Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Mon, 07/26/2010 - 19:05
यशोधराचे 'प्रार्थना' हे अप्रतिम छंद्काव्य वाचून आम्हाला काही छंद आठवले नसते तरच नवल. सादर आहे ;) ठेवतो अपेक्षा मिळेल दर्शन जिन्यात लपेन आज तुझ्या.. एकाएकी तुझे प्रकटती तात कैसे बोलतात अरे चोरा!... फोकलाया पाठी काठी बाभळीची कन्यका तुमची माझी ताई!... अवकळा उरे 'सरली' जाणीव उरली नेणीव आवर रे... छंदः परद्वार चतुरंग

Submitted by अवलिया on Mon, 07/26/2010 - 19:07

Permalink

यावर

रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचायला उत्सुक. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 07/26/2010 - 19:08

Permalink

ठ्यो!!!!!! =)) =)) =))

ठ्यो!!!!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 07/26/2010 - 19:10

Permalink

=))

खल्लास विडंबन! >>> छंदः परद्वार --- हे तर अजूनच भन्नाट :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Tue, 07/27/2010 - 00:07

In reply to =)) by नंदन

Permalink

फुटलो !

हेच वाचून फुटलो ! जियो !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 07/26/2010 - 19:11

Permalink

येप्प

येप्प... जोरदार. रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचण्याची इच्छा माझीही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 07/26/2010 - 19:24

Permalink

छंदः परद्वार =)) मान्यवरांची

छंदः परद्वार =)) मान्यवरांची दाद आता खरोखरच मिळाली असे मानते! याचसाठी केला होता अट्टाहास! :P
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 07/26/2010 - 19:30

Permalink

खल्लास!

खल्लास!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 07/26/2010 - 19:34

Permalink

सिक्सर!!

सिक्सर!!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Mon, 07/26/2010 - 19:35

Permalink

हा हा हा..

रंगाशेठ, अमच्या पेटंटेड विषया मध्ये आपले स्वागत असो..;) झकास विडंबन.. (वाचक) केशवसुमार.. कन्यका तुमची माझी ताई!... वरून आम्हाला आमच्या मिपावरच्या पहिल्या रेशमाच्या बाबांनी विडंबनातील भीड नाही केली आल्यागेल्याची मागितली माफी मी त्या मेल्याची म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! ओळी आठवल्या... (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 07/26/2010 - 20:12

Permalink

हाहाहा!!! रेवती काय बोलणार

हाहाहा!!! रेवती काय बोलणार बिचारी? पदरी पडलं आणि... अशातली गत. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 07/26/2010 - 21:24

Permalink

असं आहे काय? आँ?

ठेवतो अपेक्षा मिळेल दर्शन जिन्यात लपेन आज तुझ्या.. घरी ये त्यापेक्षा करिते मर्दन पाठीस लेपन आज तुझ्या... छंद: मुक्तद्वार
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 07/26/2010 - 21:25

In reply to असं आहे काय? आँ? by रेवती

Permalink

त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन

त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन करा.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 07/26/2010 - 21:28

In reply to त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन by प्रभो

Permalink

ओता तुम्ही अजुन तेल. बाकी

ओता तुम्ही अजुन तेल. बाकी रवतीतैंचा प्रतिसाद आवडला =))
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 07/26/2010 - 21:27

In reply to असं आहे काय? आँ? by रेवती

Permalink

काही खरं नाही रंगाण्णांच! =))

काही खरं नाही रंगाण्णांच! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 07/26/2010 - 23:29

Permalink

म्येलं आता हे!!!:)

ठेवतो अपेक्षा होईल रंजन करीता मी फोन आज तुला एकएकी तुझे सुजे कानफाट चालताच हात बायकोचे सत्वरी धाडीतो छडी ही चिंचेची बाईल तुमची माझी ताई सरले तारुण्य उरले कारूण्य प्रार्थनेचे पुण्य घेई रंगा छंदः महाद्वाड :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 07/26/2010 - 23:35

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

>>एकएकी तुझे सुजे

>>एकएकी तुझे सुजे कानफाट चालताच हात बायकोचे ययुत्सुराव बघताय ना??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 07/26/2010 - 23:58

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

हेहेहेहे

हेहेहेहे... तुम्ही आणखी कळस गाठलात.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 07/27/2010 - 00:03

In reply to हेहेहेहे by श्रावण मोडक

Permalink

सहमत ...

एक से एक आहेत सगळे. परद्वार काय आणि मुक्तद्वार काय, महाद्वाड तर कहर ... लगे रहो !!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 07/27/2010 - 00:19

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

अगागागा

छंदः महाद्वाड :)
ठ्ठो! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 07/27/2010 - 00:24

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

कसली अपेक्षा?कसले

कसली अपेक्षा? कसले रंजन? कशाला तो फोन उगा करा का बरे करावी आमची उपेक्षा कानफाटी दीक्षा कोणी दिली? कशास धाडिता चिंचेच्या फोकास बाईल टिपेस ओरडते! सरले ते मोह संसाराची हाय धरतो मी पाय डांबीसाचे! छंद : शरणद्वार
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 07/27/2010 - 01:01

In reply to कसली अपेक्षा?कसले by चतुरंग

Permalink

छ्या..

रंगाशेठ, काय हे लगेच शरणव्दार... आहो त्याच चिंचेच्या फोकानं डांबिसाला इंगा दाखवायचा नां.. (माचिस)केशवसुमार शेवटी काय 'सारी दुनिया एक तरफ आणि जोरू का भाई एक तरफ' म्हणतात हेच खरं (जोरुका गुलाम)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 07/27/2010 - 01:33

In reply to कसली अपेक्षा?कसले by चतुरंग

Permalink

हाण्ण तिच्यायला ...

जबर्‍या, एक से एक ... ही आमची विनंती --------------------------------------------- आधार जीवाला इथे मिपावर दंगा धाग्यावर रोजचाच .. प्रार्थनेच्या नादा योजले दर्शन जाहले मर्दन दुर्दैवाने .. विडंबने इथे एकाहुनी एक धमाल कडक प्रतिसाद ... रोजच्या कामाचा गंडला हिशेब बघतो साहेब चष्म्यातुनी ... करितो विनंती व्हावे हे मतैक्य हसणे अशक्य हापिसात ... छंद : कामाचा'भार' -------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 07/27/2010 - 12:36

In reply to हाण्ण तिच्यायला ... by छोटा डॉन

Permalink

कामाचा'भार'

डान्राव... त्यापेक्षा 'कामभार' कसे आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 07/27/2010 - 23:40

In reply to कामाचा'भार' by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हे हे हे

>>'कामभार' ठो$$$$
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 07/27/2010 - 00:42

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

=)) =)) =)) लै भारी!

=)) =)) =)) लै भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 07/27/2010 - 02:30

In reply to म्येलं आता हे!!!:) by पिवळा डांबिस

Permalink

(प्रार्थना)-२

ठेवतो अपेक्षा मिळावे दर्शन घरात मर्दन आज तुझे.. एक एक तुझे प्रकटती धंदे कलंत्र हे वदे अरे चोरा!... ठोकण्या पाठवी चिंचेच्या फोकास पिवळा डांबिस भाऊ राया!... अवकळा उरे सरली नेणीव 'उरली' जाणीव संपला रे... छंदः बंदव्दार
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 07/26/2010 - 23:34

Permalink

अरे

छांदिष्टांनो खीखीखी
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Tue, 07/27/2010 - 00:02

Permalink

मांडवली

मौजेची अपेक्षा, घेउनी मंजन , एक नव्हे दोन , सारे जमा कानाखाली निघे, नवी पायवाट, उकळ्यांची लाट, श्रोते चिंब. चुकले लेकरु , पोटाशी धरावे, जनांसी मारावे, फाट्यावर. बाभळीचे विष, पिवु घटाघटा, जिन्याचा तो पत्ता, व्यनि करा. छंद : परसद्वार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 07/27/2010 - 01:53

In reply to मांडवली by अडगळ

Permalink

अडगळ राव करु नका मौज येते मग

अडगळ राव करु नका मौज येते मग फौज अंगावरी! नको आडवाट भलताच जाच हमरस्ता तोच असे बरा सकाळचा चुके रातचा माघारी नको शिरजोरी नाक्यावर कशापायी घेता विष बाभळीचे गुज अंतरीचे व्यनिमनी!
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Tue, 07/27/2010 - 02:18

In reply to अडगळ राव करु नका मौज येते मग by चतुरंग

Permalink

परपीडे मन,

परपीडे मन, दु:खी झाले बहु म्हणोनिया बाहु, पुढे केले. विषाच्या मिषाने, लाचावली जिव्हा, मोक्ष देता केव्हा, चतुरंगा ? जिन्याची ती वाट, मुक्तीचे ते पीठ, खोलीत वैंकुठ, चतुर्भुज. दीनांच्या दयाळा, पुरवावा चाळा, तोषावे या बाळा, अडगळा.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 07/27/2010 - 00:51

Permalink

धमाल...

चाललीये... एक से बढकर एक! अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Tue, 07/27/2010 - 02:11

Permalink

ये ब्बात है!!! शेवटी म्हटले

ये ब्बात है!!! शेवटी म्हटले आहेच ना 'करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे'...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 07/27/2010 - 07:46

Permalink

स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक

स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक सण अस्तो ना तो हाय का आज? आता तो आपला न्हव पण चालु द्या..कोपरापासुन वगैरे नमस्कार पुरायचे न्हाइती हिथ म्हणुन आमचा दंडवत कबुल करा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 07/27/2010 - 08:30

Permalink

हॅहॅहॅ

ल्वॉक लईच हास्वुन र्‍हायली ब्वॉ! प्वॉट दुखायची बारी!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 07/27/2010 - 08:44

Permalink

वाय झेड

वाय झेड प्रकार !! अगा बाबौ !
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 07/27/2010 - 11:02

Permalink

जबरा चालु आहे.. लगे रहो

जबरा चालु आहे.. लगे रहो
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 07/27/2010 - 11:53

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 07/27/2010 - 12:09

Permalink

भन्नाट

भन्नाट ईडंबण आणि प्रतिक्रिया... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Tue, 07/27/2010 - 12:54

Permalink

तीच नारी ।तोच पलंग

तीच नारी । तोच पलंग ।। पचांगही जिर्ण । मुहुर्तही तोच ।। ऐसे समयी चेकाळला रंगा नि ।। घातला दंगा । वावगे ना मज।। दिसे काही ।। ;) ------------------------ रेवतीतै कॄपया ह. घे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 07/27/2010 - 12:30

Permalink

खण्ण!!!!

=)) =)) =)) बर्‍याच दिवसांनी असा दंगा झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 07/27/2010 - 12:57

Permalink

लगे रहो

लगे रहो. सगळेच 'सर्किट' (ते नव्हे, मुन्नाभाईवालेच) आहेत. स्वगत : मुन्नाभाई हा आयडी अद्याप कुणीच घेतलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 07/27/2010 - 17:33

Permalink

धन्य धन्य!

धन्य ती प्रार्थना धन्य विडंबन साष्टांग वंदन रंगाकाका एकाहून एक प्रतिसाद भारी मुक्त-बंद द्वारी किती छंद वेड लागेल रे किती हासवावे आता वाचवावे पांडूरंगा!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 07/27/2010 - 18:09

Permalink

'घरचा आहेर' अपुरा राहिला होता असं वाट्लं...हा घ्या

झाली ना उपेक्षा? मिळाले दर्शन? हिशेब घेईन आज तुझा! सांग कितीकांचे प्रकटले तात झाली रूजवात अरे चोरा! शेकलेल्या पाठी बाभळीची काठी त्यांचे दादा-भाई माझे नवरोजी!... अवकळा झाली उरली ऊणीव आता तरी मेल्या सावर रे... छंदः घरदार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 07/27/2010 - 18:36

Permalink

यशोधरेने प्रार्थना काय म्हटली

आणि इतक्या मोठ्या संखेने मिपाकर त्यात सहभागी झाले हे पाहून डोळे पाणावले! ;) सर्व सहभागी मिपाकरांचे आभार मानून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायच्या नाहीयेत! ;) पण तरिही म्हणावेसे वाटते ... नको ते दर्शन नको ती उपेक्षा कशाला अपेक्षा मोक्षाची ती! एकामागे एक प्रकटले सात ओव्या टाकतात शीघ्रकवी! शेकल्या जीवाला पडतो आराम वाचना विश्राम आता नको! शब्दकळा भारी ओव्यांचा सुखांत सरली हो भ्रांत म्हणे रंगा! छंद : मिपाद्वार
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 07/27/2010 - 18:49

Permalink

नको ते लिखाण अतिच

नको ते लिखाण अतिच बाष्कळ कशाला उपेक्षा माध्यमाची एकामागे एक ठाकले की उभे 'जुळारी' मिपाचे सिद्धहस्त तापल्या हवेला हवी होती शांती आता ही मिळाली जय यशो 'रंगा'चा आरंभ अडगळ डॉन्या बहुगुणी केसु पिडां भारी छंद - भाराभार
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 07/27/2010 - 21:43

In reply to नको ते लिखाण अतिच by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मार खाल्ला ...

कवितेची 'वृत्ती' जरी चांगली असली तर 'वृत्ता'त मार खाल्ला हो ऽऽऽऽ वृत्ताला पार फाट्यावर मारले आहे की ;) स्वगत : आयला हा नियम माहित नव्हता, नाहीतर ढीग लावला असता की विडंबनाचा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 07/27/2010 - 21:50

In reply to मार खाल्ला ... by छोटा डॉन

Permalink

नवख्या लोकांना माहित नसल्यास ह. घ्या ही नम्र विनंती.

डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात. बादवे, 'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार! आणि हो, तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 07/27/2010 - 22:04

In reply to नवख्या लोकांना माहित नसल्यास ह. घ्या ही नम्र विनंती. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

जळजळ पोहचली ...

डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात.
आमच्या वृत्तीचे एक सोडा ( तसे म्हणले तर आमच्या बाबतीत सगळेच सोडा ) असो. नुसती अक्षरे मोजुन कुठला 'छंद' पुर्ण होत नाही. अजुन बरेच काही असते, असो. मला कळालेला देवद्वार छंद : १. ४ ओळींची एक रचना २. पहिल्या ३ ओळीत प्रत्येकी ६ अक्षरे ३. शेवटची ओळ ४ अक्षरांची ४. दुसर्‍या व तिसर्‍या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे. अवांतर : मात्रांची माहिती नाही, स्वारी !!! हे पहा ... http://www.misalpav.com/node/4503 - ( छंदबद्ध ) डॉनोपंत
'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार!
नव्हे, तो आमचा आक्षेपच नव्हे. आमचा आग्रह फक्त काव्याची साधनशुचिता ( म्हणजे काय ते देवाला माहित ) पाळणे हा होय. - ( साधनशुचितेच्या मोहातला ) डॉन्या गडकरी
तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
१००% लिहणार आहे. बाभळी धरणाचा प्रश्न सुटला आणि त्यावर मी एक लेख लिहला की पुढचा लेख हाच ... - ( आण्णा ) डॉन्या नायडु
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 07/27/2010 - 22:31

In reply to जळजळ पोहचली ... by छोटा डॉन

Permalink

छंदफंद

४. दुसर्‍या व तिसर्‍या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे. डॉनोपंत, शब्द का अक्षरं हे नीट पहा आणि मग छंदफंद करा हो!
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Tue, 07/27/2010 - 20:42

Permalink

मजा आला !

मजा आला !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 11641 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com