मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

और कारवॉ बनता गया.

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आकाश फाटल तर ठीगळ तरी कुठे कुठे लावायच? तुला जिथे जमते तिथे लाव, उरलेल्याची काळजी करु नकोस. इतके दिवस एकटाच होतो. Image removed. देखते देखते कारवां बन रहा है. मिपावर आल्यावर रामदासांशी मैत्री झाली. पहील्या भेटीतच लक्षात आले की हे रसायन वेगळ आहे. तीच गोष्ट विजुभौंची. ही मंडळी आपल्याबरोबर आली तर? बोलत राहीलो, भेटत राहीलो. कुठेतरी मनात पक्की गाठ बांधली ह्यांना पण आपल्या सारखेच बोर्डावर तुणतुणे घेउन उभे करायचे. त्यांच्या दैनंदिन जिवनातुन वेळ देतील की नाही ह्याची शंका होती. पण 'मराठी- मराठी' ही नुस्ती चर्चा करणारी ही मंडळी नाहीत हे पण नक्की माहीत होते. फक्त प्रश्न होता तो कधी? म्हणता म्हणता आलीच की हो वेळ. दोघेही उभे राहीले. काय सांगु तुम्हाला. ते जे काही बोलले, ज्या पद्धतीने बोलले ते अयकुन अंगावर रोमांच उभे राहीले. खुप आनंद झाला. Image removed. सुमारे ७० आकडी संख्या बोर्डा वर लिहुन सुमारे अर्धा तासाने ती तशीच्या तशी परत लिहीणे.. त्यानी फळ्यावर एकदा लिहिलेली संख्या ते दुसर्‍यांदा पूर्ण लिहुन दाखवेपर्यन्त छातीत धाकधूक होत असते. अक्षरशः निशब्द केले हो विजुभौ नी. आपल्याला लक्षात ठेवायला कष्ट घ्यावे लागतात. विजुभौना विसरायला. ५० वस्तुंची लीस्ट उलटसुलटक्रमाने १ तासाच्या अंतरा सुद्धा सांगु शकतात ते. विजुभाऊ मुलाना कॉन्सेन्ट्रेशन करायचे ते शिकवतात. जे वाचू ते सगळेच्या सगळे लक्षात कसे ठेवायचे ते शिकवतात. अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते. Image removed. रामदासांबद्दल काय लिहु. लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८ १५० विद्यार्थ्यांना सुमारे एक तास खिळवुन ठेवणे सोपी गोष्ट नाही हो. रसाळ सोपी भाषा. श्रोत्याना थेट भिडणारी. मंत्रमुग्ध होतात हो पोरे. या माणसाला नक्की काय काय अवगत आहे याचा पत्ता लागत नाही Image removed. वरुन काही चुकत असेल तर सांगा हा नम्रपणा. जाता जाता: ह्या नंतरचा नंबर बिकाचा. अंदाज नाही खात्री आहे ते पण तेवढेच प्रभावशाली असतील. Image removed. Image removed.

वाचन 19057 प्रतिक्रिया 0