युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे
ती :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||
ती :
हळूच आज सांज फुलली
नभानेही लाली ल्याली
लकेर घेवूनी सुरांची सुस्वर
ताला सुरांचे गीत मी गातसे ||१||
दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....
तो :
दुरवर बघ त्या डोंगर रांगी
खुणावीतसे तो रंगीत पक्षी
बोलावी का तुला मला तो
समजेल का कधी बोल त्याचे ||२||
दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....
ती :
लहरून वारा मंद धुंदला
अस्सा झोंबला अस्सा कुंदला
लगडून जायी सार्या शरीरा
सावरून घेई मला तुच आता जवळ ये ||३||
दोघे :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०६/२०१०
प्रतिक्रिया
23 Jun 2010 - 11:00 am | निरन्जन वहालेकर
वा ! क्या बात हैं, पाषाणभेद साहेब ! एकदम मस्त गाणे !
23 Jun 2010 - 2:31 pm | स्मिता_१३
छान कविता.
ते उगाच "तान, स्वर, आ आ आ" काढा बुआ. (पटले तर :-) ) अजुन छान वाटेल कविता !
स्मिता
23 Jun 2010 - 5:34 pm | मीनल
भावना शब्दात बसल्या आहेत असे वाटते .
पण ते "तान, स्वर, आ आ आ" काढा बुआ. (पटले तर )"
:)
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
23 Jun 2010 - 6:09 pm | शुचि
खूपच सुंदर
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||