सूर्योदय रायगडावरचा

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Nov 2009 - 12:22 am

१. रायगडावरून दिसलेली चंद्राची मनमोहक प्रभा.
mahabaleshwar-nov 09 280

२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.
mahabaleshwar-nov 09 310

३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.
mahabaleshwar-nov 09 316

४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.
mahabaleshwar-nov 09 318

५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.
mahabaleshwar-nov 09 320

६. लांबवर एक नजर टाकली...
mahabaleshwar-nov 09 322

७. मग डुलत डुलत अजून वर सरकले
mahabaleshwar-nov 09 321

८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...
mahabaleshwar-nov 09 324

९. आणखी घट्ट....!
mahabaleshwar-nov 09 332

१०. भेट दोन सूर्यांची
mahabaleshwar-nov 09 334

११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप
mahabaleshwar-nov 09 342

रायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.
संध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय! पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.
धुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्‍यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. "डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.
एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता! अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा "स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.
या "ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...

मुक्तकप्रकटनअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

शेखर's picture

12 Nov 2009 - 12:25 am | शेखर

फोटो बघुन एकदम रायगडावर सकाळी उभे असल्याचा भास झाला...

टारझन's picture

12 Nov 2009 - 11:52 pm | टारझन

तसे बर्रेच किल्ले चढलोय .. पण रायगडात जी जादू आहे ती दुसरीकडे अनुभवली नाही !! भिक्कारचोट इंग्रजांनी किल्ल्याची केलेली दुरावस्था पाहुन मन हळहळतेही. पण जेंव्हा महाराजांच्या समोर उभे राहून त्या मुर्तीच्या डोळ्यात डोळे घालून पहातो .. तेंव्हा छाती दोन इंच फुलल्याशिवाय रहात नाही. मराठी असल्याचा अभिमान अचानक पिक वर पोचतो .. नकळत मुठी आवळल्या जातात... कधी नकळत डोळ्यांना गारगार वाटतं .. कधी थेंब डोळ्यांतून ओघळला हे ही कळत नाही !!
अभिजीत राव .. फोटोंबद्दल धन्यवाद !!

--(महाराज भक्त) मावळा टारझन

प्रभो's picture

12 Nov 2009 - 12:33 am | प्रभो

मस्त रे....फोटो मस्तच

होळीचा माळ आणी सुर्योदय हे काँबिनेशन मलाही लहानपणापासून आवडते...
जेंव्हा केंव्हाही मी मुक्कामी रायगडी जातो, होळीचा माळावरून सुर्योदय पाहतोच...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

रेवती's picture

12 Nov 2009 - 12:36 am | रेवती

भेट दोन सूर्यांची
हे छानच! बाकीचेही फोटू छान!

रेवती

श्रावण मोडक's picture

13 Nov 2009 - 12:08 am | श्रावण मोडक

+१

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Nov 2009 - 11:46 am | घाशीराम कोतवाल १.२

बाकि सर्व फोटो आवडले पण दोन सुर्यांची भेट खास वाटला

(महाराजांचा मावळा )कोतवाल
जय भवानी !! जय शिवाजी!!!

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

पाषाणभेद's picture

12 Nov 2009 - 12:48 am | पाषाणभेद

'जिल्हा परिषदेच विश्रांतीगृह'
आव त्ये झ्येडपीचं हाये. तुमी गेलाच कसं तितं?

फटू बाकी झ्याक आलेतं.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

गणपा's picture

12 Nov 2009 - 2:01 am | गणपा

एक तो विमुक्त आता हा दुसरा जळवा लेकांनो आम्हला.
आवांतर : मस्त रे सगळीच प्रकाशचित्र. भेट दोन सूर्यांची जास्त भावलं

sneharani's picture

12 Nov 2009 - 11:53 am | sneharani

फोटो मस्तच....

मदनबाण's picture

12 Nov 2009 - 1:22 pm | मदनबाण

मस्त फोटो...

मदनबाण.....

प्रसन्न केसकर's picture

12 Nov 2009 - 2:14 pm | प्रसन्न केसकर

विशेषतः भेट दोन सूर्यांची खूप आवडला.

पक्का राडेबाज
पुणेरी

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार

अभिदा शॉल्लीड रे !!

३ आणी १० नंबर तर अफलातुनच. खुप मस्त आलेत फोटु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नंदन's picture

12 Nov 2009 - 2:38 pm | नंदन

संपूर्ण मालिका फार छान.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

12 Nov 2009 - 3:20 pm | भडकमकर मास्तर

उत्तम फोटो छान वर्णन...
दोन सूर्य बेस्ट..
चंद्राचा फोटो ब्लर कसा नाही झाला?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

आशिष सुर्वे's picture

12 Nov 2009 - 5:17 pm | आशिष सुर्वे

भेट दोन सूर्यांची

अवर्णनीय!!
-
कोकणी फणस

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2009 - 5:19 pm | फ्रॅक्चर बंड्या

"एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता!"
"भेट दोन सूर्यांची"

वाक्ये आवडली

मस्त फोटो अन छान वर्णन

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2009 - 5:23 pm | सुमीत भातखंडे

ग्रेटच आलेत.
"भेट दोन सूर्यांची" तर मस्तच.

स्वाती२'s picture

12 Nov 2009 - 5:24 pm | स्वाती२

व्वा! मस्तच आहेत सर्व फोटो. वर्णनही सुरेख!

झकासराव's picture

12 Nov 2009 - 7:09 pm | झकासराव

वाह!!!
खरच अस मुक्कामी गेल पाहिजे एखाद्या किल्ल्यावर.

अजिंक्य's picture

12 Nov 2009 - 7:50 pm | अजिंक्य

उत्तम छायाचित्रे.
छायाचित्रांसोबतच्या 'कमेंट्स' सुद्धा आवडल्या.
एक वेगळाच अनुभव मिळाला. धन्यवाद.
अजिंक्य.

संदीप चित्रे's picture

12 Nov 2009 - 9:31 pm | संदीप चित्रे

दोन सूर्यांची भेट हा फोटो तर केवळ उच्च !

अनिल हटेला's picture

13 Nov 2009 - 12:49 am | अनिल हटेला

सारेच फोटो आवडले...

:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

लवंगीमिरची's picture

13 Nov 2009 - 9:07 am | लवंगीमिरची

8>

आपला अभिजित's picture

13 Nov 2009 - 11:17 am | आपला अभिजित

सर्व प्रतिसादकांना

मनापासून धन्यवाद!
रायगडावरचा हा सूर्योदय आणि तुमचे प्रतिसादही आचंद्र-सूर्य स्मरणात राहतील.

सुप्रिया's picture

13 Nov 2009 - 12:05 pm | सुप्रिया

सुरेख फोटो.

विसोबा खेचर's picture

15 Nov 2009 - 1:17 am | विसोबा खेचर

रडलो रे आतल्या आत!

तात्या.

लवंगी's picture

15 Nov 2009 - 9:12 am | लवंगी

जणू चंद्र राज्यांना मानवंदना देतोय..
आणी १० वा जणू सूर्य राज्याना झुकून सलाम करतोय...
नितांत सुंदर