अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
14 Apr 2010 - 2:35 pm

कालच अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव या शांतिलाल सुरतवाला यांच्य पुस्तकाच्य प्रकाशनाला गेलो होतो. जाताना पक्क ठरवल होत की पुस्तक अजिबात विकत घ्यायच नाही. साली दरवेळी खिशाला चाट बसते अन घरी कचरा वाढतो. जाता जाता प्रसन्नकुमार केसकर तथा पुणेरी यांचे पुस्तक खरेदीबाबतचे विचार डोक्यात घोळत होते पण ते काढुन टाकले.
प्रकाशनाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, भाई वैद्य ही मंडळी होती. प्रकाशन अगदी अनौपचारिक वातावरणात झाले. यशवंतरव चव्हाण प्रतिष्ठान च्या पुणे शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. शांतिलालजी व अंकुश काकडे एकाच व्यासपीठावर असले कि एकमेकांची फिरकी घेणे चालु असते. श्रोतेही दाद देतात. दोघेही मित्र आहेत. राजकारणी पेक्षा समाजकारणी आहेत. सुरतवाला हा आडनावाशी विसंगत माणुस. एकदम मराठमोळा गडी. राजकारण करता करता भटकंती जपणारा मनस्वी माणुस असल्याच जाणवत.
वंदना चव्हाण यांनी आपल्या भाषणात ग्लोबल वॊर्मिंगचे संकट हे अनाठायी नसुन सध्या त्या विषयावर त्या काम करित असल्याचे सांगितले. शांतिलालजींनी पुस्तक निर्मिती कशी झाली हे सांगितल. कैलास मानस सरोवर ४ वेळा अमरनाथ ७ वेळा एव्हरेस्ट बेस कॆम्प २ वेळा सह्याद्रीतील किल्ला जवळपास दर महिना असा भटकंतीचा वारसा असल्याने ही प्रेरणा मिळाली. अंटार्टिकाला भारतीयच मुळात कमी जातात व त्यातुन मराठी तर अगदीच कमी.
प्रकाशनानंतर अंटार्टिकाची व्हीडिओ, फोटो व सोबत शांतिलालजींचे रनिंग कॊमेंट्री मुळे सभागृह एक कुटुंबच झाले होते.लोक पहाता पहात प्रश्न विचारत होते शांतिलाल उत्तर देत होते. खर तर दुसर्‍याच दिवशी हिमालय टुरला ते सहकुटुंब चालले होते. आपला आनंद इतरांबरोबर शेअर करण्यात काय समाधान असते ते जाणवत होते.अंटार्टिका प्रवासात अर्जेंटिना चिली इंग्लंड या देशाचे व्हिसा आवश्यक होते. ही सर्व प्रक्रिया जवळपास वर्षभर चालू होती. हे देश व्हिसा देण्यास उत्सुक नसतात. मुंबई हुन अर्जेंटिना व्हाया पॆरिस हा मार्ग त्यांना निवडावा लागला. मुंबई पॆरीस हा ९ तास ३५ मिनिटांचा विमान प्रवास. नंतर पॆरिस ला विमानतळावर रात्री ११ पर्यंत टाईमपास करुन ब्युनोस आयर्स ला १७ तासांचा प्रवास. तेथुन मग प्रिन्सेस या महाकाय क्रूझने प्रवास. १७ मजली क्रुझ. तीन मजले मॊलचे, पोहोण्याचे १५ तलाव, ५० पेक्षा अधिक बार,
फिरण्याच अद्ययावत ट्रॆकस,खेळण्याची साधने, कॆसिनो. सुमारे २६०० पर्यटक व व्यवस्था पहाण्यासाठी १००० कर्मचारी. बाप रे बाप! मुंबईचे वर्णन सांगता्न एखाद्या खेड्यातल्या मुलाचे डोळे विस्फारावेत तसेच म्हणा ना! १६ दिवस क्रुझवर ९६०० किमी चा प्रवास. क्रुज म्हणजे गावच. रात्री साडेनउ पर्यंत सुर्य प्ररत पहाटे साडेपाचला सुर्य. तापमान प्रत्यक्ष अंटार्टिकावर उणे ८०, पण तेथील संशोधकांच्या प्रयोगशाळेत साधारण अधिक ०.५. ही माहिती सांगणारे वैज्ञानिक क्रुजवर होते.

त्यांची टीम तिथे माहिती देण्यासाठी कायम असायची. अंटार्टिकावर १२ देशांचे वैज्ञानिक संशोधन करतात. जाताना वाटेत फॊकलंड ची राजधानी स्टेन्ली येथ पेंग्विन कॊलनी पाहिली. कचरा दाखवा व १००० डॊलर मिळवा ही घोषणा सार्थ ठरावी असे. उरुग्वेच्या राजधानी मॊन्टेव्हिडिओ शहरात गांधीजीचा पाहिलेला पुतळा; तेव्हा तेथील टॆक्सीचालकाला तो गांधींचा पुतळा हे सांगताना ऐकण हे अधिक आनंददायी वाटल. क्रुजच्या प्रवासात त्यांना दिसलेला हिरवा निळा समुद्र, निळसर बर्फाचे हिमनग, उशीरा होणार सुर्यास्त अशा वातावरणात आपला ६० वा वाढदिवस पत्नी, भाउ व वहिनी सोबत साजरा केला.
समुद्राच्या बीगल चॆनेल मधे एका बाजुला चिली व दुसर्‍या बाजुला अर्जेंटिना यातुन प्रवास करताना डार्विनची आठवण झाली.
शांतिलालजी नी क्रुजने डिझेल चे रेट कमी झाल्याने प्रत्येकी १५० डॊलर्स परत केले होते हे आवर्जुन सांगितले. एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही या आपल्या संस्कृतीत त्यांना ते आश्चर्यच वाटले होते. हा सर्व प्रवास महाग आला तरी आनंददायी होता. तेथील सार्वजनिक स्वच्छता , शिस्त व सुविधा ही बाब त्यांच्या विवेचनात प्राधान्याने जाणवत होती. कार्यक्रम संपल्यावर पुस्तक विकत न घेण्याचा अट्टाहास मोडला. मूळ ७५ रु असलेले पुस्तक ६० रुपये स्वागतमुल्याला घेतले. व्ह्डीओ फोटो ची डीव्हीडी मात्र संपली होती
पुस्तक अतिशय देखण झालय. गुळगुळीत कागद, प्रत्येक पानावर सुरेख प्रकाशचित्र, असाहित्यिक भाषा, गप्पांचा विस्कळीत पणा आणि मुख्य म्हणजे जो अंटार्टिकाला जाउ इच्छितो त्याला ९४२२००३३३३ हा आपला मोबाईल नंबर जाहीर करुन प्रेमाने व आनंदाने सहकार्य करण्याचे आश्वासन. जाणार का मग अंटार्टिकाला?

अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव
लेखक प्रकाशक - शांतिलाल सुरतवाला २५७ बुधवार पेठ. पुणे ४११००२
पृष्ठे ५७
वितरण व्यवस्था- आदितीज पब्लिकेशन पुणे श्रीरंग वासुदेव भाटवडेकर मोबा.९४२२०८७८२९
अनुबंध प्रकाशन- पुणे ४३ मोबा९३७३७१८६६६

प्रवासदेशांतरजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

उग्रसेन's picture

14 Apr 2010 - 2:42 pm | उग्रसेन

काका बुकाची वलख लय भारी करुन देली.
बूक वाचाला आवडीन .

टैम पास : काका सध्या 'बर्म्युडा ट्रॆंगल' चार्लस बर्लिझ यायचे विजय देवधर यायनी केलेला अनुवाद वाचून राह्यलो.

बाबुराव :)

टुकुल's picture

14 Apr 2010 - 3:03 pm | टुकुल

पुस्तक परिचय एकदम मस्त...

स्वगतः लोकांना एव्हढ फिरायला पैसे कुठुन येतात?

--टुकुल

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2010 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे

आता सुरतवाला व्यावसायिक शिवाय राजकारणी. त्यांना २.५ लाख पर हेड खर्च आला. तरी नियोजन बरच अगोदर केल होत म्हणुन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अमोल केळकर's picture

14 Apr 2010 - 4:15 pm | अमोल केळकर

पुस्तकाची माहिती आवडली.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गोगोल's picture

14 Apr 2010 - 7:38 pm | गोगोल

म्हणजे कोण?

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2010 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे

भाई वैद्य हे समाजवादी नेते आहेत. एस एम जोशी सोशॆलिस्ट फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्राजु's picture

14 Apr 2010 - 8:08 pm | प्राजु

व्वा पुस्तक परिचय सुंदर.
परिक्षणावरून अँटार्क्टिका बद्दलचं आधीच असलेलं कुतुहल वाढलं आहे.
सुरेख.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मदनबाण's picture

14 Apr 2010 - 8:24 pm | मदनबाण

पुस्तक परिचय आवडला... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

चिरोटा's picture

14 Apr 2010 - 9:54 pm | चिरोटा

पुस्तक परिचय आवडला.आपण तयार आहोत जायला. तेवढं स्पॉन्सरशीपच जरा बघून घ्या! :)
बहुतेक १९८२ साली भारतातर्फे काही शास्रज्ञांना तेथे पाठवण्यात आले होते.९/१०वीच्या धड्यात अंटार्टिकाच्या अनुभवावर परुळेकर ह्यांनी त्यासंबंधीत लिहिलेला धडा वाचल्याचे आठवते.
भेंडी
P = NP

शेखर काळे's picture

15 Apr 2010 - 12:06 am | शेखर काळे

जाऊ की .. हाय काय नाय काय ..

पाषाणभेद's picture

15 Apr 2010 - 4:06 am | पाषाणभेद

काका, माला वाटलं की तुमी बी जावून आला का काय आनटारटिकाला.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

चित्रा's picture

15 Apr 2010 - 7:31 am | चित्रा

श्री. सुरतवालांकडून तशी कमीच माहिती मिळालेली दिसते. पण पुस्तक परिचयाबद्दल आभार!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Apr 2010 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

त्यांच्याकडून माहिती भरपुर मिळाली पण आम्हि टंकण्याचा कंटाळा केला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रगुप्त's picture

15 Apr 2010 - 8:14 am | चित्रगुप्त

आवडले.....
आणखी पुस्तकांविषयी कळवत रहा....

चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
http://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
http://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
http://www.misalpav.com/node/11667

इंटरनेटस्नेही's picture

15 Apr 2010 - 3:57 pm | इंटरनेटस्नेही

छान आहे. एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.