शुभ् प्रभात!!
मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय.
(कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!! शेवटी लेखणी दिली ठेवून अन कॅमेरा हाती घेतला. तर माझ्या अंगणी "सर" या शब्दाने मांडलेल्या खेळाच्या फोटोंचा हा "अल्बम ".)
शब्दखेळ
सर सर शिरवा; मनी गारवा ; पुन्हा श्रावण आला ग!
कंठी लेवून सर मोत्यांचा कुणी मिरवीते बाला ग!
सर येताच वर्गावरती कोलाहल तो शांतवला;
'सर' होऊन चेंडू फळीचा; कुणी लॉर्डस ही गाजविला!
सर सर कापीत अंतर वारू; वाऱ्यासव कुणी उधळविला,
सर करुनी किल्ला परतून तान्ह्याने (मालुसरे) भगवा फडकविला.
'सर आन्खोपे तुझे मागणे' म्हणुनी कोणी तुकवी मान.
'सर हाथोपे' घेवून तुडवी सैनिक रोज अनोखे रान.
सरळ चालली सरला तिजला सरपंच मधी भेटला,
बरे जाहले; फेरा चुकला; म्हणून अर्ज तिने सरकवला.
'सरवट' 'सरबत' दोघे भाऊ; थंडाव्याशी निगडीत,
'सर ना जरा' म्हणून कोणी भांडण खोका उघडीत.
"सर न यायची कुणास माझी " गर्व कुणाला झाला फार,
" सरण " शेवटी तुम्हा आम्हा ते करावया भवं सागर पार!!
सर्व प्रश्नान्ची उत्तरे दिली जातील्!!(अर्थात पडले तर)
प्रतिक्रिया
18 May 2010 - 11:00 am | अरुण मनोहर
सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर
सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर सरमिसळ मिसळपाव पावरोटी रोटी जाडसर
18 May 2010 - 11:04 am | रामदास
अरुण मनोहर यांचा प्रतिसाद दोन्ही कळले नाही.
18 May 2010 - 11:09 am | अरुण मनोहर
शर दिनी दिनी झेलून दिमाग का धही हो गयेला हयं बाप!
18 May 2010 - 12:25 pm | स्पंदना
चुकीची झाली की काय कविता?
कालचा स्ट्रॉन्ग डोस उतरावा म्हणुन जरा साधी सोपी कविता टाकावी म्हन्टल,तर.....
आत्ता मलाच गोन्धळल्या सारख वाटायला लागलय.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
18 May 2010 - 12:34 pm | jaypal
आप्ल्या जबाबदरी वर त्यांच्या कविता वाचा आणि सगळ्या एकदम वाचु नका म्हणुन. भोगा आता कर्माचि फळं
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 May 2010 - 1:10 pm | स्पंदना
~X( @) #:S :S
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
18 May 2010 - 1:32 pm | राजेश घासकडवी
सरफरोशी की तमन्ना आज अपने दिल मे है....
कविता वाचून बाजू ए कातिल चा जोर फारच प्रचंड आहे असं जाणवलं...
18 May 2010 - 1:38 pm | वेताळ
एका कडव्याचा दुसर्या कडव्याशी काहिएक संबध दिसत नाही.
सर सर शिरवा; मनी गारवा ; पुन्हा श्रावण आला ग!
कंठी लेवून सर मोत्यांचा कुणी मिरवीते बाला ग!
ह्या ओळी विशेष आवडल्या.
वेताळ
18 May 2010 - 2:05 pm | मेघवेडा
तर माझ्या अंगणी "सर" या शब्दाने मांडलेल्या खेळाच्या फोटोंचा हा "अल्बम ".
हे लिहिलंयत म्हणून बरं नाहीतर 'ही बै कैच्या कैच लिहिते' अशा प्रतिक्रिया आल्या असत्या! ;)
बाकी एका ओळीचा दुसरीशी संबंध नसला तरी कविता छान. आपल्याला बाबा आवडली!
चालू द्या! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 May 2010 - 7:19 pm | sur_nair
कसली कसर बाकी ठेवली नाही या 'सर'च्या सर्कशीत.
20 May 2010 - 2:01 pm | पक्या
'सर' ह्या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारी कविता आवडली. ..(अगदी हिंदी आणि इंग्लिश मधील पण अर्थ) जरी एका कडव्याचा दुसर्या कडव्याशी संबंध नसला तरी वाचायला मजा आली. एकाच शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने किती वेगवेगळ्या छटा असतात हे अशापध्द्तीने मुलांना शिकवायला सोपे जाईल. नविन काव्यप्रकार शोधलात की आपण (नसेल तर) :)
- जय महाराष्ट्र , जय मराठी !