आपली व्यक्तिपूजा

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जे न देखे रवी...
21 Jun 2010 - 12:22 pm

एका आवडलेल्या कवितेचा भावानुवाद ..

आपली व्यक्तिपूजा

तुम्ही आम्ही, या देशातील व्यक्ति-पुजारी आम जनता
केवळ व्यक्तीरूप मूर्ति शोधतो .. घडवतो. ..
वंदण्याकरता पूजेकरता ..
हार घालण्याकरता .. आरत्या करण्याकरता ..
मैदानातल्या मांडवात
स्थापना करण्याकरता ..

पुतळ्यांचा वारसा प्रवाहमान आहे आमच्या या धमण्यांत
म्हणूनच "मूरत" आणि "सूरत" शिवाय मन रमत नाही.
कुठे व्यक्तीरूप मूर्ति; कुठे मूर्तिरूप ईश्वर
स्वत:च घडविलेल्या मूर्ति
आणि नंतर स्वत:च त्यांना समर्पित होणे
कधी झालाच अपेक्षाभंग तर त्याच जागी ती मूर्ति पाडून दुसरी बसविणे

पुष्पांची माला हातात; चैत्राच्या वणव्यात मी उभी राहते
रस्त्याच्या कडेला तास अन् तास; सतृष्ण नयनांनी

आम्ही स्वत:च घडविलेली ती देवी वा देवता
काळ्या काचेच्या पल्याडहून
क्षणभर कृपादृष्टिचा एक निक्षेप जरी करेल
तरी समजेन धन्य झाले मम जीवन -
स्वप्न विकणार्‍यांची एक स्वप्नवत झलक पाहून.

थकल्या नेत्रांनी राज रथांची यात्रा येताना दिसते.
पापणी लवताच तोवर मोटारगर्दी निघून जाते.
माझ्या क्लान्त, श्रान्त व क्षुधार्त चेहर्‍यावर धूळ फेकून

हातातली फुले तशीच राहून जातात.
हत-विव्हळ इतःस्तत
एका असहाय जाणिवेने फुले त्या रथांकडे सोडते.
रेडीयल टायरांखाली त्यांचा चुराडा होतो.
सोबत भंगतात आमची शत शत अपूर्ण व खोटी आश्वासने ..
आणि आम्हीच निर्मीलेली आमची (तथाकथित) प्रेमळ मूर्ति !

करुणशांतरसकवितामुक्तकसमाज

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jun 2010 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे

व्यक्तिपु़जा ही बर्‍याच लोकांची मानसिक गरज असते. उत्तम भावांकित कविता
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

यशोधरा's picture

21 Jun 2010 - 1:55 pm | यशोधरा

छान. सुरेख.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2010 - 9:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुरेख!

ऋषिकेश's picture

21 Jun 2010 - 2:56 pm | ऋषिकेश

मूर्तीपूजा सर्वत्र, सर्वच धर्मात आढळते.. कोणाची मूर्ती मानवी असते, काहिंची वस्तुरूपी (पुस्तक, कबर, क्रॉस)

चांगली कविता

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करतो.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

अवलिया's picture

21 Jun 2010 - 6:35 pm | अवलिया

छान !

--अवलिया

विसोबा खेचर's picture

21 Jun 2010 - 10:17 pm | विसोबा खेचर

मी किशोरदा, ऋषिदा, अण्णा, बाबूजी, दीदी, पंचमदा, मधुबाला यांची व्यक्तिपूजा करतो...

त्यांच्यातला असामान्य कलाकाराची पूजा करता करता मी त्यांच्या व्यक्तिपुजेपर्यंत पोहोचलो आहे आणि जी मी यापुढेही नेहमी करत राहीन..

तात्या.