||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
6 Jul 2010 - 2:38 am

ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥
अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल

आधूनिक मिपाप निती कथा

एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल. किंवा सशाची कातडी हळुवार असल्यामुळे त्याला जरा वाजवीपेक्षा जास्तच पिडा झाली असेल. जे काय असेल ते असो.
ह्या अनुभवाने थोडा खट्टू झालेला ससा ते रान सोडून दुसऱ्याच ठिकाणी भटकला. ते ठिकाण म्हणजे एक तलाव होता. त्यात लहान-मोठे, बारीक-जाडे, टारे-खारे, बलीया-अबलीया, कंपूबाज-एकूल अनेक मासे होते. रानातील विचित्र(?) अनुभव कोणाला तरी सांगायला ससा खूप आतूर झाला होता. आपल्याला तलाव नवीन आहे, व इथे कोण कोण पोहत आहे ह्याची सशाला काही उमज नव्हती. तलावाचे ज्ञान देखील नव्हते. तरी त्याने तलावात उडी मारली आणि रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मास्यांना रानातली भाषा काय कळणार? समज दाखवणे तर दूरच, तलावातील मास्यांनी आपल्या स्वभाव धर्माला अनुसरून सशाच्या कोवळ्या कातडीचे लचके तोडायला सुरवात केली. काहींनी सशाची ढाल करून एकमेकांवर हल्ले सुरू केले. सशाला काही कळेना. त्याने पाण्याच्या दुसऱ्या कडेला उडी मारली. तिथे पुन्हा रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मासेच ते! मघाचेच मासे तिथेही येऊन आपापला स्वभाव धर्म निभाऊ लागले.
शेवटी सशाने तलावाचे त्याने उडी मारलेले दोन्ही भाग व्हॅक्यूम लावून स्वच्छ केले, व काठावर येऊन बसला. त्या व्हॅक्यूम झोतातून सगळे मासे मात्र अलगद निसटून गेले.

बोध- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल ठरतात.

हे ठिकाणकथासमाजप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

6 Jul 2010 - 2:57 am | शिल्पा ब

पाहावं तिथं विडंबित लेख...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अरुण मनोहर's picture

6 Jul 2010 - 10:33 am | अरुण मनोहर

"इथलं " जीवन हेच एक विडंबन भासतं, आणि "तिथलं" सत्य माहीत नसतं. हाच तर प्रॉब्लेम आहे!

II विकास II's picture

6 Jul 2010 - 7:53 am | II विकास II

कदाचित सश्याला चाटुगिरी माहीती नसावी किंवा कंपु विरोधक असावा.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

टारझन's picture

6 Jul 2010 - 7:59 am | टारझन

वा वा वा !! लाख पते की बात !! बाकी तळ्यात उडी मारण्या आगोदर आपण वाटरफ्रुफ टॉवेल घातला आहे काय ? हे सशाने कणफर्म णको का करायला ? =)) बाकी ह्या प्रकारातले बरेच ससे असतात हो ... त्यांना वाटतं मास्यांनी आपलंच कवतिक करावं =)) काही काही सशांना "काका" म्हंटल्यावर फार राग येतो आणि ते "पेटुन"उठतात म्हणे =))

-(कोळी) टारमासा
चाऊंगा मै तुम्हे....... सांझ सवेरे ...
फिर भी कभी अब कान को तेरे
लाल तो मै ना करुंगा ...

अरुण मनोहर's picture

6 Jul 2010 - 11:06 am | अरुण मनोहर

अरे व्वा! आपल्याच वाक्यावर आपणच =)) !
इतना मुंह छोटा ना करो यार! मी पण देतो सलामी.
=D> =D> =D>

टारझन's picture

6 Jul 2010 - 3:24 pm | टारझन

आपण प्रतिसाद लेखणासाठी "गुर्जी लेखण क्लासेस" ची शिकवणी लावली आहे काय ? कोणत्या आकाशगंगेच्या चित्राला स्लाईडवर ठेऊन माय्क्रोस्कोप खाली ठेऊन प्रतिसाद लिहीला आहात ? =))

- करुन साव्रासावर

सहज's picture

6 Jul 2010 - 8:07 am | सहज

रस्त्यावर अनेक प्रकारची वाहने असतात, वेगवेगळ्या दर्जाचे वाहनचालक असतात, रस्त्यावर आपल्या जोखमीने आपले वाहन घेउन चालवावे. शक्य तेवढे दुभाजक, वाहतूक नियंत्रक दिवे, वहातूकीचे नियम केले आहेत. अपघात तरीही होतात. कृपया माहीत असल्यास अपघात न झालेले रहदारीचे रस्ते सांगा . पब्लीक फोरम या मोठ्या हमरस्त्यावर आपण आहोत, येथे अवजड वहाने जास्त हे वाहनचालकाला समजायला हवे अन्यथा आपल्या ओळखीच्याच गल्लीत, आड रस्त्यावर सैरसपाटा करावा.

बोध- अतिसंवेदनाशील लोकांनी सार्वजनीक संस्थळावर वाचनमात्र रहाणे हेच उत्तम.

II विकास II's picture

6 Jul 2010 - 8:13 am | II विकास II

>>बोध- अतिसंवेदनाशील लोकांनी सार्वजनीक संस्थळावर वाचनमात्र रहाणे हेच उत्तम.

सहजकाका, अनुभवाने कातडी जाड होते. संपादकाचे सगळे बाण मोडुन पडतात. असो.
काही जण अजालाबाहेर कातडी कमावतात, काही जण अजालावर कातडी कमावतात.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

स्पंदना's picture

6 Jul 2010 - 11:36 am | स्पंदना

अरे व्वा!! बरेच मासे गोळा झालेत. जाळ टाकायला हव.
वैसे लेखक महाशयांना विडंबनाचे दहा पैकी अकरा मार्क!!
(एक माझ्याकडुन)
काय असत एखादा शार्क त्याच्या बळावर शिकार करताना अतिशय शोभुन दिसतो! माझी स्वतःची तर मती गुंग होते हे कसबी रुप पहाताना. पण कधी कधी त्याच्या शौर्याचा आपल्याला पण रंग लागेल या आशेन बारिक बरिक चिन्गळ्या पण त्याला चिकटतात! शार्क बनु पहातात! अन त्या गोंधळात शिकार तर निसटतेच पण चिंगळ्या सुटतात अन शार्क नजरेत भरतो..हरलेला! वर आणि काही माकड झाडावर बसुन चि चि अस जस एखाद नागव पोर नाचाव तशी नाचायला लागतात.
एकुण चुकिच्या कोंदणात बसलेल्या हिर्‍यासारखा, शार्क चमक असुनही चमकत नाही.
मराठ्याच काळीज आहे!! शार्कच डसण शतदः मान्य, पण अरे हट्..माकड नाही नाचवुन घेणार उरावर!!

अवलिया's picture

6 Jul 2010 - 12:00 pm | अवलिया

अरुण मनोहर यांच्या कथा फार छान असतात.
मी नेहमी त्या वाचत असतो.
त्यांच्यापासुन काय बोध घेता येईल याचे मी नेहमी चिंतन करत असतो.
नीतीमत्तेच्या बोध कथा सांगतांना त्यांचा हात कुणी धरु शकणार नाही.
त्यांनी अशाच कथा नेहमी सांगत रहाव्या.
परमेश्वर त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी मला भरपुर आयुष्य देवो.
मात्र या कथेत तलावातल्या माशांना खाणा-या सुसरींबद्दल त्यांनी काही सांगितले नाही.
सुसरींचा त्यांना अनुभव कमी असावा.
सुसरी मुकाट तलावात पडलेल्या असतात.
त्या उगाच इकडे तिकडे फिरत नाहीत.
त्यांच्याकडे पाहुन त्यांच्यांत जिवंतपणाचे काहीही लक्षण दिसत नाही.
परंतु एखादा मासा त्यांना दिसला की त्या गट्टम करुन टाकतात.
सुसरी या डुख ठेवुन असतात असे प्राणीशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
त्यांची स्मृती फार तीक्ष्ण असते.
मागील गोष्टी लक्षात ठेवुन त्या हल्ला करतात.
सुसरी काही काही ओळखीच्या माशांना सोडून देतात.
काही माशांना मारता यावे म्हणुन सुसरी सशांशी दोस्ती करतात.

--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

शेखर's picture

6 Jul 2010 - 12:06 pm | शेखर

नाना, नीती कथेचा उर्वरित भाग पण आवडला...

शिल्पा ब's picture

6 Jul 2010 - 12:10 pm | शिल्पा ब

अवलियाचे रसग्रहण आवडले.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

II विकास II's picture

6 Jul 2010 - 12:15 pm | II विकास II

>>परंतु एखादा मासा त्यांना दिसला की त्या गट्टम करुन टाकतात.

काहीजण कचपण असतात.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

अरुण मनोहर's picture

6 Jul 2010 - 12:34 pm | अरुण मनोहर

>>>काही माशांना मारता यावे म्हणुन सुसरी सशांशी दोस्ती करतात.<<<

क्या बात है नाना! ससा आणि सुसर एक नवीन मिपाप निती कथा बनवू चला. कथाके लिये साला कुछभी करेंगा. ससुरा ससा सुसरसेभी सांस लेना सिखेंगा!

अवलिया's picture

6 Jul 2010 - 12:48 pm | अवलिया

ससुरा ससा सुसरसेभी सांस लेना सिखेंगा!

सांस? हमे डर है कही ससा सुसर ना बन जाये... माशांचं काही खरं नाही मग.. आणि असं म्हणतात मासा रडला तरी ते दिसत नाही. सगळयात दुःखी मासा या जगात.. असो.

--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

विजुभाऊ's picture

6 Jul 2010 - 12:11 pm | विजुभाऊ

हे खरे असू शकेल.
पण ॥झाडून॥ सशाने काही सशाना अवगत असलेली गेंडाचर्मविद्या वापरायला हवी होती. म्हणजे त्याला माशा आणि मासे दोन्ही चावले नसते. किंवा तळ्यात त्याने माशांशी( माशी) मैत्री आहे आणि मळ्यात माशांशी ( मासे) मैत्री आहे हे साम्गितले असते किंवा त्याने प्रतीरूप विद्येने मासे आणि माशा असे वागायला हवे होते.
म्हणजे त्रास झाला नसता.
सुसरींचे काय्...त्याना सुसरबाई तुमची पाठ मऊ असे म्हणावे लागते हे ॥झाडून॥ ससा शिकला होता पण दुर्दैवाने त्याने एका शार्कला तसे म्हंटले आणि त्यामुळे शार्क आणि सुसरी दोन्ही नाराज झाले.

अरुण मनोहर's picture

6 Jul 2010 - 1:07 pm | अरुण मनोहर

विजुभाउ, ही सुसरी गेंच विद्या तुमच्याकडून शिकायला हवी. ससा, सुसर आणि ससाणा ह्या गोष्टीत प्लीज शिकवा नां! गुरूदक्षीणा उधार. (म्हणजे शिकल्यानंतर)

स्पंदना's picture

6 Jul 2010 - 12:26 pm | स्पंदना

स्वतःची पाठ इतकी मऊ असताना ससा दुसर्‍यांच्या पाठीच कश्याला कौतुक करेल? अरे फटका तो फटका..मोठ्या ठीकाणी उडी मारली तरी ...ती निभावायची प्रत्येकाची पद्धत असते.
अन अलिप्त पणे पाहुनच तर खरी मत बनतात्..स्वतः गुंतल की त्यात तुमची वैयक्तिक मत उतरतात्...अन एकदा बनलेले मत परत परत ..फक्त आपल्याला आवडल नाही म्हणुन बदलन... जंगलात म्हणा वा तळ्यात म्हणा..धोकादायक.

Dhananjay Borgaonkar's picture

6 Jul 2010 - 2:25 pm | Dhananjay Borgaonkar

ज्याला जस लिहायच ते लिहुदेत की..उगाच तळ्याच्या बाजुला बसुन दगड् कशाला फेकायची?
आज कोणी लेख लिहिला तर लगेच त्याच्यावर केवळ वैयक्तिक आकसापायी चिखलफेक करायची हा कसला नवीन उद्योग?

टारझन's picture

6 Jul 2010 - 3:19 pm | टारझन

ज्याला जस लिहायच ते लिहुदेत की..उगाच तळ्याच्या बाजुला बसुन दगड् कशाला फेकायची?

धनंजयराव बोरगॉनकर साहेब , मी आपले सगळे लेखन एकापाठोपाठ वाचले ... जबरदस्त लिहीता हो तुम्ही गेलाबाजार 'निवडणुक प्रकरण १२८ वे - दगडफेके आणि मी" लिहु शकाल. :) तुम्ही ल्ह्या हो तुम्हाला कोण दगडं मारतो बघुच आम्ही (नाही नाही , आरश्यात बघण्याबद्दल नाही बोलत मी ;)

पण च्यायला कोणी सुरवंट स्वतः काही करत नसेल आणि उगा येऊन चॅवचॅव करत असेल तर त्याला तळ्यातल्या माश्यांना दगडं मारायची ज्याम हुक्की येते म्हणे =))

- न्युक्लियर आरगॉनकर

Dhananjay Borgaonkar's picture

6 Jul 2010 - 4:21 pm | Dhananjay Borgaonkar

तुम्ही ल्ह्या हो तुम्हाला कोण दगडं मारतो बघुच आम्ही

तुम्ही एवढे ऱक्षणकर्ते असताना आम्ही का घाबरु.

बाकी ते माझ आडणाव लिहिण्यात थोडी गफलत झाली तुमची..
बोरगांवकर अस आहे.
मिपावर आलो तेव्हा मराठी टाईपिंग जमत नव्हत म्हणुन इंग्रजीत लिहिल.

शानबा५१२'s picture

6 Jul 2010 - 6:34 pm | शानबा५१२

ज्याला जस लिहायच ते लिहुदेत की..उगाच तळ्याच्या बाजुला बसुन दगड् कशाला फेकायची?

५१२% मताशी सह! म्हणजे मताबरोबर आहे. :D

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

jaypal's picture

6 Jul 2010 - 6:50 pm | jaypal

निळ्या डोळ्यांच्या हार्डिक शुभेच्छा =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

अवलिया's picture

6 Jul 2010 - 7:03 pm | अवलिया

अरेच्या माझा प्रतिसाद सुसरीने खाल्ला की काय? असो.
हा प्रतिसाद पण उडेल. पण हरकत नाही.

सुसरीला आमचे प्रतिसाद उडवायला ताकद मिळो अशी प्रार्थना. :)

--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jul 2010 - 7:37 pm | परिकथेतील राजकुमार

ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥
अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल

आधूनिक मिपाप निती कथा

एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल. किंवा सशाची कातडी हळुवार असल्यामुळे त्याला जरा वाजवीपेक्षा जास्तच पिडा झाली असेल. जे काय असेल ते असो.
ह्या अनुभवाने थोडा खट्टू झालेला ससा ते रान सोडून दुसऱ्याच ठिकाणी भटकला. ते ठिकाण म्हणजे एक तलाव होता. त्यात लहान-मोठे, बारीक-जाडे, टारे-खारे, बलीया-अबलीया, कंपूबाज-एकूल अनेक मासे होते. रानातील विचित्र(?) अनुभव कोणाला तरी सांगायला ससा खूप आतूर झाला होता. आपल्याला तलाव नवीन आहे, व इथे कोण कोण पोहत आहे ह्याची सशाला काही उमज नव्हती. तलावाचे ज्ञान देखील नव्हते. तरी त्याने तलावात उडी मारली आणि रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मास्यांना रानातली भाषा काय कळणार? समज दाखवणे तर दूरच, तलावातील मास्यांनी आपल्या स्वभाव धर्माला अनुसरून सशाच्या कोवळ्या कातडीचे लचके तोडायला सुरवात केली. काहींनी सशाची ढाल करून एकमेकांवर हल्ले सुरू केले. सशाला काही कळेना. त्याने पाण्याच्या दुसऱ्या कडेला उडी मारली. तिथे पुन्हा रानातील बेचैन अनुभव ॥झाडून॥ साऱ्या जलचरांना सांगीतला. मासेच ते! मघाचेच मासे तिथेही येऊन आपापला स्वभाव धर्म निभाऊ लागले.
शेवटी सशाने तलावाचे त्याने उडी मारलेले दोन्ही भाग व्हॅक्यूम लावून स्वच्छ केले, व काठावर येऊन बसला. त्या व्हॅक्यूम झोतातून सगळे मासे मात्र अलगद निसटून गेले.

बोध- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल ठरतात.

आ हा हा काय छान निती कथा लिहिली आहेत हो. मस्त मजा आली वाचताना.

लहानपणी वाचलेल्या कथांची आठवण झाली. खरेतर त्या काळात वाचलेल्या कथा ह्या अशाच प्रकारातल्या असायच्या. खरे म्हणायचे तर जवळजवळ सर्वच कथा ह्या थोड्याफार निती कथाच असायच्या.

तुमची कथा वाचताना छान गुंगलो होतो, मध्येच एकदम अशाच साधारण कथा असलेल्या पंचतंत्राची आठवण झाली. हि आठवण होणे स्वाभावीकच आहे म्हणा. पण पंचतंत्र जसे एकदा हातात घेतले की सोडवत नाही, अगदी तसेच तुमच्या ह्या लेखाच्या बाबतीत देखील घडले.

छोट्या छोट्या वाक्यातुन मोठे मोठे धडे देण्याचे नितीकथेचे कसब आपणही आपल्या ह्या कथेत जपले आहेत ह्याचे खास कौतुक करावेसे वाटते. जीवनच्या प्रत्येक संकटाला कसे युक्तीने सामोरे जावे हे सांगणारे पंचतंत्र असो वा ह्या नितीकथा असोत, खरच महान आहेत. आपली भारतीय संस्कृतीच मुळात महान आहे.

अशा प्राचिन कथारुपाला तुम्ही नव्या काळाची जी काय फोडणी माअर्ली आहेत ती तर स्तुती तोकडी पडावी अशी कामगिरी आहे. जुनी कथा पण नवीन संदर्भ लेउन आल्याने कशी एकदम ताजी टवटवीत वाटत आहे.

अशा विषयांवर लिहिताना बर्‍याचदा लिखाणाचा तोल ढासळण्याची शक्यता असते पण तुम्ही हा तोल अत्यंत व्यवस्थीत जपला आहेत हे मान्य करावेच लागेल. ससा आणि सुसरीला तुम्ही मिपा विश्वात अजरामर केलेत असे म्हणायला हरकत नसावी.

असेच छान छान लिहित चला. तुमच्या ह्या लेखनामुळे आम्हाला प्रतिसाद देण्याची संधी निर्माण झाली त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार.

पुढील लेखनाला खुप खुप शुभेच्छा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य