मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो. अक्षरधारा व परचुरे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मायमराठी महोत्सवातला एक कार्यक्रम होता. कार्यक्रम अगदी औपचारिकतेला फाटा देउन थेट चालु केला. हा प्रकार आपल्याला जाम आवडला ब्वॉ!
निळू दामले म्हणजे एक अवलिया पत्रकार. पारंपारिकतेची जोखड झुगारुन मनस्वी लेखन भ्रमंती करणारा मुक्त लेखक पत्रकार. मुलाखत कसली अगदी अनौपचारिक गप्पाच झाल्या. एकदम संवादी शैली, तरुणाईची भाषा. बोजड विद्वत्ताप्रचुर भानगड नश्शे. आयुष्यावर बोलू काही हाच मानस. प्रशांत दिक्षित हे सामाजिक राजकीय भाष्य करणारे पत्रकार म्हणुन वाचकांना माहीत आहेत त्यांनी निळू दामल्यांना श्रोत्यांच्या वतीने बोलत केल.बदलता अमेरिकन या त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भाने तेथील वर्णद्वेष, सामान्य नागरिक,गुन्हेगारी,राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर दिलखुलास सोदाहरण भाष्य निळु दामले करीत होते. रात्री ट्रेन मधे प्रवास करताना आई मुलीचे भांडण चाललेले त्यांनी पाहिल्यावर त्यांना अगदी आपल्या भारतात आल्यासारखे वाटले. त्यांच्यातला उत्सुक पत्रकार जागा झाला. मुलीला भारतात येउन संस्कृतचा अभ्यास करायचा होता. दामल्यांनी भारतीय असल्याचा फायदा घेउन त्यांना बोलते केले व त्या कुटुंबातला एक हितचिंतक सदस्य बनले. अमेरिकेत आणि भारतात माणसे मुलभुत सारखीच. फरक फक्त चाकोरीबाहेर जगण्याची मानसिकता व तेथील भौतिक सुख सुविधांबाबत आग्रही असणारा नागरिक. तो धर्म तिथे आड येत असेल तर धर्माला बाजुला करतो. तिथल बेसिक जगण अॅश्युअर्ड आहे.
समलैंगितेला पाश्चात्य जगात मानाचे स्थान आहे तो त्यांचा अधिकार म्हणुन. त्यांच्यात असलेल्या जिनियस वृत्तीला आर्थिक सुबत्तेची जोड मिळाली. मॆंचेस्टर च गे सिटी त्याच उदाहरण आहे. समलैंगिकतेला ख्रिश्चनिटी मधे पण विरोध होता तो नंतर कसा मोडुन निघाला हे सांगताना त्यांनी उपयुक्तता मुल्याचा वापर करुन समलिंगी लोकांनी उपेक्षित जगण्यातुन कसे स्वत:ला वर आणले हे सांगितले. लैंगिक मानसिकते बद्दल वेगळेपण हाच काय तो फरक. मला धनंजयच्या कोणार्कच्या मंदिराची शिल्पे ची आठवण झाली.
निळुभाउंनी भारतातील समकालीन परिस्थितीव भाष्य करताना उपदेशाचे डोस न पाजता साध्या साध्या संकल्पना राबवण्यावर भर दिला. अभिमत विद्यापीठांची उत्पत्ती व त्यातील लागेबांधे यावर मिष्किल व रोखठोक भाष्य केल. येथील ए आय सी टी, नॅक च्या मान्यता घेण्यातील भ्रष्टाचार मांडला. नॅक मान्यता प्राप्त कॊलेज मधे संडास बाथरुम नाहीत. ज्या कॊलेजच्या संडासांमधे जाणे हेल्दी नाही अशा कॊलेजना ही मान्यता कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला आहे अमेरिकेत जेव्हा अस काही घडत तेव्हा ब्लॊगच्या माध्यमातुन अशा गोष्टींची वाट लावतात. NIKE या कंपनीत मुलांना कमी पगार देउन शोषण करणार्या प्रकरण एका एमाआयटी तील ब्लॉगर विद्यार्थ्याने उघड्कीस आणले.आपल्याकडेही ते माध्यम उपलब्ध आहे आपण ते वापरु शकतो. हे ऐकताना मला नीधप यांच्या स्वच्छतेच्या बैलाला या ब्लॉगिंगच्या माध्यमातुन केलेला स्तुत्य प्रयत्नाची आठवण झाली. नीधप जेव्हा मराठी ब्लॉगर्स मेळाव्याला आल्या होत्या तेव्हा मी व्यक्तिश: भेटुन त्यांच स्वत:हून (या बाबतीत) कौतुक केल होत बर का! असो तर सांगायचा मुद्दा हा कि निळु दामल्यांनी ब्लॉगर्स मधे असलेली ताकद वापरण्याचे आवाहन केल.
गप्पा मारताना त्यांनी वाचन संस्कृतीत लंडनमधील बुक स्टॊलविषयी उदाहरण दिल. तिथ शेजारीच कॆफे मधे व्हिस्की मिळते आणि चक्क विस्की महोत्सव साजरा करतात. इथे पुण्यात पाथफाईंडर मधे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला तेथील कॆफे मधे कॊफी बरोबर बिअर किंवा वाईन पण ठेवली असती तर काय मजा आली असती असा विचार चाटुन गेला होता. निळू दामल्यांनी चक्क आमच्या मनातील हीच वाईन महोत्सवाची कल्पना मांडली त्यामुळे आपण त्यांच्यावर एकदम खुश झालो ब्वॊ.
अक्षरधाराने १००० रुपयांच्या पुस्तकावर ३०० रु ची वाईन फ्री अशी कल्पना राबवली तर मजा येईल. नाहीतरी तुम्ही ३०% देताच कि!
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत दिक्षितांनी वर्षा दोन वर्षांनी जेव्हा भेटु तेव्हा पुस्तक महोत्सवाबरोबर वाईन महोत्सवही असेल अशी आमच्या मनातील आशा व्यक्त करुन एक आनंददायी गप्पांचा शेवट केला. आम्ही पुणेरी पद्ध्तीने चपळाईने पुढे येउन मराठी ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने आभार मानुन लक्ष वेधुन घेतले व मराठी ब्लॉगिंग विषयी थोडक्यात माहीती दिली. आता कुणी याला टिमकी वाजवुन घेतली असे म्हणले तर म्हणोत बापडे!
तुम्हाला या गप्पा मात्र टिचकीसरशी गप्पा ऐकता येतील. ऐका!
प्रतिक्रिया
22 Jan 2010 - 11:13 am | प्रमोद देव
घाटपांडे साहेब वृत्तांत अगदी रोचक आहे.
गप्पा मात्र ऐकू येत नाहीयेत. :(
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
22 Jan 2010 - 11:50 am | II विकास II
>>गप्पा मात्र ऐकू येत नाहीयेत
+१
22 Jan 2010 - 11:40 am | समंजस
छान! =D>
22 Jan 2010 - 3:45 pm | प्रमोद देव
छान,अनौपचारिक गप्पा आवडल्या.
निळू दामले लिहितातही मस्त.
धन्यवाद घाटपांडेसाहेब.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
22 Jan 2010 - 4:37 pm | स्वाती२
छान वृत्तांत आणि गप्पा! धन्यवाद.
22 Jan 2010 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घाटपांडे साहेब, गप्पा आवडल्या...!
>>नॅक मान्यता प्राप्त कॊलेज मधे संडास बाथरुम नाहीत. ज्या कॊलेजच्या संडासांमधे जाणे हेल्दी नाही अशा कॊलेजना ही मान्यता कशी मिळते?
दिल्या जाणार्या मान्यतेमुळे महाविद्यालयांमधे बदल नक्कीच झाले. नॅक समितीतील सदस्यांनी अधिक प्रामाणिकपणे काम केले असते तर, काही बदल निश्चित दिसले असते.
-दिलीप बिरुटे