या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545
http://misalpav.com/node/1624 पासुन पुढे
यावेळेसची डिस्क्लेमर : या लेखातली पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहेत्. ही पात्रे तुम्हाला भविष्यात कधीतरी भेटली आणि लेखात् लिहिल्याप्रमाणे वागली तर तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे. उगीचच लेखकाची निरीक्शण शक्ती जब्बरदस्त् आहे अशी दूषणे देऊ नयेत्
\-------------------------------------------------------------------------------------------------\
वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु उत्साहाने पुढे सरसावल्या. धमु चे लग्न ठरले याचा त्याना आनन्द् झाला होता त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्या असंख्य आया बहीणीना झाला होता. निदान त्यामुळे का होईना आळीत एक कार्य होणार होते. मनस्वी ने धमु ची लग्न पत्रिका लिहायला घेतली.
आमचे येथे श्री कृपे करुन आमचे सुसदस्य.......
अगं अगोदर गणपतीचे नाव लिही. त्या नन्तर लिही कार्य सिद्धीस नेण्यास आई जगदम्बा समर्थ आहे.कोलबेर् काकानी त्यांच्या खास आवाजात् आदेश् दिला.
आणि जेजुरीचा खन्डोबा राहीला की. मनस्वी ने प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार एकेक् देवतेचा पत्रीकेत् समावेश् केला. अशा जवळ जवळ सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला तिला आता यापुढे पत्रिकेत् इतर मजकूर् कोठे लिहायचा हा प्रश्न पडला.
माझे ऐक् आता.ही सगळी नावे राहु देत सुवर्णमयी तिला समजावत म्हणाली "आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरात. सर्व देवं नमस्कारम केशवम् प्रति गछ्चती.या न्यायाने फ़क्त् केशवाय नम: एवढेच् लिही.
मी तेच् म्हणत होतो. सगळ्या कवितांचा शेवट विडंबनानेच् होतो म्हणुन मी विडंबनेच् करतो डायरेक्ट केशवसुमार तीला दुजोरा देत म्हणाला.फ़क्त् ते शुद्ध प्रमाण मराठीत लिहा नाहीतर निलकांत ऒब्जेक्शन् घेईल्.
हा अन् खाली लिहा बरका की ...
आमच्या धमु काकाच्या लग्नाला यायच्य बल का.
आपले छोटी टिंगी , छत्रपती , विवेकग , विवेकवी, ध्रुव ,वेदश्री आणि छोटी ताई
---------------------------------------------------------------------------------------------------------
अरे तु पत्रिका दाखवुन घे ना दोघांच्या. धोंडोपंत् चांगल्या बघतात् पत्रिका. बघा हो धोंडोपंत् पत्रिका पिवळा डांबीस धमु चा पडलेला चेहेरा उचलुन् म्हणाले.
अहो जरा प्रोब्लेम आहे एक नाड् येतेय धमु एकदम् सिरीयस् होत म्हणाला.
"हे बघ् आपण् मराठीत बोलतो म्हणुन हा प्रॊब्लेम येतो. तू साहेबाची भाषा बोल त्यामुळे हे प्रोब्लेम येत् नाहीत" शीतल.
म्हणजे? मला नाही कळाले?धमाल मुलगा बुचकळ्यात पडला. इंग्रजी बोलल्याने हा प्रॊब्लेम कसा सुटेल?
"हे बघ्; तु प्रथम् एक नाड येतेय हे वाक्य साहेबाच्या भाषेत सांग बरे". शीतल." आपल्याला येणारी समस्या योग्य शब्दात मांडावी मग ती सुटु शकते"
"माय लेस् इज् वन"बरोबर?धमाल ने शीतल कडे पाहीले.
बरोबर. व्याकरण द्रुष्ट्या वाक्य बरोबर् आहे.यात वन हे विषेशण आहे ते कर्मा बद्दल विषेश माहीती सांगते. शीतल.
"अग तू काय् त्याचा क्लास घेते आहेस् की काय".पिवळा डांबीस काका रागाने लालपिवळे खरे तर लाल झाले होते "तो विचारतोय काय् अन् तू सांगतेस् काय?"
"पत्रिका नाड सगळे झूट् आहे" झकासराव् 'दिण्हले गहिल्ले तत्थ मरहट्टे' अस जप करता करता मधुनच् ओरडले. "तू तसला काही विचार करु नकोस. सरळ लग्न कर. नाड जुळण्यापेक्शा मने जुळणे महत्वाचे".
-------------------------------------------------------------------------------------------------------- .
काय रे धम्या ने एकुणच् कसे काय जमवले असेल रे पोरगी पटवायचे ? मदनबाण ला ही एकच शंका राहुन राहुन सतावत होती.
मला सुद्धा तेच वाट्ते? भोचक ने दुजोरा दिला.
धमाल मुलाला आपण् विचारु का ते.
अरे मी पण् त्याला तेच् विचारले.
"मग काय् म्हणाला तो" भोचक त्याचा मुदा जोरकस पणे मांडत होता "हे बरोबर नाय ज्येष्ठानी नवोदीताना आपल्या अनुभवाचा फ़ायदा करुन दिला नाही तर काय् उपयोग त्या अनुभवाचा"
"मी पण् त्याला तेच् सांगितले तर् म्हणतो कसा तुला रे काय करायचे आहे ते टिंग्या. छोटी टिंगी असे नाव असले म्हणुन काय् झाले आमाला काही विचारायचा हक्क नाही काय? मी प्राजुचे लोणचे चांगले आहे य अर्थाने लाळ् लाळ लाल लाळ म्हणालो तर् ते पेठकर काका मला छोटी टिंगी नाव सार्थ केलेस् असे म्हणाले." छोटी टिंगी डोळे पुसत म्हणाला.
"मी धमु ला म्हणालो सुद्धा की तु लग्न कसे काय जमवलेस् हे मला सांगितले तर मी "वा वी प्र" अर्थात् वारंवार विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर् फ़ोटोसहीत ते पोष्ट् करेन्".आकडीने कैर्या पाडणारा मदनबाण म्हणाला.
---------------------------------------------------------------------------------------------------------
धमाल मुलाच्या लग्नामुळे इव्हेन्ट् मॆनेजमेन्ट् ची एक आयती सन्धी उपलब्ध झाली हे ओळखुन भडकमकर् क्लासेस् ने त्यांच्या इव्हेन्ट् मॆनेजमेन्ट् कोर्सच्या जहीरातीत "कोर्सेस प्रत्यक्श प्रॆक्टिकल सहीत" अशी एक् नवीन ओळ वाढवली.त्यानी धमाल मुलाला तू अजिबात काळजी करु नकोस् तुझ्या लग्नात माझी ५० मुले असतील म्हणुन आश्वास्न दिले.
"५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता?? चि. धमाल ने निरागस प्रश्न विचारला.
"तुझ्या लग्नाचा इव्हेन्ट मॆनेज करायला माझ्या क्लास मधले विद्यार्थी म्हणतोय मी" धमाल मुलाचा निरागसपणा भडकमकर् सरांच्या लक्षात् आला."हवे तर् तुझ्या लग्नाचा पोषाख सुद्धा मॆनेज करुयात आपण एखाद्या कपड्याच्या नव्या शोरूम मधुन स्पॊन्सर करुन. नाहीतरी ती शेरवानी तू लग्नानन्तर् पुन्हा कधी वापरणार नाहीस"
"ओ काका असे काय करताय शेरवानी नाही चालणार" मनस्वी त्यांच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त् करत म्हणाली." नवरदेव कसा राजासारखा दिसायला हवा त्याला छान सुरुवार, आंगरखा अन् रुबाबदार मावळी पगडी असा पोषाख करायला लावा त्या दिवशी..कसा रुबाबदार नवरा मुलगा दिसेल.नवरी त्याच्याकडे पाहुन हरखुन जाईल छान मुरका मारुन लाजेल पाहिल्यावर."
"आणि उलटे झाले तर?" धमाल मुलाच्या डोक्यात शाळेत केलेल्या ऐतिहासीक नाटकातला मावळा भालदार चोपदार आठवला. कमरेला तलवार,अंगरखा, सुरवार, मोजडी, आणि डोक्यावर् रुबाबदार मावळी पगडी घातलेला नवरदेव तोंडात बोट घालुन लाजतोय हे दृष्य त्याला दिसायला लागले.
"ए नको ऐतिहासीक नको.मला शेरवानी चालेल" धमाल मुलगा.
"अरे पण् तुला ती पुन्हा नन्तर् वापरता येणार नाही. ऒफ़िसात काय शेरवानी घलुन जाणार आहेस का? "इती मनस्वी. "कपडे कसे कुठेही रोज वापरता यावेत असे कर".
"कुठेही,कसेही आणि रोज वापरता यावेत असे कपडे? म्हणजे मी काय फ़क्त बनियन् चड्डी घेउ असे म्हणायचे आहे का तुला"धमाल मुलगा मनस्वीच्या सूचनानी वैतागुन गेला होता.
"तुला त्या चड्डी च्या चेन ला कुलुप घालुन ठेवावे लागेल. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे."
----------------------------------------------------------------------------------------------------------
"ए आपण् धमु च्या लग्नात भेण्ड्या खेळुया ग" प्राजु उत्साहाने म्हणाली
"प्लाजु ताई...आदनावांच्या नाहीतर नावांच्या भेंड्या चालतील? छोटी टिंगी म्हणाला" ते केवद शोप्पं हाहे. कोण्त्याही गावाचे नाव घ्यायचे आणि त्याला कर जोडायचे आमी ईयत्ता "पहीली ब" अशेच् कलायचो. त्या मुलाना काय् कलायच्यच नाय. काय नाय शापदलले तल फ़ळांच्या नावापुढे कर जोडायचे आंबेकर चिंचकर केळकर बोरकर पेरुकर सफ़रचंदकर. मी तर एकदा "ढेकर" हे आडनाव म्हणुन सांगितले होते. स्सुद्धा
"त्या पेक्श आपण् असे करुया का आपण् पकाऊ कोडी खेळुयात" वेदश्री पुढे येत् म्हणली.
"ए आपण् तो आयटम काही खास कामासाठी राखुन ठेवलाय" इती प्राजु " लग्नाच्या वेळी कोणी फ़ार दंगा करायला लागला,त्रास द्यायला लागला;की त्याला कोडी ऐकवायचे ठरले आहे.
"मग आपण् उखाणे घेउ. नावे घेउ यात मज्जा येईल"
"काय बाई माझ्या मनतलं बोललीस तू"
"आता मी नाव घेते माझे नाव प्रियाली" दोन तासापूर्वीच मिपा वर लॊग इन् केलेली कोणी एक बोलली.
" तू प्रियाली काय मग माझे नाव म्रुदुला"प्रियाली हातातल्या बांगड्या मागे करत पुढे सरसावत म्हणाली.
"ए बायानो का असे भांडताय.उखाणे तुम्हाला आठवत नसतीलतर मी सांगतो" शेवती त्या दोघींमध्य तात्याना मध्यस्थी करावी लागली."उखाणे कसे मस्त् घ्या लाजत लाजत घेतलेला उखाणा हा म्हातर्या नवरानवरीला सुद्धा गालावर लाली आणतो.
"माझे पण नाव घ्या हो त्यात" बर्याच दिवसानी उगवलेला ठणठनपाळ नकी काय चाललेय याचा अंदाज न घेताच काही तरी बोलायचे म्हणुन बोलला.
त्यावर त्याला दोघीतीघीनी चांगला टोकला.
"मी सांगते चांगला उखाणा" धनश्री पुढे आली " गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले......गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले..... गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले....पुढे काय यमक् जुळवु रे केश्या"
"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
--------------------------------------------------------------------------------------------------------
जेवणात काय् मेन्यु ठेवायचा?
ते स्वाती ला विचार
कोणत्या स्वातीला.
कोणत्याही स्वातीला विचार सारखेच होईल ते.
विजुभाऊना सांगु नकोस् नाहीतर ते फ़क्त् आंब्याच्याच् डिशेस् सांगतील कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील. धमाल मुलाने त्याना मिपा वरचा सुगरण्या म्हणुन शेफ़ारुन ठेवले आहे.
आपण् शेज्वान् राईस करुयात, पांढरा रस्सा , श्रीखंड् ,कोम्बिनेत्सिओन् पास्टा,
शिकरण, बाजरीची भाकरी , वडा पाव,
विजुभाऊ तुम्ही सांगा हो काय करायचे
"फाफडा, ढोकळा, खमण , हांडवो , उंधियो , खाखरा , ढेबरा, फजितो, थेपला, खांडवी, ओसामण "विजुभाऊनी त्यांची लिस्ट् सांगितली..
"माझे काही चुकले का ?रागावुन शिव्या कशाला देताय" आपल्याकडुन काहीतरी चुकले असावे असे वाटुन मनस्वी वरमली
"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ.
मॆन्गो सूफ़्ले, मार्बल केक् ,पुरण् पोळी , आलू पराठा ...एकेक् करत् पदार्थांचे लिस्ट् वाढतच् होती
"सुत्तरफेणी पण ठेवा" हे वाक्य ऐकल्यावर् कोपयातुन जोरात आवाज आला "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"लोकानी चमकुन पाहीले पिवळो डाम्बीस् काका हाताने तोंड झाकुन आडुन बोलत् होता.
जेवणात् खाण्याचे पदार्थांची लिस्ट् बनवायचे जबाबदारी पेठकर काका ,स्वाती राजेश् आणि स्वाती दिनेश यानी घेतल्यामुळे सगळे कसे आता निर्धास्त् होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------
छोटा डॊन आणि आनदयात्री धमाल च्या बायकोच्या मैत्रीणींविषयी रोज काही न काही तरी नवी माहीती गोळा करायच्या खटपटीत होते.प्रत्येक् नव्या माहीती नुसार ते सेण्ट् बूट् शर्ट् ब्रेसलेट् अशा एकेक् नव्या वस्तु खरेदी करत होते.
धमुकाकाच्या लग्नात जोरात नाचायचे म्हणुन छोटी टिंगी ने भडकमकर ऎकॆडमी मध्ये लग्नात् नाचावे / नाचवावे कसे हा डान्सचा क्लास लावल होता फोटो काढायचे म्हणुन मदनबाण् ने नवा कोर्रा कॆमेरा बूक् केला होता.
ईनोबा ने धमुच्या लग्नाला बाअरामतिचा काकांचे स्वागत असो. असे बॆनर् छापयला दिले होते.
धमाल मुलगा ज्याची उत्कंठेने वाट पहात होता तो ८ जुलै उजाडला........तुतारी सरसावली नटुन थटुन ऐटीत मिरवत वर्हाडी वरातीत चालु लागले. लागली छोटा डॊन ने वरातीत नाचायला पोज घेतली.. .ब्यान्ड्च्या ढोलावर पहीली थाप पडली ढम ढम ढम ढम........
-------------------------------------------------------------------------------------------------------
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...हां तर काय म्हणत् होततो मी; हां! पहाट झाली .धमु उठला.नाईलाजाने ईर्षाद म्हणत् त्याने ब्रशावर् पेष्ट् चढवुन् दातावर टेकवली. खसाखसा चेहेरा वगैरे धुतला.एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला आणि त्याचा मेंदू आत्ताच पडलेल्या गोड स्वप्नाच्या विचारातुन बाहेर आला.
(समाप्त्)
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 10:45 am | मनस्वी
अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!
कळ्ळं कळ्ळं आम्हाला..
:(
:)
30 Apr 2008 - 10:53 am | पिवळा डांबिस
"अग तू काय् त्याचा क्लास घेते आहेस् की काय".पिवळा डांबीस काका रागाने लालपिवळे खरे तर लाल झाले होते "तो विचारतोय काय् अन् तू सांगतेस् काय?"
नायतर काय! त्याला लागलीय लगी न न्हायची घाई आणि कसली एकनाड आणि कसलं काय? ऐन वेळी एकच नाडी आहे ती न तुटता बरोबर नीट सुटली म्हणजे झालं..
या हल्लीच्या पोरींना काही कळतच नाय!!!
"तुला त्या चड्डी च्या चेन ला कुलुप घालुन ठेवावे लागेल. डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे."
ही आमच्यात नव्हे, विजुभाऊंच्यात पद्धत आहे हो! त्यांच्यात तरवार घेउन माणूसही उभा करतात म्हणे! वेळप्रसंगी नवर्यामुलाचं मुंडकं छाटायला!!!:)
धमाल्या, डोकं संभाळ!!!
शिर सलामत तो शादियां पचास!!!!:))
"आणि उलटे झाले तर?" धमाल मुलाच्या डोक्यात शाळेत केलेल्या ऐतिहासीक नाटकातला मावळा भालदार चोपदार आठवला.
फार काय? स्टुलावर बसलेला चपराशी दिसशील!!:)
"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
चालेल! नाहीतरी फर्मास शिवलेल्या शर्टची मिजास मारत होता लेकाचा!!
कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील.
सांगतीलही!! सध्या त्यांचं डोकं आंब्यात बुडालेलं आहे!!
"खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"
खरं तर आम्हाला चालेल! फक्त काजूची न ठेवता नारळाची ठेवा म्हटलं!! वास येत नाही!!! उगाच नवर्यामुलीला जवळ घेऊन (मायेने आणि जिव्हाळ्याने हो!!) आशीर्वाद द्यायची वेळ आली तर भानगड नको!!
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
आता इतकं केल्यानंतर हे त्याचं स्वप्न होतं हे सांगू नका राव!!!
त्याच्या आबांना नांव सांगीन!!!
30 Apr 2008 - 11:02 am | आनंदयात्री
>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".
>>कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी
हहपुवा .. शेवट मस्त .. आता ९ जुलै ला काय लेख पडतोय त्याची वाट पहायची, लै मोठे मिपा संमेलन होइल त्यादिवशी, दुपारचे जेवण वैनीकडुन मांडवात अन संध्याकाळचे धम्याकडुन सायबावर !!
(तुला नाय नेणार धम्या काळजी नको :) .. फक्त तुझे कार्ड नेणार आमी)
30 Apr 2008 - 11:09 am | नंदन
तिन्ही भाग आवडले. शेवटपण सही :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Apr 2008 - 11:20 am | केशवसुमार
म्हणतो..
केशवसुमार
30 Apr 2008 - 11:28 am | वेडझवा
मी हि असच म्हण्तो
--
असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!
30 Apr 2008 - 11:28 am | इनोबा म्हणे
कमरेला तलवार,अंगरखा, सुरवार, मोजडी, आणि डोक्यावर् रुबाबदार मावळी पगडी घातलेला नवरदेव तोंडात बोट घालुन लाजतोय हे दृष्य त्याला दिसायला लागले.
हा हा हा. धम्या एकदा घालून बघ रे हा पोषाख.
डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे."
धम्या चड्डीत रहा :)
"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?".बराच वेळ काहीही न बोललेला केशवसुमार एकच वाक्य बोलला.
इथं पण केशवाचे विडंबन.
ईनोबा ने धमुच्या लग्नाला बाअरामतिचा काकांचे स्वागत असो. असे बॆनर् छापयला दिले होते.
च्यामारी आमची पक्षनिष्ठा पार धूळीला मिळवली की तुम्ही.
इजुभाऊ मस्त चालू आहे,लगे रहो!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
30 Apr 2008 - 11:34 am | मनस्वी
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे. ;;)
30 Apr 2008 - 11:57 am | इनोबा म्हणे
इनोबा.. शेवटी "समाप्त" असे मराठीत लिहिले आहे.
धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला.
;;)
काय ग्वाड दिसतीयास 8>
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
30 Apr 2008 - 12:24 pm | पिवळा डांबिस
धत्ततिच्यायला,क्रमशः वाचायची सवयच लागलीय आपल्याला.
ती आमच्यामुळे!!!:)
काय ग्वाड दिसतीयास 8>
आरं इनोबा, खुळा का काय तू? आरं चिकन्या दिसनार्या पोरींना "चिकनी दिसतेस" आसं म्हनायचं नसतंय!! तेन्ला म्हाईती हाये त्या चिकन्या दिसत्यात ते!! आपन ते सांगायची गरज न्हायी. तेन्ला "किती हुशार हाईस" आसं म्हनायचं आसतंय!!
आनि हुशार (पन दिसन्यात सुमार) पोरीला "तुला हा ड्रेस किती शोभून दिसतोय!" आस म्हनायचं आसतंय!!!
आप्ल्याबरूबर काळी पोरगी आसंल तर दुसर्या गोर्या पोरीकडं बघून "बघ, कशी पांढरी पाल हाये!" आसं म्हनायचं,
आनि आप्ल्याबरूबर गोरी पोरगी आसंल (आता तुमच्याबरूबर ती कशाला आसंल म्हना!! तिचे काय डोळे फुटलेत!! ह.घ्या.) तर दुसर्या कुनाकडंच न बघता तिच्याकडंच बघत र्हायाचं आसतंय!!
आरे कधी कळ्नार रे तुम्हां पोरांना या गोष्टी? डांबिसकाका आज हाये शिकिवायला, उद्या मेला तर काय कराल रं!!!!
30 Apr 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा
श्री श्री श्री क्यालिफोर्नियापीठासनाधिश, महंत पिवळा डांबीसकाका १००८ ह्यांना साष्टांग दंडवत.....
काय एकसे एक आयडिया आहेत....
आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे....
30 Apr 2008 - 12:47 pm | इनोबा म्हणे
काय एकसे एक आयडिया आहेत....आता तुमच्याकडं कल्लास लावलाच पाहिजे....
मी बी त्येच म्हणतोय.
बाकी डांबीसकाकांच्या मौलिक विचारांमुळे आमच्या ज्ञानसागरात(डबकं म्हण लेका!) थोडी आणखी भर पडली.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
30 Apr 2008 - 12:10 pm | मदनबाण
विजुभाऊ लय भारी बघा.....
तिन्ही भाग जबरदस्तच.....
(इजुध्म्याचा)
मदनबाण
30 Apr 2008 - 3:20 pm | भडकमकर मास्तर
५० मुले?....भडकमकर काका तुम्ही नक्की काय काम करता
:H :H
गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले
=)) =))
"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ.
:)) :))
लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"
:)) :))
30 Apr 2008 - 5:03 pm | छोटा डॉन
"त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आनन्द् धमु च्या आळीत रहाणार्या असंख्य आया बहीणीना झाला होता.
अहो होणारच.. त्यांच्या मुलीबाळींना रोज छळायचा हा धम्या.. आज त्याच्या तावडीतून त्या सूटणार होत्या!"
धम्या बघ रे बाबा, काय इमेज झाली तुझी ?
आपण नसतं बाबा ऐकून घेतलं ....
"कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील""
बास, आता तेवढीच अपेक्षा आहे... मला वाटते ती पण पूर्ण होईल ...
"सुत्तरफेणी पण ठेवा" हे वाक्य ऐकल्यावर् कोपयातुन जोरात आवाज आला "खुळे की काय? लग्नात जेवणात फेणी ठेवायला हे लग्न काय गोयंकार किरिस्तावाचे वाटले की काय तुम्हाला?"लोकानी चमकुन पाहीले पिवळो डाम्बीस् काका हाताने तोंड झाकुन आडुन बोलत् होता."
जबरान् , पण जर खरच नसलं तर आमाला बाहेरून कुढून तरी व्यवस्था करावी लागेल ...
"छोटा डॊन आणि आनदयात्री धमाल च्या बायकोच्या मैत्रीणींविषयी रोज काही न काही तरी नवी माहीती गोळा करायच्या खटपटीत होत""
काय तरीच काय वो विजूभाऊ, अहो असं काय घडलं तर "धम्या" नवरीच्या मागे तलवार घेऊन उभ्या असणार्या माणसाची तलवार घेऊन आमचे "मुंडके कलम" करेल , वर डांबिसकाका जोड्याने हाणतील ते वेगळेच , चिडून तात्यांनी आमच्यासाठी "दारूबंदी" केल्यावर केवढ्यात पडेल ते आम्हाला ...
बाकी "धम्या" च्या लग्नात नाचायची इच्छा अपूर्णच राहती आहे असे म्हणायचे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
30 Apr 2008 - 6:23 pm | चतुरंग
उत्तरोत्तर चढत्या क्रमाने रंगतदार!
केशवाने पूर्ण केलेला उखाणा, डांबिसकाकांचे संवाद, तायांची (ताईचे अनेकवचन B) ) आणि पोरीबाळींची लगबग एकदम जबरान!
(अवांतर (स्वगत) - आता खर्या लग्नात सुध्दा ह्यातले कायकाय घडवून आणता येते ते पहायला आवडेल ;) )
चतुरंग
30 Apr 2008 - 6:34 pm | शितल
>>>"गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले" हे चालेल का?"
वीजुभाऊ, हसुन गाल, दुखले. :D
>>>"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ.
हसुन गाल तर दुखले, पण डोळ्याच्या फटी झाल्या, आणि पुढचे काही नीट दिसेना. =))
किती हसवाल हो, खर॑च मानल॑ तुम्हाला.
30 Apr 2008 - 7:38 pm | शरुबाबा
कदाचित् तळलेले आंबे चहात बुडवुन खायचे अशी काहीतरी नवी जगावेगळी डिश सांगतील""
1 May 2008 - 12:13 am | रामदास
दादू इंदुरीकरान्च्या गाढवाचे लग्ना नंतर धमाल यशस्वी प्रयोग जर झाला असेल तर धमुचे लग्न .लाजवाब.
एवढी सुरेख लाइन आणि लेंग्थ कसलेल्या कसोटी गोलंदाजाला पण सलग तीन वेळा जमत नाही.
एव्हढे सुन्दर कॅरीकेचर शब्दात लिहीणे .वा भाई वा.
1 May 2008 - 12:46 am | अभिता
गाढव= धमु का ?
1 May 2008 - 8:07 am | रामदास
नाटकाच्या शेवटी गाढवाचा सुंदर राजपुत्र होतो.
1 May 2008 - 12:50 am | ब्रिटिश टिंग्या
फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले....
आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा....
अहो जरा प्रोब्लेम आहे एक नाड् येतेय धमु एकदम् सिरीयस् होत म्हणाला.
पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा.....मी माज्या लग्गात तुम्हालाच पत्लिका दाखवनाल हां....
त्यानी धमाल मुलाला तू अजिबात काळजी करु नकोस् तुझ्या लग्नात माझी ५० मुले असतील म्हणुन आश्वास्न दिले.
भलकमकलकाका तुमची ५० मुल जल कमी पदली तल माज्या "पहिली ब" मधल्या मित्लांना घेउन येतो....आनि मैत्लिनींनापन घेउन येतो :X
डांबीस काका म्हणत होते की नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात तशी त्या लोकांत नवरदेवाची चड्डी लपवायची पद्धत् आहे."
पिवला दांबिशकाका, आव्वा! :P
आपण् शेज्वान् राईस करुयात, पांढरा रस्सा , श्रीखंड् ,कोम्बिनेत्सिओन् पास्टा,
शिकरण, बाजरीची भाकरी , वडा पाव,
आनि बोल्नविता आनि आनि काजुकतली आनि चन्यामन्याची बोलं पन..... =P~
एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला
ऑ धमुकाका, धमुकाकींना तुझं नाव नाव शांगनाल आता 8}
- तिंग्या (धेकल)
1 May 2008 - 1:45 am | इनोबा म्हणे
पन हे एक नाद काय अश्त हो धोंदोपंत आदोबा.....
अल्ले शोन्या,तू सकाली शूला जाताना तूझ्या चद्दीचा नादा सोदून कलतोस ना? ही लग्नाची नाड पण अशीच असते. ती सुटल्याशिवाय लग्न नाय करता येत. आणि नाडा न सोडता केलं तर नंतर 'नसती धूणी' धूत बसावे लागते. :))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
1 May 2008 - 2:40 am | वरदा
लग्नाच्या वेळी कोणी फ़ार दंगा करायला लागला,त्रास द्यायला लागला;की त्याला कोडी ऐकवायचे ठरले आहे.
:))
फाल छान गोश्त. मला तल तिन्ही भाग आवल्ले....
आनि विजुकाका शेवत पन छान केलाय गोश्तीचा....
हेच म्हणते......
1 May 2008 - 9:15 am | डॉ.प्रसाद दाढे
सॉलीड विजुभाऊ..साष्टा॑ग नमस्कार..खूप आवडले
1 May 2008 - 11:17 am | विजुभाऊ
धन्यवाद मित्रानो.
हा लेख मी इथेच का संपवला असे मला बर्याच जणानी फोन करुन व्यनी ने विचारले.
पण मला वाटते की.
कोणाची फिरकी कुठपर्यन्त घ्यायची त्याला मर्यादा असाव्यात.
धमु च्या व्यक्तीमत्वाबद्दल मला आदर आहे त्याला कोठेही चीपनेस येवु नये अगदी प्रतिसादातसुद्धा याची काळजी घेउन हे असे लिहिले आहे.
कोणीही यावे आणि टर उडवावी असे धमु चे माझ्यामुळे होउ नये . त्यालाही आणि मलाही ते आवडणार नाही. मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी.
तुमचे प्रतिसाद माझे लिहिण्याचे बळ नक्कीच वाढवतील.
::::आपल्या प्रतिसादांच्या ऋणात राहु ईच्छीणारा विजुभाऊ
1 May 2008 - 4:03 pm | सखाराम_गटणे™
मानले तुम्हाला.
आता धमु च्या घरी बारसे होउ द्यात.
म्ह्न्ण्जे झाले सगले.
1 May 2008 - 2:36 pm | शरुबाबा
मित्र याची यापेक्षा वेगळी व्याख्या नसावी.
1 May 2008 - 2:44 pm | स्वाती राजेश
मस्त लिहीले आहे. आम्हाला ध मु च्या लग्नात सामिल करून घेतल्याबद्द्ल, आणि आम्हीसुद्धा काही बिनकामाचे नाही ही जाणिव करून दिल्याबद्द्ल.:)
बाकि लेख नेहमीप्रमाणे खासच आहे. यावेळी मात्र खूपच हसू आले.
सत्तवीस देवतांची नावे झल्यावर् मनस्वी चा कागद् पूर्ण भरुन गेला तिला आता यापुढे पत्रिकेत् इतर मजकूर् कोठे लिहायचा हा प्रश्न पडला.
पत्रिका जरा मोठी (पुस्तक)काढायची.:)
गुलाबाचे फ़ूल हळुहळु उकलले........... -- रावाना डुकराने ढकलले
सही...........
"अग त्या शिव्या नाहीत ते गुजराती पदार्थ आहेत्" विजुभाऊ
मस्त स्पष्टीकरण.....
पुढच्या लिखाणाची वाट पाहात आहे.....होप सो..निराश करणार नाही...
1 May 2008 - 2:57 pm | प्रगती
आम्हाला धमुच्या लग्नाला बोलावलं नाही आम्ही पण वरातीत नाचायला आलो असतो.
बाकी३लेख अप्रतिम ह. ह. पुरेवाट. जमल्यास सी.डी. पाठवुन द्या
2 May 2008 - 10:02 am | विजुभाऊ
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा
क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही.
आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही.
त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते.
2 May 2008 - 1:13 pm | धमाल मुलगा
विजुभाऊ..मान गये!
च्यामारी पहिल्याच भागात आमची चड्डी पळवायची भाषा बघून आम्ही जे काही टरकलो की मूग गिळून गप्प पडलो!!!
#o
:)) बाय द वे, ही 'छोटी ताई' कोण बॉ???
आयचा घो !!! अनुभवाचा फायदा? नको...मला जोडे पडतील!!
अग्गायायायायाया..... 8}
सार्थ ओळख....केसुशेठला आपण लग्नाला बोलावणारच नाय...आयला, तिथं पंक्तीत बायकोनं छान लाजत मुरडत नाव घेतलं की 'आज आत्ता ताबडतोब' असं ठाप्पकन हे त्याच्यावर विडंबन करुन मोकळे...आणि आम्ही झालेल्या फजितीनं तोंड लपवत सैरावैरा पळतोय....कोणि सांगितलंय हात दाखवून अवलक्षण?
:)) गंडली..गंडली...मनस्वी गंडली !!!
किरिस्तावच कशाक होउंच होया? ठेवा की...आपली काय हरकत नाही...तेव्हढंच स्टेजावर उभ्या उभ्या पाय दुखायला लागले की तुमच्यात येऊन पटकन एखादा पेग हाणून परत स्टेजावर जाईन म्हणतो !!!
आयच्या गावात !!! तरीच मास्तरांना नाही नाही ते प्रश्न पडतात...गरमी म्हणजे काय नी काय काय!!! ;)
धन्य धन्य झालो श्री श्री श्री डांबिसाचार्य :))
वस्तुस्थितीला धिरोदात्तपणे सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे मित्रा!!! लग्नापुर्वीची ऐकून घेण्याची प्रॅक्टिस म्हण हवं तर!
चल रे! मी कशाला काय करु? तेव्हढीच त्या कार्ट्यांनी छळण्याची माझ्यामागची पिडा टळेल. आंद्याला पण घे सोबतीला, त्याचंही टाक जुळवून :)
:) धन्यवाद विजुभाऊ! खरं आहे...मित्र याची व्याख्या यापेक्षा वेगळी नसावी. माझं सुदैव की असा मित्र मला लाभला !
असो,
मंडळी, माझ्या लग्नाचं हे स्वप्न, विजुभाऊंनी 'संजयाच्या दिव्यदृष्टी'ने पाहिलं आणि खास तुमच्यासाठी इथं उतरवलं....सगळ्यांनी ते छान एन्जॉय केलं... मला अगदी माझ्या खर्याखुर्या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे.
त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !!
3 May 2008 - 4:19 am | पिवळा डांबिस
मला अगदी माझ्या खर्याखुर्या लग्नात तुम्ही सगळे आल्यासारखं वाटलं ! आभारी आहे.
म्हणजे, खर्या लग्नात बोलवणार नाही की काय आम्हांला?
अरे आणू आम्ही आहेर! नुसतेच नाही येणार गिळायला!!!:))
एनीवे, विश यू एन्ड युअर ब्राईड हॅपी एन्ड प्रॉस्परस मॅरिड लाईफ!
-डांबिसकाका
5 May 2008 - 9:59 am | धमाल मुलगा
बस क्या डांबीसकाकाखाँ ? अपने इस पुतणेको इतना गयागुजरा समझे क्या?
थोडं थांबा....योग्य वेळी सांगेनच की :)
5 May 2008 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर
थोडं थांबा....योग्य वेळी सांगेनच की
घ्याऽऽऽऽ ! म्हणजे, 'बोलवतोच' असे आग्रहाने म्हंटलेले नाहीच शेवटी.....
5 May 2008 - 2:21 pm | धमाल मुलगा
:))
ह्यॅ: ! घरच्या माणसांना कुठे बोलावणी लागतात का? आणि आग्रह???? तो बाहेरच्यांना करायचा ना?
2 May 2008 - 1:54 pm | झकासराव
=))
3 May 2008 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभाऊ,
तीनही भाग सुरेखच झाले.
धम्याच्या लग्नातल्या मित्रमंडळीच्या तोंडी टाकलेला संवाद वाचायला आवडला.
खरं तर आम्हाला तीनही भागातील ब-याच वाक्यांखाली कोट्या करायच्या होत्या, पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय. :)
आपले लेखन आवडले हे वेगळे सांगने न लगे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4 May 2008 - 7:53 pm | विजुभाऊ
पण आम्ही जरा उशीराच आलो आणि वरातही आता फार पुढे गेलीय
चालायचं.....वरातीमागुन ज्यांची घोडी जातात त्यात मी ही आहे.
असो ( या वेळी तुमच्या तोंडी शिव्या सु संस्कृत होत्या . काही चुकमाक्ले तर सांगत चला.)
5 May 2008 - 2:34 pm | अजिंक्य
आयुष्यात पहिल्यांदा मला "आत्यंतिक" खेद होतोय...........
एवढं (आख्खं, संपूर्ण इ.इ. काहीही चालेल.) मोठ्ठं लग्न लागलं,
आणि तेही ध.मु. चं ..... आणि मी एवढा "लेट"!!!!
पण काय करणार, यन्ट्रीच उशीरा घेतली ना!!
आलो, ते थेट भाग - ३ वाचला. ही "भानगड" लक्षातच आली नाही, की आधी भाग १ व २ वाचायला हवेत.....
पण काही हरकत नाही! कारण, ३ र्या भागानेच एवढं हसवलं की डोळ्यात पाणी आलं.....
(आमच्या मातोश्रींना वाटलं, की कोणातरी मोठ्या नेत्याचं निधन वगैरे झालं की काय!)
अप्रतिम!!!!
लगे रहो!!!!
- अजिंक्य.
5 May 2008 - 5:26 pm | बकुळफुले
"प्लाजु ताई...आदनावांच्या नाहीतर नावांच्या भेंड्या चालतील? छोटी टिंगी म्हणाला" ते केवद शोप्पं हाहे. कोण्त्याही गावाचे नाव घ्यायचे आणि त्याला कर जोडायचे आमी ईयत्ता "पहीली ब" अशेच् कलायचो. त्या मुलाना काय् कलायच्यच नाय. काय नाय शापदलले तल फ़ळांच्या नावापुढे कर जोडायचे आंबेकर चिंचकर केळकर बोरकर पेरुकर सफ़रचंदकर. मी तर एकदा "ढे कर" हे आडनाव म्हणुन सांगितले होते.
=)) =)) =)) =))
5 May 2008 - 5:29 pm | बकुळफुले
"मी धमु ला म्हणालो सुद्धा की तु लग्न कसे काय जमवलेस् हे मला सांगितले तर मी "वा वी प्र" अर्थात् वारंवार विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर् फ़ोटोसहीत ते पोष्ट् करेन्".आकडीने कैर्या पाडणारा मदनबाण म्हणाला.
अरे बाबा किती हसवणार आता ... ))
5 May 2008 - 8:50 pm | वरदा
त्यातून मला सख्खी बहिण नाही...आणि इथे पाहतो तर इतक्या करवल्या.....छान...खूप बरं वाटलं....थॅन्क्यू ताईलोक्स !!
करवलीला आहेर द्यावा लागतो आणि त्यातुन आम्ही तुझ्या साईडच्या म्हणजे करवलीचा मान हवाच..... :D
6 May 2008 - 9:57 am | धमाल मुलगा
आहेर आहेर काय मोठी चीज आहे?
ह्या आनंदापुढं तिच्याआयला ताजमहाल सुध्दा फिका पडलाय....
बोलो क्या मंगता हय?
6 May 2008 - 7:16 pm | वरदा
क्या बात है! म्हटलस ना देतो त्यात मिळाला सगळा आहेर्...आता फक्त तारीख आणि कुठे पोचायचं ते सांग्...सगळ्या करवल्या हजर.....
6 May 2008 - 9:24 pm | विजुभाऊ
हे बरे आहे रे....माताय लिखाण मी करायचे आणि आहेर करवलीला. मला काय आहेर टिपुन घेणारा दिगू टिपणीस समजलास काय?
तुझ्या लग्नाची सगळी बित्तम बातमी सबसे तेज देतो की तु त्याची हिल्ल स्टेशन ला त्याचीच पारायणे करशील.
( बाय द वे धम्या ....चि सौ का .तै नी हा लेख वाचलाका? नाही त्याना सासरच्या लोकांची ओळख नीट करुन दे. ते किती इरसाल आहेत ते सांग)
(उप कंस: कशावरुन तरी वैतागलेल्या पतिराजानी त्यंच्या बायकोला समोरुन येणार्या गाढवाकडेबोट दाखवत म्हंटले की ते बघ तुझे नातेवाईक.( बघा किती धाडसी मनुश्य होता तो)
त्याची बायको लगेच उत्तरली : बरे झाले हो सासरच्या माणसांची ओळख झाली)
6 May 2008 - 11:14 pm | वरदा
विजुभाऊ मस्तच जोक :))
16 Jul 2015 - 1:32 pm | विजुभाऊ
धम्या हा लेख बाळराजाना वाचायला दे.....