प्रेरणा क्रांतीताईंची सुंदर गझल नको तेच झाले
असो...
विरझण घाली; असेही, तसेही
जरी फोल दावे; असेही, तसेही
जरा बोलता तो; विरोधात काही
युसलेस बोले; असेही, तसेही
किती बरळावे? मुल्य लेखनाचे
माकडे टंकती; असेही, तसेही
उडे लेखनही, न लावता काड्या
पुरावेच देई; असेही, तसेही
फुका बोलबाला स्थळपालटाचा,
इनो फार झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भांडण्याची?
कंपुबाज सारे; असेही, तसेही
काव्य कर्तनाने पडे फरक का?
विडंबन पाडे; असेही, कसेही
अवांतर सुचना: व्रुत्त आणी व्याकरण अर्धविराम तपासत बसु नये बसलात तरी मला काही फरक पडत नाही
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 2:54 pm | सहज
चेतनजी हे विडंबन "त्यांना" अर्पण हे वाक्य राहीलेच की :-)
(विडंबनप्रेमी) सहज
14 Jun 2010 - 3:17 pm | चेतन
मी "त्यांना" काहीच म्हटलेले नाही.
असे असूनही, सहज, तू का उगाच पेटवणीला लागला आहेस ? ;)
मी एवढेच म्हणतोय, की विडंबनाची किंमत शून्य.
मूल्याविषयी प्रत्येकाने ठरवावे.
14 Jun 2010 - 3:24 pm | सहज
शाबास!
त्यांना नक्की आनंद होईल मुल्यवर्धन करणारे सदस्य पाहून.
15 Jun 2010 - 3:53 pm | आंबोळी
छान झालय रे चेतन...
आंबोळी
15 Jun 2010 - 10:33 pm | मिसळभोक्ता
छान विडंबन !
आवडले.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
16 Jun 2010 - 10:10 am | चेतन
सहज, आंबोळी धन्यवाद. मिभोशेठ हलकचं घेतल्याबद्दल स्पेशल धन्यवाद.
चेतन