, आपण इतरांपेक्षा पछाडलो आहोत अशी भावना निर्माण झाली Source: मॅक्स प्लांक ह्या दिग्गज शास्रज्ञ व बोल्त्झमानच्या शिष्याने आपल्या लेखात उल्लेख केला आहे), त्याच्यावर तत्वज्ञानासंबंधी होणार्या टीका ह्या सर्वांमुळे त्याला खुप निराशा आली. ज्याचा परीणाम म्हणुन त्याला निराशेतुन फीट्स, झटके यायला लागले. ह्याच्या प्रभावाखाली त्याने आत्महत्येचे प्रयत्नही केले.
'अणु अस्तित्वात आहेत का?' ह्यावर झालेल्या वादाचा त्याच्यावर खूप खोल परीणाम झाला. बोल्त्झमानला त्याचा अतिसंवेदनशिल स्वभाव नडला. "एखाद्या ज्ञानी माणसाच्या ध्यानी पण येणार नाहीत अशा गोष्टी 'ह्याला' जखमी करुन जातात व म्हणूनच त्याच्यातली ही असामान्य मानसिकता त्याला एक प्रभावी, शक्तीशाली शिक्षक बनवते!" असं वाक्य त्याच्या एका विरोधकाने म्हटलं होत. दिवसागणिक बोल्त्झमान मानसिकद्रुष्ट्या कमकुवत होत गेला आणि एक दिवस............
On September 5, 1906, while on a summer vacation in Duino, near Trieste, Boltzmann hanged himself during an attack of depression.........(Source: McCurry and Leon - 'Physical chemistry'. वाक्य Wikipedia मधल आहे).
बोल्त्झमान अजून जगला असता तर विमानाच्या निर्मितीत त्याचा सहभाग असता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, तत्वज्ञान ह्या विज्ञानाच्या शाखा त्याच्या इतर अमूल्य योगदानाला मुकल्या असं म्हणता येइल.
हा आमचा Boltzmann.......
आणि ही त्याची समाधी!त्यावर भिंतीवर काय लिहलय बघा.........त्या समिकरणातला 'S' दिसला का?
"
तो 'S' म्हणजे Entropy!!!
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 9:17 pm | शुचि
लेख आवडला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 9:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शानबा, चांगला लेख. असाच लिहीता रहा.
बोल्ट्झमन स्थिरांकामुळे अमरत्व पावलेला लुडविग बोल्ट्झमन लीझ माईट्नर या शापित संशोधिकेचा गुरू! सिद्धांतवादी भौतिकशास्त्र म्हणा अथवा रसायनशास्त्रज्ञ, त्याचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. अणूच्या अस्तित्त्वाच्या सिद्धांताचे बोल्ट्झमनने ठामपणे प्रतिपादन केले. निरीक्षणातून अणू 'दिसत' नसल्यामुळे भौतिकशास्त्रज्ञांनी तेव्हा अणूचे अस्तित्त्व नाकारले होते. अणूच्या अस्तित्त्वाचा पुरावा अल्बर्ट आईनस्टाईन (१९०५) आणि जाँ पेटाँ (१९०८) यांनी अनुक्रमे सिद्धांत आणि प्रयोगांतून दिले. आईनस्टाईनचा शोध बोल्ट्झमनपर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही आणि त्याने वैचारिक एकटेपणापायी १९०६ साली आत्महत्या केली. (संदर्भः लिझ माईट्नर, लेखिका: वीणा गवाणकर, पान क्र. ५)
बोल्ट्झमन स्थिरांक म्हणजे थोडक्यात काय? कणस्वरूपातल्या पदार्थाची ऊर्जा आणि तापमान यांना जोडणारा हा स्थिरांक. अधिक माहिती विकीपिडीयावरही उत्तमरित्या दिली आहे.
अवांतरः शानबा, Physicist, chemistry, Physics, philosopher असे सोपे शब्द मराठीत वापरता येतील आणि परिच्छेद योग्य जागी पाडले तर वाचण्यास कमी त्रास होईल.
अदिती
24 Jun 2010 - 11:29 pm | शानबा५१२
लेख वाचुन झाला आणि त्या व्यक्तीबद्दल आठवल की मन अस्वस्थ होत,कुठल्या कल्पनेने,विचाराने झपाटलेली असतात ही माणस!!!!!!त्यांच्यासमोर आपले विचार म्हणजे...........हीन.....नाही त्याहुन खालच्या पातळीच काहीतरी!!..................निशब्द!!!
Boltzmann बद्दल खुप लिहायच होत पण त्याचाबद्दलचे काही प्रसंग नीट सांगता येणार नाहीत कींवा सांगितल्यावर त्याबद्दल गैरसमज होइल म्हणुन नाही लिहले.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
24 Jun 2010 - 10:18 pm | शिल्पा ब
लेख आवडला... =D> =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 Jun 2010 - 10:36 pm | चिरोटा
असेच लेख येवू द्यात.
P = NP
24 Jun 2010 - 11:21 pm | संजय अभ्यंकर
Entropy is Rate of Change of Heat Energy. हे खरे काय?
एरो इंजीनाच्या ज्वलन कक्षात (Cumbustion / Turbine Stage) मध्ये प्रत्येक कक्षात होणारे उष्ण वायुंचे प्रसरण स्थिर एन्ट्रॉपी ला होते हे विधान बरोबर आहे काय?
कृपया खुलासा केल्यास (आम्हांस समजेल अशा भाषेत) काही प्रश्न सुटतील.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
24 Jun 2010 - 11:51 pm | शानबा५१२
Entropy is Rate of Change of Heat Energy. हे चुकीच आहे.
आपला प्रश्न हा purely physics/engg. शाखेंशी निगडीत आहे.इथे entropy noise हा शब्द आहे आणि ह्यातला entropy हा शब्द त्याच्या(शब्दाच्या) probability ह्या गणिती व्याखेशी असलेल्या साम्यामुळे वापरला आहे.
मी जी संकल्पना वर मांडली आहे,त्यातला 'सुरळीतपणा कमी होणे' वगैरे इथे लागु होत नाहीत..........मी आता ह्यावेळी एवढच लिहु शकतो,सवडीने पुर्ण लिहेन..............माझ्या उत्तराला आधार म्हणुन हे वाचा.......
Entropy is a statistical measure; in particular, it is a measure of probability. When devising his mathematical model for information theory, Shannon (1948) borrowed the term entropy from thermodynamics.[1] What interested Shannon was the possibility for information to become a material quality which could be measured, rather than a vague medium through which meaning was conveyed.(वर मला हे सांगायच होत) When examining the heat exchange processes of thermodynamics in 1865 Clausius coined and defined the word entropy to mean ‘transformation content’ (von Baeyer, 2003: 91-92). Entropy was used as a measure, not of the loss or gain of energy (for according to the first law of thermodynamics the sum of energy is always constant), but a measure of the energy that was dissipated and broken down into less and less usable packets within a closed system (Spielberg and Anderson, 1987: 108). Today, entropy is still used as a measurement of the speed and gradual increase of the energy in any given system that can no longer be transformed into useful work or heat. Whenever energy is transformed it becomes degraded. Without an injection of fresh differentiated structures a closed system will become fully dispersed, and as undifferentiated matter, it will suffer what has been termed ‘heat death’ (Spielberg and Anderson, 1987: 125). This tendency towards maximum entropy is the second law of thermodynamics. Over time, entropy at work within a closed system leaves more and more energy unworkable.[2] However, because there are so few truly closed systems, the statistical character of entropy means that entropy becomes more the ‘measure of that state of maximal equiprobability towards which natural processes tend’ (Eco, 1989: 48) rather than a finalizing statement. Entropy is itself not the tendency towards unworkable systems, but the measurement of that tendency.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
25 Jun 2010 - 8:59 am | संजय अभ्यंकर
स्पष्टीकरण आवडले.
डोक्यात फिट बसवायला पुन्हा पुन्हा वाचावे लागेल.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 Jun 2010 - 12:52 am | Nile
जर विमानाचे इंजिन ब्रेटॉन सायकलवर आधारीत असेल तर हे खरे आहे.
पण ज्वलन कक्षात नाही. तर सुरुवातीच्या कॉम्प्रेशनमध्ये आणि मधल्या टर्बाईन एक्पान्शन मध्ये तसे होते. (टर्बाईन मध्ये ज्वलन होत नाही.) आणि कंबशन मध्ये स्टेजेस नसतात.
नाही, एन्ट्रोपीचे एकक ज्युल प्रतित केल्व्हीन आहे. (रेट म्हणले की वेळ आली.) भौतिकदृष्ट्या विचार करायचा असेल तर एन्ट्रोपी म्हणजे नुकसान किंवा उपलब्ध उर्जेतील अनुपयोगी भाग असा विचार करु शकता.
म्हणजे अ क्रिया होण्यास क्ष इतकी उर्जा पुरवावी लागते पण क्ष उर्जा त्या क्रियेतुन मिळणार नाही काही उर्जा वायाजाईल. तीच एन्ट्रोपी.
-Nile
25 Jun 2010 - 9:12 am | संजय अभ्यंकर
एरो इंजीनात ज्वलन Fuel Injection कक्षात तर Expansion टर्बाईन मध्ये होते हे पटले.
बहुसंख्य इंजीनात H.P. व L.P. तर क्वचित H.P., M.P. व L.P. अशा स्टेजेस असतात. (High Pressure, Medium Pressure & Low Pressure).
कोंप्रेशन स्टेज मध्ये २० ते ३६ स्टेजेस असतात. नंतर, फ्युएल इंजेक्शन चेंबर आणी त्यानंतर टर्बाईन स्टेज आहे.
शानबा व आपण एंट्रॉपी म्हणजे काय ते स्प्ष्ट केलेत.
मी विचारलेला प्रष्न मला असलेली माहीती योग्य का अयोग्य ते माहीत करून घ्यायला होता. त्याचे उत्तर आता मीळाले.
आपले व शानभाजींना धन्यवाद.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 Jun 2010 - 9:56 am | Nile
एक किरकोळ मुद्दा असा आहे की.
हे फक्त अॅक्शिअल (गॅस टर्बाईन इंजिनाकरताच आहे). अॅक्शिअल कॉम्प्रेसर व टर्बाईन्स मध्ये स्टेजेस असतात एक स्टेज म्हणजे थोडक्यात एक ब्लेड्सची जोडी (ब्लेड्स शाफ्टवरती लंबाकार जोडलेले) त्यातील एक ब्लेड शाफ्ट बरोबर फिरते तर दुसरे ब्लेड फिक्सड असते.
मात्र काही विमाने (सहसा छोटी) वेगवेगळे कॉम्प्रेसर्स वापरतात, तसेच काही IC engine वापरतात.(मोटारींमध्ये असते तसे)
-Nile
24 Jun 2010 - 11:41 pm | निखिल देशपांडे
शानबा लेख चांगला आहेच...
बोल्ट्झमन बद्दलची माहिती छान दिली आहेस.
आता पुढच्या लेखात अदिती म्हणते तसे पवाचतादाची काळजी घ्यावी म्हणजे अजुनच सोपे होईल हे सगळे वाचताना
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 Jun 2010 - 12:51 am | मस्त कलंदर
???
हा शब्द कुठल्या भाषेतला आहे याचा देशपांडे खुलासा करतील काय??
शक्य झाल्यास त्यांनी इथे या शब्दाचा अर्थ ही द्यावा ही विनंती.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 12:56 am | बिपिन कार्यकर्ते
देशपांडे खुलासा करण्याच्या अवस्थेत असते तर नीट लिहिले नसते? तुम्हीपण कैच्याकै प्रश्न विचारता.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 12:40 am | लॉरी टांगटूंगकर
लेख छान आहे .आवडला
एन्त्रोपी मन्जे काय या बद्दल चे कनफ्युजन वाढ्ले.
बाकी मस्त
@<(मन्द्या)>@!@#$%^&*
25 Jun 2010 - 2:36 am | भडकमकर मास्तर
एकसे एक अतिहुशार शास्त्रज्ञांवर त्या मॉर्गनासारखी एक झकास लेखमालाच लिही तू शानबा...
25 Jun 2010 - 7:30 am | अविनाशकुलकर्णी
आवडला
25 Jun 2010 - 7:36 am | सहज
मस्त!
25 Jun 2010 - 8:45 am | रामदास
शानबा साहेबांनी बोलींग एंड बदलल्यावर फॉर्म पण चेंज झाला.
स्वागतार्ह बदल. येऊ द्या आणखी.
26 Jun 2010 - 12:54 pm | शानबा५१२
आम्ही खेळच बदलला भाउ!!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
25 Jun 2010 - 8:58 am | चन्द्रशेखर सातव
कोणाचे तरी उद्गार आहेत" No philosopher had died satisfactiroly "
अत्यंत संवेदनशीलता हा या बुद्धिमान लोकांना मिळालेला शापच असावा.त्यामुळेच जगण्यातील दुखांचा ते इतर सामान्य लोकांप्रमाणे मुकाबला करू शकत नाहीत.
समोरच्या प्रश्नांचा ते त्यांच्या अत्यंत तर्कनिष्ठ बुद्धीने विचार करतात ,त्यातूनच उत्तरे न मिळाल्याने निराशा येत असावी.
अवांतर,शानबा भाऊ तुम्ही एवढे चांगले लिहू शकत असताना त्या वायफळ धागे आणि प्रतिसादात स्वतःला का अडकवून घेता ते कळत नाही.हे म्हणजे युवराज सारखे झाले,सामना जिंकून देण्याची क्षमता असताना पण निव्वळ खेळ गांभीर्याने ना घेतल्यामुळे किंवा सनकिपणा मुळे बाद होतो.सूचना ह. घ्या.
25 Jun 2010 - 9:33 am | jaypal
" No philosopher had died satisfactiroly " खुप अपवाद असु शकतात.
शानबा हा देखिल एक उत्तम लेख झाला आहे. चंद्रशेखरजींची सुचना अजिबात हलकी घेउ नकोस तर ती सिरीयसलीच घे आणि युवराजचा राहुल द्रविड झालेला आम्हाला बघु दे. पुढिल लिखाणास खुप खुप शुभेच्छा. =D> =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Jun 2010 - 11:47 pm | शानबा५१२
नक्कीच जयपाल्,पण आता मला मिपा मोबाइल वर 'फक्त वाचावा' लागेल कारण मी आता कंपनीच्या खोलीत राहणार आहे त्यामुळे घरी पण ३ दीवसांनी एकदा यायला भेटेल!!!
मला लॅबपर्यंत जायला ६ वेळा तपासणी करुन घ्यावी लागते,तेव्हा चोरुन मोबाइल वर वाचणे अशक्य!!!
बाकी घराबरोबरच मिपाची(आणि इतर साइट्सची)आठवण येइल हे नक्की!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
25 Jun 2010 - 12:05 pm | स्मिता_१३
लेख आवड्ला.
स्मिता
25 Jun 2010 - 11:19 pm | Pain
१) बर्फापासुन पाणी बनताना एंट्रॉपी वाढते म्हणून बर्फाचे पाणी लवकर होते, पण पाण्याचा बर्फ त्याच वेगाने होत नाही किंवा कमी वेगाने होतो.
बर्फ्-->पाणी लवकर आणि पाणी-->बर्फ उशिरा हे चूक आहे. पटले नाही.
बर्फाला किती वेगाने उष्णता दिली अथवा पाण्याची उष्णता किती वेळात काढून घेतली (२ तापमानांमधला फरक आणि इतर बाह्य गोष्टी वापरल्यास ते), तसेच दोन्हीची quantity यावर त्या स्थायू--> द्रव, द्रव्-->स्थायू किंवा द्रव्-->वायू रूपांतरण अवलंबून असते.
२) विकीपीडीयानुसार ह्या संकल्पनेचा जनक Rudolf Claussius असून Boltzmann visualized a probabilistic way to measure the entropy असे दिले आहे.
25 Jun 2010 - 11:42 pm | शानबा५१२
(एंट्रॉपी ही संकल्पना मांडणारा बोल्त्झमान हा काही पहिलाच संशोधक नाही. पण त्याची थियरी प्रमाण मानली जाते).
हे मी लेखात म्हणुनच लिहल आहे,आपण वाचल नाहीत का?
लेखात काही नावं देण्याचे टाळल आहे,जस 'एका विरोधकाने म्हटल आहे' वगैरे.
काही साइट्स तुन्ही ठेवता तेवढ्या विश्वास ठेवण्ञालायक नाहीत्.........................मी विकी. वाचुन लिहत नाही सर!! ह्याची आपण क्रुपया नोंद घ्यावी अस वाटत.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
26 Jun 2010 - 11:24 am | Pain
१) तुम्ही योग्य शब्द वापरले असते तर बरे झाले असते:
संकल्पनेचा जनक असणे वेगळे आणि visualizing a probabilistic way to measure the entropy (quantify, in a way) वेगळे. दोन्हीही महत्त्वाचे. नेमकेपणा महत्वाचा.
२) विकीपीडीयावर कोणीही संपादन करु शकतो हे माहिती आहे. पण सगळेच कसे चुकीचे असेल? अशा बिनमहत्त्वाच्या गोष्टीत विकीवर विश्वास ठेवायला हरकत नसावी. तिथे दिलेले नाव किंवा योगदान चुकिचे असल्यास तसे सांगा.
३) लेखात काही नावं देण्याचे टाळल आहे एकाच्या चरित्रात/ परिचयात दुसर्यांची नावे आली तर बिघडले कुठे ?
26 Jun 2010 - 12:53 pm | शानबा५१२
पहील्या प्रश्नाला उत्तर अस की मला मराठी (व इतर कोणत्याही भाषेत) छान छान शब्द वापरु नाही लिहता येत्.
विकीपीडीयावर आइन्स्टाइन बद्दलच्या लेखात तो अमु तमुक विषयात कच्चा होता..... He was thought of as a dumb child in grade in grade school....वगैरे वाक्य होत.हे साफ खोट आहे..........त्यानंतर मी ते कधी वाचल नाही आता त्या लेखात सुधारणा झाली आहे...........जेव्हा तुम्हाला खर माहीती असत तेव्हा अशी माहीती कळल्यावर सर्वाचाच संशय यायला लागतो.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
25 Jun 2010 - 11:18 pm | Pain
१) या शोधाचे/ संकल्पनेचे व्यावहारिक उपयोग (practical applications) द्यायला हवे होते.
२) बोल्ट्झमानच्या नावाचा एक स्थिरांक (constant) ही आहे.
kB = 1.38065×10−23 J K−1
25 Jun 2010 - 11:31 pm | शानबा५१२
ओह ओह ओहवो!!
अरे मित्रांनु हा लेख अजुन खुप मस्त व भावनाशील(??) झाला असता पण मला आजकल म्हणजे जन्म झाल्यापासुन पहील्यांदा 'कामामुळे' होणारी घाइ हे काय असत ते समजत आहे,म्हणुन नाही लिहु शकलो.आम्ही पण अणुशास्त्रज्ञ होणाराय म्हटल! :D :D :D :D :D :D :D
@Pain
तापमान व आकार,घनता(कींवा इतर परीमाण) स्थिर (constant) ठेवल्या शिवाय आपण कुठलेही समीकरण नाही समजु शकत.........ह्या वाक्याला आधार म्हणुन द्यायची उदाहरण द्यायला वेळ लागेल तो माझ्याकडे नाहीये.......Gibbs ची physical chemistry मधली समीकरण व ती लागु होताना ठेवलेल्या अटी ह्यांचे निरीक्षण करा तुम्हाला मी काय बोलतोय ते समजेल.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
25 Jun 2010 - 11:52 pm | Pain
पदार्थाच्या स्थायू, वायू आणि द्रव या अवस्था तापमानावर ( त्यातील उष्णतेवर (enthalpy), आणि त्याचे boiling point, melting point यावर अवलंबून असतात. (५ वी पासून शिकलेले chemestry व सामान्यज्ञान)
गिब्ब्स कोण ? त्याची कुठली समीकरणे आणि त्यांची assumptions याची लिंक द्या.
26 Jun 2010 - 7:37 am | रामदास
म्हण्जे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वाला असणार.
25 Jun 2010 - 11:58 pm | हुप्प्या
कंबश्शन इंजिनविषयी जे वरती लिहिले आहे ते म्हणजे एन्थाल्पीच्या संदर्भात असते असे वाटते. ती बरीच वेगळी कल्पना आहे.
एंट्रॉपीचे उदाहरण म्हणजे एका डब्यात एक कप गहू आणि एक कप तांदूळ ओतले आणि डबा बंद करून गदागदा हलवला तर काय होईल? अर्थातच दोन्ही धान्ये मिसळली जातील. एखाद्यावेळेस असे करुनही गहू आणि तांदूळ वेगळेच राहिले आहेत असे होईल का? आजिबात शक्य नाही. निसर्गधर्म असे होणार नाही ह्याची काळजी घेतो. हा धर्म म्हणजेच एंट्रॉपी.
गणिती भाषेत सांगायचे तर मिश्र झालेली धान्ये ह्या स्थितीची एंट्रॉपी जास्त आहे. त्यात बेशिस्त जास्त आहे. याउलट दोन्ही धान्ये वेगळी रहाणे ह्यात जास्त शिस्त आहे. त्याची एंट्रॉपी कमी आहे. अजून एक उदाहरणः मी एक कोटी वेळा नाणेफेक केली (नाणे निर्दोष आहे) आणि प्रत्येक वेळेस छापा आला. हे कितपत संभवते? अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तसेच हेही.
कल्पना करा की ही एक कोटी वेळा नाणेफेक लाखो लोक करत आहेत. प्रत्येकाचा निकाल (म्हणजे कधी छापा आला कधी काटा) हे इतरांपेक्षा वेगळे असेल. पण बहुतेक लोकांचा निकाल हा छापाकाट्याची सरमिसळ असाच असेल. सगळे छापे किंवा सगळे काटे आलेले लोक बहुधा नसतीलच.
ज्या घटनेची एंट्रॉपी अधिक त्या घटनेच्या घडण्याची शक्यता अधिक.
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
26 Jun 2010 - 12:45 am | आळश्यांचा राजा
एंट्रॉपी म्हणजे बेशिस्तीचे किंवा डिस-ऑर्डरचे परिमाण. जीवनाचा जन्म ते मृत्यु हा प्रवास म्हणजे एंट्रॉपीच्या विरूद्ध चाललेला एक लढाच असतो.
Life is a continuous struggle against entropy!
केमिस्ट्री आणि ती समीकरणे डोक्यात घुसत नसल्याने हे असं लक्षात यायला सोपं पडतं आमच्यासारख्यांना!
असो. शानबांचे कौतुक - जरा वेगळे विषय आणल्याबद्दल.
आळश्यांचा राजा
26 Jun 2010 - 2:07 am | धनंजय
छान लेख
26 Jun 2010 - 2:09 pm | विसोबा खेचर
सहमत..
26 Jun 2010 - 11:03 am | ramjya
लेख आवडला