आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 Apr 2010 - 12:28 am

ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्‍यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा..

आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे..

मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!)

"तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले.

मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली. आत्ताच सामना संपला आणि आण्णाचा छद्मी हास्य असलेला फोन आला,

"काय तात्या, तुझ्या सचिनच्या भरवश्याच्या म्हशीने दिला की नाही टोणगा? उद्या भेटतोय तुला. २५ रुपये तयार ठेव! अरे लेका तुला एवढं समजत नाही? मुंबै इंडियन्सच्या खेळाडूंच्या घरी भरपूर रक्कम पोहोचती झाली असणार आणि म्हणूनच मुंबै इंडियन्सवाले हारले..त्यांना अगदी सहज शक्य असलेलं अवघं १६८ धावांचं आवाहनही त्यांनी (मुद्दाम) पुरं केलं नाही आणि हरले! अगदी रीतसर आणि ठरवून!

आता यावर मी काय बोलणार? आण्णाचं म्हण्णं खोडूनही काढता येत नाही.. उद्या सक्काळी ७ वाजता दारात हजर होईल भोसडीचा. २५ रुपये घ्यायला! :)

असो, आता पुन्हा पुढच्या आयपीएलच्या सामन्यांत भेटू.. :)

तात्या.

क्रीडाअर्थकारणविचारमतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2010 - 12:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, परस्पर पंचवीस रुपये देऊन टाकायचे. एक तर म्याच हरल्यामुळे झोप येईना. त्याच्यात तुमचा धागा म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटलं...! :(

च्यायला, आज मुंबैची सुरुवात लैच पुचकी झाली. १६८ काय अवघड नव्हते. त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं !
हूट साला, आपला दिवसच नव्हता आज...! :(

-दिलीप बिरुटे
[मुंबईचा पराभवाने नाराज झालेला]

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 12:51 am | विसोबा खेचर

त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं

तेच तर आण्णा पळसुल्याही म्हणतो की हा सगळा सट्ट्याचा परिणाम आहे.. मुंबै इंडियन्सवाल्यांना हारण्याकरता पोत्यानं पैसे दिले म्हणतात..

बरं आण्णा पळसुल्याला खोडूनही काढता येत नाही कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन..

तात्या.

टारझन's picture

26 Apr 2010 - 1:18 am | टारझन

पोलार्ड ला थोडा अजुन लेट पाठवायला हवा होता हे माझं प्रांजळ मत आहे :)
बाकी जहिर खान चं कॅचिंग स्किल क्या केहने :) कोण ते दोघे जणे ... कॅच सोडला म्हणुन टिका होते आहे. पण त्यांनी स्वत:ला इंज्युर्ड होण्यापासुन वाचवलं .. किती ही समजदारी :)

समंजस's picture

26 Apr 2010 - 11:24 am | समंजस

कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन..

तात्या बाकी हे खरं आहे.......:)

काही दशकांआधी धनाढय लोकांचं मनोरजंनाचं आणि सट्ट्याचं साधन हे महालक्ष्मी रेसकोर्स वर होत असलेल्या घोडयांच्या शर्यती होत्या त्यांची जागा आता आइपीएल ने घेतलेली दिसतेय.....:)
काळ बदलला तसा खेळ प्रकार बदलला पण मुळ कारण मात्र तेच आहे :>

टारझन's picture

26 Apr 2010 - 1:15 am | टारझन

हाहाहाहा ... चेन्नईचा जेवढा स्कोर झाला तेवढाही झाला नसता.
सुरुवातीपासुनंच सगळा ड्रामा चालु असलेलं दिसत होतं =))
पैशाचा गमजा आहे सारा :)
बाकी तात्या २५ रुपये हरल्यामुळे २ मिनीटं शांतता पाळुन शोक व्यक्त करतो

-टारझन
इकडे भेळ , तिकडे खेळ

संदिप शेलार's picture

26 Apr 2010 - 1:32 am | संदिप शेलार

मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे. हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा.
खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.

-संदिप शेलार

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 1:51 am | विसोबा खेचर

मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे.

कल्पना आहे मला. हा माझां ब्लॊग नसून हे माझं संकेतस्थळ आहे! ब्लॊग आणि संकेतस्थळामधील फरक मी जाणतो..!

हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा.

आम्ही कुणाचीही हुकूमवजा भाषा जुमानत नाही.. विनंती केली असतीत तर एक वेळ विचार केला असता!

खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.

केवळ गप्पा मारण्याकरता नव्हे. या धाग्यात आजच्या सामन्याविषयी चर्चा, आयपीएल मधील सट्ट्याचे अर्थकारण इत्यादी गोष्टींवर चर्चा व्हावी असे वाटते..

तात्या.

हुप्प्या's picture

27 Apr 2010 - 1:55 am | हुप्प्या

तुमच्यासारख्या लोकांची मनोगते वाचायला मिळते हे मिसळपाववरचे एक आकर्षण आहे. तुम्ही मस्त लिहित र्‍हावा. उगाच कुणाचे टीका ताशेरे मनावर घेऊ नका.
आमच्या सारखे तुमचे लिखाण आवडीने वाचणारे अनेक आहेत याची खात्री आहे.
असो.

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 2:33 am | डावखुरा

तात्या...
कोण पैशासाठी खरंच हरायला तयार होईल का?
मी आज फायनल म्हणुन आय.पी.एल.चा साम्ना पहिल्यांदा पुर्ण पाहिला..
पण सचिनने उडवलेला झेल...???????
अभि..नायर ची प्लेट करताच पळ्ण्याची घाई....
आनि पोलार्ड चा (घसर्लेला) क्रमांक
???????????????????????????????

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

सुचेल तसं's picture

26 Apr 2010 - 2:51 am | सुचेल तसं

खेळात हार-जीत होत राहते. तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही. त्याची काय इच्छा नव्हती आयपीएल जिंकायची? कदाचित शेवटची आयपील असेल त्याची. दुसरी ज्याची बॅटिंग असणार होती त्याचे हरायचे चान्सेस नक्कीच जास्त होते. मुंबईचंच रेकॉर्ड पहा ना. त्यांनी जास्ती सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. उपांत्यफेरीत देखील चेन्नईच्या १५० पण धावा नव्हत्या झाल्या, पण त्यांनी डेक्कन चार्जर्सला किती स्वस्तात गुंडाळले. ह्या आयपीलमधे तर चिक्कार कॅच सुटले, ह्याचा अर्थ ते खेळाडूंनी मुद्दाम सोडले असे अजिबात नाही. कधी कधी दबावाखाली, अति-उत्साहाच्या भरात, अंदाज चुकल्याने कॅच सुटतात. बॅटिंग ऑर्डरचं म्हणाल तर ऐनवेळी संघ व्यवस्थापनाला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हरभजननी एक मॅच बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलीये.

चेन्नईचे हार्दिक अभिनंदन आणि मुंबईचे खूप खूप आभार. त्यांनी ह्या (आणि मागच्या) आयपीलला नितांतसुंदर खेळ करून सर्वांची मने जिंकल्याबद्दल!!! पोलार्ड, तिवारी आणि रायडू आपले आवडते खेळाडू आहेत आता :-)

वाईट फक्त ऐवढ्यासाठीच वाटतं की सचिननी हा आयपील कप उंचवावा आणि आपण ते डोळे भरून पहावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. असो...

मेघवेडा's picture

26 Apr 2010 - 3:25 am | मेघवेडा

अगदी मनातलं बोललात.. इतकंच म्हणतो सध्या.. वेळ आल्यास पाडीनच प्रतिसाद एम्बीज् मध्ये!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 8:14 am | विसोबा खेचर

तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही.

नक्कीच नाही.. परंतु ऐनवेळेला तो खेळला नाही की साला या आण्णा पळसुल्यासारख्यांचं फावतं!

आणि कालचा सामना मुंबैचा संघ अगदीच सामान्य रितीने हारला.. टफ फाईट तरी द्यायला हवी होती.. पण तसं काही न होता ते मुद्दाम हारत आहेत हे सरळ सरळ दिसत होतं..

चक्रमकैलास's picture

27 Apr 2010 - 1:21 pm | चक्रमकैलास

त्याने आउट होण्याआधी ४८ रन काढल्या ना..आता प्रत्येक सामन्यात त्याने ८०-९० रन काढल्या पाहिजेत ही अवास्तव अपेक्षा आहे..

खेचर कुठला... :>

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

अस्मी's picture

26 Apr 2010 - 10:32 am | अस्मी

अगदी सहमत.

चेन्नईने चांगला खेळ केला, धोनीने सही कॅप्टनशिप केली, रैना मस्त खेळला :)
चेन्नईला फेअर प्ले अवॉर्डही मिळालं :) शांतपणे (without sledging) खेळूनही मॅच जिंकता येते हे कॅप्टन कूलने सिद्ध केलं.

चेन्नईचे हार्दिक अभिनंदन :)

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

रेवती's picture

26 Apr 2010 - 6:09 am | रेवती

मुंबै टिमच्या घरी रक्कम पोहोचती झाली असेल कि नाही अशी शंका आहे.
त्यांना (क्रिकेटवाल्यांना) तसेही रग्गड पैसे मिळत असतात. मला अजूनही ते वेगवेगळ्या देशाच्या खेळाडूंचं एका टिममध्ये येउन खेळणं फारसं पचनी पडलेलं नाही. कोणतेही दोन (वेगळे) देश मैदानावर शत्रू असावेत तसे खेळताना बघण्याची सवय इतकी वर्षे झालीये.....

बाकी ते २५ रू. हरल्याचं काय वाईट वाटून घेता.......समजा त्यांनी एखाद्या मैफिलीच्या तिकिटाची पैज लावली असती तर जास्त खर्च आला असता. (हलके घ्या.)

रेवती

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Apr 2010 - 7:40 am | llपुण्याचे पेशवेll

आमचे काही मित्र आपली टिम आपली टिम करत मुंबईच्या नावाने चांगभलं करत होते. म्हटल आपली नाही तुमची टिम म्हणा. ज्या टिमचे शेअर्स मला मिळतील तीच माझ्यासाठी आपली टिम.

(पट्टीचा व्यापारी )
पुण्याचे पेशवे
Phoenix

नितिन थत्ते's picture

26 Apr 2010 - 10:16 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

तसेही या टीमला मुंबईची टीम म्हणायला त्यातले किती खेळाडू मुंबईचे होते?

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

26 Apr 2010 - 10:19 am | ऋषिकेश

मागे उपक्रमावर म्हटल्याप्रमाणे आयपीएल भारतीय वॉटरगेट आहे... आता काय व किती समोर येते व येऊ दिले जाते ते बघायचे.

जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय?

बाकी तात्या, तुमच्या २५ रु. बद्दल वाईट वाटले.. मुंबई "आपली" टिम नसून अंबानीची टिम आहे हे लक्षात घेतलेले बरे (पुढच्या आयपीएल्मधले पैसे वाचवण्यासाठी ;) )

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2010 - 3:17 pm | भडकमकर मास्तर

जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय?

ही कन्सेप्ट जाम आवडली...
__/\__

वेताळ's picture

26 Apr 2010 - 10:21 am | वेताळ

मुंबई पैशे घेवुन हारली असे होवु शकत नाही.
तात्या २५ देवुन वरुन ५ त्यांना द्या आणि तोंड बंद करा त्यांचे. X(

वेताळ

निखिल देशपांडे's picture

26 Apr 2010 - 11:29 am | निखिल देशपांडे

मुंबई जिंकली असती तर मिसळपाव सारख्या तामीळ साईट वर असाच एखादा लेख वाचायला मिळाला असता :-)

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Apr 2010 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll

निख्या,
मिसळपाव मराठी साईट आहे हे ठावं नाही होय तुला. धाडस कसं होतं मिसळपावला तामीळ म्हणायचं. अरे खादाडीतल्या एखाद दुसर्‍या तामीळ नटीमुळे सारी साईट तामीळ होत नाही रे. कधी कळणार तुला?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

निखिल देशपांडे's picture

26 Apr 2010 - 11:56 am | निखिल देशपांडे

मिसळपाव ही तामिळ साईत नाहिए.. तसे आम्हाला वाटतही नाही..
असो..
ह्या खुलाश्याबद्दल धन्यवाद म्हणणार्‍या सगळ्यांना धन्यवाद.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

समीरसूर's picture

26 Apr 2010 - 3:03 pm | समीरसूर

मुंबई इंडियन्सच्या धक्कादायक पराभवामुळे सामना 'पूर्वनिर्णित' असण्याच्या संशयाला जन्म घेता आला आणि हा संशय अगदी वणवा पेटावा तसा सगळ्यांच्या मनात घोंघावू लागला केवळ ही एक गोष्ट विश्वासाला तडा देण्यास पुरेशी आहे. आयपीएलने भारतातल्या सगळ्या जनतेचा घोर अपमान आणि त्यांची फसवणूक केलेली आहे. हा ललित मोदी, तो केतन देसाई, ती सुमित्रा बॅनर्जी...सगळे कोट्यवधी रुपयांचा चट्टामट्टा करून आणखी काही मिळते आहे का म्हणून जीभ बाहेर काढून फिरणारे कोल्हे आहेत. त्या केतन देसाईकडे म्हणे १.५ टन सोने सापडले. अबब!! अरे हा काय मरतांना सोन्याच्या चितेवर जळून अनंतात विलीन होण्याच्या प्रयत्नात होता की काय? ती सुमित्रा बॅनर्जी नवर्‍याला पाठवून दीड-दोन कोटींची लाच पचवण्याच्या बेतात होती. यांची हाव तरी किती? आयपीएल मध्ये कितीतरी हजार कोटी रुपयांचा चट्टामट्टा करून बसलेली मंडळी नक्की असणार. ही मंडळी जेवतांना देखील नोटांच्या पुंगळ्या करून खातात की काय देवाला माहित. बीसीसीआयच्या अगदी शिपायाला देखील ललित मोदी काय करतोय हे माहित असणार आणि बाकी मोठ्या मोठ्या धेंडांना माहित नसणार हे शक्यच नाही. त्यांना प्रत्येकाला १००-२०० कोटी मिळाल्यावर कोणी कशाला काही बोलेल? या सगळ्या प्रकारात भारतातली जनता किती मूर्ख आणि बिनडोक आहे हे सिद्ध झाले. अत्यंत पद्धतशीरपणे बसवलेल्या या सामन्यांच्या नाटकांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक सामना स्क्रिप्ट लिहून बसवावा तसा बसवलेला असतांना त्या नाटकी सामन्यांमध्ये काय अर्थ होता? रणजी, दुलीप वगैरे जिथे खेळाडूंचा कस लागतो, जिथे खरे क्रिकेट जोपासले जाते तिथे आपले लोकं जात नाहीत पण जिथे चिअरलीडर्स नाचतात, जिथे भपका दिसतो, जिथे बॉलीवूडची माकडे नाचतात तिथे स्वतःचे माकड करून घ्यायला आपली मूर्ख जनता अगदी जीवाचे रान करून जाते यात दोष लोकांचा आहे, ललित मोदी किंवा घोटाळे करणार्‍यांचा अजिबात नाही!!!

आयपीएल ४ होऊच नये अशी इच्छा आणि झालेच तर प्रेक्षकांनी पाठ फिरवून लोकांच्या जीवावर त्यांच्याच भावनांना फसवून कोट्यवधींच्या राशींवर लोळणार्‍यांचे, अश्लील पार्ट्या करणार्‍या बाजारबुणग्यांचे कोट्यवधींचे नुकसान व्हावे ही प्रार्थना!

--समीर

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2010 - 3:30 pm | भडकमकर मास्तर

सामना खूप विनोदी झाला..
हेडनची बॅटिंग विनोदी होती...
एक ओव्हर आधी क्षेत्ररक्षकांच्या नावाने ठणाणा करणार्‍या झहीरने कॅच टाकल्यावर त्याचा झालेला चेहरा विनोदी होता..
सचिन आणि अभिषेक नायर यांनी इतके बॉल खाल्ले आणि आवश्यक वेगाने अजिबात रन्स केले नाहीत, मग कीपरच्या रीचमध्ये बॉल ढकलून अभिषेकचं धावणं विनोदी होतं....
भज्जीसुद्धा धम्माल विनोदी डिफेन्स दाखवत आउट झाला..
पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं...

शिवाय मोदींनी प्रेझेन्टेशन पार्टीत स्वतः एक भाषण ठिकायची हौस पुरी केली तीसुद्धा विनोदी होती...

एकूण खूप मजा आली.....

सगळ्यांनी खूप पैशे कमावले....

भारद्वाज's picture

26 Apr 2010 - 6:13 pm | भारद्वाज

पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं...

१००% सहमत
-
यावेळी घरीच मॅच पाहणारा
सचिनप्रेमी

देवदत्त's picture

26 Apr 2010 - 10:54 pm | देवदत्त

=))
माझं बरंय, सामन्याच्या वेळात चित्रपट (हिंदी पूर्ण, मराठी अर्धा) पाहून मी माझा आणि घरच्यांचा वेळ सत्कारणी लावला. ;)

टुकुल's picture

26 Apr 2010 - 11:00 pm | टुकुल

तात्या, तुम्हीपण, पैज लावायची तर चेन्नई वर तरी लावायची, म्हणजे मुंबई जिंकली असती (स्वः अनुभवावर हे लिहित आहे) :-).

--टुकुल

सोम्यागोम्या's picture

26 Apr 2010 - 11:22 pm | सोम्यागोम्या

तात्याच्या २५ रु.सारखे योगायोगाने आम्हीही २५ डॉलर हरलो आहोत. आमच्या हापिसातला तंबी मॅच पाहतानाच चेकाळून उड्या मारत असणार. आज आला नाहिए उद्या आल्या आल्या येईल पैसे मागायला.

पोलार्ड ला स्पिन वर खेळता येत नाही म्हणून त्याला शेवटी पाठवतात. त्यामुळे प्लान नुसार त्याला शेवटीच पाठवले . ज्यांना येते स्पिनवर खेळायला ते खेळले नाहीत व सचिनही काही अंशी जबाबदार आहे. फारच संथ सुरुवात व फेकलेला झेल.

इंटरनेटस्नेही's picture

26 Apr 2010 - 11:34 pm | इंटरनेटस्नेही

चांगली मांडणी तात्या...

शुचि's picture

27 Apr 2010 - 1:05 am | शुचि

+१
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव