आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.
ही एक विसंगतीच वाटते की नवे वर्ष साजरे करण्यासाठी एकीकडे गोडाचे जेवण करायचे आणि दुसरीकडे मात्र कडुझार अशा कडुनिंबाची चटणी खायची. बरोबर की नाही?
माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने).
काल संध्याकाळी सहजच विचार डोक्यात आला की यालाही काहीतरी कारण असेल.
एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावायची याचा अर्थ आपले सुख जगापुढे मांडायचे;
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही.
हा मंत्र जर तुम्ही आयुष्यभर जपलात तर जीवन नक्क्कीच सुखी होऊन जाईल.
याचा गाभा म्हणून जाता जाता बहिणाबाईची एक ओळ सुचली ती सांगतो आणि थांबतो.
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं
प्रतिक्रिया
6 Apr 2008 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!! विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा शास्तर मारे नक्की पाळतो :)
माझं सुख माझं सुखहंड्या झुंबर टांगलंमाझं दु:ख माझं दु:खतळघरात कोंडलं
आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही, आधी कोणतं बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)
6 Apr 2008 - 12:30 pm | इनोबा म्हणे
आपण कडूनिंब लावण्यामागची प्रथा/हेतू सांगीतला.धन्यवाद!
माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने).
माझी सुद्धा...
काही शंका:
१)गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू काय.मी बर्याच जणांकडून ऐकले की रावणाला युद्धात हरवून या दिवशी राम अयोध्योत परतले होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्या. मात्र अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का?
२)हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मग वर्षाच्या पहील्याच दिवशी तांब्या उलटा का टांगला जातो.
३)गुढीला कापडाचा खण का लावला जातो.
जाणकारांनी माहीती द्यावी.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 12:31 pm | प्रभाकर पेठकर
अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का?
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे मोंगलांचे काही चालले नाही. आणि महाराजांच्या तसेच, पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राने अनेक युद्धे जिंकून, अनेक वियजोत्सव साजरे केले. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रथा चांगलीच रुजली असावी.
हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात.
मला नाही तसे वाटत. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या, जात्यावर दळायला देखिल पालथी मांडी घालूनच बसायच्या. फळ्यांवर प्यायची भांडी, तांब्ये, पातेली सर्व उलटेच ठेवतात. लहान बाळ स्वतःहून पालथे पडायला लागले की कोण कौतुक असते. घरच्या माणसाला घरी परतायला उशीर झाला की पायताण उलटे ठेवण्याची प्रथा होती.
गुढीला कापडाचा खण का लावला जातो.
प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.
6 Apr 2008 - 2:36 pm | इनोबा म्हणे
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल).
हा तर्क पटण्यासारखा आहे.
फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या
'खरे तर मला धार्मीक विधीच्या वेळी पालथी मांडी घालून बसत नाहीत' असे म्हणायचे होते. असो.
प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.
असू शकेल.आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 11:52 am | संजय अभ्यंकर
इनोबाजी,
भले शाब्बास!
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
6 Apr 2008 - 11:59 am | इनोबा म्हणे
धन्यवाद!
आपणाला व आपल्या कुटुंबियांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 12:23 pm | विसोबा खेचर
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही.
हे एक कारण आहेच, शिवाय कडुनिंब ही पोटाच्या विकारांवर व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे, म्हणून वर्षाच्या सुरवातीला तिचे सेवन करण्याची प्रथा आहे असे कुठेतरी ऐकले होते...
आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.
6 Apr 2008 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर
एक अत्यंत औषधी वनस्पती आहे
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.
6 Apr 2008 - 12:46 pm | विसोबा खेचर
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.
मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद पेठकरशेठ!
आपला,
(विनापत्य अविवाहीत!) तात्या. ;)
मिपावरील नवदांपत्यांनी मात्र हे अवश्य लक्षात ठेवावयास हवे..!
आपला,
(सावध) तात्या.
बाय द वे, एखाद दोन मुलं झाल्यावरही कुणी खाल्ला तर त्याला वंध्यत्वाच्या साईड इफेक्टची विशेष काळजी पडू नये असे वाटते!
आपला,
(चिंतामुक्त) तात्या.
6 Apr 2008 - 1:21 pm | प्रभाकर पेठकर
मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद
तसे नाही हो... पण उगीच, दैवाने दिले आणि कर्माने नेले, असे व्हायला नको म्हणून बरीक सावध केले, दुसरे - तिसरे काही नाही.
6 Apr 2008 - 1:58 pm | अन्या दातार
मी उघडलेल्या या टॉपिक वर खूपच चांगली चर्चा चालली आहे. पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे. आपणा सर्वांचा आभारी आहे.
ही चर्चा अशीच पुढे चालू रहावी जेणेकरुन अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
6 Apr 2008 - 2:03 pm | विसोबा खेचर
पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे
अरे अभियंत्या, लेका मला विसरलास की काय? अरे यार औषधी गुणधर्माबद्दल मी पण लिहिलं आहे ना? :)
असो, जगाची साली रीतच आहे अशी! त्याला तू तरी काय करणार अभियंत्या! रितीला धरूनच तू वागलास! :)
तात्या.
6 Apr 2008 - 5:24 pm | अन्या दातार
विसरलो नक्कीच नाही. पण चूक झाली. (अजूनही मिपावर मी ट्रेनी आहे असे समजा)
6 Apr 2008 - 6:29 pm | डॉ.प्रसाद दाढे
आयुर्वेदीक तज्ञा॑नी आपले मत सा॑गावे, पण कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते..ते परत काही कडूनिम्बाच्या नादी लागले नाहीत.. हो.. विषाची परिक्षा कोण घेणार म्हणा.. ;) ..(आजन्म) ब्रम्हचार्यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..
6 Apr 2008 - 6:47 pm | इनोबा म्हणे
कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे.
मी सुद्धा ऐकले आहे.
(आजन्म) ब्रम्हचार्यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..
ज्यांनी स्वतःहून इच्छा मारली आहे,त्यांना कडूनिंबाची काय गरज आहे डॉक्टरसाहेब.(परिक्षणापूरता म्हणत असाल तर ठिक आहे)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 7:08 pm | प्रमोद देव
एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते
माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की वरील विधान अतिरंजित आहे. मी एकेका वेळी पेला भरून कडूनिंबाचा रस प्यायलेला आहे पण मला असे काही जाणवलेले नाही.
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. पण वरील विधान म्हणजे "खा तूप नी दाखव रूप" किंवा "पी हळद की हो गोरी" अशा प्रकारचे वाटते.
6 Apr 2008 - 8:46 pm | विसोबा खेचर
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे.
अहो मीही हेच म्हणत होतो पण डॉक्टर दाढ्यांनी एकदम भितीच घातली तिच्यायला! :)
तात्या.
6 Apr 2008 - 8:08 pm | डॉ.प्रसाद दाढे
म्हणूनच म्हणतो की ह्याविषयावर एखाद्या आयुर्वेदाचार्या॑चे मत महत्वाचे आहे..आणि अरे इनोबा, 'त्या' बाबतीत नुसता मनोनिग्रह उपयोगी नसतो बाबा, तारूण्यात लै॑गिक इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, नेमेके त्याच वयात ब्रम्हचारी राहायचे ठरविणे हे अतिशय अवघड आहे..निसर्गाच्या विरूद्ध लढायला सगळीच शस्त्रे वापरावी लागतात (तरीही बर्याचदा पराजयच पदरी येतो :) अर्थात मुळातच ब्रम्हचर्य हा एक वेगळाच विषय आहे (बर्याचदा विनोद-विषय सुद्धा आहे; पाहा: आचार्य अत्रेकृत 'ब्रम्हचारी' सिनेमा वा नाटक :)
6 Apr 2008 - 10:19 pm | डॉ.प्रसाद दाढे
हा: हा: कशी केली?? :)
बाकी तात्या, असले विषय नवीन लग्न झालेल्या मित्राबरोबर चघळायला फार मजा येते बर॑ का ;) फारच खाजगी गोष्ट असल्यामुळे 'इथे' नको.. (आ॑बट शौकीना॑ना उगीचच मेजवानी नको :))
3 Apr 2016 - 8:58 pm | प्रसाद गोडबोले
वाह वाह !
फारच माहीतीपुर्ण धागा !
अनाजी दातारु असे लेक्घन करायचे हे आम्हास ठावुकच नव्हतेन !
गुड्घी पाडव्याचा सर्वांना आगाऊ शुभेच्छा !!
3 Apr 2016 - 9:04 pm | प्रचेतस
अगागागागा.
दातार सरांचे उच्च कोटीचे लेखन.
4 Apr 2016 - 11:52 am | नाखु
रत्न दाखवल्याबद्दल प्रोगोचे आभार आणि जरा फेरफार करून
गुढी बरोबरच (चार मित्र) गाठीला असलेला नाखु