संदीप खरेची 'नास्तिक' ही कविता बरेच दिवस मनात ठाण मांडून होती, आणि आज अचानक अनेक दिवसांनी .......
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा खरं तर साहित्यात भरच पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सट्ट्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची !
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण गरज
कवींनी आपले काव्य पाडणे थांबवून टांकसाळीबाहेर येण्याची !
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा शोधक नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या कविता, कंपूबाज प्रतिसादकांची जत्रा...
कोणीतरी आपल्या कविता विडंबल्यामुळे(च)
वाचल्या जात असल्याचे समाधान लाभते कवींनाच!
म्हणून तर एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा खर्या वाचकांना एक कवी कमी मिळत असेल कदाचित!
पण मिळते आकंठ समाधान उगाच 'प्राचीला-गच्ची' न वाचायला लागल्याचे!
टांकसाळ बंद झाल्यावर लगबगीने बाहेर येऊन
तिथे विसावलेल्या विडंबकाशी गप्पा मारता मारता
कवी म्हणतो, "विडंबनं करत जा अधून मधून........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना!"
टांकसाळीबाहेर थांबलेला एक खरा खुरा विडंबक
त्याला टांकसाळीत बोलावणार्या कवीला मोठ्या मिन्नतवारीने थोपवतो
तेव्हा कुठे वाचायला मिळतात
वक्रोक्तीच्या भरजरी शालजोडीत लपेटलेली विडंबनं....
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो..............
-चतुरंग
प्रतिक्रिया
12 Jan 2010 - 9:36 pm | jaypal
रंगाशेठ (आणि विडंबन) अफलातुनच आहे.
रंगाशेठच्या टांकसाळीतुन बाहेर पडलेल आणखी एक खणखणीत नाणं
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Jan 2010 - 10:33 pm | श्रावण मोडक
तुमच्या तारतम्याला दाद!
12 Jan 2010 - 10:47 pm | उग्रसेन
वरीजनल आन ह्या इडंबनाचा सुर काय जुळला नाय बा.
इंडंबन म्हून मजा नाय आली. सॉरी हं काका.
बाबुराव :)
12 Jan 2010 - 11:09 pm | टारझन
ह्हा ह्हा ह्हा ... एकदम चाबूक ... नेमकं !! गद्य विडंबणांच्या बाबतीत आमचा हाच अनुभव आहे !
- मी लोळ =))
12 Jan 2010 - 11:40 pm | प्राजु
सह्ही!
एकदम भारी.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
13 Jan 2010 - 3:51 am | चित्रा
म्हटले तर विडंबन, म्हटले तर स्वतंत्र निर्मिती.
आवडली कविता.
13 Jan 2010 - 6:12 am | मीनल
+१
मीनल.
13 Jan 2010 - 6:04 am | प्रभो
मस्त हो रंगाशेठ.
आवडलं विडंबन.
पण मिळते आकंठ समाधान उगाच 'प्राचीला-गच्ची' न वाचायला लागल्याचे!
=)) =)) =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
13 Jan 2010 - 9:14 am | विनायक प्रभू
वि....डंबन
13 Jan 2010 - 9:48 am | केशवसुमार
रंगाशेठ,
एकदम जब्राट विडंबन..
(खरा खुरा कवी)केशवसुमार
13 Jan 2010 - 11:20 am | विशाल कुलकर्णी
जबरदस्त , अप्रतिम रंगाभाऊ :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Jan 2010 - 8:46 pm | गणपा
तुम्ही स्वतः विडंबन म्हणताय म्हणुन आम्ही ही म्हणतो.
बाकी हे स्वतंत्र काव्य म्हणण्याच्या लायकीचे आहे.
जियो रंगाशेठ.
14 Jan 2010 - 4:40 pm | चतुरंग
आवडलेल्या/न आवडलेल्या आणि प्रतिसाद देणार्या/न देणार्या सर्वांचे आभार!!
(तीळगूळ घ्या गोड बोला!)
(खराखुरा विडंबक)चतुरंग