मनसे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Nov 2009 - 11:21 pm

मनसे व्यतिरिकत महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,

मला तुमची लाज वाटते!

मला तुमच्या लाचारीचा, मूग गिळून गप्प बसण्याचा संताप येतो!

मला तुमच्या अस्मिताहीनतेची दया येते!

मला तुमच्या कणाहीनतेची कीव वाटते!

मला तुमच्या नपुंसकत्वाचं हसू येतं!

मला तुमच्यावर थुंकावं असंदेखील वाटत नाही!

धन्यवाद,

जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपला,
(एक सामान्य परंतु मराठीचा अभिमान असलेला मराठी माणूस) तात्या अभ्यंकर.

समाजविचारबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

9 Nov 2009 - 11:38 pm | मी-सौरभ

शिंदे, वांजळे, गिते, कदम
दाखवून दिलात, मराठीचा दम

४ काढलेत तर ४० आणू
नडलात तर कानाखाली हाणू

जय महाराष्ट्र!!!

सौरभ

विसोबा खेचर's picture

9 Nov 2009 - 11:48 pm | विसोबा खेचर

४ काढलेत तर ४० आणू
नडलात तर कानाखाली हाणू

अगदी!

तात्या.

अमोल खरे's picture

10 Nov 2009 - 9:55 am | अमोल खरे

बहुमताने सहमत.

मुंबईत येऊन मराठीतच बोलायचं. माज दाखवायचा नाही. दाखवला तर काय होतं ते बघितलाय सर्वांनी. राज चे अभिनंदन आणि भाजपा व शिवसेनेच्या पळपुट्या आमदारांचा निषेध.

विकास's picture

9 Nov 2009 - 11:44 pm | विकास

तुमच्या भावना समजू शकतो...

पण जेंव्हा मतदार मतदानाला जात नाहीत, नागरीक म्हणून आपण जे "जनतेचे सेवक" म्हणून निवडून गेले आहेत त्यांना जाब विचारत नाहीत तेंव्हा अशा वृत्तीला काय म्हणावे?

रागावू नका, हे व्यक्तीगत नाही तर सामाजीक वृत्तीबद्दलचे माझे कायमचे म्हणणे आहे.

साधे घरात कामाला कुणाला घेतले तर भांडी नीट घासली का आणि फरशी साफ केली का ह्यावर नजर ठेवतो, धंदा असेल अथवा नोकरीत हाताखाली कुणाला घेतले तर बाकी काही नाही तरी निदान ८ ते ५ पिळवणूक केल्याशिवाय आपण त्याला पगारातील एक पै देणार नाही. आणि इथे मात्र नागरीक म्हणून कर्तव्य न पाळता जनताजनार्दनाच्या या सेवकाला पैसे उधळायला जणू "ब्लँक चेकच" देतो... अहो तेच काय उद्या कुणालाही असे मोकाट सोडले तर हेच होणार.

म्हणून म्हणावेसे वाटते की अजून वेळ गेली नाही, भारतीय नागरीका लवकर जागा हो....

विसोबा खेचर's picture

9 Nov 2009 - 11:51 pm | विसोबा खेचर

आणि इथे मात्र नागरीक म्हणून कर्तव्य न पाळता जनताजनार्दनाच्या या सेवकाला पैसे उधळायला जणू "ब्लँक चेकच" देतो... अहो तेच काय उद्या कुणालाही असे मोकाट सोडले तर हेच होणार.

हा मुद्दा खरा आहे, पण विकासराव ही मुद्दे मांडण्याची वेळ नाही..कारवाईची, कानाखाली आवाज काढण्याची वेळ आहे जे मनसेने करून दाखवलं आहे!

जय मनसे!

तात्या.

विकास's picture

10 Nov 2009 - 12:14 am | विकास

कानाखाली आवाज काढण्याची वेळ आहे ...

या बाबतीत असहमत... पण विस्तृत उत्तर नंतर येथे अथवा इतरत्र देईन.

sujay's picture

10 Nov 2009 - 12:17 am | sujay

कारवाईची, कानाखाली आवाज काढण्याची वेळ आहे जे मनसेने करून दाखवलं आहे!

+१

मनसे प्रेमि,
सुजय

मी-सौरभ's picture

9 Nov 2009 - 11:58 pm | मी-सौरभ

एकदा आवाज काढला की मग समोरचा सरळ वागतो असा आपला अनुभव असेलच ना...
=D>

ते काय फक्त भांडण करायला नक्कीच आमदार झालेले नाहीत..

सौरभ

शैलेन्द्र's picture

10 Nov 2009 - 12:04 am | शैलेन्द्र

जे झालं मस्तं झालं...

आता पुढच पुढे...

शिवसेनेची गत मात्र शेपुट कापलेल्या कुत्र्यासारखी झालीय, ओरडताही येत नाही, झाकताही येत नाही.

माझी दुनिया's picture

10 Nov 2009 - 1:23 pm | माझी दुनिया

शिवसेनेची गत मात्र शेपुट कापलेल्या कुत्र्यासारखी :$ झालीय, ओरडताही येत नाही, झाकताही येत नाही.

=D> १०१% सहमत
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:13 am | अक्षय पुर्णपात्रे

तात्या, तुमच्या मताविषयी आदर बाळगून तुमचा संताप अनाठायी असल्याचे नोंदवावेसे वाटते. अबू आझमीला मराठीत शपथ घ्यावी लागण्यासाठी कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचा विसर पडू देऊ नका व या अवस्थेला (गुंडांना जेलात असतांनाही निवडून देणे वगैरे) जबाबदार असणार्‍या मतदारांविषयी, त्यांच्या बोथटलेल्या संवेदनांविषयी संताप व्यक्त करावा.

(जे राज्य स्वतःला प्रगत म्हणवते तेथे शेतकरी आत्महत्या करतात, बावीस-बावीस तास वीज नसते, २६-११ सारखे हल्ले झाल्यानंतरही काहीच बदल घडत नाही, त्या राज्यातल्या मतदारांनी आतमपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. नको त्या मुद्द्यांवर भावनेने पेटून उठण्याची गरज नाही. उद्या मतदारांनी मराठी न बोलणार्‍यांना मतेच दिली नाहीत तर अबु आझमीसारखे लोक विधानसभेत दिसणारच नाहीत.)

शैलेन्द्र's picture

10 Nov 2009 - 12:14 am | शैलेन्द्र

"अबू आझमीला मराठीत शपथ घ्यावी लागण्यासाठी कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचा विसर पडू देऊ नका "

एखाद्या स्त्रीशी बोलताना कुठे बघावे याचे काही कायदे/नियम आहेत का? तरी काही संकेत आपण पाळतोच ना?

आणि जो पाळत नाही त्याच्या कानाखालीच लावली पाहिजे..

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:26 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री शैलेंद्र, आपला प्रतिसाद कळला नाही. अधिक माहिती द्यावी.

एखाद्या स्त्रीशी बोलताना कुठे बघावे याचे काही कायदे/नियम आहेत का? तरी काही संकेत आपण पाळतोच ना?

सहमत आहे. मला बातम्यांवरून जी माहिती कळाली त्यात या प्रकारच्या माहितीचा उल्लेख नव्हता. कृपया एखाद्या बातमीचा दुवा द्यावा. मीदेखिल शोधतोच आहे. धन्यवाद.

या बातमीत श्री गिरीश बापट यांनी संस्कृतमधून शपथ घेतल्याचा उल्लेख आहे. त्याचाही तितकाच तीव्र निषेध व्हायला हवा.

जनतेच्या मालमत्तेचे असे नुकसान करून नक्की काय साधले जाणार आहे याचाही विचार व्हावा.

(सकाळ माझे आवडते वृत्तपत्र नाही. ऑफिसात फक्त तेच वाचता येत असल्याने त्यातील बातमीचे दुवे दिले आहेत.)

विसोबा खेचर's picture

10 Nov 2009 - 12:20 am | विसोबा खेचर

अबू आझमीला मराठीत शपथ घ्यावी लागण्यासाठी कायदा बदलण्याची आवश्यकता आहे.

हो, परंतु त्यापूर्वी कानाखाली आवाज काढण्याची आवश्यकता होती ती आज पूर्ण झाली. कायदा बदलूच!

लोकशाहीचा विसर पडू देऊ नका

मराठीद्वेषाच्या मुद्द्यावर लोकशाहीचा नाही तो पपलू भंकस आम्हाला नका शिकवू पूर्णपात्रेसाहेब!

मायझंव, मुंबैला चार दिस दहशतीखाली ठेवणार्‍या त्या कसाबला तुम्ही भडव्यो आर्थररोडच्या जेलात वर्ष झालं तरी अजून पोसताय! आणि चार आमदारांनी मराठीचा ग्राह्य मुद्दा उचलून धरला तर लगेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई??

लोकशाहीचा राग कुणाला देता?

तात्या.

पक्या's picture

10 Nov 2009 - 12:25 am | पक्या

मस्त हो तात्या. प्रत्येक मुद्याला छान उत्तर दिलेत.

जय महाराष्ट्र , जय मराठी

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:32 am | अक्षय पुर्णपात्रे

तात्या, आपल्या मताशी काहीसा सहमत आहे. कसाबला जलदपणे शिक्षा करण्यात यावी यात शंका नाही. खटला जलद चालावा यासाठी योजना करणे अशक्य नाही पण तसे होतांना दिसत नाही. (केंद्रात व राज्यात त्यानंतरही लोकांनी अस्तित्त्वात असलेल्या राजवटीलाच कौल दिला आहे.) पण त्यालाही जबाबदार जनताच आहे. तुम्ही कितीही कंठशोष केला तरी जोपर्यंत जनता जागी होत नाही, तोपर्यंत फारसा बदल संभवत नाही.

आणि चार आमदारांनी मराठीचा ग्राह्य मुद्दा उचलून धरला तर लगेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई??

ही कारवाई जाचक आहे किंवा नाही, याबाबत फारशी कायदेशीर माहिती नसल्याने तूर्तास काही मत व्यक्त करत नाही.

विसोबा खेचर's picture

10 Nov 2009 - 12:59 am | विसोबा खेचर

तुम्ही कितीही कंठशोष केला तरी जोपर्यंत जनता जागी होत नाही, तोपर्यंत फारसा बदल संभवत नाही.

जनता जागी होण्याकरताच आजची कारवाई आवश्यक होती!

साला, नेहरूपासून ते आजतागायत यूपी-बिहारच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा, मराठी माण्साचा, मराठीचा फक्त द्वेषच केला आहे..भडव्यांना आमची मुंबै वेगळी करून हव्ये! छटपूजेचं निमित्त करून भोसडीचे आपले राजकीय शक्तिप्रदर्शन येथे करणार!

आज झालं ते उत्तमच झालं. फक्त अबूचीच गालफडं सुजली असं नाही तर त्यानिमित्ताने या सार्‍याच मराठीद्वेष्ट्यांना एक धडा मिळाला!

आणि देशाभिमान/देशाची अखंड एकात्मता वगैरे गोष्टी आम्हाला कुणी शिकवू नयेत. आम्हा मराठी माण्सांना देशाभिमानाचं बाळकडू आमच्या शिवाजीराजाकडून मिळालं आहे. स्वातंत्र्यसंग्रामात फडके/टिळक/चाफेकर/कान्हेरे यांसारख्या अनेक मराठी माणसांनी भाग घेतला होता. या देशाकरता कोलू पिसणारे सावरकर मराठीच! त्यांच्या घरातल्या बायकांनी भडव्यो स्मशानातले पिंड खाऊन आपली पोटाची आग शमवली होती!.

अंदमानातून सावरकरांची वचनं काढून टाकणारं मणीशंकर अय्यर नावाचं सोनियाच्या दारातलं कुत्रं तेव्हा जल्माला यायचं होतं!

असो..

अवांतराबद्दल क्षमस्व..

तात्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 1:03 am | अक्षय पुर्णपात्रे

जनता जागी होण्याकरताच आजची कारवाई आवश्यक होती!

तात्या, असे झाले तर हे भविष्यात दिसून येईलच.

साला, नेहरूपासून ते आजतागायत यूपी-बिहारच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा, मराठी माण्साचा, मराठीचा फक्त द्वेषच केला आहे..भडव्यांना आमची मुंबै वेगळी करून हव्ये! छटपूजेचं निमित्त करून भोसडीचे आपले राजकीय शक्तिप्रदर्शन येथे करणार!

आज झालं ते उत्तमच झालं. फक्त अबूचीच गालफडं सुजली असं नाही तर त्यानिमित्ताने या सार्‍याच मराठीद्वेष्ट्यांना एक धडा मिळाला!

आणि देशाभिमान/देशाची अखंड एकात्मता वगैरे गोष्टी आम्हाला कुणी शिकवू नयेत. आम्हा मराठी माण्सांना देशाभिमानाचं बाळकडू आमच्या शिवाजीराजाकडून मिळालं आहे. स्वातंत्र्यसंग्रामात फडके/टिळक/चाफेकर/कान्हेरे यांसारख्या अनेक मराठी माणसांनी भाग घेतला आहे. या देशाकरता कोलू पिसणारे सावरकर मराठीच! त्यांच्या घरातल्या बायकांनी भडव्यो स्मशानातले पिंड खाऊन आपली पोटाची आग शमवली होती!.

अंदमानातून सावरकरांची वचनं काढून टाकणारं मणीशंकर अय्यर नावाचं कुत्रं तेव्हा जल्माला यायचं होतं!

तुमचा आत्मक्लेष समजू शकतो.

आशिष सुर्वे's picture

10 Nov 2009 - 1:04 am | आशिष सुर्वे

कायदा बदलावाच पण त्यासाठी जनमत तयार करावे

चालूद्यात.. नोव्हेंबर चालू झाला आहेच.. २६/११ आल्यावर जा मेणबत्त्या पेटवायला...
जमलं तर त्या कसाई कसाबला पण घेऊन जा.

-
कोकणी फणस

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 1:10 am | अक्षय पुर्णपात्रे

चालूद्यात.. नोव्हेंबर चालू झाला आहेच.. २६/११ आल्यावर जा मेणबत्त्या पेटवायला...
जमलं तर त्या कसाई कसाबला पण घेऊन जा.

श्री मराठा, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? तुम्ही कुठली क्रांती करता आहात हे कळू शकेल काय? जनमताशिवाय काय बदल घडू शकणार आहे?

आशिष सुर्वे's picture

10 Nov 2009 - 1:16 am | आशिष सुर्वे

जनमताशिवाय काय बदल घडू शकणार आहे?

आज ते त्या अबूला चांगलेच कळले आहे!

-
कोकणी फणस

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2009 - 9:43 am | विशाल कुलकर्णी

<<जनमताशिवाय काय बदल घडू शकणार आहे?>>

पुर्णपात्रेसाहेब जनमत बदलण्यासाठी नक्की काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे. काही अपवाद वगळता बहुसंख्य जनता ही मेंढरांसारखी असते. त्यांना हाकण्यासाठी कुणी मेंढपाळ नसेल तर ती गोंधळून जाते. मनसेने ती जबाबदारी घेतली. आता यातुन जागृत व्हायचं की लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारत अजुन आंधळ्याचं सोंग घ्यायचं ते जनतेने ठरवायचं आहे. यानंतरही जर जागृत होणार नसेल तर मग अशा जनतेचं कठीण आहे.

तात्या, तोडलंत देवा. एकदम सहमत. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

समंजस's picture

10 Nov 2009 - 11:55 am | समंजस

अगदी सहमत!
जनता स्वतःहून रस्त्यावर येत नाही. कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावी लागते.
जनता ही नेहमी नेत्यांच्या मागे असते, पुढे नाही.
जिथे ५०% मतदार मत द्यायला घराबाहेर पडत नाही, तिथे जनजागृती करणे हे
फार कठीण काम आहे.

पाषाणभेद's picture

10 Nov 2009 - 3:44 am | पाषाणभेद

अगदी तात्यांसारखेच मलाही म्हणावे असे वाटते.
मला मनसेव्यतीरिक्त आमदारांची लाज वाटते.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

टुकुल's picture

10 Nov 2009 - 4:09 am | टुकुल

हेच म्हणतो

-- टुकुल

हर्षद आनंदी's picture

10 Nov 2009 - 6:43 am | हर्षद आनंदी

तात्यांशी पुर्ण सहमत.

चार पावले चालुन दक्षिणेत उतरा.. तिथे कोणी राष्ट्रभाषा हिंदीला भीक घालीत नाही. हे चांगले नसेल किंवा नाही, पण आम्ही मराठीत बोलण्याची विनंती केली असता, तुम्ही माजोरडेपणा करुन हिंदीतच बोलता आणि गेली २० वर्षे इथे राहुन मराठी येत नाही असे म्हणल्यावर हा प्रतिसाद योग्य होता.

काल झी-२४तास या वाहिनीवर असे दाखवित होते की, पहिल्यांदा मनसेचे नेते विरोध दर्शविण्यासाठी आले असता, अबुने चप्पल दाखविली किंवा तसा अविर्भाव आणला.. मग त्याची उस्फुर्त प्रतिक्रीया म्हणुन मनसे आमदारांनी त्याला बुकलला.

परत एक प्रश्न असाही पडतो की, राम कदम ह्यांनी काल एका हिंदी वृत्तवाहिनीवर बोलताना "मराठी" का नाही वापरली? ते हिंदीतच का उत्तरे देत होते? मनसे सुप्रीमो राष्ट्रीय इंग्रजी वाहिनीवर "मराठी" बोलु शकतात, मग तुम्ही का नाही, अश्याने बाजु लंगडी पडते असे नाही का वाटत?

मनसेला पुर्ण समर्थन..पण त्यांनी पब्लिक प्रॉपर्टीची वाट लावु नये.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

स्वप्निल..'s picture

10 Nov 2009 - 10:35 am | स्वप्निल..

>>मनसेला पुर्ण समर्थन..पण त्यांनी पब्लिक प्रॉपर्टीची वाट लावु नये.

सहमत!!

प्रभो's picture

10 Nov 2009 - 6:48 am | प्रभो

मनसे झिंदाबाद.....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सुनील's picture

10 Nov 2009 - 8:22 am | सुनील

अबू आझमींना आपण मुंबई-महाराष्ट्रातील तमाम उत्तर भारतीयांचे मसीहा आहोत, हे दाखवायचे होते. त्यात ते यशस्वी झाले आहेत.

राज ठाकरे यांना आपण मराठीच्या मुद्द्याबाबत शिवसेनेपेक्षा अधिक आग्रही आहोत, हे दाखवायचे होते. त्यात ते यशस्वी झाले आहेत.

थोडक्यात, त्या दोघांसाठी ही विन-विन सिच्युएशन आहे.

बाकी, अमीन पटेल यांनी हिंदीतूनच घेतलेली शपथ मनसे आमदारांनी चूपचाप ऐकून घेतली. इतकेच नव्हे, तर, इंग्लीशमधून शपथ घेणार्‍या बाबा सिद्दीकी यांच्याशी मनसेचे नितिन सरदेसाई यांनी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आजच्या मुंबई मिररने पहिल्या पानावर छापले आहे. ह्या दोन घटनांबद्दल अधिक भाष्याची गरज नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2009 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी, अमीन पटेल यांनी हिंदीतूनच घेतलेली शपथ मनसे आमदारांनी चूपचाप ऐकून घेतली. इतकेच नव्हे, तर, इंग्लीशमधून शपथ घेणार्‍या बाबा सिद्दीकी यांच्याशी मनसेचे नितिन सरदेसाई यांनी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आजच्या मुंबई मिररने पहिल्या पानावर छापले आहे. ह्या दोन घटनांबद्दल अधिक भाष्याची गरज नाही!
अमीन पटेल किंवा बाबा सिद्दिकी या दोहोंपैकी कोणीही विधीमंडळाच्या कामकाजाची प्रत हिंदीतून मागितलेली नव्हती अथवा मी हिंदीतून/इंग्रजीतून शपथ घेणार असे जाहीर सांगितलेले नव्हते. त्यामुळे कारवाई मुजोर व्यक्तिवर झाली हे उचितच आहे. त्यामुळे हिंदी न्यूज चॅनेल वगैरे आता मनसेने हिंदीमधून काढलेली पत्रके दाखवत फिरत आहेत. म्हणजे जिथे हवा तिथे आग्रह केला की दुराग्रह म्हणण्यासारखेच आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

धमाल मुलगा's picture

10 Nov 2009 - 10:34 am | धमाल मुलगा

मुळात घटना काय घडली आणि त्यामागचा 'ड्रायव्हिंग फोर्स' काय ह्याबद्दल विचार केला तर उत्तर मिळु शकेल.

विधानसभेत हे प्रकार होणं एका बाजुनं पाहता मुळीच योग्य नाही,परंतु विधानसभेमध्येच "हिंदीत शपथ घेऊ नका" असं सांगितल्यावर स्टेजवरुनच चपलेला हात घालणं हे कितपत शोभनीय आहे?

ही घटना घडली तो होता भावनिक/राजकीय विस्फोट! आमच्या बावळ्ट धार्मिक भाषेत सांगायचं झालं तर अबु आझमीचा शिशुपाल झाला! अंगच्या मुजोरीमुळं आणि नसते उद्योग करण्याच्या हौसेपायी कधी ना कधी तो सटकावुन घेणारच होता..ते इथं घडलं. बाहेर त्याला बडवायचं असतं तर त्याची 'सरकारी' सिक्युरिटी, वैयक्तिक सिक्युरिटीमधले आझमगढी 'मारेकरी' रक्षक ह्यांच्या गराड्यातून त्याला फटके पडलेच नसते!
म्हणुन पुन्हा, जरी विधानसभा असली तर 'विंचु पिंडीवर चढुन बसला होता...खेटराचं चेचणं भागच होतं.'

आता मुद्दा येतो बाबा सिद्दिकी आणि अमिन पटेल ह्यांचा.
तर अमिन पटेल ह्यांनी कधी फारसा उतमात घातलेला ऐकिवात नाही, किंवा प्रांतवार रचना झालेल्या राज्यामध्ये राहुन तिथल्या भाषिक अस्मितेला डिवचलेलं ठाऊक नाही. ती मुजोरी अबु आझमीनं दाखवली..

बाबा सिद्दिकीनी इंग्रजीत् शपथ घेतली..
दुर्दैवानं इंग्रजीला अजुनतरी विरोध करता येत नाही.
"THE OFFICIAL LANGUAGES ACT, 1963 (AS AMENDED, 1967) (Act No. 19 of 1963) " ह्याच्या अनुशंगाने इंग्रजी भाषेत अनुवाद करणे, एका राज्यातील कागदपत्रे दुसर्‍या राज्यात (विशेषतः ज्या राज्यांनी हिंदी ही अधिकृत भाषा म्हणुन स्विकारली नाही त्यांच्यासाठी) इंग्रजीत भाषांतरीत करुन पाठवणे गरजेचे असते. त्यामुळे इंग्रजी ही प्रत्येक सभागृहाची एक अनिवार्य भाषा आहे.

ह्या कारणास्तव बाबा सिद्दिकीच्या इंग्रजी शपथेला विरोध करता येत नाही.

निमीत्त मात्र's picture

10 Nov 2009 - 8:28 pm | निमीत्त मात्र

बाकी, अमीन पटेल यांनी हिंदीतूनच घेतलेली शपथ मनसे आमदारांनी चूपचाप ऐकून घेतली. इतकेच नव्हे, तर, इंग्लीशमधून शपथ घेणार्‍या बाबा सिद्दीकी यांच्याशी मनसेचे नितिन सरदेसाई यांनी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आजच्या मुंबई मिररने पहिल्या पानावर छापले आहे

हं..म्हणजे मराठीतुन शपथ वगैरे दुय्यम होते...काहीतरी कारण काढून अबूल धुवायचा होता

सहज's picture

10 Nov 2009 - 9:26 am | सहज

सुनीलभौंचा मार्मीक प्रतिसाद!

भडकमकर मास्तर's picture

10 Nov 2009 - 9:15 am | भडकमकर मास्तर

टीव्हीवर हाणामारीची दृश्ये पाहताना वाईट वाटले....
पण अबु आणि मनसे दोघांसाठी हे चांगलेच झाले आहे.. ( विन विन आहे हे खरेच.. सहमत आहे..)...

पण यात शिवसेनेची अवस्था केविलवाणी झालीय हे खरेच...
भाजपाची कोंग्रेस व्हायची प्रोसेस पूर्णत्त्वाकडे चाललीय आणि
शिव्सेनेचा अगदी भाजपा झालाय असे वाटते... ;)

मुक्तसुनीत's picture

10 Nov 2009 - 9:16 am | मुक्तसुनीत

चला , हेही झाले. आता विधायक कामे कधी होणार ? प्रश्न तर आ वासून पडलेत. आधी पंधरवडाभर सरकारच नव्हते. मग सट्टेसाईबाबा नि आता हे. लोकनियुक्त प्रतिनिधी, लोकांचे प्रश्न सोडविणे , दुष्काळाने, रोगराईने, महागाईने ग्रस्त लोकांच्या पैशावर निवडून आलेल्यानी काही कामे करणे, राज्यव्यवहार सांभाळणे इत्यादि गोष्टी कालबाह्य झालेल्या दिसताहेत. यापुढचे सगळे लक्ष या लठ्ठालठ्ठीमधे लागणार. मग मूठभरानी मलिदा खायचा नि कोट्यावधीनी अंधारात कुढायचे.

प्रादेशिक अस्मिता, धार्मिक अभिमान, भाषेचा अभिमान, शहरांच्या नि विमानतळांच्या नावांचे मराठीकरण, कोट्यावधींची स्मारके या सगळ्या ज्वलंत प्रश्नांमधे , लोकांनी आपली तहान-भूक, खपाटीला गेलेली पोटे, घरोघरी लागणारे गळफास , अज्ञान , दारिद्र्य असल्या चिल्लर प्रश्नाना विसरावे असा नवीन राजकारणाचा नियम दिसतो.

असो. मनसेने ठोसे लगावून दाखवले. आता काही विधायक वगैरे कार्यक्रम हाती घेणे त्याना आपल्या व्यस्ततेतून जमले तर पहावे असेसुद्धा मला वाटले.

मनिष's picture

10 Nov 2009 - 12:23 pm | मनिष

+++++१

छोटा डॉन's picture

10 Nov 2009 - 10:45 am | छोटा डॉन

तात्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत. आमच्या भावना एकदम सुरेख शब्दात मांडल्या आहेत.
मनसेच्या लढाऊ आमदारांचे अभिनंदन व इतर बोटचेप्या आमदारांचा धिक्कार ...!!!

काही महत्वाचे मुद्दे की जे पाहुन हे कारस्थान मुद्दामुन मनसेला आडवे जाण्यासाठी रचले गेले अशी आम्हाला शंका येते.

१. जरी कायद्याप्रमाणे कोणताही आमदार अगर खासदार राज्यघटनेत सुचवल्या गेलेल्या मातॄभाषेव्यतिरिक्त इतर १८ भाषात शप्पथ घेऊ शकत असला तरी ह्याचे प्रयोग वारंवार महाराष्ट्रातच कशासाठी ?
इतर राज्यातले समकक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे काय ? का मराठी अस्मितेला नेहमीच आव्हान देऊन मराठी माणसाला किंवा मनसेसारख्या मराठी मुद्दा घेऊन लढणार्‍या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे उचकावले जाते ?

२. अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहेत, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे व त्यांची मातॄभाषा हिंदी असल्याने व त्यामुळेच मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रिय जनतेच्या सन्मानासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ?
शिव्यागाळी करायला बरी मराठी जमते ?

३. राज ठाकरे ह्यांनी पुर्वसुचना देऊनसुद्धा प्रकरण एवढ्या थराला गेले ह्यावरुन सरकारने मुद्दामुन हयकडे डोळेझाक केली व नंतर तत्परतेचा आव आणुन कारवाई केली असे आम्हाला वाटते.
आजपर्यंत संसदेत कितीवेळातरी "मार्शल्स" बोलावले आहेत मग ही काळजी काल का घेता आली नाही ?

४. ज्यांनी अजुन शपथच घेतली नाही अशा २ आमदारांना ४ वर्षासाठी निलंबीत करणे ह्याचाच अर्थ सरकार आधीच घुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते असा घ्यायचा का ?

५. अबु आझमींना सभापतींच्या आसनासमोर उभे राहुन जी "चप्पल दाखवली" व त्यानंतर अ‍ॅच्युअल धक्काबुक्कीला सुरवात झाली हा महत्वाचा मुद्दा सरकारच्या दृष्टीने काहीच किमतीचा नाही का ?
चप्पल दाखवल्यावरही अबु आझमी निर्दोष ठरुन सभागॄहात बसुच कसे शकतात ?

६. शपथ घेऊन खाली उतरल्यावर मात्र फलक फडकावणार्‍या "शिशीर शिंदे" ह्यांना ढकलुन त्यांच्याशी धक्काबुक्कीची सुरवात कोणी केली हे सरकारने तपासुन पाहिले आहे काय ?
मिडिया फुटेजमध्ये तर स्पष्टपणे आधी आझमींनी ढकलल्याच दिसते आहे ....

७. "वसंत गिते" ह्यांनी नेमके काय केले हे कळु शकेल काय ? कारण आम्ही जे काही फुटेज पाहिले त्यात गिते हे बरेच मागे अथवा प्रत्यक्ष सहभागी नसल्याचे आढळले.
केवळ नाशकात सरकारातल्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्पर्धा नको म्हणुन गितेंना बाहेर काढण्यात आले काय ?

८. वाद होणार हे माहित असुनसुद्धा सरकारतल्या कोणी वरिष्ठांनी अबु आझमींना विनंती करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असे काही घडले आहे का ? नसल्यास का नाही ह्याचे उत्तर मिळावे ?
सभागॄहात शांतता रहावी हे सगळ्यांचेच कर्तव्य नाही का ?

९. आता महत्वाचा मुद्दा की वर्षाची शिक्षा कितपत योग्य आहे ?
आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का ?
६० च्या दशकात "जांबुवंतराव धोटे" ह्या विदर्भातल्या आमदाराने थेट सभापतींना पेपरवेट फेकुन मारला त्या प्रकरणात किती शिक्षा झाली होती ?
दस्तुरखुद्द "छगन भुजबळ" हे जेव्हा शिवसेनेचे एकमेव आमदार होते तेव्हा ते एवढा धिंगाणा घालत की त्यांना कित्येकवेळा मार्शलकरवी अक्षरशः "उचलुन" सभागॄहाबाहेत न्हेले असल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा किती शिक्षा व्हायची भौ त्यांना ?
शिवसेनेच्या गुलाबराव गावंड्यांनी भर विधानसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन घेऊन स्वतः रोबरच इतर सदस्यांनाही धोका उत्पन्न केला होता, त्याचे संदर्भ घेतले आहेत काय ?
कित्येकवेळा माईक उखडले, कागदपत्रे फेकली, धाराधरी व पळापळी झाली, धक्काबुक्की सदृष्य घटना ह्याच सभागॄहात घडल्या आहेत, मग ह्यावेळीच इतकी कठोर शिक्षा का ?

जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.
जय महाराष्ट्र !!!!
मनसे आमदारांचे अभिनंदन ... !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मदनबाण's picture

10 Nov 2009 - 10:50 am | मदनबाण

डॉनरावांशी १००% सहमत...

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

समंजस's picture

10 Nov 2009 - 12:11 pm | समंजस

सहमत. मुद्दे अचुक आहेत.
१९९५ मधे सपा नी मायावती वर गेस्ट हाउस मधे केलेला हल्ला, सपाचे नेते विसरलेले दिसताहेत आणि महाराष्ट्रातली तथाकथीत पुरोगामी जनता सुद्धा.

अनामिका's picture

10 Nov 2009 - 12:27 pm | अनामिका

तात्यांशी !
अंत:करणापासुन सहमत.......समस्त स्वाभिमानी मराठी जनांच्या भावना तात्यांनी शब्दात अत्यंत समर्पक व योग्य शब्दात मांडल्यात.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

माझी दुनिया's picture

10 Nov 2009 - 1:35 pm | माझी दुनिया

जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.

:? ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म, सत्यवचन
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

गणपा's picture

10 Nov 2009 - 2:01 pm | गणपा

तात्या अगदी मनातल बोललात.
आताच राजच आमदारांना लिहिलेल आवाहन पत्र वाचलं.
काय खोटं बोलला राजं? मनसेतर आमदारांना मायमराठीची साथ न देता त्या लां* अबुची दाढी कुरवाळण्या बद्दल उलटे टांगुन ओल्या फोकाने फोडलं पाहीजे.
राजच पत्रकं. (मटा वरुन साभार)


प्रशु's picture

10 Nov 2009 - 3:36 pm | प्रशु

तात्यांशी पुर्ण सहमत....

जय महाराष्ट्र....

विनायक प्रभू's picture

10 Nov 2009 - 7:00 pm | विनायक प्रभू

खरच का अबु आजमी च्या कानाखाली आवाज निघाला.

मला नाही वाटत.
तो निघाला दुसरीकडेच.
राज चे आजवरचे पोलीटीकल अक्युमन पहाता ही येत्या चार वर्षात १४० च्या तयारीची पहीली रणदुदुंभी होती.
एका फटक्यात मराठी मनाचे पोलरायझेशन.
तात्यांशी सहमत.
राज लवकर राज्य करा.

तात्यासाहेब, जय हो! अगदी मस्त. अगदी मनातलं बोललात हो!
खरं तर दुहीचा शाप भोवलाच. जर शिवसेनेने साथ दिली असती तर काय त्यांचे चार चव्वल गेले असते कां? "किमान कार्यक्रम" मिळून करायला काय हरकत आहे? असं नाहीं केलं तर शिवसेना संपलीच असं नाइलाजाने म्हणावे लागेल. "उद्धवा, रात्र वैर्‍याची आहे. जागा हो" असं म्हणायची वेळ आली आहे!
भाजपला आणि गोपूला मारा गोळी! त्यांना "अखिल भारतीय"चा मंत्र जपू दे. पुढच्या निवडणुकीत बघून घेऊ!
खरंच उद्धवजींनी असं गप्प बसायला नको होतं!
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

तिमा's picture

10 Nov 2009 - 9:19 pm | तिमा

छे छे! नाही पटलं! राजच्या मतलबी चालीवर फक्त काही भडक टाळकी खुष आहेत असं वाटलं होतं. पण इथे तर त्याच्या गळाला विचारवंतही लागलेले दिसतात.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

देवदत्त's picture

10 Nov 2009 - 9:34 pm | देवदत्त

तात्यांशी सहमत.

बाकी शिवसेनाही फक्त निषेधच करत आहे हे पाहून वाईट वाटते.

आजही अबु आझमी ने बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढल्यावरही शिवसेनेने फक्त धमकीच दिली? जुनी शिवसेना असती तर अबु आझमी कमीत कमी हॉस्पिटलमध्ये असता आतापर्यंत.

संदेश's picture

11 Nov 2009 - 12:20 am | संदेश

"मराठी तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा , नडला एखादा अबु तर त्यास गाढवासारखा लोळवावा"