मनातले थोडेसे..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
5 May 2010 - 8:46 pm

९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही.
स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध!
आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. हे स्वप्नवत वाटतं आहे..
नक्की कशा शब्दांत माझ्या भावना व्यक्त करव्यात समजत नाहीये. कवितेशी जवळीक तशी लहानपणीच झाली होती. आईने रूजवलेलं ते कवितेचं बीज काही वर्षं सुप्तावस्थेत राहूनही मेलं नाही.. तग धरून राहिलं. आणि थोडंसं खत पाणी मिळताच अंकुरलं आणि जोमाने वाढलं सुद्धा. मी कविता लिहायला, माझं अमेरिकेत येणं जरूरी होतं का ?? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये मला. गेल्या ४ वर्षात माझी बाळबोध कविता प्रगल्भ होऊ लागली आहे. कित्ती प्रकारे मी कवितेवर प्रेम केलं असेल! काही कविता तर रात्री अडीच वाजता उठून लिहिलेल्या आठवतात मला.
एक गोष्ट मात्र नक्की, ऑगस्ट २००८ मध्ये मिसळपावची निर्मिती झाली, इथूनच प्राजुच्या कवितांना पंख फुटले. सुरूवातीच्या कवितांमध्ये , वृत्त मात्रांच्या नियमांना धाब्यावर बसवून काहीहि... अक्षरशः काहीही लिहिलं आहे मी! तेव्हा ज्या सदस्यांनी हे अत्याचार सहन केले, कानपिचक्या दिल्या त्यांच्याच प्रयत्नांना आलेलं हे फळ आहे असं म्हणेन मी. इथे आवर्जून नावे घ्यायची झाली, तर, प्रमोद देव काका, सर्किट्(मिसळमोक्ता), स्वातीताई राजेश, स्वातीताई दिनेश, लिखाळ, केशवसुमार, चतुरंग, शितल, इनोबा, आनंदयात्री, मदनबाण, बेसनलाडू, ऋषिकेश, नाना चेंगट्(अवलिया), बिपिनदा, सहजराव, बिरूटेसर..धोंडोपंत , तात्या.. यादी खूप मोठी आहे. मिपाच्या सुरूवातीच्या काळात ज्यांनी ज्यांनी माझ्या कविता सहन केल्या, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कदाचित माझ्या नावापुढे 'कवयित्री' लावायची संधी मला मिळाली.
गझल शिकण्यासाठी उत्तम गझलकार आणि विडंबन सम्राट अनिरूद्द अभ्यंकर उर्फ केशवसुमार यांना मी किती त्रास दिलाय.. ते फक्त त्यांना आणि मलाच माहिती! संदीप चित्रे.. !आम्ही दोघेही मायबोलीच्या गझल कार्यशाळेमध्ये सामिल झालो होतो.. आणि त्यानंतर लिहिलेली प्रत्येक गझल एकमेकाला पाठवून पॉलिश करत होतो. इतकं होऊनही अजूनही मी गझलेसाठी धडपडते आहेच. मीनल..!! हीच्या सहनशक्तीची तर कमालच आहे. हिच्याकडे कुठून इतकी सहनशक्ती आली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! असो.. तिची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वृद्धींगत होऊदे अशीच प्रार्थना करते.
"फुलांची आर्जवे" .. हो! माझा.. या प्राजक्ताचा ..पहिला वहिला कविता संग्रह! पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं... इथे .. अमेरिकेत, तेव्हा प्रचंड खळबळ चालू होती मनांत. का? नाही सांगता येणार. हे चित्र.. माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं आहे., हे मनोगत.. मी, माझ्या पुस्तकासाठी लिहिलेलं आहे, ही अर्पण पत्रिका.. मी लिहिलेली आहे, मलपृष्ठावरचा हा फोटो.. माझा आहे! या कविता... मीच लिहिलेल्या.. माझ्या मित्रमैत्रीणिंनी कौतुक केलेल्या आहेत. हे.... हे.. माझं पुस्तक आहे!! या सगळ्यांवर विश्वास बसायला फार वेळ लागला.
गेल्या वर्षी जुलै मध्ये आई भारतात परतताना माझ्या ५० -६० कविता एका सिडीवर कॉपी करून घेऊन गेली होती. सप्टेंबर मध्ये तीने त्याच्या प्रिंट्स काढून दिलिपराज प्रकाशन, पुणे, यांच्याकडे पाठवून दिल्या.. २ महिने इतके अशक्य गेले!! काय सांगू?? वाटलं प्रकाशकांनी कवितांना कचरापेटी तर नसेल ना दाखवली..! आणि एकेदिवशी समजलं प्रकाशक कविता संग्रह काढणार आहेत. त्या दिवसापासून आजपर्यंत काय काय झालं असेल ते फक्त मलाच ठाऊक आहे.
९ मे २०१०, माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे,आणि ते ही माझ्या अनुपस्थितीत. चालयचंच! इतकी मोठी गोष्ट देवाने पदरात घातलीये.. तर छोट्याश्या गोष्टीसाठी उदास कशाला व्हायचं!
आज जर स्वतःला यशस्वी समजायचं म्हंटलं, तर या यशामध्ये माझ्या आईच्या बरोबरीने वाटा कोणाचा असेल तर तो मिसळपाव चा आहे. हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की, या मिसळपावच्या संपादक मंडळात मी आहे. मिसळपाव आणि मिपाकर यांना धन्यवाद मी नाही देणार, कारण यांच्या ऋणात मला रहायचं आहे.

एक मिपाकर म्हणून, माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला माझ्या मिपाकर मित्रमैत्रीणींनी जरूर उपस्थित रहावे असा हट्ट करते आहे. प्राजु आणि मिसळपाव यांच्यावतीने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ :
चित्तरंजन वाटिका,
"जिव्हाळा", वसुंधरा वाचनालय हॉल,
मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे

वेळ : ९ मे २०१०, सकाळी १०.०० वाजता.

मान्य आहे मला, रविवार सकाळ आहे.. उशिरा उठण्याचा हक्काचा दिवस आहे.. पण तुमच्या या मैत्रीणीसाठी हा एकच दिवस थोडंसं लवकर उठून नक्की उपस्थित रहा... अशी मी विनंती करते. कोणाला शक्य असेल तर, इथे वृत्तातही लिहावा. मला वृत्तांत तरी वाचायला मिळेल.
आणखी काय मागू मी ?

- प्राजु

मुक्तकप्रकटनबातमीआस्वाद

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

5 May 2010 - 9:47 pm | मेघवेडा

सध्या फक्त

=D> =D> =D> =D> =D>

=D> =D> =D> =D> =D>

इतकंच.. सविस्तर प्रतिसाद घरी जाऊन देतोच प्राजुतै..

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रभो's picture

5 May 2010 - 9:54 pm | प्रभो

तुझ्याबरोबर मलाही मस्त भेट मिळाली असे म्हणेन...

९ तारखेला माझा वाढदिवस आहे.. :)

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 9:53 pm | इंटरनेटस्नेही

अभिनंदन!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

आणि तुमचा अभिमान वाटतो हेही नमूद करायलाच हवं.

आमंत्रण पत्रिका आवडली.

स्वाती२'s picture

5 May 2010 - 9:57 pm | स्वाती२

अभिनंदन प्राजु !

भानस's picture

5 May 2010 - 10:02 pm | भानस

प्राजु, अभिनंदन व अनेक शुभेच्छा! आगे बढते रहो..... :).

ऋषिकेश's picture

5 May 2010 - 10:10 pm | ऋषिकेश

प्राजुतै मनापासून हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D>
मनोगत थेट मनातून उतरलं आहे.. खूपच सुरेख..
या रविवारी मला मुंबईतच थांबणे मस्ट आहे. तेव्हा तुला इथुनच भरघोस शुभेच्छा!

जियो!!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

शुचि's picture

5 May 2010 - 10:13 pm | शुचि

अभिनंदन प्राजक्ता : )
कालच एक छानसं "मोटीव्हेशनल" पुस्तक वाचत होते. त्यात लिहीलं होतं - स्वतःला शाबासकी देणं फार महत्त्वाचं असतं.
जरूर तुझी पाठ थोपट. Give yourself a nice treat for this hardwork.
______________________________
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रमोद देव's picture

5 May 2010 - 10:29 pm | प्रमोद देव

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

अनामिक's picture

5 May 2010 - 11:02 pm | अनामिक

खूप खूप अभिनंदन...

-अनामिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2010 - 11:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन आणि शुभेच्छा....!
प्राजु मॅम, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. :)

-दिलीप बिरुटे

अभिनंदन आणि प्रकाशन समारंभासाठी शुभेच्छा! :)

चतुरंग

बेसनलाडू's picture

6 May 2010 - 12:35 am | बेसनलाडू

(शुभेच्छुक)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

5 May 2010 - 11:14 pm | नितिन थत्ते

मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी सदिच्छा.

नितिन थत्ते

मीनल's picture

5 May 2010 - 11:27 pm | मीनल

=D>
अश्याच उंच आकाशी भरा-या घे. पण पाय जमिनीवर ठेऊन !

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

धनंजय's picture

5 May 2010 - 11:42 pm | धनंजय

प्रकाशनसमारंभासाठी अनेकानेक शुभेच्छा!

स्पंदन's picture

5 May 2010 - 11:54 pm | स्पंदन

मनःपुर्वक अभिनंदन. निमंत्रण पत्रिक एकदम सुरेख, व तुमच्या शब्दातील निमंत्रण ही एकदम झक्कस. प्रकाशनसमारंभासाठी अनेकानेक शुभेच्छा

मुक्तसुनीत's picture

6 May 2010 - 12:43 am | मुक्तसुनीत

मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी सदिच्छा.

संदीप चित्रे's picture

6 May 2010 - 1:02 am | संदीप चित्रे

कार्यक्रमासाठी आणि अनेक उत्तमोत्तम कवितांसाठी शुभेच्छा !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विकास's picture

6 May 2010 - 2:03 am | विकास

अभिनंदन प्राजू! तुझे तसेच घरातील सर्वांचे ज्यांनी तुला प्रोत्साहन दिले!

=D> =D> =D> =D> =D>

=D> =D> =D> =D> =D>

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नंदन's picture

6 May 2010 - 2:45 am | नंदन

आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

6 May 2010 - 5:57 am | चित्रा

प्राजु,
मस्त!
तुझ्या प्रयत्नांना आणि अभ्यासाला यश मिळालेले दिसतेच आहे. तेव्हा मनापासून अभिनंदन आणि तुझी अशीच खूप प्रगती होत राहो अशा शुभेच्छा.

अरुण मनोहर's picture

6 May 2010 - 9:31 am | अरुण मनोहर

खूप खूप शुभेच्छा. आणखी खूप यश बघायचे आहे.

>>>कोणाला शक्य असेल तर, इथे वृत्तातही लिहावा. मला वृत्तांत तरी वाचायला मिळेल.<<<- म्हणजे काय? तुम्ही जाणार नाही का?

समिधा's picture

6 May 2010 - 9:50 am | समिधा

मनःपुर्वक अभिनंदन आणि प्रकाशन समारंभासाठी शुभेच्छा.
तुझ्या कवितांचे अनेक संग्रह प्रकाशित होवोत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मदनबाण's picture

6 May 2010 - 10:00 am | मदनबाण

प्राजु ताई तुझे मनःपूर्वक अभिनंदन !!! :)

मदनबाण.....

Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER

पर्नल नेने मराठे's picture

6 May 2010 - 10:42 am | पर्नल नेने मराठे

मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

चुचु

दत्ता काळे's picture

6 May 2010 - 11:06 am | दत्ता काळे

प्राजुताई,

मी प्रकाशन समारंभाला नक्की येणार.

श्रीराजे's picture

6 May 2010 - 11:22 am | श्रीराजे

अभिनंदन!

समंजस's picture

6 May 2010 - 11:26 am | समंजस

अभिनंदन!!
=D>

रानी १३'s picture

6 May 2010 - 11:39 am | रानी १३

अभिनंदन!!!!!

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 11:46 am | इन्द्र्राज पवार

मनःपूर्वक अभिनंदन.....!!!
प्रमुख पाहुण्यापैकी एक "श्री. लक्ष्मीकांत देशमुख" जे सध्या आमच्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांची या ना त्या निमित्ताने मित्रांसमवेत गाठ भेट होत असते.... आता तुम्ही दिलेल्या या निमंत्रणाच्या निमित्ताने आजच त्यांची भेट घेण्यासाठी दोन समविचारी मित्रांना संदेश देईन आणि "फुलांची आर्जवे" बाबत (आपल्या या निवेदनाच्या आधारे...~~ आपले हे मॅटर मित्रांना ई-मेलने दिले तर चालेल ना?) बोलण्याची संधी घेण्यास सांगत आहे..... कितीही घाईत असले तरी साहित्य संदर्भात श्री. देशमुख वेळ काढतात हा माझा अनुभव आहे.

पुस्तक प्रकाशन समारंभासाठी हार्दिक शुभेच्छा...... फुलांच्या आर्जवा निमित्ताने..... या पुढेही मराठी शारदेच्या प्रांगणात प्राजक्त्ता पटवर्धन यांचे नाव अशाच फुलासारखे बरसू दे !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु's picture

6 May 2010 - 6:46 pm | प्राजु

हो जरूर. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

निरन्जन वहालेकर's picture

6 May 2010 - 2:01 pm | निरन्जन वहालेकर

अभीनन्दन ! ! मनःपूर्वक शुभेच्छा ! ! !

प्राजु's picture

6 May 2010 - 6:45 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

स्वाती दिनेश's picture

6 May 2010 - 6:48 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

टुकुल's picture

6 May 2010 - 6:56 pm | टुकुल

अभिनंदन !!

--टुकुल

घाटावरचे भट's picture

6 May 2010 - 7:33 pm | घाटावरचे भट

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

विमुक्त's picture

6 May 2010 - 11:45 pm | विमुक्त

प्राजुताई,

खूप खूप अभिनंदन... पुण्यात असलो तर नक्की येणार समारंभाला...

मिहिर's picture

7 May 2010 - 12:02 am | मिहिर

कोल्हापूर सकाळच्या मुक्तपीठ मध्ये वाचले आज तुझ्याबद्दल.

टिउ's picture

7 May 2010 - 12:27 am | टिउ

अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी हार्दीक शुभेच्छा... :)

स्पंदना's picture

7 May 2010 - 12:44 pm | स्पंदना

=D> =D> <:P =D> =D>

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2010 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

प्राजुतै मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

डावखुरा's picture

7 May 2010 - 1:10 pm | डावखुरा

प्राजुतै....मनापासुन अभिनंदन....!!
=D> =D> =D>
आमंत्रणही खुमासदार शैलीत लिहिलेय...

पण तुम्ही असतात तर अजुन आनंद वाट्ला असता...
पुलेशु..

[कार्यक्रमाला येण्याचा विचार चालुये..]
-----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

=D> =D> =D>
वेताळ

मनीषा's picture

7 May 2010 - 3:13 pm | मनीषा

अभिनंदन प्राजु!!!

मी जुन मधे पुण्याला जाणार आहे तेव्हा तुझा कवितासंग्रह नक्की विकत घेईन ...

ज्ञानेश...'s picture

7 May 2010 - 4:02 pm | ज्ञानेश...

आगे बढो ! =D>

पिंगू's picture

7 May 2010 - 7:37 pm | पिंगू

अभिनंदन प्राजुताई!!!!!!
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

प्राजु's picture

7 May 2010 - 7:47 pm | प्राजु

पुन्हा एकदा मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

दिनेश५७'s picture

8 May 2010 - 9:23 am | दिनेश५७

अभिनंदन ! ! मनःपूर्वक शुभेच्छा ! ! !

स्वाती राजेश's picture

8 May 2010 - 3:33 pm | स्वाती राजेश

मनात असून सुद्धा कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहता येत नाही याचे दु:ख होत आहे. :(
मनःपूर्वक शुभेच्छा! आणि अभिनंदन!!!
मि.पा.वर तुझ्या सगळ्या कवितांचा आम्ही मनापासून आनंद घेतला आहे.
यापुढेही तुझ्या अशाच कविता आम्हाला वाचायला मिळू देत... :)

ईन्टरफेल's picture

8 May 2010 - 4:01 pm | ईन्टरफेल

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> ........................ एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि

वल्लरी's picture

8 May 2010 - 6:57 pm | वल्लरी

अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा प्राजु...

---वल्लरी

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 9:52 am | विनायक पाचलग

खुप खुप शुभेच्छा !!!
मराठी महाजालाने साहित्य विश्वावर जो प्रभाव पाडला आहे ,त्याचे हे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते..
अभिनंदन प्राजु तै......
परवा दिवशी देशमुख सराना फोन झाला त्यावेळेला याविषयावरही चर्चा झाली.......
विनायक

विष्णुसूत's picture

10 May 2010 - 3:56 am | विष्णुसूत

वाचुन अतिशय आनंद झाला. अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !