असा अनुभव यावा म्हणूनच का?

वेदश्री's picture
वेदश्री in जनातलं, मनातलं
10 Nov 2009 - 11:04 pm

"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले. पुढच्या गाड्या जसजशा पुढेपुढे गेल्या तशी मीही त्यांच्या मागून मार्गक्रमण करत पुढे गेले. फोडलेली बस आणि त्याशेजारी खाऊ की गिळू अशा अवतारात असलेल्या संतप्त लोकांचा घोळका प्रत्यक्ष बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग... मनात चर्र झालं माझ्या अगदी. अजिबात वेळ न दवडता गाडी पुढे दामटली मी. उण्यापुर्‍या नेहमीच्या एका तासाच्या प्रवासाला तब्बल पावणेतीन तास लागले. रस्त्यात असेच संतप्त जमाव अनेक ठिकाणी बघायचे नशिबी आल्याने मी मनातून जाम टरकले होते. माझ्या परिसरात माझी गाडी प्रवेशताच 'घर जवळ आलंय..' असे वाटून नेहमीचा वाटणारा आगळा आराम वाटला नाही कारण सगळीकडे मिट्ट काळोख होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख. इथेही असेल का एखादा संतप्त जमाव.. हीच धडधड होती मनात. नको नको तेच विचार मनात यायला लागले माझ्या. गाडीच्या आणि मग मोबाईलच्या उजेडात घरात सुखरूप जाऊन पोहोचले पण हृदयाची धडधड मात्र कायम होती.

थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?"

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

शेखर's picture

11 Nov 2009 - 12:20 am | शेखर

थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?"

मी पण कर भरतो. त्या कराचा उपयोग स्थानिक लो़कांसाठि होत नसेल तर मी पण सगळा कर का भरावा?
मी भरलेल्या करातुन युपी बिहार मधुन येण्यार्‍या लोकाना झोपड्या ऐवजी पक्की घेरे सरकार बांधुन देणार असेल तर काय करावे?
हे थांबण्यासाठी काही लोक आवाज उठावणार असतील आणी त्यामुळे जर थोडेफार असले अनुभव येणार असतील तर मला चालतील.

शेखर

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 1:12 am | वेदश्री

माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर माझ्या ताटात पोळी येत असेल तर एखाद्या (अशक्त?) भावंडाच्या पोळीवर तूप वाढले जात असल्याबद्दल माझी कसलीच तक्रार नसते. भावंडाशी मारझोड करून काय हशील?

तुम्ही म्हणता अगदी तो मुद्दा जरी गृहित धरला तरी 'आवाज उठावणे' या प्रक्रियेतून विधायक असे काय घडले? स्थानिकांसाठी घरे उभी राहिलेली मलातरी दिसली नाहीत उलट त्यांचे येण्याजाण्याचे आधीच असलेले हाल आणखीच वाढण्यात भर पडलीये!

शेखर's picture

11 Nov 2009 - 1:33 am | शेखर

तुमच्या मता विषयी आदर आहे... पण त्या अशक्त भावाचे (चुलत) आई वडिल काही करत नाहीत.. त्यामुळे हे सर्व अशक्त भाऊ आमचे तुप कायमच खाणार .. त्याना तुप द्यायच्या नादात आमच्या सख्ख्या भावाना पोळी जर मिळणार नसेल तर...?

तुम्ही म्हणता अगदी तो मुद्दा जरी गृहित धरला तरी 'आवाज उठावणे' या प्रक्रियेतून विधायक असे काय घडले?

आपल्या कडे विधायक पद्धतीने आवाज उठवल्यास त्यास केराची टोपली दाखवली जाते.. तुम्ही सांगा मग कसा आवाज उठावायाचा?

माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर माझ्या ताटात पोळी येत असेल
त्यांना तुप घालण्यामुळे उद्या तुमच्या ताटात पोळी नसेल तर तुम्ही काय कराल?

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 1:46 am | वेदश्री

संयुक्त कुटुंबात चुलत,मावस, मामे,आत्ये वगैरे सगळेच येतील की त्यांच्यात्यांच्या गुणदोषांसकट. ते सगळे निभवावे लागतेच मोठे कुटुंब म्हटले की. 'आमच्या'पासून 'आपल्या'पर्यंत प्रवास करणेच जर मान्य नसेल तर मग प्रत्येकाने वेगळा घरोबा करायचा का? तसे केल्याने तरी सगळे प्रश्न सुटणार आहेत का? भावांमध्ये भांडणं झाली म्हणून काय लगेच घरात मोडतोड करायची का?

भावंडाच्या ताटात तूप वाढले जाऊन माझ्या ताटात पोळी येत नसेल तर त्यात भावंडाची चूक नाही तर वाढणार्‍याची चूक आहे ज्याला चूक लक्षात आणून देईन.

सारासार विचार करून योग्य तिथे किल्ली फिरवली की आवाज उठवायची गरज पडणार नाहीसे वाटते. यासाठी एकजूट मात्र महत्त्वाची. काल इंग्रज होते आणि आज आपलीच काही माणसं आहेत पण नियम तोच... फोडा आणि राज्य करा! ६० वर्षात काहीच का शिकलो नाही आपण???

शेखर's picture

11 Nov 2009 - 2:05 am | शेखर

भावंडाच्या ताटात तूप वाढले जाऊन माझ्या ताटात पोळी येत नसेल तर त्यात भावंडाची चूक नाही तर वाढणार्‍याची चूक आहे ज्याला चूक लक्षात आणून देईन.

सारासार विचार करून योग्य तिथे किल्ली फिरवली की आवाज उठवायची गरज पडणार नाहीसे वाटते. यासाठी एकजूट मात्र महत्त्वाची.

समजा उदाहरणार्थ राज ठाकरे चुक असतील तर त्यांना चुक लक्षात आणुन देता येईल. पण त्याच बरोबर विधायक कामात त्यांच्या मागे एकजुटीने उभे पण राहिले पाहिजे. हे आपल्यातले किती जण करतात? चुक सांगणारे भरपुर लोक असतात. पण योग्य मार्ग सांगुन त्या मार्गावर चालण्यास मदत करणारे किती असतात?

नुसतीच चुक लक्षात आणुन देऊन चालणार नाही तर त्यांचा बरोबरीने पण चालले पाहिजे.
राहणार आहोत का आपण त्यांच्या बरोबर?

शेखर,

मी व्यक्तीला पाठिंबा कधीच देत/देणार नाही, मी पाठिंबा देते तो विधायक कार्याला. माझ्या पातळीवर मी असा पाठिंबा देण्याचा कायमच पूर्ण प्रयत्न करते.

शेखर's picture

11 Nov 2009 - 4:56 am | शेखर

तुमच्या मतां अथवा भुमिकेच्या प्रामाणिकपणा बद्दल अजिबात संदेह नाही. पण व्यक्ती/संस्था (व्यक्ती समुह) ह्यांच्या शिवाय कुठलेही कार्य होत नसते. मग अश्या वक्ती किंवा समुहाला त्यांच्या गुण दोषांसहित स्वीकारले पाहिजे. त्यांच्या चुका दाखवुन त्या दुरुस्त करुन घेतल्या पाहिजेत. नुसता त्रागा ( जो योग्य आहे) करुन काहीही साध्य होणार नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2009 - 12:52 pm | llपुण्याचे पेशवेll

"असो. अशा मोठ्या मोठ्या शहरांमधे अशा छोट्या छोट्या घटना होतच असतात. " इति.
मा. गृहमंत्री आर आर पाटील
अवांतरः ज्या लोकानी बसेस फोडल्या त्यानी रस्त्यावरच्या दुचा़कीवाल्याना पण मारहाण केली का? पादचार्‍याना पण मारहाण केली का? मग तुम्हाला भिती वाटायचे कारण काय. मग उगाच साप साप म्हणून भुई का बडवत आहात.
तुम्हाला उशीर झाला, मनस्ताप झाला हे समजू शकतो पण तुमच्या परिसरातल्या मिट्ट काळोखाला हिंसक जमाव कारणीभूत होता का?

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

धनंजय's picture

11 Nov 2009 - 1:38 am | धनंजय

तुमच्यावर (आणि बहुधा खूप मराठीभाषकांवर) असा प्रसंग आला याबद्दल वाईट वाटते.

माझ्या लहानपणी यापेक्षा लहान प्रमाणात गोव्यात कोंकणी-मराठी भाषावाद चालू होता. अशीच एकदा एक सरकारी बस मोडून रस्त्यावर आडवी केली, म्हणून शाळेला सुटी मिळाल्याचे आठवते. त्या वेळी गंमत वाटली होती. (शिवाय ज्या बाजूने बस उलटवली ते आमच्या तालुक्यातले, म्हणून त्यांच्याबद्दल हुर्रेऽ! अशा प्रकारचा अभिमानही होता.

पण आम्ही शाळेत असताना तिथे पलीकडे अडकलो असतो तर? आई-बाबांची काळजीने काय हालत झाली असती...

बहुधा जाळपोळ आणि विध्वंस हा "आपल्या बळाच्या" भागातच करता येतो. दुसर्‍या भागात जाऊन "आवाज उठवणे" योजनेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने शक्यच नसावे, असा माझा कयास आहे.

हे म्हणजे शेजारच्या पोराने दगड मारला म्हणून आपल्या घरच्या मुलांना बदडून काढण्यासारखे आहे. "असा आवाज नाही उठवला तर कसा आवाज उठवावा" मला तर खरे हा प्रश्नच समजत नाही.

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:02 am | वेदश्री

>हे म्हणजे शेजारच्या पोराने दगड मारला म्हणून आपल्या घरच्या मुलांना बदडून काढण्यासारखे आहे. "असा आवाज नाही उठवला तर कसा आवाज उठवावा" मला तर खरे हा प्रश्नच समजत नाही.

अगदी बरोब्बर बोललात तुम्ही, धनंजय. पूर्णपणे सहमत आहे!

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Nov 2009 - 1:48 am | अक्षय पुर्णपात्रे

वेदश्रीतै, तुम्हाला थोडाफार त्रास झाला तर एवढे वाईट वाटून घेऊ नका. विधानसभेत धक्काबुक्की करायला लागते तर रस्त्यावर थोडीफार अडचण येणारच ना. अहो मराठी माणसाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सामान्य माणसाचे जगणे ते काय जगणे आहे? दिवसभर काम करून घरी तर सर्वच जातात. पण मायमराठीच्या उद्धारासाठी एक दिवस तरी थोडेफार हाल झाले तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे?

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:11 am | वेदश्री

अक्षय,

>सामान्य माणसाचे जगणे ते काय जगणे आहे?

मग आम्ही सामान्यांनी जगायचेही नाही का?

>दिवसभर काम करून घरी तर सर्वच जातात. पण मायमराठीच्या उद्धारासाठी एक दिवस तरी थोडेफार हाल झाले तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे?

काय उद्धार झाला मायमराठीचा?

निमीत्त मात्र's picture

11 Nov 2009 - 2:22 am | निमीत्त मात्र

काय उद्धार झाला मायमराठीचा?

काय हे? असे प्रश्न विचारुनच तुम्ही मराठीची प्रगती रोखत आहात. 'राज ठाकरेंचा मुलगा म्हणे इंग्रजी माध्यमातुन शिकतो (आणि जर्मनची पेश्शल टूशन लावतो) तेव्हा कुठे गेली मराठीची अस्मिता?' हा एक तसलाच प्रश्न

वैचारीक नंपुसकत्व आहे असले विचार म्हणजे. त्यापेक्षा मारा झोडा, डोकी फोडा, बशी जाळा मग कसं सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात..

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:32 am | वेदश्री

माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 2:04 am | हुप्प्या

राजने शिवाजी राजांचा आदर्श ठेवावा आणि सामान्य लोकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. असल्या बसाबिसा फोडून काही फायदा नाही.

पण मराठीविषयी आक्रमक भूमिका घेणे आजिबात गैर नाही. इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:18 am | वेदश्री

>इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे.

कोणी दिला मायमराठीला मोलकरणीचा दर्जा? घरी आलेले पाहुणे जर घराच्या मालकिणीचा दर्जा ठरवत असतील तर मग घरातली मूळ मंडळी कोण आहेत म्हणायची?

> आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.

सन्मान मिळवून दिला जात नसतो, कमावला जात असतो. 'मिळवून दिलेला' सन्मान टिकाऊ नसतो!

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 4:36 am | हुप्प्या

<<
कोणी दिला मायमराठीला मोलकरणीचा दर्जा? घरी आलेले पाहुणे जर घराच्या मालकिणीचा दर्जा ठरवत असतील तर मग घरातली मूळ मंडळी कोण आहेत म्हणायची?
<<
नालायक, लाचार काँग्रेसी नेत्यांनी सर्वात आधी आपल्या भाषेला दुय्यम वा तिय्यम दर्जा दिला. शिवसेनेने सुरवातीला मराठीचा मुद्दा उचलून धरला पण हिंदुत्ववादी बनण्याच्या नादात तो सोडून दिला.
घरी आलेले पाहुणे? अहो महाराष्ट्रातील कठपुतळी नेत्यांच्या दोर्‍या दिल्लीतील गांधी घराण्याच्या विद्यमान सदस्याच्या हातात असत. असे ४०-५० वर्षे चालू आहे. आणि त्यामुळे असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला अशी वेळ मराठीवर आली आहे.
घरातील मूळ माणसे आपला स्वाभिमान सोडून कुत्र्यासारख्या शेपट्या हलवत, लाळ गाळत दिल्लिश्वर वा दिल्लीश्वरीभोवती पिंगा घालत होती आणि आहेत म्हणूनच ही रड आहे.
>
सन्मान मिळवून दिला जात नसतो, कमावला जात असतो. 'मिळवून दिलेला' सन्मान टिकाऊ नसतो!
<
ठीक मग असे म्हणतो की राज ठाकरे हा मराठीचा सुपुत्र आपल्या आईकरता सन्मान कमावतो आहे. त्याकरता साम, दाम, भेद आणि दंड असे सगळे उपाय वापरत आहे. आता खूष?

निमीत्त मात्र's picture

11 Nov 2009 - 2:24 am | निमीत्त मात्र

इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.

हो आधी स्वत:पासूनच सुरुवात करुन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून राज साहेब आणि मनसे नेत्यांनी योग्य उदाहरण ठेवले आहे.

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 4:40 am | हुप्प्या

पोटासाठी इंग्रजी आणि हृदयासाठी मराठी. दोन्ही आवश्यक आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणारे लोकही मराठीवर प्रेम करू शकतात आणि करतातही. आपण चतुर आहात म्हणून आपण ते आधीच ओळखलेले दिसते! भले शाब्बास!

निमीत्त मात्र's picture

11 Nov 2009 - 6:17 am | निमीत्त मात्र

पोटासाठी इंग्रजी आणि हृदयासाठी मराठी.

हुप हुप... =))

समस्त मिपाकर इंग्रजी माध्यमातलेच असावेत, कारण मराठी माध्यमातून शिकून पोट भरायची मारामार इंटरनेट संगणक कुठून मिळायचे त्याना..

चालू द्या..

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 10:37 am | पर्नल नेने मराठे

L) मराठी माध्यम (राज ठाकरे न मी एकाच शाळेतले ;) )

चुचु

प्रभो's picture

11 Nov 2009 - 10:42 am | प्रभो

>>समस्त मिपाकर इंग्रजी माध्यमातलेच असावेत, कारण मराठी माध्यमातून शिकून पोट भरायची मारामार इंटरनेट संगणक कुठून मिळायचे त्याना..

वाचून हसावं का रडावं हे कळेना.....मराठी माध्यमातून शिकणार्‍यांना नोकर्‍या मिळत नाहीत का??? मला तर वाटतं होतं की मराठी तरूणांनाच आजकाल नोकर्‍या मिळत नाहीत म्हणे......

मी ही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे....

बाकी चालू द्या..

मदनबाण's picture

11 Nov 2009 - 10:46 am | मदनबाण

मी ही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे....

मदनबाण.....
Jaipur Indian Oil fire pushes migratory birds to Uttar Pradesh
http://www.thaindian.com/newsportal/enviornment/jaipur-indian-oil-fire-p...

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 11:04 am | हुप्प्या

आपण मराठी माध्यमातून शिकलात आणि यशस्वी झालात त्याबद्दल अभिनंदन. पण मुद्दा वेगळा आहे. निमित्त मात्र एक काडी लावून गेलेत की ज्याची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात त्यांना मराठीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. हे मला साफ नामंजूर आहे. आजकाल मराठी शाळांचा दर्जा घसरलेला आहे हे अनेकांच्या अनुभवावरून सांगतो आहे. तेव्हा मुलांची करियर चांगली व्हावी म्हणून त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तर फार महापाप झाले आणि अबु आझमी इतकेच हे लोक मराठी द्वेष्टे आहेत असा एक सूर निमित्त मात्र आणि अन्य लावत आहेत त्याला मी खोडून काढू इच्छितो.
इंग्रजी माध्यमात मुले शिकल्यामुळे त्यांचे मराठी प्रेम ऑटोम्याटिकली संपते हे आजिबात खरे नाही.
बाकी मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा घसरला आहे का नाही ह्याविषयी वाद घालायचा असल्यास वेगळा घालू या.

समंजस's picture

11 Nov 2009 - 11:11 am | समंजस

काय झालं? मराठी माध्यमात शिक्षण घेण्याची सुचना करणार्‍यां कडुन काही उत्तर आलेलं नाही??
मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतलयं. अभियांत्रीकीचं सोडून.

छोटा डॉन's picture

11 Nov 2009 - 11:06 am | छोटा डॉन

प्रभोशेठ, जाऊ द्यात, तो मुद्दा वेगळा आहे.
ह्याला खास "आंतरजालीय उपहासात्मक शैली" म्हणतात. ह्याचा वापर करण्यामागेही काही खास कारणे असतात.
बराच मोठ्ठा विषय आहे आहे हा, तुम्ही ते सिरीयसली आणि शब्दशः घेऊ नका, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते पहा ;)

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 11:05 am | विशाल कुलकर्णी

<<<हो आधी स्वत:पासूनच सुरुवात करुन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून राज साहेब आणि मनसे नेत्यांनी योग्य उदाहरण ठेवले आहे.>>>

मात्र साहेब, तुम्ही विनोद भारी करता राव. मला वाटतं शिक्षण कुठल्या भाषेतुन घेतलं यापेक्षा त्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही कुठल्या भाषेच्या विकासासाठी, उद्धारासाठी करता हे जास्त महत्वाचे आहे.
आणि शत्रूला नामोहरम करायचे असेल तर आधी त्याच्या गोटात शिरून, त्यांची अंडी-पिल्ली जाणून घेणे, त्याची कमजोरी तसेच सामर्थ्याची माहिती करून घेणे आणि त्या दृष्टीने स्वतःला तयार करणे ही युद्धनीती आहे.

बाकी विरोधच करायचा म्हटले की कुठल्याही मुद्याचा बाऊ करता येतो हे वेगळे. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:11 am | वेदश्री

प्रकाटाआ

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Nov 2009 - 2:13 am | अक्षय पुर्णपात्रे

वेदश्रीतै, तुम्ही तात्यांनी मांडलेले विचार वाचा. तुम्हाला त्याग काय असतो याची व्यवस्थित कल्पना येईल.

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:39 am | वेदश्री

जर एक सामान्य म्हणून माझ्याकडून देशासाठी जरुर ते सगळे प्रयत्न करूनदेखील जर मला 'जमेल तसेच जगणे' मिळणार असेल तर मी कशाला पोसू या लोकांना कर भरुन?

तात्याच्या लेखातील हाताळलेल्या क्षेत्राबद्दल मला अजिबात गती नाही त्यामुळे मी काय बोलणार त्यावर?

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Nov 2009 - 2:45 am | अक्षय पुर्णपात्रे

माझ्यापाशी उत्तर नाही. पण तुम्ही कर भरत रहा. सामान्य माणसाने कायदा मोडू नये नाहीतर शिक्षा होते.

वेदश्री's picture

11 Nov 2009 - 2:52 am | वेदश्री

:D

समंजस's picture

11 Nov 2009 - 11:28 am | समंजस

तुम्ही कर भरत राहा. ह्या असल्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करा.
संयुक्त कुटुंबात भावंडा मध्ये खाण्या/पिण्या वरून थोडी फार भांडणे/मारामारी ही होतच असतात म्हणून काय ह्याने रागावूनं आई/काकूंनी स्वैंपाक करून जेवायला घालू नये?? अहो कर नाही भरलात तर चुलत भावंडे उपाशी राहणार ना? शेवटी आमच्या चुलत भावंडाची आणि त्यांच्या पालकांना पोसण्याची जबाबदारी ही आमचीच आहे. त्यामुळे मी तरी कर भरतच राहणार.

पक्या's picture

11 Nov 2009 - 2:42 am | पक्या

ही बातमी वाचा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5217269.cms
मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसगाड्यांचे नुकसान करणे/ दगडफेक करणे हे निषेधार्ह आहे. आणि वरील बातमी खरी असेल तर आपणच (मनसे) आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत हे स्पष्ट दिसतेय. अबू ह्या प्रकरणातून नामानिराळा राहिल आणि मनसे चे नाव मात्र परत गुंडागर्दी करतात म्हणून खराब होणार.

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

कालिन्दि मुधोळ्कर's picture

11 Nov 2009 - 3:02 am | कालिन्दि मुधोळ्कर

तुमचा अनुभव वाचून वाईट वाटले. पण सामान्य माणसांच्या हाल-अपेष्टा, गैरसोयी या बद्दल मनसे किंवा इतर पक्ष यांना काही देणं घेणं असेल असं वाटत नाही.
अशा हुल्लडबाजी मधे व्रुद्ध लोकांचे झालेले हाल मी पाहिले आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2009 - 12:14 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. माओवादी, नक्षलवादी यांच्या हिंसेमध्ये सामान्य पोलिस शिपाई ठार होतात त्याचे कोणत्याच कम्युनिस्टप़क्षाला घेणे नसते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

रेवती's picture

11 Nov 2009 - 7:05 am | रेवती

काही लोकांचे म्हणणे आहे त्याप्रमाणे मायमराठीसाठी आपण एवढे सहन केले पाहिजे. आपण म्हणजे आपली लहान मुलेबाळे आणि घरातले वृद्धही त्यातच धरायचे का? असे झाले तर काय होइल या विचारानेच अर्धमेले होण्याची वेळ आली म्हणायची!
या स्पेशल मोक्यावर सगळ्या मंत्र्यांची मुले/वृद्ध मात्र उबदार (की थंडगार?) घरट्यात असणार. काही वर्षात यांच्यापैकी कुणीजर पार्टीबदल केला तर दंग्यात सापडलेल्यांच्या आहुतीचे काय? बाकीच्या राज्यांमध्ये तेथील जनता त्यांच्या भाषेसाठी असे काय दिवे लावत आहेत? स्वतःचे मूल / म्हतारे आईवडील समोरच्या दंग्यात सापडले असताना स्वभाषेसाठी म्हणून त्यांच्या परत येण्याची आशा सोडणारे किती आहेत?
याचा अर्थ माझे मराठीवर प्रेम नाही असा होत नाही पण ते प्रेम सिद्ध करायला मारामारी, दंगे, जाळपोळ यांचे समर्थन करायला तयारी नाही.

रेवती

छोटा डॉन's picture

11 Nov 2009 - 11:03 am | छोटा डॉन

हम्म्म्, मुद्दा वादाचा आहे खरा.

वैयक्तिक पातळीवर जर मी विचार केला तर मला खरोखर ह्या घटनेची चीड आली. अशा घटनांचा त्रास सामान्य नागरिकांना व्हायला नको ह्याबाबत सहमत आहे.

मात्र मी जर सामाजिक पातळीवर जाऊन पाहिले तर मात्र मला ह्यात स्पष्टपणे "अपरिहार्यपणा" जातो.
मी आता "मनसे" ह्या एकट्या पक्षाबद्दल न बोलता एकुनच रस्त्यावर उतरणे आणि आंदोलने ह्याबद्दल बोलतो आहे.
कदाचित त्या कार्यकर्त्यांसमोर हाच सोपा आणि सुलभ पर्याय असावा असे वाटते. तसेही असंतोष होता सरकारबद्दल आणि आंदोलन ही सरकारविरुद्धच होते. मग हे आंदोलन करताना जर काही संघटना मोर्चा काढुन सरकारी कार्यालयाकडे अथवा मंत्रालयाकडे कुच करत असतील तर ट्राफिक ज्यॅम अपरिहार्य नाही का ? त्यांनी मोर्चा काढावा तरी कुठे ? जर ते मॉबचा मोर्चा न विस्कळीतपणे गेले तर त्या प्रश्नांची तिव्रता सरकारपर्यंत आणि मिडीयासमोर खरोखर पोहचेल ?
अहो गांधीयुगात अगदी सत्याग्रह करायचा म्हणला तरी रस्त्यावर अथवा एखाद्या कार्यालयासमोर ठाण मांडुन बसावे लागत होते.
अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.
बाकी खासगी वहानांची तोडफोड वगैरे नि:संशय चुकीचे आहे ...

बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यातुन सामान्य माणसाला होणार्‍या त्रासाबाबत मी ह्या घटनांच्या विरोधात आहे पण मी एक "सामाजिक अपरिहार्यता" म्हणुन ह्या गोष्टी स्विकारतो.
असो.

अवांतर :
वर काही खासकरुन "उपहासात्मक प्रतिसाद" दिसले, त्यांना एक विनंती आहे की लोकशाही / हुकुमशाही असलेल्या एखाद्या अशा देशाचे उदाहरण द्यावे की जिथे आंदोलने ह्या मार्गाने होत नाहीत.
उद्या जरी आम्ही मेणबत्या घेऊन शांतता मार्गाने निदर्शने करत राहिलो तरी ते पाहुनही एखाद्याच्या मस्तकाची शीर सरकणार नाही कशाहुन ?

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2009 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll

डाण्याशी डिफाल्ट सहमत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

Nile's picture

11 Nov 2009 - 12:22 pm | Nile

मात्र मी जर सामाजिक पातळीवर जाऊन पाहिले तर मात्र मला ह्यात स्पष्टपणे "अपरिहार्यपणा" जातो.

ह्या विधानाशी असहमत आहे. सोपं कारण आहे, इजी टारगेट्स. जितका जास्त सर्वसामान्यांना त्रास होइल तितकं महत्त्वाचं. समजा ही चळवळ आहे आणि सर्वसामान्यांना समजलंच नाही तर त्याचा उपयोग काय?

अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.

ही वाचुन मात्र हसु आलं बरका!

अहो उलट आम्ही त्यांच्याकडुन 'आमच्या' कराच्या पैशातुन काही विधायक काम करावं म्हणुन निवडुन देतो असं आम्हाला वाटतं!

समंजस's picture

11 Nov 2009 - 3:48 pm | समंजस

अहो उलट आम्ही त्यांच्याकडुन 'आमच्या' कराच्या पैशातुन काही विधायक
काम करावं म्हणुन निवडुन देतो असं आम्हाला वाटतं!

नाही पटलं! ज्यांना तुम्ही निवडून दिलंय(मनसेलाच मत दिलंय हे गृहीत धरुन) ती मंडळी विधानसभेत होती, दगडफेकीत नाही. दगडफेक करणारे हे तळागाळातले कार्यकर्ते होते.
आमदार हे विधायक कार्य करण्या करीता निवडून येतात? सरकार स्थापनेच्या घोळावरुन तरी तसे दिसले नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2009 - 1:24 pm | प्रकाश घाटपांडे

अहो गांधीयुगात अगदी सत्याग्रह करायचा म्हणला तरी रस्त्यावर अथवा एखाद्या कार्यालयासमोर ठाण मांडुन बसावे लागत होते.
अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.

मान्य पण उपोषण/सत्याग्रह असो वा जाळपोळ तोडफोड ही देखील आत्मपीडा च आहे. यात नुकसान आपलेच वा स्वकीयांचेच असते. स्वतःवरच उद्विग्न होउन स्वत:च्या घरातील वस्तुंची तोडफोड करणारे देखील असतातच. नंतर त्याचा फटका थेट आपल्यालाच मोजायला लागल्याने पश्चाताप देखील होतो पण कबुल करायचे धैर्य नसते. सार्वजनिक नुकसानीत ही किंमत विभागली जाते त्यामुळे त्याचा 'लोड' एकट्यावर येत नाही.

बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यातुन सामान्य माणसाला होणार्‍या त्रासाबाबत मी ह्या घटनांच्या विरोधात आहे पण मी एक "सामाजिक अपरिहार्यता" म्हणुन ह्या गोष्टी स्विकारतो.

काळानुसार सामाजिक अपरिहार्यतेची परिमाण बदलत असतात इतकेच. संवेदनशील मनाची ती असहाय्यता असते परंतु आपल्या हातात काही नसल्याने त्याचे रुपांतर अपरिहार्यतेत होत. समुहमानसिकता ही विवेकी वा विचारी नसते. म्हणुनच समुहाला धड असते डोके नसते असे म्हणतात. लोकशाहीत संख्याबळ मह्त्वाचे असल्याने समुह मानसिकतेला महत्व असते. लोकशाही पद्धतीने पांडवांचा जय कधीच झाला नसता. पाच पांडव अगदी सहावा कर्ण पुढे श्रीकृष्ण जरी मतदानाला पांडवांच्या बाजुने आला तरी शंभर कौरवांचे एकगठ्ठा मतदान हे कौरवांच्याच बाजुने निकाल देणार. जनमानसिकता बदलणे ही प्रबोधनाची स्लो प्रोसेस आहे.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2009 - 11:14 am | प्रकाश घाटपांडे

आयबीएन लोकमत वर विधानसभेतील झालेल्या गोंधळावर आत्ताच एक लाईव्ह कार्यक्रम झाला. पत्रकार हेमंत देसाई, आमदार कपिल पाटील व आमदार राम कदम यांच्याशी निखिल वागळे यांनी चर्चा घडवुन आणली. मराठीचा मक्ता हा फक्त मनसेचा नाही. सभागृहाची शिस्त,चर्चेची सभ्यता,लोकप्रतिनिधीचे अधिकार, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, हिंदी ही मराठीची शत्रु आहे का?, विचारांची आक्रमकता, महाराष्ट्राच्या समस्या असे अनेक विषय त्यात आले. चर्चा विचारप्रवर्तक होती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2009 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे साहेब, निखिल वागळेंचे एक ठरलेले आहे. मनसे कशी चूक आहे, हे दाखवायचे ते काम करतात आणि समारोप करतांना म्हणायचे आझमींचेही चूकले. बरं जनतेचा कौल घेतला की तो निखिल वागळेच्याच विरोधात जातो. असो, आयबीएनच्या चर्चा ऐकतोच आहे.

अरे बाबा, भाषा आणि स्थानिकांना नौकर-या या विषयावर कोणी तरी बोलतंय त्यांचंही जरा कौतुक करा ना !

-दिलीप बिरुटे

आशिष सुर्वे's picture

11 Nov 2009 - 11:22 am | आशिष सुर्वे

घाटपांडे साहेब,
अजून थोडी माहिती दिलीत तर उपकॄत होईन.
-
कोकणी फणस

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2009 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे

हेमंत देसाई- मनसेनी सभागृहाची माफी मागितल्यास कारवाई सौम्य करणे योग्य आहे. यापुर्वी असे प्रकार घडले आहेत पुन्हा ते घडु नयेत म्हणुन कारवाई आवश्यक. मराठीचा प्रचार व प्रसार व्यावहारिक पर्याय देउन करावा.
कपिल पाटील- मराठीचा मुद्दा हा इतरांचाही आहे. अकांडतांडव योग्य नाही
राम कदम- सभागृहाची दिलगरी ( माफी शब्द नाही) पण अबु आझमीची माफी नाही. आमची आक्रमकता योग्यच
एकूण चर्चा योग्य वाटली. निखिल वागळेंना तिन्ही जणांना सांभाळणे कठीण जात होते. बहुसंख्यांचे (एसेमेस) मत निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असेच होते
माझे मत- मराठीचा मुद्दा योग्य असला तरी तो हाताळण्याचे साधन मात्र लोकशाहीला मारक आहे. जनतेच्या संपत्तीचे नुकसान हे आपलेच नुकसान आहे. ते तुमच्या आमच्या खिशातुनच भरुन द्यायचे असते. अबु आझमी ने डिवचण्यासाठी हे केले आहे ते मराठीच्या द्वेषातुनही नाही व हिंदीच्या प्रेमातुनही नाही. ते प्रसिद्धीच्या प्रेमातुनच आहे.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

11 Nov 2009 - 11:49 am | अवलिया

बहुसंख्यांचे (एसेमेस) मत निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असेच होते

स्वारस्यपुर्ण कल.

हे बहुसंख्य बहुधा कर न भरणारे आणि ऑफिसात न राबणारे असावेत... असो.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

छोटा डॉन's picture

11 Nov 2009 - 12:02 pm | छोटा डॉन

>>हे बहुसंख्य बहुधा कर न भरणारे आणि ऑफिसात न राबणारे असावेत... असो.
=))
होय होय, सहमत आहे.
कर भरणारे व ऑफिसात राबणारे लोक मनसेच्या आंदोलनामुळे त्यांचे "संध्याकाळचे टिव्हीवरचे डेली सोप्स" विविध कारणामुळे बुडल्याने संतप्त होते असे रावसरांच्या प्रतिसादातुन कळाले.
ते समस पाठवण्याची शक्यता कमीच आहे ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 12:06 pm | विशाल कुलकर्णी

<<कर भरणारे व ऑफिसात राबणारे लोक मनसेच्या आंदोलनामुळे त्यांचे "संध्याकाळचे टिव्हीवरचे डेली सोप्स" विविध कारणामुळे बुडल्याने संतप्त होते असे रावसरांच्या प्रतिसादातुन कळाले.>>>

डान्या जबरा रे ...

=)) =)) >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

समंजस's picture

11 Nov 2009 - 12:17 pm | समंजस

निखिल वागळें तेच का? जे काही वर्ष आधी 'महानगर' नावाचं वर्तमानपत्र चालवायचे आणि शिवसेनेवर नेहमी आगपाखड करायचे?
यामुळे चिडून जाउन शिवसेनेने त्यांच्या कार्यालयात एक-दोन वेळेस तोडफोड केली होती.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2009 - 12:23 pm | llपुण्याचे पेशवेll

अचूक माहीती अशी: त्याना शिवसैनिकानी मुस्काडवले होते चांगलेच.
अवांतरः पण हे मनसेचे चुकलेच असे वारंवार ठोकून सांगताना वागळे यांचा चेहेरा फुललेला होता. पण मनसेने केले ते योग्य का अयोग्य यावर त्यानी लावलेल्या कौलाला जेव्हा ९७% लोकानी योग्य असे उत्तर दिले तेव्हा त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2009 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखिल वागळें तेच का? जे काही वर्ष आधी 'महानगर' नावाचं वर्तमानपत्र चालवायचे आणि शिवसेनेवर नेहमी आगपाखड करायचे?

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 11:27 am | विशाल कुलकर्णी

डानराव, रोखठोक प्रतिसाद. आवडला !

मला वाटते कर भरला, मतदान केले की आपले कर्तव्य संपले का?
ज्यांना आपण निवडून दिलेय, प्रतिनिधी म्हणुन तिथे पाठवलेय ते आपले काम व्यवस्थित करताहेत की नाही? करत नसल्यास ते करावे म्हणुन किंवा का करत नाही म्हणून आपण त्यांना जाब विचारतो का?
तेही आपले कर्तव्यच नाही का?

जाब विचारायचा झाल्यास तो कुठल्या मार्गाने.....
पाकिस्तानी राज्यकर्ते आणि आपले राज्यकर्ते यांच्यात एक मुलभुत साम्य आहे ते म्हणजे गेंड्याची कातडी . त्याना निषेधपत्रे पाठवून चालत नाहीत कारण अशा पत्रांची काही दखलच घेतली जात नाही, त्यांना सरळ केराची टोपली दाखवली जाते. (अपवादाबद्दल क्षमस्व)
अशा लोकांचे कानांपर्यंत आपली बाजु मांडायची असेल तर हुतात्मा भगतसिंगांनी म्हटल्याप्रमाणे मोठा आवाजच (उदा. स्फोटाचा आवाज) करावा लागतो. इथे अबु आझमीच्या कानाखाली वाजवल्याचे निमीत्त झाले. पण असे काही होणार याची अबु आझमी आणि सरकार यांनाही कल्पना होती. मग सरकाराने याला अटकाव करण्याचा काहीच प्रयत्न का केला नाही? की असे काही व्हावे याचीच सरकार वाट पाहात होते.
तसे असेल तर मनसे जर दोषी ठरत असेल तर अबु आझमी आणि सरकार हे ही तितकेच दोषी ठरतात. मग रोख एकट्या मनसेवरच का?
या सगळ्या प्रकरणात मनसे आमदारांना आधी चप्पल दाखवणारे अबु आझमी कुणालाच का दिसत नाहीत?
गेली कित्येक वर्षे आपण ही श्री. निमीत्तमात्र यांच्या शब्दात वैचारीक नंपुसकत्वाचीच भुमिका घेवुन जगतो आहोत म्हणुन आज त्यांची एवढी हिंमत होते. आज नवाब मलिक सारखे मुस्लीम आमदार्/खासदार मराठीत बोलतातच ना, मग यांनाच काय समस्या आहे.

अवांतर : आजची मटाची बातमी "अबू, शिक रे... अ आ ई!"

वीस वर्षाच्या राजकारणाने जे शिकवले नाही ते अबुला एका थपडेने शिकवले. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

समंजस's picture

11 Nov 2009 - 11:47 am | समंजस

सहमत!
मनसे वर आणि आधी शिवसेने वर आग पाखड करणार्‍यांना दुसर्‍यांच्या चुका का दिसत नाहीत/नव्हत्या हे माझ्या करता एक आश्चर्य आहे.
ज्या दिवशी विधानसभेतली घटना घडली त्याच दिवशी सपाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीत कित्येक बसेस वर दगडफेक केली होती. त्या क्रुती बद्दल, त्या नुकसाना बद्दल बोलावसं वाटलं नाही? का? कारण ते कार्यकर्ते मनसे नव्हते म्हणून? की
सपा ची ती क्रुती आवडली म्हणून?
(कुठलाही आजार बरा करायचा असेल, तर आजाराच्या मुळ कारणाचा शोध धेऊन त्या वर उपचार करायचा असतो. आजाराच्या वर वर दिसण्यार्‍या लक्षणांवर नाही).

त्याचे अमृततुल्य काही विचार इथे टंकु शकाल काय?
चर्चेतुन काही निष्पन्न झाले का?
बाकीह्या मनसेअच्या राडेबाजी मुळे एका प्रामाणिक करदात्याला एकदिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले.बाकी उर्वरित महाराष्ट्रात त्यावेळी प्रकाशात अगदी न्हाउन निघाला होता. अतिसामान्य लोक स्वस्ताईमुळे तुडुंब जेवुन कामधाम न करता,कर न भरता झोपी गेली होती. ह्याची ह्या मनसेवाल्याना काही फिकिरच नाही.

वेताळ

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 5:32 pm | विशाल कुलकर्णी

मनसेअच्या राडेबाजी मुळे एका प्रामाणिक करदात्याला एकदिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले>>>>

बघा ना वेताळभाऊ, एक दिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले तर एवढा त्रास झाला. देशाची साठ टक्के जनता गेली कित्येक वर्षे अंधारात (लोड शेडिंग वगैरे) उपासपोटी दिवस काढतेय त्याचे काय? की स्वतःला त्रास झाल्यावरच फक्त सामान्य जनता, लोकशाही वगैरे गोष्टी आठवतात?

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2009 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या अनुभवाबद्दल वाईट वाटलेच. स्त्रीया, वृद्धांची, आजारी माणसांचे अशा प्रसंगी हाल होतात याच्याशी सहमत आहे. मराठी भाषा प्रेमासाठी दंगे,हाणामार्‍या, हे योग्य नाही. विधानसभेच्या पवित्र मंदिरात झालेली घटना योग्य नव्हे, सनदशीर मार्ग होता, प्रतिनिधींना जवाबदारीचे भान नाही. भाषेचा मक्ता कोणा एकाचा नाही. अशा वैचारिक गप्पा मारल्या म्हणजे आपले वैचारिक प्रौढत्व सिद्ध होते, त्याची काहींना गरजही असते म्हणा.

पण का कोणास ठाऊक 'आझमी चोपल्याचा' ज्या लोकांना आनंद झाला. त्यापैकी आम्ही एक. कदाचित असा आनंद कोणाच्या दृष्टीने विकृतही असेल. आबू आझमी मस्तवाल माणूस आहे, आणि त्याची मस्ती उतरलीच पाहिजे होती. झाले ते योग्यच झाले. दुसरी गोष्ट 'एक राज्य एक भाषा' असा आग्रह कोणी धरत असेल तर त्यांच्या सोबत राहण्याऐवजी अशा लोकांना गुंड वगैरे म्हणायला आपण मो़कळे, हे काही पटणारे नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस कॉग्रेस सोडून सर्व पक्ष एकत्र झाले होते, तसे सर्व इतर पक्ष मराठी भाषेचे समर्थन करण्याकरिता एकत्र यायला पाहिजे होते. पक्षभेद दूर ठेऊन एक संदेश दिल्या गेला असता, तर काय बिघडले असते. पण जिथे तिथे राजकीय पोळी भाजून घेणारे आपल्या ताटात किती पडणार याचाच विचार करणार आणि आपण काहीतरी करणा-यांच्या विरोधात कण्हत राहू... हे तर नेहमीचेच आहे.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

11 Nov 2009 - 12:20 pm | अवलिया

'एक राज्य एक भाषा' असा आग्रह कोणी धरत असेल तर त्यांच्या सोबत राहण्याऐवजी अशा लोकांना गुंड वगैरे म्हणायला आपण मो़कळे, हे काही पटणारे नाही.

+१

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

समंजस's picture

11 Nov 2009 - 12:38 pm | समंजस

सहमत!
(नशीब त्यांचं, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला आणि त्यावेळेस
जे काही आवश्यक होतं ते केलं अश्या लोकांना गुंड नाही म्हटल्या गेलं. सध्याच्या ह्या पुरोगामी काळात, पुरोगामी लोकांनी तर नक्कीच त्यांना गुंड/समाजकटंक ठरवलं असतं
)...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2009 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉनराव, विशालभाऊ, आणि सर्व दगडफेकी, जाळपोळीच्या काही प्रमाणातल्या समर्थकांसाठी:

कोणालाही मारण्याची काय अपरिहार्यता असते? ही दगडफेक सामान्य नागरीकांवरच का झाली, सपाच्या कार्यालयावर का नाही झाली? मोर्चातून होणारे ट्रॅफिक जॅम्स आणि त्यातून होणारी चिडचिड आणि जाळपोळ, संतप्त जमाव यांना पाहून वाटणारी भीती यात काही फरक आहे का नाही? मी मुंबैत प्रवास करायचे तेव्हा काही वेळा नर्मदा बचाववाल्यांमुळे अनेकदा मलाही उशीर झाला आहे, उपाशीपोटी, गाडीला लटकून दीड तास प्रवास करावा लागला आहे; पण तेव्हा कधी भीती वाटत नव्हती. शांतपणे ते लोकं रस्त्यावर, सब-वेमधे निदर्शनं करीत होते; सामान्य माणसाची चिडचिड झाली असेल माझ्यासारखीच, पण कधी कोणी फोन करून, प्रत्यक्ष भेटून 'काळजी घे' असं सांगितलं नाही. या राड्याच्या वेळी, नंतर लोकं 'काळजी घे, जप स्वतःला' असं का सांगत आहेत?

मी एक सामान्य माणूस, मनसेला मत देण्याची शक्यताही आहे. पण याच पक्षाच्या राडेबाजीमुळे माझ्यावरही वेळ वाईट येऊ शकते हे मला दिसलं तर मी का या लोकांना मत द्यावं? प्रत्येकाला आपापला जीव प्यारा नाही का? मराठी लोकं या राड्यांमधेच खपले तर मराठी भाषा टिकणार कुठून? कोणी आजारी माणूस, कोणी गर्भार स्त्री, कोणी तान्हुलं जन्माला यायच्या आधीच या असल्या ट्रॅफिक जॅम्समुळे दगावलं असतं तर? हुतात्मा म्हणवले जाणार होते का ते??

असाच काहीसा 'लक्षवेधक' प्रकार विधानसभेच्या समोर/जवळ नसता करता का आला? अनेक सामान्यांनी त्यांना दुवाच दिला असता. प्रसिद्धीही मिळाली असती. पण जसं अतिरेक्यांसाठी भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे, तसं आपण सामान्य नागरीक हे राजकीय राडेबाजांचं सॉफ्ट टार्गेट आहोत का? अबू आझमींना फटकावून पुरेशी प्रसिद्धी नाही का मिळाली.

अदिती

Nile's picture

11 Nov 2009 - 12:45 pm | Nile

मी मुंबैत प्रवास करायचे तेव्हा काही वेळा नर्मदा बचाववाल्यांमुळे अनेकदा मलाही उशीर झाला आहे, उपाशीपोटी, गाडीला लटकून दीड तास प्रवास करावा लागला आहे; पण तेव्हा कधी भीती वाटत नव्हती.

कीती उपयोग झालाय नर्मदाबचाव वाल्यांच्या निदर्शनाचा आज पर्यंत? खरं तर त्यांनी आता हाच मार्ग वापरायला हवा आहे असा सुर दिसतोय लोकांचा.

वा, कल्पना करा, आज अ राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक आ कारणासाठी बसेस फोडताहेत, उद्या नर्मदा बचाव वाले. परवा .... वा वा! काय मजा येईल नाही सामान्यांना त्रास होत असेल तर त्यांनी गपचुप घरी बसुन टीव्ही पहावा, जसे ते मतदानाच्या दिवशी करतात त्याच प्रमाणे. :)

यशोधरा's picture

11 Nov 2009 - 1:29 pm | यशोधरा

तुला अनुमोदन अदिती.

छोटा डॉन's picture

11 Nov 2009 - 1:55 pm | छोटा डॉन

>>कोणालाही मारण्याची काय अपरिहार्यता असते?
मारहाण झाली आहे ती अबु आझमीला, त्यात अपरिहार्यता होते असे आम्हाला वाटते, दुसरी मते असु शकतात.
बाकी त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन "सामान्य माणसाला" पकडु पकडु धुतल्याचे माझ्या पहाण्यात नाही. सपाच्या लोकांनीही तसे केले असल्याची शक्यता नाही.

>>ही दगडफेक सामान्य नागरीकांवरच का झाली,
सामान्य नागरिकांवरच झाली ह्या वाक्याला आक्षेप आहे. काही अनावश्यक उत्साही कार्यकर्त्यांनी "बस"वर दगडफेक केली हे सत्य आहे, मात्र सामान्य माणुस हुडकुन त्याला त्रास दिला गेला असे नाही. त्या दंग्याच्या गदारोळात जे चुकुन त्यात सापडले त्यांना त्रास झाला हे सत्य असले तरी त्यात मुद्दामुन त्यांनाच टार्गेट केले गेले नाही.
सामान्य माणसालाच त्रास द्यायचा असता तर ते बसमधुन उतरल्यावरही त्यांना मारता आले असते, रस्त्याने जाणार्‍या गाड्या अडवुन त्यांनाही त्रास देता आला असता पण असे घडले नाही व कधीही घडत नाही अर्थातच जातीय दंग्यांचा अपवाद वगळता.

>>सपाच्या कार्यालयावर का नाही झाली?
सपा कार्यालयांवर ठिकठिकाणी योग्य ती कॄती केली आहे आंदोलकांनी. जास्त डिटेल्स पेपरमध्ये मिळु शकतील.

मोर्चातून होणारे ट्रॅफिक जॅम्स आणि त्यातून होणारी चिडचिड आणि जाळपोळ, संतप्त जमाव यांना पाहून वाटणारी भीती यात काही फरक आहे का नाही?

आहे, त्यात फरक जरुर आहे. पण अशावेळी तुमची काळजी घ्यायची जबाबदारी पोलिसांची नाही का ?
बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की जातिय दंगलींचा अपवाद वळगता कुठल्याही पार्टीच्या आंदोलनात सामान्य माणसाला रस्त्यावर खेचुन त्याला मुद्दामुन त्रास दिला गेला नाही. ते समजा बसमध्ये असतील तर बसवर दगडफेक होऊ शकते पण बसमधुन उतरल्यावर कोणी त्यांना खानी कानफाटात मारत नाही अथव अनु काही करत नाही.
ह्या मुद्द्यामधला बेसिक फरक समजुन घ्यावा.

भर समुद्रात समजा आपण प्रवास करत असलेल्या जहाजाला भोक्पडले तर आत घुसणारे पाणी आपल्याला मारायला नसुन जहाज बुडवायला आत घुसत असते, आपण त्यावेळी तिथेच असल्याने आपले जे नुकसान होते ते केवळ आपण तिथे असल्याने होते. आपण समजा जीव वाचवुन जहाजातुन खाली उतरलो तर पुन्हा कोणी खेचुन आपल्याला जसे जहाजात टाकत नाही तसेच इथे घडते.

पण कधी कोणी फोन करून, प्रत्यक्ष भेटून 'काळजी घे' असं सांगितलं नाही. या राड्याच्या वेळी, नंतर लोकं 'काळजी घे, जप स्वतःला' असं का सांगत आहेत?

मुद्दा बरोबर आहे ...
पण एक सांगु का की त्या वेळी जी आंदोलने व्हायची ( अर्थात आपल्या नमर्दा आंदोलनाचा अपवाद वगळुन ) ती आजच्या एवढीच तीव्र व खतरनाक असायची, उलट कार्यकर्ते जरा जास्तच भडकु होते. मात्र त्यावेळी दुरसंचार साधनांची ( पक्षी : फोन , समस, ई-मेल्स वगैरे ) एवढी रेलचेल नसल्याने तेवढे पॅनिक होत नव्हते.
आज जरा कुठे खट्ट झाले की लाखो समस, फोन्स आणि मेल्सचा पाऊस पडतो व अनावश्यक घबराट निर्माण होते. अर्थात हे सगळेच अनाठायी आहे असे नाही पण बर्‍याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे. आपल्या लोकांची काळजी आपण घ्यायलाच हवी पण ह्या सर्वामुळे उगाच क्रेझ निर्माण होऊन अजुन माणसे नक्की काय चाल्ले आहे ते पहायला रस्त्यावर उतरतात व मागनं ओरडत असतात त्याचे काय ?
शिवसेनेची गत दशकातली आंदोलने आणि त्याची तिव्रता व त्यात झालेला सामान्य माण्सला त्रास हा ताळेबंद काढल्यास मी काय म्हणतोय ते आपल्याला लक्षात येईल.

पण याच पक्षाच्या राडेबाजीमुळे माझ्यावरही वेळ वाईट येऊ शकते हे मला दिसलं तर मी का या लोकांना मत द्यावं?

तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.
पण ठराविक एखादाच पक्ष हा "राडेबाज" आहे असा निष्कर्ष काढण्याआधी थोडे बाकीच्यांच्या चालीकडे पाहुन मग निर्णय घ्यावा ही विअनंती.
अर्थात मी इथे "मनसे"चे समर्थन करण्या अथवा न करण्याचा प्रश्न नाही.

>>प्रत्येकाला आपापला जीव प्यारा नाही का?
आहे, जरुर आहे ...
मग अशावेळी जेव्हा अशी बातमी येईल तेव्हा कॄपा करुन गाड्या घेऊन रस्त्यावर न येता सध्या आहात तिथेच सुरक्षित राहण्यात हित आहे असा निर्णय घ्यावा. सध्या बाहेर काय चालले आहे हे माहित असुनसुद्धा सधयच्या सुरक्षित ठिकाणाहुन बाहेर पडुन स्वतःचय घराकडे जाण्याचा निर्णय स्वतःच घेणे हे अट्टाहास आहे व तो निर्णय तुमचा आहे.
अखेरीस जीव ही तुमचाच आहे व तो तुम्हाला प्यारा आहे हे आहेच ना ?

कोणी आजारी माणूस, कोणी गर्भार स्त्री, कोणी तान्हुलं जन्माला यायच्या आधीच या असल्या ट्रॅफिक जॅम्समुळे दगावलं असतं तर?

करेक्ट ...
ह्या बाबतीत आपल्याशी सहमत आहे, इनफॅक्त ह्याच एका गोष्टीमुळे आम्ही नेहमी अशा रस्त्यावरच्या आंदोलनांना बाकी इतर सर्व अपरिहार्यता लक्षात घेऊनसुद्धा विरोध करतो.

असाच काहीसा 'लक्षवेधक' प्रकार विधानसभेच्या समोर/जवळ नसता करता का आला?

म्हणजे नक्की काय करायचे होते ?
मुळात ही कार्यकर्त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते नेहमी. काही अपवाद वगळता नेहमीच पक्षाकडुन "राडा नको, शांत रहा" असे आदेश कार्यकर्त्यांना येतात. जो काही दंगा होतो तो पक्षाच्या बांधणीत अतिशय खालचय कक्षेत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडुन होतो, त्यात पक्षश्रेष्ठींचा अपवादानेच हात असतो.
आंदोलने, मोर्चे वगैरेचे आदेश वरुन येतात पण त्यात "१० बसेस, २० गाड्या फोडा" असा आदेश वगैरे नसतो. एखादी घटना घडुन जमाव अनावर होतो व काही दु:खद घटना घडतात. बेकाबु जमावाला कोणीच नेता नसतो व तो कोणत्याही नेत्याचे ऐकतही नाही हे सत्य आहे.
अर्थात ह्यालाही अपवाद आहेत पण तो आपला विषय नाही.

पण जसं अतिरेक्यांसाठी भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे, तसं आपण सामान्य नागरीक हे राजकीय राडेबाजांचं सॉफ्ट टार्गेट आहोत का?

तुलनेत प्रचंड गल्लत होते आहे,.
भारतातल्या कुठल्याच राजकिय अथव बिगरराजकिय पक्षाने सामान्य माणसाला टार्गेट करुन दंगा केल्याचे स्मरणात नाही.
( अर्थातच काही हत्यांनंतरचे पडसाद व त्यानंतरच्या दंगली वगळता )
आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.

अबू आझमींना फटकावून पुरेशी प्रसिद्धी नाही का मिळाली.

तो मुद्दा इथे नाही, तरीही योग्य ती आणि योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली असे आम्हाला वाटते.

अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले".
असो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !------

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2009 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मारहाण झाली आहे ती अबु आझमीला, त्यात अपरिहार्यता होते असे आम्हाला वाटते, दुसरी मते असु शकतात.

माझं वाक्य थोडं संदिग्ध होतं, कोणालाही मारण्याची किंवा कुठेही तोडफोड करण्यात अपरिहार्यता कसली? ही अगदीच लेम एक्सक्यूज आहे. राग योग्य ठिकाणी आणि योग्य माणसा(सां)वर काढता नाही आला की फोडा सरकारी, पर्यायाने समाजाच्या, मालकीच्या गोष्टी!

माणसावर दगडफेक झाली नसेलही, पण नाडलं कोण गेलं, सामान्य माणूसच ना? कोणाचा पोटावरचा रोजगार गेला, कोणाला कर भरल्याबद्दल निराशा दाटून आली. काय मिळवलं नक्की यातून?
बसेस का फोडल्या, आस्थापनांवर हल्ला का होतो, प्रतिकार करत नाहीत म्हणूनच ना? कोणी सैनिकी तळाच्या जवळ रहाणार्‍यांनी दंगा केल्याचं ऐकलं आहे का?

बर्‍याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे.

१००% मान्य की आपणच पॅनिक तयार करतो. पण त्याचं मूळ कशात असतं? कधीही कोणीही आजतागायत फोन केलेला नाही की आज तुझ्या नेहेमीच्या रस्त्यावर 'नर्मदा बचाव'वाले आंदोलन करत आहेत, काळजी घे. ('नर्मदा बचाव' हे एक उदाहरण. माझा त्यांना पाठिंबा आहे का नाही हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही.)
कुठूनतरी हिंसक निदर्शनं सुरू आहे, ठिणगीचा वणवा व्हायला किती वेळ लागतो हे माझ्यासारख्या सुरक्षित शहरी वातावरणात राहिलेल्या माणसांनी सांगायची गरज नाही; पण समाजकंटकांनी याचा फायदा घेतला असता, परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली असती तर याची जबाबदारी कोणाची?

भडकाऊ परिस्थितीत सामान्य कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत नसतीलही, अगदी गांधीजीही त्याला अपवाद नव्हते. पण एकदा झालं, दोनदा झालं, किती वेळा लोकांनी हे सहन करायचं? पुण्यात काय, राज ठाकरेंना अटक झाली तेव्हा बस जाळली, आता काय पुन्हा काहीतरी झालं पुन्हा बसेस फोडल्या! मधल्या दिवसांत काही होमवर्क झालं का नाही?
हे सगळं मी मुद्दामच सपाच्या विरोधात लिहीत नाही आहे. कारण त्यांचा जो काही मुद्दा आहे, तोच मला मान्य नाही. अबू आझमींनी मराठी न येण्याचा माज करू नये हा मुद्दा १००% मान्य आहेच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चार शब्द मी का खर्च करावेत. चांगल्या मुद्द्यासाठी, विकासासाठी लढत आहेत असं वाटत आहे, म्हणून मी मनसेला मत देण्याची शक्यता आहे असं लिहीलं आहे. इतरही काही कारणं असतील आणि इतरही काही पक्ष असतील पण मला त्यांच्याबद्दल सहानुभूती नसताना मी त्यांच्याबद्दल का लिहू? "ते लोकं ना, तसलेच आहेत", असं म्हणून बाहेरच्यांना सोडून देऊ शकते. पण माझ्या घरातल्या लोकांना मी किंवा आणखी कोणीही असं सोडून देऊ शकते का?

आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.

आणि ह्या नाडल्या गेलेल्या लोकांकडूनच पुन्हा मतं मागायची? का मतांच्या व्यवस्थेवरही रागच आहे?

अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले".

म्हणजे सपा आणि मनसे यांच्यात काहीच फरक नाही का? "त्यांनी दोन बसेस फोडल्या काय, आम्ही जास्त पराक्रमी आहोत, आम्ही चार फोडून दाखवू", हा 'विचार' या राड्यांमागे होता का?
एरवी राज ठाकरे मिडीया गाजवतात, मनसेच्या लेटरहेडवर एक पत्रक (मागेच) नाही काढता आलं की या दगडफेकींना, जाळपोळींना, हिंसेला, सामान्यांना त्रास देणार्‍या घटनांना राज ठाकरे व्यक्तीशः आणि पक्षस्तरावरही निषेध करतात म्हणून! हेच 'पेटून' उठणारे लोकं सगळे नाहीतर किमान पन्नास टक्केतरी या राड्यापासून लांब नसते राहिले? मान्य आहे सामान्य कार्यकर्ते नाही एवढा विचार करू शकत, पण मग नेत्याचं काय काम?

अतिरेक्यांच्या गोळ्यांना मरणार्‍याचा धर्म समजत नाही, तसंच या आततायीपणामुळे होणार्‍या जाचालाही नाडल्या गेलेल्या माणसाची भाषा, विचारधारा समजत नाही. एक-दोन माणसं नाही काही शे माणसांना याचा त्रास होतो, पाच-पन्नास लोकांच्या भडक डोक्यांमुळे! का या सामान्य लोकांनीही कुठे काही खुट्ट झालं की स्वतःची मुंडी सोडवून घ्यायला पर्समधे वॉलेटऐवजी पिस्तुल ठेवायचं?

घाबरवणारे लोकं जेवढे सामान्य असतात, पिडीत सामान्यही तेवढेच सामान्य असतात. पण तरीही हे नाडले जाणारे लोकं जास्त चांगले वाटतात, असतात, कारण तेही आण्णासाहेबांप्रमाणे कायदा हातात घेत नाहीत.

अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी एकदम सहमत
वेदातै,
सुक्याबरोबर ओले जळ्णारच. औषध जरी कडु असले तरी आरोग्य सुस्थीतीत ठेवण्यासाठी जबरदस्ती करावीच लागते. लाडका मुलगा असला तरी योग्य वळण लावण्या साठी अधुनमधुन धपाटे घालावेच लागतात. कर्क रोगाची गाठ असल्यास ती कापुनच काढवि लागते नाईलाज(हा एकच ईलाज) आसतो.
बाकी आपल्याच सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान कधिही समर्थनिय ठरणार नाही.
"सामाजीक बहिष्कार" या अस्त्राचा उपयोग करुन पहायला हरकत नसावि. मी सुरु केला आहे.

==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमाल मुलगा's picture

11 Nov 2009 - 4:54 pm | धमाल मुलगा

ते सगळं हुच्चभ्रु, "माझ्या पोटातलं पाणी न हलता सुधारणा हवी" वगैरे छापाच्या गोष्टी कळल्या!
माझा एकमेव मुद्दा आहे, त्यावर कोणी उत्तर दिलं तर फार फार उपकार होतील.

सर्वसाधारण माहितीनुसार, आधी निदर्शनं, अबुचा पुतळा जाळणं इ.इ. प्रकार करायला जमलेल्या लोकांना पोलिसांनी विरोध केल्यावर बर्‍याच ठिकाणी बसवर दगडफेक(! हो असं म्हणायची पध्दत आहे, खरी दगडफेक म्हणजे काय हे दरोडा अनुभवताना कळतं...त्याशिवायच्या अनुभवावर ४ दगड इकडंतिकडं ह्यालाही दगडफेक म्हणतात!) झाली, त्या जमावात म.न.से.चे अधिकृत कार्यकर्ते किती होते? सगळॅच असतील तर इतर पक्षाच्या नेत्यांना त्या त्या भागात शिरणंही मुश्किलच असेल, नाही का? :)

बरं, प्रवासी लोकांना बसमध्ये तसेच बसवुन दगड मारले की आधी उतरु दिलं आणि मग 'दगडफेक' झाली?

"स.पा.च्या 'कार्यकर्त्यांनी' नव्या मुंबईत रेल-रोको करण्यासाठी जे दगड मारले त्यात मोटारमन घाबरुन खाली उतरला, रेल्वेतील प्रवाशांमध्ये हल्लकल्लोळ उडाला आणि जो तो जीव वाचवत पळु लागला" असं वाचलेल्या संयत बातम्यांमधुन कळते!
मग स.पा.च्या ह्या कृत्याबद्द्ल 'सामाजीक चाड/जाणिव' वगैरे वगैरे असलेल्यांनी जसं मनसेला जबाबदार धरुन दोष दिला तसं स.पा.बाबत होताना का नाही दिसत आहे?

:?

समंजस's picture

11 Nov 2009 - 6:18 pm | समंजस

"स.पा.च्या 'कार्यकर्त्यांनी' नव्या मुंबईत रेल-रोको करण्यासाठी जे दगड
मारले त्यात मोटारमन घाबरुन खाली उतरला, रेल्वेतील प्रवाशांमध्ये
हल्लकल्लोळ उडाला आणि जो तो जीव वाचवत पळु लागला" असं
वाचलेल्या संयत बातम्यांमधुन कळते!
मग स.पा.च्या ह्या कृत्याबद्द्ल 'सामाजीक चाड/जाणिव' वगैरे वगैरे
असलेल्यांनी जसं मनसेला जबाबदार धरुन दोष दिला तसं स.पा.बाबत होताना
का नाही दिसत आहे?

धमु साहेब, मला एक कारण माहित आहे. (व्यक्तीगत अनुभवा वरून सांगतोय, कोणाला वाईट वाटू नये)
आम्ही मराठी मंडळी (बरीचशी) ही पापभिरू, सुसंस्कृत, कायदा मानणारी, भांडणाला घाबरणारी, भांडणापासून चार हात दुर राहणारी (खरंतर कायद्याला घाबरणारी) अश्या प्रकारची आहोत. तसंच आम्हाला हे माहित आहे की, घरच्या मुलांना दरडावणं, वेळप्रंसगी दोन धपाटे घालणं हे सोपं आहे. मात्र दुसर्‍यांच्या मुलांशी असं नाही वागता येत(इच्छा असून सुद्धा). त्यामुळे जेव्हा केव्हा आमच्या मुलाचं दुसर्‍यांच्या मुलाशी भांडण होतं तेव्हा, आमच्या मुलाची चुक नसताना सुद्धा, आम्ही आमच्या मुलाला आधी रागावतो, एकाध धपाटा सुद्धा घालतो, कारण हेच आम्हाला शक्य असते. काय शक्य नसते तर असे दुसर्‍याच्या मुला सोबत वागणे. आमच्या मुलाने जर त्याची चुक नाही, आधी दुसर्‍या मुलाने खोडी काढली असे कितीही सांगीतले तरी ते समजून न घेता आम्ही उलट त्याला मनाचा मोठेपणा काय, सुसंस्कृतपणा काय, आमचे विचार किती उच्च, भांडण/मारामारी किती निरर्थक हे सांगतो. मग बिचार्‍या आमच्या मुला कडे गप्प राहण्या वाचून काही पर्याय नसतो. तसंच पुढे भविष्यात जेव्हा केव्हा त्याच्यावर भांडण लादलं जातं, किंवा कोणी खोडी काढतं तेव्हा आमचा मुलगा चुकुनही ते प्रकरण घरापर्यंत जाउ देत नाही. मग वेळप्रसंगी तडजोड करावी लागली (दुसर्‍या मुला सोबत, जसे की त्याच्या खोड्यां कडे दुर्लक्ष करणे, बोलणी ऐकून घेणे, वगैरे) तरी गत्यंतर नाही. (माझा लहाणपणाचा अनुभव)

तर हे सांगण्याचं कारण की, का काही लोक मनसे/शिवसेनेला दोष देतात आणि सपा / इतरांना नाही. कदाचीत अशीच काही कारणं असावीत. काही लोकांची कदाचीत आणखी काही कारणं असावीत.

यशोधरा's picture

11 Nov 2009 - 9:31 pm | यशोधरा

धमु, कोणत्याही पार्टीने असली जनसामान्यांना वेठीला धरुन केलेली कृत्ये चुकीचीच आहेत.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 4:06 pm | धमाल मुलगा

मग फक्त एकाच पक्षाला वेठीला धरुन कंठशोष का?
जर त्या पक्षाच्या मुख्यालयातून शाखांमध्ये आदेश गेलेले होते की 'रस्त्यावर उतरु नका' त्या पक्षावरच का सगळे एकांगी आरोप?
ह्याला उत्तर नाही कुणाकडे!

असो, यशो तुझ्या भावना समजु शकतो, पण फुक्काटची कृतीशुन्य तोंडपाटिलकी करणारी धेंडं पाहीली की संताप अनावर होतो!
लोकांची पायापुरती खेटरं कापण्याची वृत्ती काही नवी नाही म्हणा, "मला त्रास नको, बाकी काय क्रांत्या बिंत्या करायच्या त्या खुशाल करा! आम्ही मागाहुन फायदे लाटायला सगळ्यात पुढे येऊ" असली वृत्तीच जास्त बोकाळलीये त्याला कोण काय करणार?

यशोधरा's picture

12 Nov 2009 - 6:48 pm | यशोधरा

>>"मला त्रास नको, बाकी काय क्रांत्या बिंत्या करायच्या त्या खुशाल करा! आम्ही मागाहुन फायदे लाटायला सगळ्यात पुढे येऊ"

हे मात्र अगदी पटलं रे धम्या! अगदी खर आहे.

चित्रा's picture

12 Nov 2009 - 7:56 pm | चित्रा

ऐकून सगळेच बरोबर आहेत असे वाटायला लागले आहे. :(
पण तेही खरे नव्हे. श्री. प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादाशी सहमत. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते, म्हणूनच तिच्या नुकसानाचा अधिकार कोणालाही नाही. खरे तर मराठी/हिंदी असा हा प्रश्नच नाही, प्रश्न आहे प्रसिद्धीचा - ती देखील जितक्या लवकर मिळवता येईल त्याचा.

बाकी वेदश्रीताईंना झालेल्या त्रासाबद्दल वाईट वाटले. तरी असे दंगलीसारखे काहीही घडलेले नसताना पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सोयीची नसल्याने, एकही रिक्षा थांबत नसल्याने, रात्रीच्या वेळी, पुलाच्या खाली, झीब्रा क्रॉसिंगवरही रस्त्यातले एकही वाहन बाजूला अडकलेल्यांची दया येऊनही थांबत नसल्याने लहान मुलांसकट तब्बल पंधराहून अधिक मिनिटे अडकण्याचे सुख (!) अनुभवलेले असल्याने हे जे सामान्यांना वेठीस धरणे आहे, ते अगदी दंगल होत नसतानाही घडल्याचा, तेही सामान्यांनीच सामान्यांना वेठीला धरण्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे वेदश्रीताईंच्या भावना कळू शकतात. (यात कुठच्याही शहराला नावे ठेवण्याचा उद्देश नाही, ही कृपया ध्यानी घ्यावे, नाहीतर चर्चा भलतीकडे जाईल).

तरीही (मुंबईकर असल्याने असाच सपाटून पडणार्‍या पावसाच्या वेळी अडकण्याचा अनुभव असल्याने) एक न मागता सल्ला - गडबड चाललेली असताना लवकरात लवकर घरी सुखरूप पोचावे अशी इच्छा असणे अगदी योग्य आहे, पण त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरू नये (हे स्वतःच्या अनुभवावरून).

ऑफिसमध्ये थांबण्यासाठी जागा असल्यास किंवा मूलभूत सोयी (बाथरूम, पाणी, सुरक्षा, किंवा वीज इ. )असल्यास काही विश्वासार्ह व्यक्तींबरोबर तेथेच बाहेरची स्थिती बदलेपर्यंत थांबणे चांगले. नसल्यास जवळ राहणार्‍या मित्रांच्या/नातेवाईकांच्या घरी जाणे/ थांबणे चांगले.

(पुणेकर/मुंबईकर/मध्य रेल्वेकर) चित्रा

श्रावण मोडक's picture

12 Nov 2009 - 11:01 pm | श्रावण मोडक

छान चर्चा. एकूण दीड तास मस्त गेला!!!