उद्या दहावीचा निकाल आहे १७-जून-२०१०
खालील अधिकृत संकेतस्थळावर सकाळी ११ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील
वरील अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त http://www.rediff.com/ या संस्थळावरही उपलब्ध होणार आहे अशी बातमी आहे. पण अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहिलेला उत्तम.
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा :)
- सागर
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 12:00 am | अविनाशकुलकर्णी
तळे , नद्या ,या ठिकाणची गस्त वाढवा..झुरळ ..ऊदिर मारण्याची आउशधे लपवा..पाल्यास एकटा बाहेर सोडु नका..कमकुवत पाल्ये अपयशाने खचुन चुकीचा मार्ग धरतात..सा~यांना शुभेछ्या
17 Jun 2010 - 12:33 am | टारझन
माझा निकाल दिसत नाहीये :( निकालात निघाला बहुतेक :((((
-- टारझन
निकाल निकाल .. सब कुछ निकाल
17 Jun 2010 - 12:39 am | शानबा५१२
निकल बघण्याआगोदर येथे
जावे 'जोर का झटका,धीरे से लगे' ची प्रचिती होइल.
17 Jun 2010 - 2:25 am | योगी९००
चांगली लिंक आहे..
कोल्हापुरची तुळजाभवानी नसून कोल्हापुरची अंबाबाई असे हवे होते.
खादाडमाऊ
(आई, जगदंबे, सगळ्यांना त्यांचा अपेक्षेप्रमाणे मार्क मिळू देत गं बाई)
17 Jun 2010 - 9:28 am | मिलिंद
नाहीतर एनआयसीचा सर्व्हर बोंबलायचा जास्त ट्रॅफिकने
www.rediff.com/exams
www.studyssconline.com
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
http://sscresult.mkcl.org
17 Jun 2010 - 11:24 am | पाषाणभेद
माझा भाचा परीक्षा उत्तीर्ण झाला. ८५.६४% गुण मिळाले. तुम्ही दिलेल्या सायटींवरून निकाल बघीतला.
समद्या ठिकाणी सारखेच गुण आसल्याचे पाहून डोळे पाणावले. काय टेक्नालाजी हाये भाऊ. जराशीक गोंधळ नाय. आमच्या येळी पेप्रात नंबर यायचा. आन पास का नापास एवढंचं. बास.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
17 Jun 2010 - 2:11 pm | योगी९००
सागर आणि मिलिंद , तुमचे आभार..येथे लिंक्स दिल्याबद्दल.
माझी भाची ७५ % आणि दुसरा भाचा ८० % गुण मिळवून उत्तिर्ण झाली. त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन..
पण एक गोष्ट जाणवली. हे प्रतिशत best of five subjects च्या नुसार काढले गेले आहेत. ते काही तितकेसे पटले नाही. आमच्या वेळी हा प्रकार असतात तर मला ९०% पेक्षा जास्त मिळाले असते. (मराठीमुळे माझे प्रतिशत कमी होऊन ८५.८५ % वर आले.... जरी मराठी माध्यमातून शिकलो तरी..)
खादाडमाऊ
17 Jun 2010 - 7:47 pm | टारझन
आपल्या प्रतिसादात कोदा दिसले :)
18 Jun 2010 - 2:06 am | योगी९००
नाही हो.. इतकी माझी लायकी नाही...!!!
पण कधी कधी मला स्वतःचे कौतूक करायला आवडते...त्यामुळे आत्मविश्वास वाढतो..(असे माझे स्वतःचे मत आहे..IT मध्ये काम केल्याचा परीणाम दुसरे काय..?)
खादाडमाऊ
17 Jun 2010 - 2:13 pm | अवलिया
जे मिपासदस्य पास झाले त्यांचे अभिनंदन.
जे फेल झाले त्यांनी निराश होवु नये
--अवलिया
17 Jun 2010 - 2:16 pm | II विकास II
जे मिपासदस्य पास झाले त्यांचे अभिनंदन.
जे फेल झाले त्यांनी निराश होवु नये
अगदी छान लिहीलेत, नाना.
बाकी तो शुध्दलेखनाचा लेख दिसत नाही तुझा.
17 Jun 2010 - 2:14 pm | अर्धवट
तुमच्या मुलाला/तुम्हाला किती टक्के मार्क पडले असे विचारणारी जमात म्हणजे कोंबड्यांच्या झुंजीत कोंबडे रक्तबंबाळ झाल्यावर टाळ्या पिटणारयांपैकी आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ;) (मत वैयक्तीक बरकां.. कारण आम्हाला कधी चारचौघात सांगावे असे मार्कच पडले नाहीत.)
असो पण आता पडलेच आहेत मार्क तर अभिनंदन.
17 Jun 2010 - 6:08 pm | मीनल
माझ्या नणंदेच्या मुलाला ओव्हऑल ९६%. टॉप फाय आणि स्पोर्ट्स मिळून ९९.०९ %. भारतात हेच मार्क कॉलेजच्या प्रवेशासाठी ग्राह्य ठरतील असे कळले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
17 Jun 2010 - 6:20 pm | वेताळ
१०० % मार्क घेवुन उत्तीर्ण झाले आहेत काही लोक ह्या परिक्षेत...
२००८ ला माझ्या ओळखीचे दोन विद्यार्थी ९५% मार्क घेवुन उत्तीर्ण झाले होते,पण त्याना १२ वीत सत्तरी देखिल गाठता आली नाही.
वेताळ
17 Jun 2010 - 6:23 pm | मीनल
नाही हो. खरेच मिळाले आहेत ९९.०९%
बंडल मारून मला काय मिळणार?माझे मार्क थोडेच आहेत ते ?
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
17 Jun 2010 - 6:36 pm | विनायक पाचलग
यात खेळाच्या २५ गुणांचा वाटा आहे हो वेताळ दादा
...
एका ठिकाणी एकाला १०० % पडले आणि त्याला खेळाचे गुण २५ च्या ऐवजी १९ च दिले गेले .
कारण नाहीतर मार्क ६५६/६५० असे काहिसे होतात...
नाद खुळा
असो
सर्वाना शुभेच्छा !!!!!!!!!!
( एका परिक्षेमुळे असेच २५ गुण हुकलेला ) विनायक पाचलग
वाँट टु टॉक
17 Jun 2010 - 6:34 pm | II विकास II
आवडले दुवे.
ज्यांचे सगळ्यांचे निकाल पाहीले ते सगळे उत्तीर्ण झाले.
मनपुर्वक ध्नय्वाद.