आकाश फाटल तर ठीगळ तरी कुठे कुठे लावायच?
तुला जिथे जमते तिथे लाव, उरलेल्याची काळजी करु नकोस.
इतके दिवस एकटाच होतो.
देखते देखते कारवां बन रहा है.
मिपावर आल्यावर रामदासांशी मैत्री झाली.
पहील्या भेटीतच लक्षात आले की हे रसायन वेगळ आहे.
तीच गोष्ट विजुभौंची.
ही मंडळी आपल्याबरोबर आली तर?
बोलत राहीलो, भेटत राहीलो.
कुठेतरी मनात पक्की गाठ बांधली ह्यांना पण आपल्या सारखेच बोर्डावर तुणतुणे घेउन उभे करायचे.
त्यांच्या दैनंदिन जिवनातुन वेळ देतील की नाही ह्याची शंका होती.
पण 'मराठी- मराठी' ही नुस्ती चर्चा करणारी ही मंडळी नाहीत हे पण नक्की माहीत होते.
फक्त प्रश्न होता तो कधी?
म्हणता म्हणता आलीच की हो वेळ.
दोघेही उभे राहीले.
काय सांगु तुम्हाला.
ते जे काही बोलले, ज्या पद्धतीने बोलले ते अयकुन अंगावर रोमांच उभे राहीले.
खुप आनंद झाला.
सुमारे ७० आकडी संख्या बोर्डा वर लिहुन सुमारे अर्धा तासाने ती तशीच्या तशी परत लिहीणे..
त्यानी फळ्यावर एकदा लिहिलेली संख्या ते दुसर्यांदा पूर्ण लिहुन दाखवेपर्यन्त छातीत धाकधूक होत असते.
अक्षरशः निशब्द केले हो विजुभौ नी.
आपल्याला लक्षात ठेवायला कष्ट घ्यावे लागतात.
विजुभौना विसरायला. ५० वस्तुंची लीस्ट उलटसुलटक्रमाने १ तासाच्या अंतरा सुद्धा सांगु शकतात ते.
विजुभाऊ मुलाना कॉन्सेन्ट्रेशन करायचे ते शिकवतात. जे वाचू ते सगळेच्या सगळे लक्षात कसे ठेवायचे ते शिकवतात. अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते.
रामदासांबद्दल काय लिहु.
लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८
१५० विद्यार्थ्यांना सुमारे एक तास खिळवुन ठेवणे सोपी गोष्ट नाही हो.
रसाळ सोपी भाषा. श्रोत्याना थेट भिडणारी. मंत्रमुग्ध होतात हो पोरे.
या माणसाला नक्की काय काय अवगत आहे याचा पत्ता लागत नाही
वरुन काही चुकत असेल तर सांगा हा नम्रपणा.
जाता जाता: ह्या नंतरचा नंबर बिकाचा. अंदाज नाही खात्री आहे ते पण तेवढेच प्रभावशाली असतील.
प्रतिक्रिया
14 Nov 2009 - 9:29 am | सहज
प्रबुमास्तर, रामदाससर व विजुभौ!! अभिनंदन
विजुभौ, ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे, आजकाल फार विसरायला होतेय. :-)
14 Nov 2009 - 9:36 am | चित्रा
ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे
असेच म्हणते.
सर्वांचे अभिनंदन. खूपच चांगले काम करता आहात.
14 Nov 2009 - 10:33 am | मुक्तसुनीत
हेच बोल्तो ! :-)
सर्वाना पाहून , कामाबद्दल ऐकून आनंद झाला. अनेकोत्तम शुभेच्छा !
14 Nov 2009 - 3:50 pm | Nile
म्या पण हेच बोल्तो! लई भारी.
हार्दीक शुभकामना.
14 Nov 2009 - 8:05 pm | अनामिक
हेच बोलतो... अभिनंदन आणि शुभेच्छा!
-अनामिक
14 Nov 2009 - 8:52 pm | टारझन
विजुभौ आणि रामदासांना प्रत्यक्ष भेटल्यानं त्यांचे गुण सेण्सले होते .. :)
आणि बिका सारखा बॅलंस्ड , प्रत्येक शब्द तोलून मोलून बोलणारा सेन्सिबल माणूस मी तरी अजुन पाहिलेला नव्हता :) !!
सगळेच , जियो !!
आणि मास्तरांना खुलाश्याबद्दल धन्यवाद !
- टारझन
15 Nov 2009 - 1:04 am | स्वप्निल..
सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!
एकदा भेटण्याची इच्छा आहे!! आणि या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग पहायला मिळतील का?
स्वप्निल
15 Nov 2009 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रबुमास्तर, रामदाससर व विजुभौ!! अभिनंदन
विजुभौ, ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे, आजकाल फार विसरायला होतेय.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2009 - 3:12 am | प्राजु
तिघांचेही अभिनंदन!!
बिका बद्दल १००% खात्री आहे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
14 Nov 2009 - 9:36 am | विद्याधर३१
त्याना चांगले मार्गदर्शक मिळाल्याबद्दल.
विद्याधर
14 Nov 2009 - 9:47 am | क्रान्ति
प्रभू सर, या वर्गासाठी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करायची आहे. :)
क्रान्ति
अग्निसखा
14 Nov 2009 - 10:30 am | प्रमोद देव
प्रभू मास्तरांच्या धडपडीला अखेर यश आलं. :)
असाच कारवाँ वाढत जावो हीच सदिच्छा!
रामदास आणि विजुभौंचे हार्दिक अभिनंदन!
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
14 Nov 2009 - 10:57 am | अवलिया
मास्तरसह सर्वांचे अभिनंदन !
बिका(काका) ला शुभेच्छा !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
14 Nov 2009 - 1:08 pm | प्रभो
मास्तरसह सर्वांचे अभिनंदन !
बिका(काका) ला शुभेच्छा !
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
14 Nov 2009 - 11:19 am | sneharani
प्रभु मास्तर, रामदास, विजुभाऊ अभिनंदन हो.
ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे
असेच म्हणते.
14 Nov 2009 - 11:22 am | विंजिनेर
परबूभाय आणि इतरांचे अभिनंदन/कौतुक तर आहेच पण माझ्यामते मिपाचासुद्धा ह्या कौतुकात वाटा आहे.
मिपा आता केवळ उत्तम लेख/कवित लिहिण्याची, गेला बाजार जाहीररित्या वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढण्याची इ.ची जागा राहिली नाहीये. तर त्यापुढे जाऊन काही भरीव काम करु शकणार्या लोकांनासुद्धा एकत्र आणण्याची क्षमता असणारं व्यासपीठ होऊ घातलं आहे - मिपा मोठं होऊ घातलंय :)
14 Nov 2009 - 11:26 am | विनायक प्रभू
हे तात्याजवळ मी अनेकवेळा बोलुन दाखवले आहे.
15 Nov 2009 - 8:10 am | लवंगी
चांगल्या उपक्रमाची सुरवात केलीत.. अभिनंदन..
14 Nov 2009 - 12:19 pm | नंदन
सर, कामाला मनःपूर्वक शुभेच्छा.
>>> लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८
-- मती कुंठित होणे म्हणजे काय, त्याचा अनुभव आला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Nov 2009 - 12:24 pm | घाटावरचे भट
आपल्या सर्वांच्या कामाला खूप सार्या शुभेच्छा गुर्जी.
'मती कुंठित होते' या नंदनरावांच्या मताशी सहमत.
14 Nov 2009 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार
त्रिदेवांना शुभेच्छा !
बिकांना बेस्ट ऑफ लक.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Nov 2009 - 12:29 pm | ऋषिकेश
प्रभुसरांना परमनंट दंडवत आहेच :)
रामदासराव व विजुभौनाही वाचाळता क्रीयेत परावर्तित केल्याबद्दल अभिनंदन.
बालदिनी इतकी चांगली बातमी ऐकून बरं वाटलं.
नंदनशी १००% सहमत :)
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
14 Nov 2009 - 12:47 pm | मदनबाण
प्रभु मास्तर, रामदास, विजुभाऊ तुम्हा सर्वांचे अभिनंदन... :)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
14 Nov 2009 - 1:45 pm | jaypal
त्रिदेवांना शुभेच्छा आणि अभिनंदन...
या वर्गासाठी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करायची आहे.
कशी? कधि? कुठे? जरा सांगाल का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
14 Nov 2009 - 11:11 pm | संजय अभ्यंकर
मास्तरांनू, मलाही सांगा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Nov 2009 - 2:51 pm | गोगोल
काहीतरी फेकाफेक वाटतेय.
उगाचच पोरान्ना आशेला लावाल आणी नन्तर त्यान्चा अपेक्षाभन्ग होईल.
16 Nov 2009 - 10:31 am | विजुभाऊ
यात फेकाफेक असे काही नाही. मी याचे प्रात्यक्षीक ही करून दाखवतो. अवघड असे काहीच नाही.
स्मरणशक्ती ही दैवी देणगी आहे असे मलाही अगोदर वाटायचे.
पण त्यासाठी काही टेक्नीक्स आहेत. ती शिकता येतात शिकवता येतात.अर्थात त्यांचा कसून सराव करावा लागतो.
स्मरण शक्तीचा मला थोडा वेगळा प्रॉब्लेम होता. लहानपणापासून मी जे वाचायचो ऐकायचे ते सर्व माझ्या लक्षात रहायचे. वर्तमान पत्र वाचले तरिही सर्वच्यासर्व लक्षात रहायचे. माझ्या सरानी मला शिकवले. त्यानन्तर तो ठीक झाला
16 Nov 2009 - 10:39 am | सहज
>पण त्यासाठी काही टेक्नीक्स आहेत. ती शिकता येतात शिकवता येतात.
जमेल तसा सराव करु. :-)
16 Nov 2009 - 1:50 pm | गोगोल
या पैकी कुठलीही सिस्टीम ईतकी स्केलेबल नाहिये.
हा आता तुमची जन्मजात मेमरी ईतकी चांगली असेल तर गोष्ट वेगळी. पण मग विद्यार्थ्यांचीही तितकीच चांगली असेल याची काय ग्यारंटी?
मी स्वतः ~२०० पानी पुस्तक लक्षात ठेवयचा प्रयत्न १९९६ साली केला होता. सफळ झाला नाही.
16 Nov 2009 - 2:09 pm | विजुभाऊ
मी स्वतः ~२०० पानी पुस्तक लक्षात ठेवयचा प्रयत्न १९९६ साली केला होता. सफळ झाला नाही.
ज्याचा त्याचा अनुभव. म्हणून सिस्टीम स्केलेबल नाही असे होत नाही.
असो.... पेग्गिंग / माईड मॅप्स या सर्व गोष्टींची पूर्तता करू शकत नाहीत. त्यां ना लिमिटेशन्स आहेत.
एखाद्या गोष्टीत रसच नसेल तर कोणतीच सिस्टीम कधीच उपयोगी पडणार नाही.
एखाद्या विषयात रस निर्माण करणे हे मात्र करता येऊ शकते. त्यासाठी सिस्टीम आहे.
हे अनुभवान्ती सांगतोय
जय महाराष्ट्र.....
16 Nov 2009 - 4:32 pm | गोगोल
"एखाद्या गोष्टीत रसच नसेल तर कोणतीच सिस्टीम कधीच उपयोगी पडणार नाही."
पण मला खरोखर कुतुहल वाटते आहे कि तुम्ही (किंवा खरतर वेगळ्या कुणितरी कि ज्यान्ची मेमरी तुमच्या ईतकी चांगली नाही आहे त्यांनी) असे मोठे पुस्तक लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता का?
असल्यास ते टेक्निकल पुस्तक होते का?
आणी तसे असल्यास केवळ एकाच पद्धतीचा वापार केला होता की एकाहून ज्यास्त?
14 Nov 2009 - 2:52 pm | भोचक
या विधायक कामाबद्दल ऐकून छान वाटले. तिघांबद्दल आदर होताच, तो दुणावला. बिकांना शुभेच्छा.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
14 Nov 2009 - 3:39 pm | गणपा
रामदासकाका, विजुभाय दोघांचे अभिनंदन.
प्रभुमास्तरांनी या दोघांना या विधायधक कार्यक्रमात जोडुन घेतल्याबद्दल त्यांचे विषेश आभार.
बिकाना पुढिल कार्याबद्दल शुभेच्छा..
हा कारवाँ असाच वृधिंगत होवो!!!!!!!!
14 Nov 2009 - 3:42 pm | सुनील
कारवा असाच वाढत जाओ हीच शुभेच्छा!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Nov 2009 - 4:05 pm | स्वाती२
प्रभूसर, विजूभाऊ, रामदासकाका पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
14 Nov 2009 - 5:06 pm | एकलव्य
प्रभूसर, विजूभाऊ, रामदासकाका -- एकदम झक्कास!
14 Nov 2009 - 6:37 pm | वेताळ
प्रभुसर,विजुभाऊ व रामदास काका ना नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
14 Nov 2009 - 10:55 pm | देवदत्त
अरे वा,
अभिनंदन आणि शुभेच्छा :)
15 Nov 2009 - 1:12 am | विसोबा खेचर
ए मास्तरा, छान शिष्यवर्ग तैय्यार करतो आहेस रे!
साला, एकदा या तात्याचंही समुपदेशन ठेव केव्हातरी! साला, सगळी पोरं खिशात टाकीन! :)
तात्या.
15 Nov 2009 - 8:03 am | चतुरंग
एकेका मानकर्याकडून घडवणूक छान चालू आहे. तुमचे, रामदास आणि विजूभाऊंचे ह्या कामासाठी अभिनंदन. पुढे रांगेत उभे असलेल्या बिकांनाही त्यांच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा! :)
(७० आकडी संख्या लक्षात ठेवणे म्हणजे कमालच म्हणायला हवी! विजूभाऊ काय शकुंतलादेवींकडे क्लास वगैरे जॉइन करुन आलेत की काय? :?)
चतुरंग
15 Nov 2009 - 11:04 am | मिसळभोक्ता
एक महत्त्वाचे लक्षात आले, की मास्तर स्वतःच काम करत नाही, स्वतःबरोबर इतरंनही कामाला लावतो. (आता त्याच्यापासून दूरच रहायला हवे.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 12:15 pm | विसोबा खेचर
मास्तर, रामदास, विजूभाऊ, आणि आता येऊ घातलेले बिका या एक चांगले काम करणार्या चौघांत मिपा हा कॉमन दुवा आहे, जोडणारा दुवा आहे याचे समाधान वाटते!
मिपाच्या सुरवाती-सुरवातीला, 'मिपा म्हणजे काय, दर चारआठ दिवसांनी जमून, कट्टा करून फक्त दारू पिणार्या लोकांचे संकेतस्थळ आहे!' असे आरोप झाले होते/ज्यांनी केले होते ती मंडळी आता कोठे आहेत?! :)
तात्या.
16 Nov 2009 - 6:40 am | मिसळभोक्ता
.
16 Nov 2009 - 3:27 pm | विनायक प्रभू
मंडळीच्या बैलाला होळीच्या आधीच हो.
बोल कधी वेळ देतोस तात्या.
तुझा पण कार्यक्रम ठेवु.
16 Nov 2009 - 3:44 am | पिवळा डांबिस
विप्र, रामदास, विजुभाऊ आणि बिका यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!
आपल्यासारख्या लोकांकडून हे भरीव कार्य घडत आहे याचा खूप आनंद वाटतो!!
16 Nov 2009 - 1:33 pm | समंजस
मास्तर, रामदासभाउ, विजुभाउ यांचं अभिनंदन (माझ्या सारख्यां प्रमाणे, फक्त विचारवंत न राहता कृतीवान झाल्या बद्दल).
तसेच मास्तरांचा कारवॉं असाच वाढत जावो या बद्दलही अनेकानेक शुभेच्छा!!!
13 Sep 2013 - 12:25 am | विजुभाऊ
मास्तर पुन्हा कधी करायचा असा कार्यक्रम?
18 Mar 2017 - 12:06 am | विजुभाऊ
प्रभु मास्तर आणि रामदास दोघेही गायबलेत इथून
18 Mar 2017 - 1:32 am | ट्रेड मार्क
कृपया स्मरणशक्ती कशी वाढवायची हे खरंच शिकवा. आजकाल अगदी सकाळी सांगितलेलं संध्याकाळी आठवत नाही. त्यात बायकोने सांगितलं असेल तर वाट लागते.
6 Nov 2020 - 10:48 am | विजुभाऊ
जुने दिवस आठवले प्रभुमास्तर
6 Nov 2020 - 11:53 am | विनायक प्रभू
कार्य खणखणीत पणे सुरू आहे विजुभाऊ. तुमच्या सहभागाबद्दल धन्यवाद.
6 Nov 2020 - 10:33 pm | चौथा कोनाडा
विजुभौ, रामदास, बिका ही तिन्ही दिग्गज मंडळी आहेत, त्यांना सॅल्यूट !
तिघांनाही भेटण्याची इच्छा आहे, पाहू कधी योग्य येतात ते !
6 Nov 2020 - 10:50 pm | वीणा३
हि स्मरणशक्ती वाढवायच काही टेकनिक असेल तर त्यावर नक्की एखादा लेख लिहा विजुभौ. इथे पण खूप लोकांना नक्की उपयोग होईल त्याचा.
7 Nov 2020 - 7:46 am | विजुभाऊ
नक्की लिहीतो