काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती. ही सगळी धुळवड बघून मन विषण्ण झाले आणि आम्ही भलतेच गाणे गुणगुणायला लागलो............
एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा
समजाऊनी तयांचा चालूच राही दंगा
अन पाहुनि तयांना, चेकाळती अनेक
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
वेड्यास दुःख भारी, चालू रडे जगाशी
पाध्ये न त्या विचारी, सांगेल ते कुणाशी ?
संपादकांस टोची, दावी उगाच धाक
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
पंचास सर्व काही एके दिनी कळाले
नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले
धुरळा जरी उडाला, मिपावरी क्षणैक
होती मुळात सगळी ती धोरणे सुरेख
-केसुरंगा
प्रतिक्रिया
15 Jul 2010 - 10:48 pm | विनायक प्रभू
>:)
15 Jul 2010 - 10:51 pm | प्रभो
8}
15 Jul 2010 - 10:53 pm | रेवती
आत्ता कुठे जरा शांत वाटत होतं तोवर लगेच दंगा सुरू होणार.
आता तुम्ही म्हणाल आम्ही तर चांगलच लिहिलय.
पण दंगा सुरु होण्यासाठी एवढं पुरेसं आहे.
रेवती
15 Jul 2010 - 10:54 pm | मुक्तसुनीत
नो कमेंट :-)
15 Jul 2010 - 10:54 pm | चतुरंग
लै भारी!!
केसुरंगाशेठ तोफू कबूल करो!! ;)
चतुरंग
15 Jul 2010 - 10:54 pm | विनायक प्रभू
=))
15 Jul 2010 - 11:02 pm | प्रियाली
=))
डिस्क्लेमरः शीर्षक आणि शब्द नसणारा हा प्रतिसाद एखाद्याला अवांतर वाटत असल्यास प्रतिसादकर्ती जबाबदार नाही. ;)
15 Jul 2010 - 11:07 pm | केशवसुमार
केसुरंगाशेठ,
तुमचीच वाट बघत होतो.. इतकी धुळवड झाली आणि तुम्ही आला नाही असे कसे झाले म्हणत होतो तोवर तुमची दणदणीत एन्ट्री झाली..
रंगाशेठ प्रमाणे आमचा पण तोफा कबुल हो..
(हासरा)केशवसुमार
15 Jul 2010 - 11:13 pm | मस्त कलंदर
अगदी सही जमलेय विडंबन...
नेहमी तीच ती मिपा सद्स्यांवर केलेली विडंबने वाचून तोच तोच पणा आला असे वाटू लागले होते.. पण हे म्हणजे सगळ्यांवर कडी आहे.. आवडले हे वे सां न ल!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
15 Jul 2010 - 11:20 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
15 Jul 2010 - 11:26 pm | श्रावण मोडक
हाहाहा... चालू द्या...
16 Jul 2010 - 12:14 am | लिखाळ
वा वा .. एकदम मस्त :)
16 Jul 2010 - 12:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शब्दांची वही हरवलेली दिसत्ये! ;-)
विडंबन मस्तच हो!!
अदिती
16 Jul 2010 - 12:33 am | Nile
याबाबतीत केसु(न्)रंगा सहमत आहेत हे पाहुन डोळे पाणावले.
बाकी विडंबन ठीक. पण केसुरंगा विडंबन टाकुन लगेच का पळाले बुवा? बहुदा टोपी बदलायची असेल.
-Nile
16 Jul 2010 - 12:51 am | केसुरंगा
पळून कशाला जातोय! आम्ही ९९% वाचनमात्र.
एखांदा विषय गावला तरच विडंबन! बाकी गपगुमान बसतो. :|
16 Jul 2010 - 6:44 am | Nile
अहो येत चला. फार नाहीतर नवविडंबकांना चार मार्गदर्शनपर शब्द देत चला. तेव्हढेच आम्हाला पण चार थेंब मिळतील वाचायला.
-Nile
16 Jul 2010 - 12:40 am | धनंजय
मस्तच
16 Jul 2010 - 1:18 am | शिल्पा ब
शिळ्या कढीला उत दुसरे काय..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
16 Jul 2010 - 1:52 am | गणपा
=D>
केसुरंगाजी १६ आणे जमुन आलय विडंबन.
16 Jul 2010 - 8:25 am | यशोधरा
मस्त!
16 Jul 2010 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार
शॉल्लेड !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य