यशोधराचे 'प्रार्थना' हे अप्रतिम छंद्काव्य वाचून आम्हाला काही छंद आठवले नसते तरच नवल. सादर आहे ;)
ठेवतो अपेक्षा
मिळेल दर्शन
जिन्यात लपेन
आज तुझ्या..
एकाएकी तुझे
प्रकटती तात
कैसे बोलतात
अरे चोरा!...
फोकलाया पाठी
काठी बाभळीची
कन्यका तुमची
माझी ताई!...
अवकळा उरे
'सरली' जाणीव
उरली नेणीव
आवर रे...
छंदः परद्वार
चतुरंग
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 7:07 pm | अवलिया
रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचायला उत्सुक. ;)
26 Jul 2010 - 7:08 pm | प्रभो
ठ्यो!!!!!! =)) =)) =))
26 Jul 2010 - 7:10 pm | नंदन
खल्लास विडंबन!
>>> छंदः परद्वार
--- हे तर अजूनच भन्नाट :)
27 Jul 2010 - 12:07 am | मिसळभोक्ता
हेच वाचून फुटलो !
जियो !
26 Jul 2010 - 7:11 pm | श्रावण मोडक
येप्प... जोरदार.
रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचण्याची इच्छा माझीही आहे.
26 Jul 2010 - 7:24 pm | यशोधरा
छंदः परद्वार =))
मान्यवरांची दाद आता खरोखरच मिळाली असे मानते! याचसाठी केला होता अट्टाहास! :P
26 Jul 2010 - 7:30 pm | मेघवेडा
खल्लास!
26 Jul 2010 - 7:34 pm | शुचि
सिक्सर!!
26 Jul 2010 - 7:35 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
अमच्या पेटंटेड विषया मध्ये आपले स्वागत असो..;)
झकास विडंबन..
(वाचक) केशवसुमार..
कन्यका तुमची
माझी ताई!... वरून आम्हाला आमच्या मिपावरच्या पहिल्या रेशमाच्या बाबांनी विडंबनातील
भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
ओळी आठवल्या...
(स्मरणशील)केशवसुमार
26 Jul 2010 - 8:12 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!!
रेवती काय बोलणार बिचारी? पदरी पडलं आणि... अशातली गत. ;)
26 Jul 2010 - 9:24 pm | रेवती
ठेवतो अपेक्षा
मिळेल दर्शन
जिन्यात लपेन
आज तुझ्या..
घरी ये त्यापेक्षा
करिते मर्दन
पाठीस लेपन
आज तुझ्या...
छंद: मुक्तद्वार
26 Jul 2010 - 9:25 pm | प्रभो
त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन करा.. ;)
26 Jul 2010 - 9:28 pm | गणपा
ओता तुम्ही अजुन तेल.
बाकी रवतीतैंचा प्रतिसाद आवडला =))
26 Jul 2010 - 9:27 pm | यशोधरा
काही खरं नाही रंगाण्णांच! =)) =))
26 Jul 2010 - 11:29 pm | पिवळा डांबिस
ठेवतो अपेक्षा
होईल रंजन
करीता मी फोन
आज तुला
एकएकी तुझे
सुजे कानफाट
चालताच हात
बायकोचे
सत्वरी धाडीतो
छडी ही चिंचेची
बाईल तुमची
माझी ताई
सरले तारुण्य
उरले कारूण्य
प्रार्थनेचे पुण्य
घेई रंगा
छंदः महाद्वाड
:)
26 Jul 2010 - 11:35 pm | प्रभो
>>एकएकी तुझे
सुजे कानफाट
चालताच हात
बायकोचे
ययुत्सुराव बघताय ना??? ;)
26 Jul 2010 - 11:58 pm | श्रावण मोडक
हेहेहेहे... तुम्ही आणखी कळस गाठलात.
27 Jul 2010 - 12:03 am | छोटा डॉन
एक से एक आहेत सगळे.
परद्वार काय आणि मुक्तद्वार काय, महाद्वाड तर कहर ...
लगे रहो !!!
27 Jul 2010 - 12:19 am | नंदन
ठ्ठो! =)) =))
27 Jul 2010 - 12:24 am | चतुरंग
कसली अपेक्षा?
कसले रंजन?
कशाला तो फोन
उगा करा
का बरे करावी
आमची उपेक्षा
कानफाटी दीक्षा
कोणी दिली?
कशास धाडिता
चिंचेच्या फोकास
बाईल टिपेस
ओरडते!
सरले ते मोह
संसाराची हाय
धरतो मी पाय
डांबीसाचे!
छंद : शरणद्वार
27 Jul 2010 - 1:01 am | केशवसुमार
रंगाशेठ,
काय हे लगेच शरणव्दार... आहो त्याच चिंचेच्या फोकानं डांबिसाला इंगा दाखवायचा नां..
(माचिस)केशवसुमार
शेवटी काय 'सारी दुनिया एक तरफ आणि जोरू का भाई एक तरफ' म्हणतात हेच खरं
(जोरुका गुलाम)केशवसुमार
27 Jul 2010 - 1:33 am | छोटा डॉन
जबर्या, एक से एक ...
ही आमची विनंती
---------------------------------------------
आधार जीवाला
इथे मिपावर
दंगा धाग्यावर
रोजचाच ..
प्रार्थनेच्या नादा
योजले दर्शन
जाहले मर्दन
दुर्दैवाने ..
विडंबने इथे
एकाहुनी एक
धमाल कडक
प्रतिसाद ...
रोजच्या कामाचा
गंडला हिशेब
बघतो साहेब
चष्म्यातुनी ...
करितो विनंती
व्हावे हे मतैक्य
हसणे अशक्य
हापिसात ...
छंद : कामाचा'भार'
-------------------------------------------
27 Jul 2010 - 12:36 pm | बिपिन कार्यकर्ते
डान्राव... त्यापेक्षा 'कामभार' कसे आहे?
27 Jul 2010 - 11:40 pm | मी-सौरभ
>>'कामभार'
ठो$$$$
27 Jul 2010 - 12:42 am | Nile
=)) =)) =))
लै भारी!
27 Jul 2010 - 2:30 am | केशवसुमार
ठेवतो अपेक्षा
मिळावे दर्शन
घरात मर्दन
आज तुझे..
एक एक तुझे
प्रकटती धंदे
कलंत्र हे वदे
अरे चोरा!...
ठोकण्या पाठवी
चिंचेच्या फोकास
पिवळा डांबिस
भाऊ राया!...
अवकळा उरे
सरली नेणीव
'उरली' जाणीव
संपला रे...
छंदः बंदव्दार
26 Jul 2010 - 11:34 pm | विनायक प्रभू
छांदिष्टांनो
खीखीखी
27 Jul 2010 - 12:02 am | अडगळ
मौजेची अपेक्षा,
घेउनी मंजन ,
एक नव्हे दोन ,
सारे जमा
कानाखाली निघे,
नवी पायवाट,
उकळ्यांची लाट,
श्रोते चिंब.
चुकले लेकरु ,
पोटाशी धरावे,
जनांसी मारावे,
फाट्यावर.
बाभळीचे विष,
पिवु घटाघटा,
जिन्याचा तो पत्ता,
व्यनि करा.
छंद : परसद्वार
27 Jul 2010 - 1:53 am | चतुरंग
अडगळ राव
करु नका मौज
येते मग फौज
अंगावरी!
नको आडवाट
भलताच जाच
हमरस्ता तोच
असे बरा
सकाळचा चुके
रातचा माघारी
नको शिरजोरी
नाक्यावर
कशापायी घेता
विष बाभळीचे
गुज अंतरीचे
व्यनिमनी!
27 Jul 2010 - 2:18 am | अडगळ
परपीडे मन,
दु:खी झाले बहु
म्हणोनिया बाहु,
पुढे केले.
विषाच्या मिषाने,
लाचावली जिव्हा,
मोक्ष देता केव्हा,
चतुरंगा ?
जिन्याची ती वाट,
मुक्तीचे ते पीठ,
खोलीत वैंकुठ,
चतुर्भुज.
दीनांच्या दयाळा,
पुरवावा चाळा,
तोषावे या बाळा,
अडगळा.
27 Jul 2010 - 12:51 am | राजेश घासकडवी
चाललीये... एक से बढकर एक! अजून येऊ द्यात.
27 Jul 2010 - 2:11 am | घाटावरचे भट
ये ब्बात है!!!
शेवटी म्हटले आहेच ना 'करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे'...
27 Jul 2010 - 7:46 am | स्पंदना
स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक सण अस्तो ना तो हाय का आज?
आता तो आपला न्हव पण चालु द्या..कोपरापासुन वगैरे नमस्कार पुरायचे न्हाइती हिथ म्हणुन आमचा दंडवत कबुल करा.
27 Jul 2010 - 8:30 am | प्रकाश घाटपांडे
ल्वॉक लईच हास्वुन र्हायली ब्वॉ! प्वॉट दुखायची बारी!
27 Jul 2010 - 8:44 am | मुक्तसुनीत
वाय झेड प्रकार !! अगा बाबौ !
27 Jul 2010 - 11:02 am | अवलिया
जबरा चालु आहे.. लगे रहो
27 Jul 2010 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
27 Jul 2010 - 12:09 pm | दिपक
भन्नाट ईडंबण आणि प्रतिक्रिया... :-)
27 Jul 2010 - 12:54 pm | मितभाषी
तीच नारी ।
तोच पलंग ।।
पचांगही जिर्ण ।
मुहुर्तही तोच ।।
ऐसे समयी
चेकाळला रंगा नि ।।
घातला दंगा ।
वावगे ना मज।।
दिसे काही ।। ;)
------------------------
रेवतीतै कॄपया ह. घे.
27 Jul 2010 - 12:30 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
बर्याच दिवसांनी असा दंगा झाला.
27 Jul 2010 - 12:57 pm | श्रावण मोडक
लगे रहो. सगळेच 'सर्किट' (ते नव्हे, मुन्नाभाईवालेच) आहेत.
स्वगत : मुन्नाभाई हा आयडी अद्याप कुणीच घेतलेला दिसत नाही.
27 Jul 2010 - 5:33 pm | क्रान्ति
धन्य ती प्रार्थना
धन्य विडंबन
साष्टांग वंदन
रंगाकाका
एकाहून एक
प्रतिसाद भारी
मुक्त-बंद द्वारी
किती छंद
वेड लागेल रे
किती हासवावे
आता वाचवावे
पांडूरंगा!
27 Jul 2010 - 6:09 pm | बहुगुणी
झाली ना उपेक्षा?
मिळाले दर्शन?
हिशेब घेईन
आज तुझा!
सांग कितीकांचे
प्रकटले तात
झाली रूजवात
अरे चोरा!
शेकलेल्या पाठी
बाभळीची काठी
त्यांचे दादा-भाई
माझे नवरोजी!...
अवकळा झाली
उरली ऊणीव
आता तरी मेल्या
सावर रे...
छंदः घरदार
27 Jul 2010 - 6:36 pm | चतुरंग
आणि इतक्या मोठ्या संखेने मिपाकर त्यात सहभागी झाले हे पाहून डोळे पाणावले! ;)
सर्व सहभागी मिपाकरांचे आभार मानून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायच्या नाहीयेत! ;) पण तरिही म्हणावेसे वाटते ...
नको ते दर्शन
नको ती उपेक्षा
कशाला अपेक्षा
मोक्षाची ती!
एकामागे एक
प्रकटले सात
ओव्या टाकतात
शीघ्रकवी!
शेकल्या जीवाला
पडतो आराम
वाचना विश्राम
आता नको!
शब्दकळा भारी
ओव्यांचा सुखांत
सरली हो भ्रांत
म्हणे रंगा!
छंद : मिपाद्वार
27 Jul 2010 - 6:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नको ते लिखाण
अतिच बाष्कळ
कशाला उपेक्षा
माध्यमाची
एकामागे एक
ठाकले की उभे
'जुळारी' मिपाचे
सिद्धहस्त
तापल्या हवेला
हवी होती शांती
आता ही मिळाली
जय यशो
'रंगा'चा आरंभ
अडगळ डॉन्या
बहुगुणी केसु
पिडां भारी
छंद - भाराभार
27 Jul 2010 - 9:43 pm | छोटा डॉन
कवितेची 'वृत्ती' जरी चांगली असली तर 'वृत्ता'त मार खाल्ला हो ऽऽऽऽ
वृत्ताला पार फाट्यावर मारले आहे की ;)
स्वगत : आयला हा नियम माहित नव्हता, नाहीतर ढीग लावला असता की विडंबनाचा ;)
27 Jul 2010 - 9:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात.
बादवे, 'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार!
आणि हो, तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
27 Jul 2010 - 10:04 pm | छोटा डॉन
आमच्या वृत्तीचे एक सोडा ( तसे म्हणले तर आमच्या बाबतीत सगळेच सोडा )
असो.
नुसती अक्षरे मोजुन कुठला 'छंद' पुर्ण होत नाही.
अजुन बरेच काही असते, असो.
मला कळालेला देवद्वार छंद :
१. ४ ओळींची एक रचना
२. पहिल्या ३ ओळीत प्रत्येकी ६ अक्षरे
३. शेवटची ओळ ४ अक्षरांची
४. दुसर्या व तिसर्या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे.
अवांतर : मात्रांची माहिती नाही, स्वारी !!!
हे पहा ...
http://www.misalpav.com/node/4503
- ( छंदबद्ध ) डॉनोपंत
नव्हे, तो आमचा आक्षेपच नव्हे.
आमचा आग्रह फक्त काव्याची साधनशुचिता ( म्हणजे काय ते देवाला माहित ) पाळणे हा होय.
- ( साधनशुचितेच्या मोहातला ) डॉन्या गडकरी
१००% लिहणार आहे.
बाभळी धरणाचा प्रश्न सुटला आणि त्यावर मी एक लेख लिहला की पुढचा लेख हाच ...
- ( आण्णा ) डॉन्या नायडु
27 Jul 2010 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
४. दुसर्या व तिसर्या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे.
डॉनोपंत, शब्द का अक्षरं हे नीट पहा आणि मग छंदफंद करा हो!
27 Jul 2010 - 8:42 pm | शाहरुख
मजा आला !
27 Jul 2010 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त मजा आली......!
-दिलीप बिरुटे
28 Jul 2010 - 10:31 am | llपुण्याचे पेशवेll
मजा आली. मज़ा आला आणि मज़े घेतले या कवितांचे.
28 Jul 2010 - 1:44 pm | वाहीदा
विडंबन अगदी.. एक से बढकर एक !
~ वाहीदा
24 Sep 2011 - 9:23 pm | अर्धवट
काय जबरदस्त छंदावलेत मानसं..
मुद्दाम वरती काढतोय हा धागा..
24 Sep 2011 - 11:30 pm | सूड
अरे ...कविता, प्रतिसाद सगळंच एकसोएक !!
धागावर काढल्याबद्दल आभार हो, अर्धवट.
28 Jan 2012 - 10:38 pm | जाई.
वाचूनिया मस्त
विडंबन भारी
हहपुवा झाली
आज पुन्हा
साद प्रतिसाद
एकाहून एक
बहरे प्रतिभा
विडंबनी
हाती रंग्गांण्याच्या
पडे कच्चा माल
मिळे हे झकास
काव्यरत्न