(या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
10 Apr 2010 - 3:28 am

नुकतंच अन्य स्थळावर एका धाग्यात मी काही प्रतिसाद लिहिलेला असताना अचानक 'कंपू तुमचा पाठलाग न करो ही प्रार्थना' अशी धमकीवजा सूचना आली. मी भांबावलो. त्याच धाग्यात आधी मी औद्धत्य करून कंपूबाजीला आव्हान देतोय असं प्रश्नवजा विधान आलं होतं तेही दिसलं. तेव्हापासून ही भाई लोकं नक्की काय म्हणत असावेत याविषयी मनात विचार सुरू झाले. (त्यातूनच मूळच्या उत्कृष्ट काव्याचं विडंबन, केवळ भीतीपोटी झालं म्हणून कवीची क्षमा मागतो.) पुन्हा, अन्य स्थळावर हे मी अधोरेखित करतोय. मिपावर कंपूबाजी वगैरे काही नाही. निदान मला तरी दिसलेली नाही.

या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती.

पाळत तुमची हाच असे हो या दोघांचा धंदा
लेखनाची अन् तुमचीसुद्धा ते करतील निंदा
तुमचे प्रतिसाद हेच रणांगण, खवीच्या खिंडित धरती

आयडीत हे लपतील दोघे, स्वस्थ दबा धरुनी
तुमच्या पाया दगड बांधुनी टाकतील बुडवुनी
येतिल दोघे, येईल कंपू, ही तर जालिय नीती.

मूळ कविता

या डोळयांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील, असा कुठे ही जगती

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासवीण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यास नभांगण, घरकुल तुमची छाती

सावलीत ही बसतील वेडी, प्रीतीच्या दडूनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती

भयानकसंस्कृतीविडंबनराजकारण

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Apr 2010 - 7:24 am | अक्षय पुर्णपात्रे

कंपूच्या अस्तित्त्वाबाबत साशंक आहे पण विडंबन आवडले.

नितिन थत्ते's picture

10 Apr 2010 - 10:29 am | नितिन थत्ते

कंपूच्या (सध्याच्या मिपावरील) अस्तित्त्वाबाबत साशंक आहे.

नितिन थत्ते

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2010 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल. त्यामुळे समूह उन्माद व कंपुबाजी हा लेख आपोआपच (गळून) पडेल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2010 - 9:04 am | राजेश घासकडवी

तुम्हीच भाकितं करायला लागलात तर ओकसाहेब काय म्हणतील?

अंनिसचं तुमच्या भाकितांबाबत काय मत आहे? तुम्ही वापरता त्या पद्धतीची शास्त्रीय चाचणी झाली आहे का?

राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2010 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे

आता काही लोक म्हणतात ही भाकिते तारतम्यानी केली जातात पण खर सांगु का ही भाकिते 'आतुन' येतात. अंनिस बद्दल ही आमचे भाकित आहेच पण ते गुपित ठेवले आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Apr 2010 - 9:20 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री घाटपांडे यांच्या प्रतिसादात कंपूचे अस्तित्त्व (तसेच कंपूसदस्यांमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अभाव (व्याख्येनूसार)) त्यांना मान्य असावे असे वाटते.

लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल.

कंपूची व्याख्या व कंपूचे अस्तित्त्व या गोष्टी आहेत हे सोदाहरण दाखवता येणे श्री घाटपांडे यांना शक्य असावे. त्यांनी (व जमल्यास विडंबनकारांनी) ते तसे दाखवून द्यावे अन्यथा या आरोपात (किंवा वस्तुस्थितीच्या निरीक्षणात) फारसे तथ्य नाही असेच म्हणावे लागेल.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2010 - 9:43 am | प्रकाश घाटपांडे

'कंपुबाजीमुळे वाचलास ' असा भुतकाळात एक निष्कर्ष काढला होता. मूळ दस्त जशाच्या तसा नसला तरी बहुतांशी आहे.
आंतरजालावर कुणीही कुणाचा कायमचा शत्रु वा मित्र नसतो हे आमचे अत्यंत आवडते वाक्य आहेच.
(समद्यात असुन नसल्यावानी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2010 - 9:46 am | राजेश घासकडवी

यात शून्य आहे.

प्रथमत: मिपावर कंपुबाजी नाही वा निदान मला तरी ती दिसली नाही असं मी स्पष्ट म्हटलेलं आहे.

द्वितीयत: मी अन्य संस्थळावर कंपूची शंका असल्यामुळे तो जर असेल तर त्यांच्या मनात कुठचं गाणं चालू असेल हा विचार करून कल्पनेने लिहिलेलं ते काव्य आहे. हे म्हणजे 'हमने तो बोसे लिये थे, तस्वीरोंके, ख्वाब मे' असला प्रकार आहे. इत:पर जर कोणाचे 'आरीज नीले पड गये' तर त्यात माझा काय दोष?

पण एखाद्या य:कश्चित विडंबनाबाबतीत असे उलटतपासणीवजा प्रश्न येणं हे कसलं द्योतक आहे बरं?

राजेश

Nile's picture

10 Apr 2010 - 11:59 am | Nile

पण एखाद्या य:कश्चित विडंबनाबाबतीत असे उलटतपासणीवजा प्रश्न येणं

सहमत. यात वातावरन गंभीर करण्यासारखं काय आहे हे मला तरी कळलं नाही.

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Apr 2010 - 7:15 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री घाटपांडे, श्री घासकडवी व श्री नाइल :
उलटतपासणीवजा प्रश्न गंमतीचा भाग आहेत. तुम्ही लोड घेऊ नका. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2010 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>लवकरच राजेश ला कंपुत सामावुन घेतले जाईल.

शाब्बास ! आता वकिलीही सुरु केली काय ?

-दिलीप बिरुटे
[मोजक्याच केसेस हाताळणारा हायकोडताचा वकील]

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2010 - 2:02 pm | प्रकाश घाटपांडे

हे विधानार्थी वाक्य आमचे भाकीत आहे. वकीली नव्हे
(ज्योतिर्टीकामणी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रमोद देव's picture

10 Apr 2010 - 9:29 am | प्रमोद देव

म्हणजे कंपूबाज आहेत...हे तुम्ही मान्य करताय तर! ;)
लगे रहो राजेशभाय पण जरा जपून बरं का!
महाजालावर कैक कंपूबाजांना ओळखून असणारा...आणि म्हणूनच अप्रिय ठरणारा
प्रमोद देव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2010 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती.

बाय द वे, दोन माणसांची नावे कळतील काय ?

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

10 Apr 2010 - 11:56 am | टारझन

हॅहॅहॅहॅ ... वरचे काही अपेक्षित प्रतिसाद आल्याने अंमळ मौज वाटली ... =))
जो तो स्कोर सेटल करण्याच्या मागे ... आणि कवी लेंड्या टाकण्याच्या मागे ...
लेंड्या वर लेंड्या. .. लेंड्यावर लेंड्या ... लाखो लेंड्या =))

- रोजेश काव्यपाडवी
हल्ली कोदांची आठवण होत नाही , भरपुर काँपिटीशन आली आहे.

टारझनभाऊ,

गेल्या आठ दहा दिवसात पाषाणभेद, कानडाऊ योगेशु आणि जयंत कुलकर्णी यांनी प्रत्येकी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त कविता लिहिल्या. मग माझ्याच कवितांना लेंड्या टाकण्याचे उद्योग का बरं म्हणता? तुमच्या अशा प्रतिसादांनी माझ्या हृदयाला घरं पडतात...

राजेश

वेताळ's picture

10 Apr 2010 - 1:37 pm | वेताळ

मागच्या आठवड्यात कोल्हापुर सकाळ मध्ये गुरुवार च्या अंकात कोदाचा एक लेख आला होता. जमल्यास स्कॅन करुन टाकेन.
पण हे मिपाच्या धोरणात बसेल काय?

वेताळ

अरुंधती's picture

10 Apr 2010 - 1:44 pm | अरुंधती

छान मजेशीर विडंबन.... मी कल्पना करून बघत होते.... दोन आय.डी. तुमच्या सर्व जालीय चहाड्या, उचापती, कुरबुर्‍या, कुटाण्यांना टकमक बघत आहेत आणि त्यांच्या नोटबुकमध्ये नोंद करत आहेत...... हा हा हा......
आता कवितेत अधिक गेयता येण्यासाठी मला हे दोन शब्द सुचले ते ठळक दाखवत आहे! ;-)
<<आयडीत हे लपतील दोघे, स्वस्थ दबा जो धरुनी
तुमच्या पाया दगड बांधुनी प्राण घेत बुडवुनी
येतिल दोघे, येईल कंपू, ही तर जालिय नीती.>>

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

II विकास II's picture

12 Apr 2010 - 9:28 pm | II विकास II

अमंळ मजेदार धागा.
श्री राजेश यांना आंतरजालावरील राजकारणाचे बरेच ज्ञान असे आम्ही समजतो होतो. बहुतेक त्यांना बरीच माहीती नाही असे दिसते.

काही बळी गेल्याने मिसळपावला हायजॅक करायचा प्रयत्न करणारा कंपु सध्या पाहुणे म्हणुन वाचनमात्र असतो, असे म्हणतात. असो.

तुर्तास एवढेच, पुन्हा कधी वेळ मिळाला तर लिहीनच.
--

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2010 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माननीय श्री ॥विकास॥ यांच्या या प्रतिसादातून विचार आला, जर मिसळपाव काही परिस्थितीमुळे हायजॅक होऊन तुमच्या हातात सगळे कंट्रोल्स आले तर काय कराल?
१. इतरांना कळू न देता मिपा आहे तसं चालू ठेवेन.
२. इतरांना कळू न देता मिपा आहे त्यापेक्षा चांगलं चालू ठेवेन.
३. मिपा माझ्या हातात आहे, आता गाठ माझ्याशी आहे असं काही विवक्षित चहाडांना किंवा सगळ्यांना सांगेन.

राजेश, दोन दिवस सुट्टी घेतल्यामुळे विडंबन अंमळ उशीराच वाचलं होतं. आता धागा वर आला आहेच तर इथे प्रतिसाद देते ... "चालू द्या" आणि ते विडंबनाच्या क्लासेसचं बघा की!

बाकी बर्‍याच लोकांना 'कंपू'ची आठवण येते हे पाहून अंमळ आनंद झाला.

अदिती

Nile's picture

16 Apr 2010 - 3:13 pm | Nile

आजचा शब्द. कोवार्ड.

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 3:17 pm | इनोबा म्हणे

म्हंजी काय रे भाऊ?

लिमिटेड माज!

Nile's picture

16 Apr 2010 - 3:22 pm | Nile

तो मनुष्याचा होणारा एक विवक्षित प्रकारचा विकास आहे. अधिक माहिती करता, विकीलेखकांना संपर्क करावा.

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 3:27 pm | इनोबा म्हणे

तो मनुष्याचा होणारा एक विवक्षित प्रकारचा विकास आहे.
आलं लक्षात... ;)

अधिक माहिती करता, विकीलेखकांना संपर्क करावा.
म्हंजी तो अज्ञानकोशवाला विकी का?

लिमिटेड माज!

प्रियाली's picture

10 Apr 2010 - 7:20 pm | प्रियाली

इतरांचे कंपू आहेत आणि ते आपल्याला त्रास देतात असा प्रचार करणे हे उत्तम कंपूबाजाचे लक्षण आहे. घासकडवींना आपला कंपू सापडणार असा अंदाज होताच (भाकित नव्हे) तसा तो सापडलेला दिसतो. अभिनंदन! :)

अविनाशकुलकर्णी's picture

16 Apr 2010 - 2:53 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त...आवडल...लै भारी..झकास