ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली....
डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ. ना फाट्यावर मारण्यात येईल)
असो...
प्रगल्भ विचारवंतांनी वास्तव थंड केले
म्हणे मराठी माणसाने राष्ट्रद्रोही बंड केले
पाहुनी द्वेष जेव्हा वळल्या मुठी जनांच्या
मवाली डुकरे म्हणोनी प्रगल्भता सिध्द केले
जेव्हा उभे राहिले पाठीमागे मराठी जन
एका दगडामुळे मूळ प्रश्नांस थंड केले
बोललेली वचने नडतील दर्जास म्हणूनी
प्रतिसाद संपादित करुनी 'मिपा'द्वेषास थंड केले
जेव्हा प्रयत्न केला त्यास विरोध करण्याचा
नैतिकतेच्या नावाखाली विचारास बंद केले
नव्या आयडिच्या आड 'ते'च जुने आयडी
मुर्ख लक्षणे वाचुनही नवे सदस्यत्व लोड केले
अहिंसेचा बुरखा फाड 'हे' नवे कलंत्री
वदले " 'मन' से " केले तेच योग्य झाले
धग 'काडि'ची तरी उरली आहे का मनी?
मन पेटणार कसे? स्वतःहुन मनांस षंढ केले
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 11:23 am | अवलिया
क्या बात है ! वा !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
25 Nov 2009 - 11:57 am | टारझन
चेतन सर .. सलाम आहे अपल्या काव्यप्रतिभेला ! जबरदस्त टोलेबाजी केली आहे .
मी तर आपल्या लेखणाच्या प्रेमातंच पडलोय .. किती सुंदर लिहीता तुम्ही . आजपासून मी तुमचा चाहता !!
अल्टिमेट !!
* बाकी प्रतिसाद धागा वाचून
- टारझन
25 Nov 2009 - 12:04 pm | अमृतांजन
"नव्या आयडिच्या आड 'ते'च जुने आयडी
मुर्ख लक्षणे वाचुनही नवे सदस्यत्व लोड केले"
क्या बात है!
ह्यातील लोड हा शब्द तुम्हाल कसा सुचला? तो कोणत्या बोली भाषेतला आहे?
[श्रीमती शांता शेळके ह्यांना "वल्हव रे नाखवा" ह्या गाण्यातील "नाखवा" हा शब्द पाहून असेच एका मुलाखतकाराने त्यांना विचारले होते.][माझ्या कविता वाचूनही मला कोणीतरी असा प्रश्न विचारावा असे मला राहून-राहून वाटते,] [हा प्रश्न मी तुम्हाला विचारुन एक हिंट दिली आहे]
25 Nov 2009 - 2:05 pm | चेतन
आयडी ज्या भाषेत आहे त्याच भाषेत लोड आहे
>>हा प्रश्न मी तुम्हाला विचारुन एक हिंट दिली आहे
हिंट ही त्याच भाषेत आहे
;)
>>माझ्या कविता वाचूनही मला कोणीतरी असा प्रश्न विचारावा असे मला राहून-राहून वाटते
बरेच प्रतिसाद आहेत की तुमच्या कवितेवर :W
अवांतरः हा कोदाचा नविन शिष्य तर नाही ना आला
अतिअवांतरः जालिंदर बाबांची शिकवणी लावा
25 Nov 2009 - 5:26 pm | ऋषिकेश
:)
चालु दे!
बाय द वे माझ्या कवितेचे कोणीतरी पहिल्यांदा विडंबन केले आहे. :) कवितेला विडंबनास पात्र ठरविल्याबद्दल मनापासून आभार
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
25 Nov 2009 - 5:27 pm | सूहास (not verified)
नव्या आयडिच्या आड 'ते'च जुने आयडी
मुर्ख लक्षणे वाचुनही नवे सदस्यत्व लोड केले >>.
=)) =))
मस्त !!
सू हा स...
25 Nov 2009 - 5:58 pm | धमाल मुलगा
_/\_
एका स्वाभिमानी मराठी मनाची तगमग उत्तम प्रकट झालीये.
25 Nov 2009 - 8:11 pm | प्रभो
जबहरा....कविता सुंदर झालीय...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
26 Nov 2009 - 9:39 am | चेतन
अवलिया, माळकरी संत टारझन, अमृतांजन, सू हा स, धम्या, प्रभो धन्यवाद
ऋषिकेश
>>कवितेला विडंबनास पात्र ठरविल्याबद्दल मनापासून आभार
कविता नक्कीच चांगली होती ;)
विचारही चांगले होते. (मनसे बद्दल थोडासा माझा विचार वेगळा होता)
तु लिहलेलं कदाचित मला "कावळा बसला आणि फांदी मोडली" या प्रकारातलं वाटलं
असो. प्रत्येकाचा विचार वेगळा :)
धम्या स्पेशल धन्स
चेतन