जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली
डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच्
असो...
मधूनच घाऊक बरसतो कसा मालक
टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक
पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर
संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर
पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे
बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे
जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण
टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन
३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून
पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून
टीळा लावियला भाली, टार्या माळ घालून
टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो सुधारून
चेतन
अवांतर: वरील कवितेला "जिरवा खाज" किंवा "मिरवा माज" अशी शिर्षके सुचली होती पण डांबिसकाकांचे विडंबन वाचुन "पिवळा बाज" जास्त बर वाटलं ;)
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 4:19 pm | गणपा
एकदम जबहर्या
मस्त जमुन आलय इडंबन
25 Nov 2009 - 5:49 pm | धमाल मुलगा
एऽऽकदम कऽडक :)
25 Nov 2009 - 8:14 pm | प्रभो
एऽऽकदम कऽडक
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 8:58 pm | ब्रिटिश टिंग्या
क ड क!
- टिंग्या
26 Nov 2009 - 1:01 am | टुकुल
ज ब र द स्त !!
--टुकुल
25 Nov 2009 - 4:35 pm | अमृतांजन
एकदम खोडकर विडंबन!
खूप आवडले.
25 Nov 2009 - 4:39 pm | llपुण्याचे पेशवेll
अरे मस्त रे चेतन्या. वेलकम टू धी क्लब ऑफ सिटिंग इन वातानूकुलीत हापिस अॅन्ड पाडिंग कविता विडंबान. :)
पुण्याचे पेशवे
अवांतरः नगाडा हा हिंदी शब्द वाटतो त्याला मराठी शब्द नगारा असा आहे.
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 5:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण यमकात बसवायला पहिल्याच ओळीत काही शब्द इकडे तिकडे करता येतीलः
याऐवजी
मधूनच घाऊक बरसतो कसा मालक
टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक
हे जास्त योग्य वाटेल.
बाकी आमचं नाव विडंबनात पाहून काय वाटलं हे मी लिहीण्यासाठी जागा सोडत आहे.
अदिती
25 Nov 2009 - 6:35 pm | अवलिया
छान !
जास्त सविस्तर प्रतिसाद दिला तर लेटेष्ट संपादक धापा टाकतील म्हणुन थांबतो
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
25 Nov 2009 - 6:57 pm | सूहास (not verified)
ख ल्ला स ..
सू हा स...
25 Nov 2009 - 8:08 pm | पिवळा डांबिस
वा, वा, पंत!!!
धमाल लिहिलंय!!!!
:)
25 Nov 2009 - 11:22 pm | टारझन
वाह चेतनराव !! काय खंगरी लिहीलंय हो ! कसं काय सुचतं तुम्हाला एवढं चपखल ? अतिशय सुंदर काव्यात्मक रचना .. चाल लावुन वाचता आलय ओ
आपली सध्य स्थितीवर बारिक नजर आहे .. आवडलेच ..
बाकी "जिरवा खाज" हे आम्हालाही सुचलं होतं .. पण त्याचा आम्ही मर्डर केला हे तुम्ही जाणताच. असो बदलिन
- टारझन
26 Nov 2009 - 12:02 am | कवटी
चेतनराव लैच बेष्ट झालय.... तुमच्या अभ्यासाला आणि काव्य प्रतिभेला सलाम!
श्री. टारझण यांस,
भाड्या चक्क टारझन अशी सही???????
"मधुनच बरसतो कसा मालक घाऊक" हे खरे की काय?
कवटी
25 Nov 2009 - 11:47 pm | विसोबा खेचर
छान रे! :)
25 Nov 2009 - 11:59 pm | शाहरुख
मिपा प्रशासनावरची विडंबनं वाचून उबग आलाय पण हे चांगलं जमलंय..
26 Nov 2009 - 9:49 am | चेतन
बल्लवाचार्य गणपा, धम्या, प्रभो, टिंग्या, टुकुल, अमृतांजन, अवलिया, सू हा स, डांबिस काका, टार्या, कवटी, शहारुख धन्यवाद
मालक उर्फ विसोबा खेचर उर्फ आणिबाणिचा प्रशासक स्पेशल धन्यवाद
पुपे बदल केलायं (इथे मेवाडी मध्ये सुद्धा नगारा असाच शब्द आहे) धन्स
आदिती ताई सुंदर बदल आवडला धन्यवाद
चेतन