भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन (भाग १/२)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Nov 2009 - 9:49 am

भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन
हा भाग : भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन (भाग १/२)
(पुढील भाग : भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन(भाग २/२))

सहकार म्हणजे सारख्याविचारसरणीचे लोक एकत्र येवून एखादी आर्थिक उलाढाल करणारी संस्था. यात एक व्यक्ती एक मत असल्या प्रणालीचा वापर होतो. अगदी सुरूवातीला इंग्लंडमध्ये सहकारी तत्वावर असणारी शेतकर्‍यांची संस्था होती.

भारतात असणारे शेतकरी सावकारांच्या कचाट्यात पिळून निघत होते. कर्जामुळे त्यांची शेतजमीन होत्याची नव्हती होत होती. त्याच काळी १९०४ साली सहकार कायदा मंजूर झाला. त्या कायद्यान्वये भारतात सहकारी तत्वावर संस्था उभ्या करण्याची परवानगी मिळू लागली. लगोलग बडोदा येथे 'अन्योन्य सहकारी बँक' स्थापन झाली. त्या आधीही निकोलसन या इंग्रज अधिकार्‍याच्या प्रयत्नांमुळे भारतात सहकारी पतपेढ्या अस्तित्वात आलेल्या होत्या. आधिच्या कालखंडातील सहकारी पतपेढ्या यांचे स्वरूप केवळ शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्था असेच स्वरूप होते. आजकाल सहकारी चळवळ अनेक उद्योग व्यवसायांत फोफावलेली दिसते तसले विस्तृत, सर्वसमावेशक असले त्यांचे स्वरूप नव्हते. १९०४ च्या सहकारी कायद्यामुळे त्या चळवळीला एक कायद्याची चौकट लाभली. १९१२ साली या कायद्यात सुधारणा होवून केवळ आर्थिक व्यवहार न करणार्‍या सहकारी संस्थांनाही परवानगी मिळू लागली. या कायद्यामुळे सहकारी संस्था वेगाने अस्तिस्त्वात आल्या. लगोलग १९१९ साली मुंबई सरकारने यासंदर्भात कायदा केला. त्याचेच अनुकरण प. बंगाल, मद्रास, बिहार व ओरीसा या सरकारांनी केले. साधारणता: १९१९ ते १९२९ सालात या क्षेत्रात ज्या काही घाडामोडी होत होत्या ती केवळ संख्यात्मक वाढ होती, गुणात्मक नव्हती. म्हणून हा कालखंड सहकारी ईतीहासात सुनियोजीत विकासाचा नव्हता. १९२९ सालापर्यंत तर जगतिक युद्ध, मंदी या करणामुळे सहकारी संस्थाचे आर्थिक गणित कोलमडल्या मुळे पंजाब, हरियाणा, बिहार या प्रांतातल्या बर्‍याचशा संस्था बंद पडल्या. मुंबई प्रांतातल्या संस्थांचे ९३% कर्ज हे विनावसूलीत होते. यावरून आर्थिक स्थिती किती भीषण होती ते लक्षात येते.

१९३५ साली भारतीय रिझर्व बँन्क अस्तित्वात आली. तिच्यात असलेल्या सहकारी खात्याने १९३७ साली सहकारी संस्थांना अग्रक्रम देण्याची सुचना केली. १९३९ ते १९४७ सालात अनेक शेतीतर सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. त्यात प्रामुख्याने सहकारी ग्राहक भांडार, युद्धात पुरवठा करणार्‍या संस्था आदी संस्था होत्या. शेतकरीही आपआपल्या कर्जांचे परतफेड करू लागल्याने सहकारी संस्था परत बाळसे धरू लागल्या. याच काळात 'गुजरात सहकारी दुध महासंघाचे' 'अमुल' (आनंद मिल्क युनियन) अस्तित्वात आली. १९४८ साली पायाभरणी होवून १९५१ साली आशिया खंडातील पहिला साखर कारखाना 'प्रवरानगर सहकारी साखर कारखाना' चालू झाला ही महाराष्ट्राला अभिमान वाटणारी घटना आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटिल यांचे नाव यानिमीत्ताने सहकारी ईतिहासात कायम लक्षात राहिल.

नंतरच्या लालबहाद्दूर शास्त्रींच्या काळात सहकार हे क्षेत्र पंचवार्षीक नियोजन योजनांमध्येही लक्षात घेतले जावू लागले. त्यानंतर 'राष्ट्रिय शेती व ग्रामीण विकास बॅंक (NABARD)' ही सहकारी बँकावर लक्ष ठेवणारी संस्था अस्तित्वात आली. भारत सरकारनेही 'अमुल' चा कित्ता इतरत्र गिरवण्यास सुरूवात केली. संपुर्ण भारतात त्या नंतर अनेक सहकारी संस्था अस्तित्वात आल्या व त्यांत झपाट्याने प्रगती होवू लागली.

१९६० च्या दशकात महाराष्ट्रातून डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, श्री. दे.गो.कर्वे, ना. गोखले, तात्यासाहेब केळकर वर उल्लेखिलेले विठ्ठलराव विखे-पाटिल आदींचे समर्थ नेतृत्व लाभले.
वर उल्लेखलिल्या व्यक्तिंविना महाराष्ट्रातीलच काय पण भारतातीलही सहकारी चळवळ मागे पडली असती.

कोल्हापुरची वारणा सहाकारी दुध उत्पादक संस्था ही पण एक मान्यता पावलेली सहकारी संस्था आहे. आण्णासाहेब कोरे हे नावही यापुढील काळात मानाने घेतले जाईल. सहकारी संस्था शेतीमाल, शेतकरी आदींपुरत्याच मर्यादीत न राहता गृहनिर्माण, सहकारी खरेदी, सहकारी कारखाने, मस्त्यव्यवसाय, पुरवठा, मजूर संस्था, मुद्रण आदी अनेक क्षेत्रातही सहकाराचा शिरकाव झाला. यात सरकारने घेतलेला पुढाकार फार महत्वाचा आहे.

साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, हुकूमशाही या प्रमाणेच सहकार हिसुद्धा एक मानवी अस्तीत्वाची प्रणाली आहे हे आपण मान्य केलेच पाहीजे.

सहकाराची अशी ही साधारणता: १०० वर्षे फार दैधिप्यमान असूनही सहकारी क्षेत्राचा पाहिजेतसा विकास झालेला आपल्याला दिसत नाही. पुर्वकडच्या राज्यांत तर अजुनही सहकारी चळवळ बाल्यावस्थेत आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे सहकाराची झालेली वाढ हि केवळ संख्यात्मक वाढ होती, गुणात्मक नव्हती. असे का झाले त्याची कारणमिमांसा आपण पुढील भागात बघू.

(पुढील भाग : भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन(भाग २/२))

(लेख बोजड होवू नये म्हणून सहकारी संस्था, त्यांची आकडेवारी, आर्थिक ताळेबंद आदी फापटपसारा माझ्यासारख्या अल्पमती असणार्‍याच्या लक्षात न राहिल्याने दिलेला नाही. लेखात आकडेवारी, सनावळ्या यांत त्रूटी असू शकते. इच्छूकांनी अधिक माहितीसाठी अधिकारी संस्थांशी संपर्क करावा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या )

समाजजीवनमानलेखमाहिती

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Nov 2009 - 10:01 am | llपुण्याचे पेशवेll

छान छान. वाचतो आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

टारझन's picture

24 Nov 2009 - 10:17 pm | टारझन

काय सांगावे ... सुंदरंच आहे लेख ... अतिशय आवडले ...
लेखकाचा चाहता झालो मी !

- टारझन

मदनबाण's picture

24 Nov 2009 - 10:44 am | मदनबाण

दफोराव छान लिहले आहे.

भारतात असणारे शेतकरी सावकारांच्या कचाट्यात पिळून निघत होते.
आजही तीच अवस्था आहे. :(

याच काळात 'गुजरात सहकारी दुध महासंघाचे' 'अमुल' (आनंद मिल्क युनियन) अस्तित्वात आली.
आपल्या इथल्या आरेची काय अवस्था आहे ? एकेकाळी सगळीकडे एनर्जी हे त्यांचे पेय मिळायचे आता सगळीकडे अमुल कुल मिळते.

कोल्हापुरची वारणा सहाकारी दुध उत्पादक संस्था ही पण एक मान्यता पावलेली सहकारी संस्था आहे.
यांचे श्रीखंड उत्तम चवीचे आणि दर्जाचे असते...आता बर्‍याच दुकानात यांचे श्रीखंड मिळणे बंद झाले आहे,त्या जागी अमुलचे श्रीखंड मिळते.

पुढच्या भागाची वाट पाहतोय.

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

‘आरे’च्या मलईदार जमिनींवर राजकारणी, बिल्डरांची नजर!
http://www.loksatta.com/old/daily/20090803/mp04.htm

jaypal's picture

24 Nov 2009 - 10:54 am | jaypal

मदनाचा बाण बरोबर लागला आहे. त्याच्या सर्व विधानांशी सहमत.
विषेतः "आरे" वा त्या बाबतचा दुवा. (बडे तिरंदाज हो/)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Nov 2009 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll

वारणावाले सध्या असल्या सामान्य माणसांना आवडणार्‍या फालतू गोष्टी विकण्याऐवजी, बोर्नव्हीटाचे उत्पादन करतात कॅडबरीज् साठी.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

राकेश वेंदे's picture

24 Nov 2009 - 10:49 am | राकेश वेंदे

पुढील भागाची वाट पाहत आहे.

अवलिया's picture

24 Nov 2009 - 11:02 am | अवलिया

चांगला लेख !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ....

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सुनील's picture

24 Nov 2009 - 11:19 am | सुनील

महाराष्ट्राचा सहकारी इतिहास धनंजयराव गाडगीळ ह्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ही नजरचूकदेखिल असू शकेल, पण अनुल्लेख थोडा खटकला.

बाकी लेख उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

24 Nov 2009 - 1:12 pm | पाषाणभेद

सुनीलराव खरोखर माफ करा. (लेख पहाटे लिहायला घेतला होता. मुद्दे डोक्यात होते पण कागदावर आले नाही. त्यामुळे खरोखर लक्षात आले नाही.)

१९६० च्या दशकात महाराष्ट्रातून डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, श्री. दे.गो.कर्वे, ना. गोखले, तात्यासाहेब केळकर वर उल्लेखिलेले विठ्ठलराव विखे-पाटिल आदींचे समर्थ नेतृत्व लाभले.

वर उल्लेखलिल्या व्यक्तिंविना महाराष्ट्रातीलच काय पण भारतातीलही सहकारी चळवळ मागे पडली असती.

मुळ लेखात वरील उल्लेख टाकून चुकीची भरपाई केली आहे.
- पा.भे. उर्फ द.फो.

स्वाती२'s picture

24 Nov 2009 - 6:40 pm | स्वाती२

चांगला लेख. पुढील भागाची वाट बघतेय.

प्रभो's picture

24 Nov 2009 - 8:04 pm | प्रभो

पुढील भागाची वाट बघतेय.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विकास's picture

25 Nov 2009 - 1:30 am | विकास

लेख आवडला. सहकारक्षेत्राबाबत महाराष्ट्रापुरती थोडीफार माहीती होती पण संक्षिप्त तरीही विस्तॄत वाचायला आवडले.

धन्यवाद!

राहूल's picture

30 Nov 2009 - 8:01 pm | राहूल

लेख आवडला. एक सुधारणा:

कोल्हापुरची वारणा सहाकारी दुध उत्पादक संस्था ही पण एक मान्यता पावलेली सहकारी संस्था आहे. आण्णासाहेब कोरे हे नावही यापुढील काळात मानाने घेतले जाईल.

वारणेच्या संस्थापकांचे नाव 'आण्णासाहेब' नसून 'तात्यासाहेब' आहे. तात्यासाहेबांचा आदर्श नंतर कित्येक लोकांनी घेतला. जाताजाता.. वारणेच्या विकासाचा वेध घेणारा एक सुंदर लेख नमूद करावासा वाटतो: वारणानगरची मयसभा!

मदनबाण's picture

30 Nov 2009 - 8:12 pm | मदनबाण

उत्तम दुवा... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

मन१'s picture

9 Sep 2012 - 2:08 pm | मन१

वर्गिस कुरियन गेल्याचे आताच समजले.
सहकार चळवळीतील अग्रणीस श्रद्धांजली.