गुलाबाचा महिमा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
11 Mar 2010 - 1:44 pm

गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी. पण शेवटी सगळ्यांना एकाच गुलाब या नावानेच ओळखलं जातं, कारण कोणी कवी म्हणूनच गेलेला आहे - नावात काय आहे, गुलाबाला कुठचंही नाव दिलं तरी शेवटी तो गुलाबच. आता त्या आंग्ल कवीला गुलाब मधलं एक अक्षर थोडं भदललं तर किती गलिच्छ अर्थ होतो याची कल्पना करता आली असती तर त्याने मराठीत तरी आपलं बाषांतर होऊ दिलं नसतं.

गुलाब हा संस्कृत काव्यात सापडत नाही. म्हणून त्या फुलाला असंस्कृत कदाचित म्हणता येईल. पण संस्कृत भाषेप्रमाणेच केवळ तग धरून असलेले व तिने एके काळी शिरोधारी चढवलेले कमळ (त्याचबरोबर कमळ-भुंगा जोडीही - शमा परवान्याच्या पर्शियन काव्य क्लिशेला संस्कृतचा सडेतोड जबाब) आजकाल गुलाबाच्या लोकप्रियतेचा बळी ठरले आहेत. हीन मानल्या गेलेल्या आयपीएल मधल्या हीन मानल्या गेलेल्या उत्तान आनंद-नर्तकी जशा आजकालच्या असंस्कृत जगात (त्यांच्या अर्धवट कपड्यांतून) पुढे येत आहेत व दंडावर ठेवलेला रुपया कलात्मक रीतीने ओठाने उचलणाऱ्या मराठमोळ्या सुसंस्कृत लावणी नर्तकी कशा मागे पडत आहेत त्याचेच हे पुष्पजगतातले पडसाद आहेत.

हा मदनाला किंवा रतीला विशिष्ट दिवशी अर्पण करावा असं त्यांचे ब्रह्मचारी भक्त श्री. संत. व्हॅलेंटाईन (की व्हॅलेतिनो? की व्हॅलेंटिनस?) यांचं म्हणणं होतं असा प्रवाद आहे. या प्रवादापायी अब्जावधी रुपयांची गुलाबाची फुलं १४ फेब्रुवारीला विकली जातात. ती तशी अर्पण केली जाऊ नयेत (किंवा कदाचित त्या विक्रीवर काही 'कर' रामाच्या चरणी अर्पण व्हावा) यासाठी मुतालिक यांसारखे हिंदु संस्कृतीचे (पाहिजे तो अर्थ काढावा) रक्षक (पुन्हा पाहिजे तो अर्थ काढावा) नि:शस्त्र (काठ्या लाठ्या न घेता - केवळ मुद्दे व गुद्दे यांचा वापर करून व अनेक स्त्रियांना महत्कर्तृत्वाने जमीनदोस्त करून [यांना आतंकवादी म्हणावे काय?]) सेना घेऊन जन आंदोलन करतात. त्याच आंदोलनाविरुद्ध काही नवी, जवळपास तितकीच नि:शस्त्र आंदोलनं (काळी शाई घेऊन, पण पेनातली नव्हे बरं का - ती कसली नि:शस्त्र? ती तर नीर्जीव...) निर्माण होतात. मग काही उच्चभ्रू संस्थळांवर यापैकी कुठचे कमी नि:शस्त्र यावर बरीच अधिक नि:शस्त्र चर्चा होते. त्या चर्चेचं फलित दोन्ही आंदोलनांपर्यंत पोचतं व ती दोन्ही पुन्हा डोकं वर काढत नाहीत. आधी असलीच जन आंदोलनं करणाऱ्या काही सेना मात्र त्यांचे धोत्र्याला शिव-गुलाब नाव देऊन १४ फेब्रुवारीला शिव-दिन म्हणवून घेण्याचे जुने आंदोलन पुन्हा उगाळत बसत नाहीत. मराठीच्या प्रश्नाप्रमाणेच त्यांनी हाही प्रश्न नवीन सेनेला आउटसोर्स केला असावा असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. अर्थात विचारवंत कोण व खरे विचार कोणाचे हे सेनेच्या सामर्थ्यावर ठरते हा वाक्प्रचार माहीत नसल्याने ते विचारवंतच नाही, असं इतरांचं म्हणणं आहे. काही काळांनी ते इतर लोक विचारवंत ठरतील बहुतेक. पण ते सेनेच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.

गुलाब हे प्रीतीचं प्रतीक आहे. विशेषत: लाल गुलाब. काही मुक्त स्त्रियांच्या हातचे ते लाल मात्र काहींना मॅटेडोर बैलांना आकर्षित करण्यासाठी वापरत असलेल्या लाल कापडांप्रमाणे धोकादायक वाटतात. व ते स्त्रियांनी शोषण केलेल्या पुरुषजमातीचं रक्षण करण्यासाठी मारक्या रेड्याप्रमाणे त्यावर तुटून पडतात. ही युद्धं बघण्यासाठी खूप प्रेक्षक जमत असल्यामुळे एखाद्या सेकंदाच्या साथीदाराने असेच लाल रुमाल काढून दाखवणे, त्यावर लोकांनी मॅटे़डोरप्रमाणे तुटून पडणे, त्यात कोणी प्रेक्षकांतल्या व्यक्तींना शेफारलेलं म्हणणे, कोणी झाडांवर चढून बसून तिकिटाचे पैसे वाचवणे, तर कोणी इतरांना 'उचकू नको ग' म्हणताना कुणा बाबामहाराजांच्या आव्हानाने स्वत:च उचकणे, असे अनेक मनोरंजक उपखेळ सुरू होतात, व त्याने प्रेक्षक आणखीनच वाढतात. जरा भरकटलो, तर मी गुलाबाविषयी बोलत होतो...

गुलाब हे शांततेचं प्रतीक म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकतं. त्यासाठी विशेषत: पांढरे (फटक) गुलाब वापरले जातात. उदाहरणार्थ एखादा नवीन आलेला (वाटणारा) सदस्य हाटेलच्या मालकास काही वेडेवाकडे बोलला तर लोकांसमोरचं भांडण (कोण म्हणालं लुटुपुटूचं? जोडे तयार आहेत) खेळ खूप झाला म्हणून घाईघाईत मिटवण्यासाठी हे खाजगीत (वयाचा मान राखून वगैरे) दिले जातात असं मानलं जातं. मग सदस्याकडे ऑर्कुटवर वाटण्यासाठी लाल गुलाब शिल्लक राहातातच. पण तेही लवकरच सुकतात...

कवितांविषयी लिहिल्याशिवाय लेख कसा पूर्ण होईल? गुलाब या फुलाने अनेक (असंस्कृत) काव्यांना जन्म दिलेला आहे.

तेरा मुंह तो ऐसा है के जैसे मेहेका हो कोई गुलाब
दे साकी, जल्द ही दे साकी, मुझे एक गिलास जुलाब
(हा फार फार जुन्या काळी सापडलेला शेर आहे, पोट सुटलंय, टक्कल पडलंय.... कोणाचा तरुणपणी एखादा शेर हरवला होता का?)

जैसे गुलाबाचे काटे| टोचती वास घेत्याटे
तैसे रद्दड काव्याचे काटे| टोच्विन वाच्कास
(बरेच नवोदित कवी)

गुलाब म्हणजे गुलाब म्हणजे प्रेम असतं,
रोज हे एक त्याचं 'नेहेमीचंच' नेम असतं, (किंवा)
गुलाब हे 'रोज'चंच एक नेम असतं. (पापड कंपनीने कुठची ओळ चांगली ते ठरवावं)

(मंगेश पाऊसपा(प)डगावकर - नावातलं साधर्म्य पूर्णपणे वाचकाच्या मनात)

तर असे हे गुलाब महात्म्य - साठा उत्तराची कहाणी, पाच उत्तरी सफळ संपूर्ण.

विनोदमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2010 - 2:42 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

सध्या अंमळ जोरात आहे गाडी घास्केमास्तरांची...

जैसे गुलाबाचे काटे| टोचती वास घेत्याटे
तैसे रद्दड काव्याचे काटे| टोच्विन वाच्कास

अप्रतिम... सूड घ्यावा तर असा... यालाच काव्यगत न्याय असे म्हणता येईल का?

बिपिन कार्यकर्ते

तुकाम्हणे's picture

12 Mar 2010 - 7:11 pm | तुकाम्हणे

घासकडवी मास्तरांची गाडी मराठी संकेतस्थळांवरती सध्या जोरात सुटली आहे.
सही :)

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

नंदू's picture

11 Mar 2010 - 2:52 pm | नंदू

आवडली.

नंदू

विसोबा खेचर's picture

11 Mar 2010 - 3:44 pm | विसोबा खेचर

मस्त रे! :)

चतुरंग's picture

11 Mar 2010 - 5:19 pm | चतुरंग

एकदम जॉ ब र्‍या!!
काय गुलाब आहे, काय फाटे .... आपलं काटे आहेत.. वा, वा!!! =)) =))
आणि आपली ओवी तर साक्षात माउलीनं गुलाबावर लिहावं इतकी बेतशुद्ध आहे!! ;)

(झेंडू)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2010 - 5:51 pm | प्रकाश घाटपांडे

गुलाबाला फाट्याव मारायच आसन तर मंग धतुरा देत्यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि's picture

11 Mar 2010 - 8:36 pm | शुचि

गुलाब माझ्या हृदयी फुलला
रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला
शूल तुझ्या ऊरी कोमल का?
भा रा तांबे

लेख आवडला.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

मेघवेडा's picture

11 Mar 2010 - 8:40 pm | मेघवेडा

एकदम तुफान!! मस्तच!!

बाकी गुलाबावरनं प्रेमाचा गुलकंद आठवला! ;)

-- (कॉलेजात गुलकंदाच्या बाटल्या जमवलेला) मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

प्राजु's picture

11 Mar 2010 - 8:57 pm | प्राजु

आज काही खरं नाही...
रंगरावांचं विडंबन, खरवसकरांचे चाट, आणि आत हे..
=)) =)) कहर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

jaypal's picture

11 Mar 2010 - 9:02 pm | jaypal

काव्य दोन्ही भलतेच वेड लावणारे आहेत
पुष्पं समर्प यामी.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/