या निर्दय मंत्र्यांचा धिक्कार!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 Jan 2010 - 10:33 pm

आताच माणुसकीला काळिमा लावणार्‍या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त्रावाने इस्पितळाच्या वाटेवर मरण पावला. या सर्व घटनेत हे मंत्रीद्वय गाडीतून उतरलेही नाहीत, इतकंच नव्हे तर त्यांनी आपली गाडी वेत्रवल्ली ला इस्पितळात नेण्यासाठी देण्यासही नकार दिला!

या भ्याड मंत्र्यांचा जितका निषेध करावा तितका कमीच, त्यांना सार्वजनिकरीत्या अपमानित केले पाहिजे.

आधिक वृत्तासाठी इथे पहा.

समाजमाध्यमवेधप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

8 Jan 2010 - 10:50 pm | देवदत्त

अपमानित?
तुम्हाला दंडित म्हणायचे आहे का? अपमानित करून त्यांना काही फरक पडणार नाही. :|

रेवती's picture

8 Jan 2010 - 11:17 pm | रेवती

असेच म्हणते.
नीच कर्म असेच म्हणायला हवे.

रेवती

कशिद's picture

8 Jan 2010 - 11:03 pm | कशिद

निषेध !! निषेध !!! निषेध !!!!

jaypal's picture

9 Jan 2010 - 10:57 am | jaypal

म.टा. पान क्र.७ वाचुन या विषयावर धागा टाकायच्या विचारत होतो.
संतापाने अता काय लिहु ते सुचत नाही . मंत्री हे असे षंढ निघाले आणि मिडीय वाले पण मदतीच्या ऐवजी बातमी कव्हर करण्यात गुंग होते म्हणे. या प्रतिसादाची इथे आठवण झाली.
मग कशाला कोण **घालयाला जिवावर उदार होऊन कामं करतील?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/