मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Feb 2010 - 11:01 pm

राम राम मंडळी,

आत्ताच परततोय गेट वे ऑफ इंडियाहून. आज व्हॅलेन्टाईन डे ना? तसंही काही काम नव्हतं. धंदा आजकाल थोडा डाऊन आहे. नुसतं घरी बसून काय करणार? त्यातून रैवार. मग मी देखील गेलो होतो फिरायला माझ्या एका मैत्रीणीसोबत. .व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला!

गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी तीही आली होती मला भेटायला. त्यातून तिचा आज वाढदिवस. मी तिच्याकरता मेट्रोच्या क्यानीकडचे छानसे मावा नेले होते. आम्ही दोघं गेटवेला एक छानशी जागा पकडून बसलो. सुंदर हवा, गेटवेवरचा आल्हाददायक वारा. मी तिला हॅपी बर्थडे म्हटलं. तिनं तिचं ते नेहमीचं जीवघेणं स्मितहास्य केलं!

तिथेच आसपास एक फिरता भेळवाला घुटमळत होता. आम्ही भेळ खाल्ली, केक खाला. तिखट-चवदार भेळ खाताना ती अजूनच छान दिसू लागली. मला तिच्याशी खूप खूप बोलावसं वाटत होतं पण हाय-हॅलो पलिकडे मी तिच्याशी काहीच बोलू शकलो नाही. तिचं अस्तित्व, तिचं दिसणं, तिचं अवखळ हसणं, तिच्याकडे डोळे भरभरून पहाणं, हे डोळ्यात साठवतानाच माझा सारा वेळ जात होता. बोलायला-गप्पा मारायला वेळच मिळाला नाही..

काही वेळाने ती निघाली. तिला लौकर जायचं होतं.. मला टाटा करून, बाय बाय करून ती निघून गेली. ती आली केव्हा, गेली केव्हा हे कळलंच नाही..

तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात गेटवेवर पुन्हा मी एकटाच! तिच्यासारखी सौंदर्यसम्राज्ञी इतका वेळ माझ्यासोबत होती हेच माझं नशीब!

बराच वेळ तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिलो आणि भानावर आलो. अंधारून आलं होतं. समोर गेटवेचा अथांग सागर! अचानक माझ्या कानात आशाताईंच्या आणि गुरुवर्य किशोरदांच्या गाण्याचे काही स्वर गुंजन करू लागले..

हाल कैसा है जनाब का..

काय दिसली होती ती त्या गाण्यात!

तसाच थोडा वेळ गेटवेला घुटमळलो. आणि कानात स्वर ऐकू येऊ लागले..

अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना..

संपलं! त्या गाण्यातल्या तिच्या त्या लाडिक विनवण्या, तिचं ते अवखळ, अल्लड दिसणं!

एका कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेतली आणि पुन्हा एकदा गेटवेच्या बांधावर बसलो..आणि गाणं ऐकू येऊ लागलं..

जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात!

काय बोलू या गाण्यावर? ठीक आहे. माझी शब्दसंपदा एक वेळ कमी पडेल, मग वरील दुव्यावर जाऊन तुम्हाला तरी तिच्यावर आणि या गाण्यावर काही शब्द सुचताहेत का ते पाहा! मी मनमोकळी दादच देईन!

आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..

कुठून तरी सोहोनीचे स्वर ऐकू येऊ लागले. राग सोहोनी..! शृंगारातील एक जीवघेणी अस्वस्थता आणि त्यात बडे गुलामअलीखासाहेबांची लोचदार-लयदार अशी सुरेल गायकी. मला काही उमगेना, स्वस्थता लाभेना, बेचैन वाटू लागलं! जवळच्याच एका ठेल्यावरून मी १२० पान लावलं. पान मस्त जमलं पण अस्वस्थता जाईना..

प्रेम जोगन बनके
चे ते स्वरच बेचैन करणारे होते. त्यातला तिचा तो शृंगार! सलीमच्या भव्य महालातला तो एकांत. दूर कुठेतरी तानसेन सोहोनी गात बसला आहे त्याचे स्वर अंगावर येताहेत, अस्वस्थ करताहेत! आता ती अवखळ-अल्लड दिसत नाही.. नशीली दिसते! सोहोनीतल्या आर्त शृंगाराने तिचाही कब्जा घेतलाय!

सोहोनीचा अंमल उतरायला जरा वेळच लागला..

कोण ती? का घर करून राहिली आहे माझ्या मनात? मी आसपास पाहिलं. गेटवे भोवतालची ती सारी संध्याकाळ आपल्याच नादात मशगुल होती.. मजा करत होती. मग मीच का असा तिथे खुळ्यासारखा घुटमळत होतो?

खुळ्यासारखा कसा काय? तिला कुणी याद करो वा न करो.. पण निदान मला तरी तिला विसरता येणं शक्य नाही. खुळा तर खुळा! येडगळ तर येडगळ! तुम्ही काहीही म्हणा ना, मला फिकिर नाही..

विचार करत होतो तिच्या आयुष्यावर! तिचं अफाट अमर्याद सौंदर्यच तर त्या यक्षिणीकरता शापित ठरलं नाही ना? जिवंतपणीच दंतकथा कशी काय बनली ती? सुख का नाही लाभलं तिला आयुष्यात? मोकळेपणाने कधी कुणाशी काही बोलली का नाही? मरताना अशांत का होती??

परतीच्या प्रवासात होतो..वरील सर्व प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळण्याजोगे असे सूर ऐकू येऊ लागले..

मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

-- तात्या अभ्यंकर.

कलावाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Feb 2010 - 12:43 am | टारझन

व्वा !! गाण्यांमुळे लेख प्रभावी झाला आहे :)

आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..

आम्ही शिंगल असताना ह्या भावनेचा भरपूर अनुभव घेतलेला आहे ;)

- (डबल) टारझन

शुचि's picture

15 Feb 2010 - 3:50 am | शुचि

तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो? :( :( :(
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अरुण मनोहर's picture

15 Feb 2010 - 7:47 am | अरुण मनोहर

जुन्या गाण्यांची खुमारी नेहमीच नवी, टवटवीत. चीरतारुण्याचे रहस्य.

प्रदीप's picture

15 Feb 2010 - 10:22 am | प्रदीप

आणि लता ह्यांची आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद.

मधुबाला आणी लता ह्यांच्या सोहळ्यातील मला अजून काही आठवले, ते इथे देत आहे..

[अनिल बिश्वास]

*वो दिन कहाँ गये बता?

*मोसे रूठ गया मोरा साँवरिया

*बेईमान तोरे नैनवा नींदिया न आये

********
[सज्जाद हुसैन]

*
वो रात दिन, वो शाम की गुजरी हुई कहाँनिया

*वो तो चले गये ऐ दिल..

********
[मदन मोहन]

*न हंसो हम पे, जमाने के है ठुकराये हुवे..

*सपने ने सजन से दो बातें

*******
[नौशाद]

*बेक़स पे करम कीजिये...

विसोबा खेचर's picture

15 Feb 2010 - 11:04 am | विसोबा खेचर

धन्यवाद प्रदीपराव..

बेक़स पे करम कीजिये... हे माझं अत्यंत आवडतं गाणं.

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे आभार..

तात्या.

नीधप's picture

15 Feb 2010 - 4:33 pm | नीधप

छान लेख.
बेकसपे करम हे माझंही अतीच आवडतं गाणं आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

सन्जोप राव's picture

15 Feb 2010 - 11:58 am | सन्जोप राव

तात्या असं चटका लावणारं का लिहीता हो?
पण बायकांच्या आड्यंन्सला रडवायला ते पोर मारुनबिरुन टाकू नका हां! अरे, मोठ्या माणसांना मारा की. हे बघ, ते हिरॉइनचं बाप भटजी असतंय की नाही? म्हातारंच असणार की ते! मारा की त्याला!
पोरं मारुन, बायका रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप की हो ते! थू!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विसोबा खेचर's picture

15 Feb 2010 - 2:28 pm | विसोबा खेचर

संजोपा, आपलं काय ठरलंय? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! ठरलंय की नाही? :)

तात्या.

सन्जोप राव's picture

16 Feb 2010 - 5:52 am | सन्जोप राव

विसरलो होतो. एक डाव मापी कर हां सायबा..
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विसोबा खेचर's picture

16 Feb 2010 - 7:47 am | विसोबा खेचर

:)

उदय सप्रे's picture

15 Feb 2010 - 2:45 pm | उदय सप्रे

मस्तच !
परवा अशोक हांडे यांचा "मधुरबाला' पाहिला, गडकरी ला !
खरं सांगू का, आपल्याला नाही झेपला बॉ ! अपेक्षा खूप होत्या पण चुराडा झाला !
नाही म्हणायला 'मुगल्-ए-आझम' गाण्यांनी जरा रंगत आणली , पण बरसात की रात एकदम कंडम झालं ! अशोक हांडे पण निवेदनात अतोनात चुका करत होते , हां पण एकच मुदा मस्त ! वर सिलिंगवर "प्यार किया तो डरना क्या" चे ते मधूचं असंख्य काचांमधलं रूप दाखवलं ! (सालं ते पण गडकरी च्या "नागडं"करी सिलिंग्मुळे रद्दी दिसलं !
एखाद्या ठिकाणाचा राडा कसा करायचा हे ह्या ठाणे प्रशासनाकडून शिकावं राव !
मधूच्या आठवणी जाग्या झाल्या....न भूतो न भविष्यती ! आणि आमचीच एक कविता आठवली :
"घडवल्यावर जिला , त्याला वाटलं,
"आपली बाकीची सर्वच निर्मिती नगण्य !"
अशी ही एकच मधुबाला , म्हणजेच
दिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
ला वण्य

प्रशु's picture

15 Feb 2010 - 4:44 pm | प्रशु

बहुतेक पाडगावकरांनी म्हटलयं....

कितिक आल्या कितिक गेल्या..
पण मधुबाला ती मधुबाला

मेघवेडा's picture

15 Feb 2010 - 6:30 pm | मेघवेडा

गाण्यांनी मजा आणली तात्या.
आणि सप्रे साहेब..

मदिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
ला वण्य

वाह, क्या केहने!!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विशाल कुलकर्णी's picture

15 Feb 2010 - 6:59 pm | विशाल कुलकर्णी

का त्रास देताय तात्या?

बाकी लेख अगदी चटका लावणारा झालाय हे सांगायला नकोच. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अनामिका's picture

15 Feb 2010 - 8:17 pm | अनामिका

तात्या!
नेहमीप्रमाणे अतिसुंदर लिखाण्.....पण या लि़खाणाने आमच्या देखिल काही जुन्या स्मृती चाळवल्या.........आणि लावण्यवती मधुबालाच हे
http://www.youtube.com/watch?v=-DObsicnD-k&feature=related"दो घडी वो जो पास आ बैठे" गाण जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेल.
मधुबालाचा सर्वागसुंदर अभिनय आणि लताजींचा आवाज या मिलापाला तोड नाही....
सौदर्याच लेण आसपास वावरत होत त्यामुळे ठोकळा असणारे भारतभुषण सुद्धा अंमळ अभिनय करु शकले असावे बहुदा
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

राजेश घासकडवी's picture

16 Feb 2010 - 10:06 am | राजेश घासकडवी

दोष नाही, तिच्या इतक्या अदांमधल्या किती लक्षात ठेवणार आणि इतक्या छोट्या जागेत किती लिहीणार...

'दो घडी वो जो पास आ बैठे' मध्ये ती जी निरागस नटखट दिसली आहे त्याला तोड नाही. एक तो ठोकळा भारत भुषण सहन करावा लागतो...

चलती का नाम गाडी मधल्या 'लेकीन पेहेले देदो मेरा..' मध्ये ती बेफाम दिसलेली आहे...

'आईये मेहेरबान...' म्हणताना ती जे नजरेने दाखवते त्यासाठी झीनत अमानला बरंच काही करावं लागतं (अर्थात त्याला आमची ना नाही...)

'जानु जानु रे चुपके कौन आया तेरे अंगना' हेही तिचं गोड गाणं...

मी होस्टेलमध्ये होतो तेव्हा माझ्या रूमच्या भिंतीवर मी एक पाच फूट बाय सहा फूट एवढा तिचा चेहेरा स्केच केला होता. तीन वर्ष त्या हास्याने माझी साथ केली.. त्यानंतर पंधरा वर्षं अनेक रंगरंगोट्यातून बचावून इतरांना साथ दिली...

तिच्यावर जीव कुर्बान...

ऋषिकेश's picture

16 Feb 2010 - 10:26 am | ऋषिकेश

सुंदर लेख आणि गाण्यांचे दुवे
प्रदीपरावांनी पण मस्त दुवे दिले आहेत.
दोघांचेही आभार :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

आनंदयात्री's picture

16 Feb 2010 - 10:49 am | आनंदयात्री

मस्त ! तात्याश्टाईल लिखाण वाचायला बर्‍याच दिसांनी मिळाले, और भी आने दो !

आनंदयात्री's picture

16 Feb 2010 - 10:50 am | आनंदयात्री

मस्त ! तात्याश्टाईल लिखाण वाचायला बर्‍याच दिसांनी मिळाले, और भी आने दो !

विसोबा खेचर's picture

16 Feb 2010 - 3:17 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार...

तात्या.

JAGOMOHANPYARE's picture

16 Feb 2010 - 9:17 pm | JAGOMOHANPYARE

छान आहे....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

वाहीदा's picture

17 Feb 2010 - 12:16 pm | वाहीदा

तात्या,
आमच्या जवळच रहाणारी भाभी पण मधुबाला सारखीच दिसते... Infact त्यांच्या घरातील सर्वच स्त्रिया खुपच सुंदर आहेत ... पण सगळेच स्रिया बुरख्यात असल्याने आम्हीच फक्त त्यांना घरी गेल्यावर पाहू शकतो ....ती जिवघेणी अदा आम्ही रोज अनुभवतो
आज घरी गेल्यावर काहीतरी कारण काढून भाभीं कडे जाणार फक्त तिचे ते स्मित हास्य अनुभवायला :H
आम्ही मुली असूनही त्यांच्यावर फिदा ... मग मुलांची काय गत ? =((
~ वाहीदा

दत्ता काळे's picture

17 Feb 2010 - 12:35 pm | दत्ता काळे

फार सुंदर लिखाण.

ललिता's picture

17 Feb 2010 - 2:40 pm | ललिता

अगदी वाहीदा, मधुबाला ही एकच स्त्री जगात असेल जिच्या सौंदर्याबद्दल तमाम स्त्रीवर्गात एकमत आहे!
बाकी बायका दुसर्‍या बाईची अशी सहजा सहजी स्तुती करत नसतात... मधुबाला एक सुंदर अपवाद!

वर्षा म्हसकर-नायर's picture

17 Feb 2010 - 3:47 pm | वर्षा म्हसकर-नायर

तात्या,
लेख खुपच आवडला. एकदम स्वप्निल.
शांता शेळकेंच्या गाण्यातील ओळी आठविल्या.

'स्वप्नामधिल गावा, स्वप्नामधुन जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा... '

एखादा जुना black and white पिक्चर बघत आहोत असे वाटले. कल्पना, मधुबालाचे वर्णन सर्वच आवडले.

जीयो.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Feb 2010 - 4:06 pm | बिपिन कार्यकर्ते

शापित यक्षिणीला त्रिवार मुजरा !!!

बिपिन कार्यकर्ते

योगी९००'s picture

17 Feb 2010 - 4:18 pm | योगी९००

लेख आवडला..

जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्या‍विषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे.

दिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
लावण्य
हे एकदम पटलं.

योगी९००'s picture

17 Feb 2010 - 4:18 pm | योगी९००

लेख आवडला..

जगात फार कमी स्त्रीया अशा आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्या‍विषयी मला आदर वाटतो. (म्हणजे मनात भलते सलते विचार येत नाहीत). मधुबालेच्या सौंदर्याचे हेच वैशिष्ठ आहे.

दिरेशिवाय
धुन्दावणारं
बावनकशी
लावण्य
हे एकदम पटलं.

वर्षा म्हसकर-नायर's picture

17 Feb 2010 - 7:06 pm | वर्षा म्हसकर-नायर

अजुन एक मधुबालाच्या बाबतीत सांगावसे वाटते ते हे कि त्याकाळी कॅमेरामनने अथवा दिग्दर्शकाने खुप सुरेख पद्धतीने तीच्या अदा कॅमेर्‍यात टिपल्या.
पुर्वीच्या गाण्यांचे picturization, चित्रीकरण किती सुरेख असायचे. नाहीतर आता... एका सेकंदाला ५० फ्रेम्स बदलतात. दृष्टीला पडुन मेंदुत रजिस्टर व्हायच्या आत फ्रेम बदललेली असते. आणि गाणी म्हणजे कवायती. जाउ दे. शिवाय ब्लॅक अ‍ॅंड व्हाईटची मजाच काही और असते.n