प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 1:45 pm

मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने.

मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच. नुकताच त्यांचा फुलांची आर्जवे हा कवितासंग्रह प्रकाशीत झाला आणि आता त्यांच्या कविताचा अल्बमदेखील बाजारात आला आहे. या अल्बमच्या प्रकाशन सोहळ्याचा इत्यंभुत, सविस्तर आणि सचित्र वृत्तांत मिसळपावचे संपादक बिपिन कार्यकर्ते यांनी त्यांच्या खास शैलीत सोहळ्यानंतर लगेचच दिला होताच.

आंतरजालावर रमणार्‍या प्राजक्ता पटवर्धन यांचे समस्त जालकर्‍यांनी जे कौतुक केले ते तसे अपेक्षितच होते. परंतु या सोहळ्यानंतर प्राजक्ता पटवर्धन यांचे जे कौतुक विविध भाषिक वृत्तपत्रांमधे छापुन आले ते पाहुन कुण्याही जालकर्‍याची छाती अभिमानाने फुलेल यात अजिबात शंका नाही.

आज प्राजक्ता पटवर्धन या अक्षरशः पेज थ्री सेलिब्रिटी झालेल्या आहेत. मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्याबाबत लिहिले आहेच पण अगदी भाषेची दरी लीलया ओलांडुन त्यांच्या कवितांनी एरव्ही एतद्देशीय भाषिक साहित्याकडे उपमर्दानेच पाहणार्‍या इंग्रजी वृत्तपत्रांवर देखील गारुड घातलेले आहे. विविध वृत्तपत्रांनी याविषयाची दखल अशी घेतलेली दिसते:

१. सकाळ ( २० जुलै २०१० )

---------------------------------------------------------------------------------------------------------------
२. पुढारी ( २० जुलै २०१० )

----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. प्रभात ( १९ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
४. लोकसत्ता ( २१ जुलै २०१० )


-------------------------------------------------------------------------------------------------------------------
५. लोकमत ( १९ जुलै २०१० )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
६. केसरी ( २२ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
७. डी एन ए ( इंग्रजी वृत्तपत्र ) ( २२ जुलै २०१० )


या सर्व फोटोंचे संकलन येथेही पाहता येईल
.

संगीतसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजुचे पुनश्च एकवार अभिनंदन.

सहज's picture

27 Jul 2010 - 1:57 pm | सहज

प्राजुतैंचे एक स्वप्न तर फार छान साकार झाले.

सर्व मिपापरिवाराच्या सदिच्छा आहेतच. आता पुढचा प्रकल्प कोणता? :-)

प्रभो's picture

27 Jul 2010 - 7:22 pm | प्रभो

सहजरावांसारखेच म्हणतो.

प्राजुतैंचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील प्रकल्पासाठी शुभेच्छा.

तेसेच प्रसन्नादांचेही आभार ज्यांनी इतकी सगळी कात्रणं जमवुन ती सॅनकरुन आमच्या प्रर्यंत पोहचवली.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jul 2010 - 2:18 pm | llपुण्याचे पेशवेll

प्राजुतैंचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. स्वप्नपूर्तीचा सोहळा अत्युत्तम पार पडला.

सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन.

सहज's picture

27 Jul 2010 - 2:20 pm | सहज

सर्व कात्रणे जमवून इथे चढवल्याबद्दल आणि प्राजुतैच्या कार्यक्रमाची मिडीया पब्लिसिटी करण्याचे काम करण्याबद्दल प्रसन्नदांचेही हार्दिक अभिनंदन.

असेच म्हणतो.

sneharani's picture

27 Jul 2010 - 2:12 pm | sneharani

परत एकदा अभिनंदन..!

सुहास..'s picture

27 Jul 2010 - 2:22 pm | सुहास..

मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! >>>>

खरय !! सहमत !!

पडद्यामागच्या कहाण्या सहसा अपुर्णच रहातात्,अर्थात त्याच आपण कितपत मनावर घ्यायच हाही प्रश्न ज्याच त्याचाच...

एका अधुर्‍या कहाणीचा साक्षीदार

असो..ईडा-पिडा जावो आणी बळीराजाचं राज्य येवो.

सागर's picture

27 Jul 2010 - 2:22 pm | सागर

प्राजुतैंचे अभिनंदन

तुमच्या सुंदर सुंदर कविता वाचतच होतो. त्या कवितांचे गाण्यांच्या स्वरुपातले रुप पाहून आनंद झाला. नक्की ऐकेन ही सीडी :)

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2010 - 2:28 pm | प्रकाश घाटपांडे

प्राजुच्या अल्बमची वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आनंद.
छिद्रान्वेषीपणा मुळे बातमीतील एक चुक (बहुतेक सकाळ) वाचुन आनंद झाला. प्राजुचा प्रवास कवयत्रि ते संगीतकार असा उल्लेख.

घाटावरचे भट's picture

27 Jul 2010 - 2:29 pm | घाटावरचे भट

अभिनंदन!!

बद्दु's picture

27 Jul 2010 - 2:34 pm | बद्दु

पुनश्च एकदा अभिनन्दन !

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jul 2010 - 2:40 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे वा!!!

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2010 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त !

चिंतामणी's picture

27 Jul 2010 - 3:40 pm | चिंतामणी

पुनःश्च अभिनंदन

स्वाती२'s picture

27 Jul 2010 - 3:47 pm | स्वाती२

पुन्हा एकदा अभिनंदन!

रेवती's picture

27 Jul 2010 - 4:29 pm | रेवती

अरे वा! छानच!
प्राजुचे अभिनंदन!
गाणी ऐकण्यास उत्सुक!

ग्लोबल मराठी मधे सुध्दा "प्राजक्ताचा सुगंधित उपहार" प्रकाशित झाले आहे.
जरूर वाचा.

मुक्तसुनीत's picture

27 Jul 2010 - 5:34 pm | मुक्तसुनीत

प्राजु यांचे पुनश्च अभिनंदन.

अतिअवांतर : "प्राजक्ताचा सुगंधित उपहार" ही अत्यंत विनोदी शब्दरचना आहे. उपाहार म्हणजे नाश्ता. उपहार म्हणजे भेटवस्तू. या दोन्हीचा प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधी हाराच्या उपप्रकाराशी (!!) नक्की काय संबंध ! पण शीर्षक वाचून मज्जा आली हे खरे ! ;-)

मीनल's picture

27 Jul 2010 - 5:43 pm | मीनल

उपहार म्हणजे भेटवस्तू. तेच अपेक्षित आहे.
तिच्या पुस्तकाचे नाव आहे आर्जवे= विनंती.
परंतु यातून तिने खरे तर वाचकांना काव्य सुमनांच्या सुगंधाची भेट दिली आहे असे म्हणायचे आहे.

नुसतेच शीर्षक वाचलेत का? की लेख ही वाचलात?
असो! काही का असेना -तूम्हाला शिर्षक वाचूनही मज्जा आली हे उत्तम!

अविनाशकुलकर्णी's picture

27 Jul 2010 - 8:15 pm | अविनाशकुलकर्णी

कार्यक्रम खुप छान झाला..मजा आलि..अभिनंदन..व शुभेछ्या

अंतु बर्वा's picture

27 Jul 2010 - 10:50 pm | अंतु बर्वा

पुनश्च अभिनंदन प्राजुतै....

मी-सौरभ's picture

27 Jul 2010 - 11:46 pm | मी-सौरभ

आम्च्या कडून बी

देवदत्त's picture

29 Jul 2010 - 7:13 am | देवदत्त

हार्दिक अभिनंदन :)

प्राजूचे खूप अभिनंदन....

अप्पा जोगळेकर's picture

29 Jul 2010 - 9:40 am | अप्पा जोगळेकर

आमच्याकडून पण हार्दिक अभिनंदन.