एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख
काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती. ही सगळी धुळवड बघून मन विषण्ण झाले आणि आम्ही भलतेच गाणे गुणगुणायला लागलो............
एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा
समजाऊनी तयांचा चालूच राही दंगा
अन पाहुनि तयांना, चेकाळती अनेक
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
वेड्यास दुःख भारी, चालू रडे जगाशी
पाध्ये न त्या विचारी, सांगेल ते कुणाशी ?
संपादकांस टोची, दावी उगाच धाक
फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक
पंचास सर्व काही एके दिनी कळाले
नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले
धुरळा जरी उडाला, मिपावरी क्षणैक
होती मुळात सगळी ती धोरणे सुरेख
-केसुरंगा
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
आत्ता कुठे
नो कमेंट
हाण्ण तिच्या!!
(विषय दिलेला नाही)
...
हा हा हा
होती मुळात सगळी ती धोरणे सुरेख!!!!
हाहाहा!!!
हाहाहा
धुरळा जरी
शब्दांची
पाध्ये न
नाय बा!
अहो येत
हा हा
शिळ्या
केसुरंगाज
मस्त!
शॉल्लेड