(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
6 Aug 2010 - 9:31 pm

अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद! ;)

हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा
गुबारण्याचा अर्थ कसा कोणा समजावा

कधीतरी पोटाची भाषा मला कळावी
कुणीतरी मज 'अबोल' काका का समजावा?

तुमानीतल्या गोल मितीच्या प्रतलामध्ये
घेराचा सारांश कसा सांगा बसवावा

पीसी बदलले, वेळ बदलली तरी बापडा
एक आयडी डुप्लिकेट मग मी उघडावा

कितीक वेळा अजून जाऊ नाक्यावरती
कधीतरी छळ 'निरखण्यातला' हा थांबावा

उगाच चर्चा मी तेव्हा केली ललनांशी
'भिडला टाका' अखेर हा निष्कर्ष निघावा

पुन्हा देखता अर्धांगी मज रोखुन डोळे
काव्यामधला 'रंगा'चा दंगा थांबावा

-चतुरंग

हास्यकविताविडंबनगझल

प्रतिक्रिया

डॉ.कैलास's picture

6 Aug 2010 - 9:38 pm | डॉ.कैलास

क्या बात है.... मस्तच झाले आहे विडंबन...

कधीतरी पोटाची भाषा मला कळावी
कुणीतरी मज 'अबोल' काका का समजावा?

तुमानीतल्या गोल मितीच्या प्रतलामध्ये
घेराचा सारांश कसा सांगा बसवावा

ह्या दोन द्विपदी अगदी कळस झाला आहे.

डॉ.कैलास

मेघवेडा's picture

6 Aug 2010 - 9:40 pm | मेघवेडा

=)) =))

उच्च विडंबन!

केशवसुमार's picture

6 Aug 2010 - 9:42 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
मस्त विडंबन..चालू दे
(वाचक)केशवसुमार

प्रभो's picture

6 Aug 2010 - 9:44 pm | प्रभो

क ह र !!!

श्रावण मोडक's picture

6 Aug 2010 - 9:45 pm | श्रावण मोडक

शेवटच्या तीन द्विपदींवर येणाऱ्या प्रतिसादांकडे (सर्व 'जिज्ञासूं'नी अनेकवचनाची नोंद घ्यावी) लक्ष ठेवावे लागेल. ;)

लिखाळ's picture

6 Aug 2010 - 9:52 pm | लिखाळ

वा ! मस्तच आहे :)

(थोडे विस्कळीत वाटले ;) )

मूळ कवितेचे नाव 'हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा' असे आहे. आपल्या प्रस्तावनेत शब्दांची स्वप्ने झाली आहेत.

चतुरंग's picture

6 Aug 2010 - 9:56 pm | चतुरंग

आणली आणली पुन्हा स्वप्नातून शब्दात आणली गाडी! ;)

मेघवेडा's picture

6 Aug 2010 - 10:58 pm | मेघवेडा

घ्या आणखी एक उदाहरण. ;)

कसलं वगैरे काही सांगत नाही. इथं ऑलरेडी काऊंटर बसवलेलाच आहे! :D

त्यांना स्वयंसंपादनाची सुविधा आहेच! तुम्हा आम्हा पामरांसाठीच फक्त तो काउंटर आहे. :)

(ती चूक बघितल्यावर फ्रायडियन स्लिप का कायसे शब्द आठवले...)

अडगळ's picture

6 Aug 2010 - 10:38 pm | अडगळ

असेच 'टाके' चुकवून डोळा घालत र्‍हावा,
काव्यकुडीला विडंबनाचा स्वेटर व्हावा.

मराठमोळा's picture

6 Aug 2010 - 10:49 pm | मराठमोळा

जबराट!!!!! :)

मदनबाण's picture

7 Aug 2010 - 10:33 am | मदनबाण

कितीक वेळा अजून जाऊ नाक्यावरती
कधीतरी छळ 'निरखण्यातला' हा थांबावा

झकास !!! :)

उगाच चर्चा मी तेव्हा केली ललनांशी
'भिडला टाका' अखेर हा निष्कर्ष निघावा
खल्लास !!! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2010 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

शिर्षक वाचुन व विडंबकाचे नाव वाचुन उत्साहाने आत शिरलो मात्र निराशा झाली :(

हे म्हणजे 'मेरी पेहली नशीली रात' अशा कथेला घाईघाईने उघडावे आणि आत वॉचमनचे आत्मचरीत्र निघावे तसे झाले.

रंगाशेठ हाय हाय !!