'डॉन' या कराचीहून प्रसिद्ध होणार्या दैनिकात आज खाली दिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. मजकूर वाचल्यावर असे वाटते कीं पाकिस्तानी सरकार कसेही असो पण पाकिस्तानी जनतेला नीर-क्षीर-विवेक सुचू लागलेला दिसतोय! ही खरंच एक निरोगी परिस्थितीकडे नेणारी घटना आहे व आपण तिचे स्वागत केले पाहिजे.
पत्र लिहिणार्याने जरी दोनदा भारताचा उल्लेख केला असला तरी जास्त करून माहिती चीनचीच दिली आहे. कदाचित पाकिस्तानी वृत्तपत्रांत भारताची माहिती दिली जात नसावी. (अर्थात आंतरजालावरून कुणीही वाचू शकतो!)
पण एकंदरीत आम पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या चांगल्या गोष्टींबद्दल अंधारातच ठेवले जात असावे व सध्या चीनबद्दल बरीच माहिती तिथल्या वृत्तपत्रांत येत असावी असे वाटते! म्हणूनच अशी पत्रं म्हणजे एक गार वार्याची झुळूकच वाटते!
वाचा व आपापली मतं ठरवा.
माझे अशाच विषयावर 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेले पत्र http://asinstitute.org/node/131 या दुव्यावर EASY MONEY या शीर्षकाखाली आलेले आहे. पण जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे या पत्राला दुजोरा देणारे एक पत्र एका कॅनडास्थित पाकिस्तानी नागरिकाने पाठविले होते. म्हणजे असेही पाकिस्तानी नागरिक आहेत! या पत्राचा दुवा या क्षणी सापडत नाहींय. तो नंतर देईन.
धन्यवाद,
सुधीर
We could learn from the examples of China and India, the countries that have largely remained unscathed by the current world economic recession. Let us take a look at China.
The Chinese, since the days of Mao Zedong, among other progressive measures made child literacy compulsory, developed indigenous energy resources, and made merit the order of the day and look where they stand today. Is it just by chance that our economic minister since the time of Gen Ayub has always been someone from the World Bank?
It is well-known that today the wealth of a nation is decided by its international liquidity status determined on the basis of its foreign exchange reserves, and institutions like the World Bank would be the last to see us economically self-sufficient due to their international geopolitical strategies.
Our economic minister is constantly threatening to increase the rupee tax base, a sure way to escalate poverty and depress productivity instead of discovering ways and means to generate more and more hard currency.
Our country could have stayed untouched by the international economic crisis had we adopted the policies similar to ones pursued by China and India.
HAMID ALI
Muzaffargarh
प्रतिक्रिया
9 Nov 2009 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार
येस येस
नो नो
थँक्यु थँक्यु
देवनागरीत होते ते वाचले आणि हो इंग्रजीत सुधारणा करीनच
©º°¨¨°º© परायक ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Nov 2009 - 6:53 am | Nile
मार्क ट्वेन च्या भाषेत सांगायचं तर, "All generalizations are wrong, including this one."
भारता बाहेर अनेक ठीकाणी भारतीयांचा परदेशीयांशी संपर्क येत असावा, माझ्या स्वानुभवावरुन अमेरीकेत तर अनेक पाकीस्तान्यांशी संपर्क येतो, मी तर भारतीय आणि पाकीस्तानी गुण्यागोविंदाने(!) रुममेट्स म्हणुन राहतानाही पाहिलं आहे.
पण त्याउलट, भारतातील काही परिचीत मुसलमान व्यक्तींना पराकोटीचा भारतद्वेष करतानाही पाहीलं आहे. शेवटी, ज्याप्रमाणे अनेक लोक इंटरनेट वर आपुल्या अपुर्या ज्ञान, अभ्यास, अनुभवाची पर्वा न करता मतं मांडत असतात त्याच प्रमाणे अनेक पाकीस्तानी नागरीक भारताचा द्वेष करत असावेत असे वाटते. (त्याचप्रमाणे अनेक भारतीयांची सामान्य पाकीस्तानी नागरीका बद्द्लची मते कशाच्या आधारे बनली आहेत ह्याचा विचार केला तर गंमत वाटेल)
हा व्हीडिओ बघण्यासारखा आहे: http://www.youtube.com/watch?v=81cfly1npRA
10 Nov 2009 - 7:24 am | सहज
नाईलशी सहमत.
एकतर ह्या लेखाचे शीर्षकच पाकीस्तानला कमी लेखणारं आहे. जणू त्यांच्यात चांगली लोक नसणारचं. असो. तुमची या विषयाची आवड, उत्सुकता समजु शकतो. पण तरी शक्य असल्यास पुढचे काही दिवस-आठवडे पाकीस्तान, अमेरीका रेटरीक (rhet⋅o⋅ric) न आलेले बरे. ;-) कधी कधी बुश चेनी- वॉर ऑन टेरर - फॉक्स चॅनेल लागला असे वाटते आहे.
अर्थात शक्य तितके अभ्यासु, संतुलीत लेख वाचायला नक्कीच आवडतील. गैरसमज नको. वरचा लेख फार काही विशेष वाटला नाही. त्यामानाने नाईलशेठनी दुवा दिलेला व्हिडिओ जास्त सांगून जातो.
पाकीस्तान, अमेरिका द्वेष करुन काही साध्य होणार नाही. उलट दोन्ही देशातुन जनमताचा रेटा संबध सुधारण्याच्या बाजुने झाला तर दोन्हीकडचे नेते प्रयत्न करतील. जोवर दोन्ही देशातुन एकमेकांना नावे ठेवण्यात जास्त लोकप्रियता मिळते आहे तोवर अवघड आहे. तुमचा लेख हा संबध सुधारण्याच्या दिशेने असेल तर शीर्षक वेगळे वाचायला आवडेल. सद्य शीर्षकात जरा नकारात्मक सूर वाटतो.
10 Nov 2009 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाईल आणि सहज दोघांशी सहमत. विशेषतः संतुलित लेखनाच्या मागणीबद्दलतर जास्तच.
इतरांचं लिखाण दुवा न देता देताना इंग्लिशमधे उतारेच्या उतारे टाकायचे, पण मराठीमधे भाषांतर नाहीच इ इ. या पद्धतीचं लिखाण तर अगदी हौशी लेखकाची सुरूवात असावी असं वाटतं.
आता याला विरोधासाठी विरोध म्हणायचं असेल तर तसं म्हणा, मला फरक नाही पडत. पण माझ्याकडे बोट दाखवून लिखाण सुधरत नाही ही वस्तुस्थितीच आहे ना?
अदिती
14 Nov 2009 - 12:27 pm | सुधीर काळे
अमाहासउ
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
10 Nov 2009 - 1:12 pm | सुधीर काळे
जेवढे पटले तेवढा बदल केला आहे व आपली पोचही वाचली आहे.
BTW, Fox चॅनेलवर बुश-चेनी यांच्या बाजूने लिहिलेले असते (भजनच म्हणा!) व मी जास्तकरून त्यांच्याविरुद्ध बाजूने लिहितो!
असो.
कुणीतरी मला अलीकडे सल्ला दिला होता की लिहायचे ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी.
मी तेंव्हाच लिहितो जेंव्हा एकादी गोष्ट माझ्या काळजाला भिडते. उगीच 'उचलली लेखणी लावली कागदाला' किंवा 'उचलले बोट, लावले कीबोर्डला' असा माझा खाक्या नाहीं.
पण तरीही सल्ल्याबद्दल धन्यवाद. हाही सल्ल मी लक्षात ठेवीन.
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
10 Nov 2009 - 1:03 pm | सुधीर काळे
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
21 Nov 2009 - 1:41 am | निमीत्त मात्र
सुधीरकाका गायन मस्तच! बाकिची गाणीपण ऐकली. लागे रे मधला रिखभ तर अप्रतिम लागला आहे.
असेच आणखी एक काका आठवले..
21 Nov 2009 - 6:25 am | गणपा
हा हा हा
आत्ता समजल मायकल जॅक्सनने जिव का दिला ते..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
14 Nov 2009 - 1:25 pm | सुधीर काळे
माझ्या "Easy money" या पत्राला अनुमोदन देणारे पत्र कॅनडा येथे रहाणार्या J. S. HUSSAIN यांचे होते. दुवा आहे http://www.dawn.com/2008/05/24/letted.htm#8
माझ्या अल जझीराच्या सर्वेक्षणावरील लेखात मी माझ्या पत्राचा व या पत्राचा असे दोन्ही दुवे दिले होते.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
20 Nov 2009 - 9:34 am | सुधीर काळे
नाईल,
तुझी लिंक आज पहिल्यांदा पाहिली. इतरत्र मी लिहिले आहेच (अब्बास अकबर अली, विमानात भेटणारे पाकिस्तानी वगैरे) की आम पाकिस्तानी खूपच वेगळा व दोस्ती करू इच्छिणारा आहे. जकार्तातल्या ट्रॅवल एजन्सीतल्या पाकिस्तानी गृहस्थाने तर "माझे वडील फरीदाबादचे" असे मला अभिमानाने सांगितले. माझाही हाच अनुभव आहे. पण मनात काय आहे व तोंडात काय येते हे खरे-खरे समजणे कठीण.
आज 'डॉन'मध्ये इर्फानसारखे वार्ताहार आहेत कीं जे भारताचा मुद्दा सुरेखपणे उचलून धरतात. "मुंबई मॅसॅकर"नंतरच्या काळात त्यांनी लिहिलेला एक सुरेख लेख मी मित्रांना पाठवला होता. सापडला तर तुला वैयक्तिक पत्त्यावर पाठवेन.
खरं तर मिपाच्या धोरणामुळे असे कितीतरी लेख किंवा वाचकांची पत्रे जी मी इथे पोस्ट करण्यालायक समजतो ती करता येत नाहींत हे दुर्दैव आहे आणि एकेकाला पाठविणे म्हणजेही अशक्य आहे. जर धोरण बदललं तर मी 'डॉन'मधील वेगवेगळ्या छटांची माहिती देऊ शकेन. तोपर्यंत असंच चालू दे.
ती लिंक पाठविल्याबद्दल धन्यवाद. आपला भारतीय पत्रकार व कॉलेजातल्या मुली यांची जुगलबंदी मस्त जुळली आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
21 Nov 2009 - 1:20 am | Nile
नक्की पाठवा काळे काका. मत-मतांतरे हा तर इंटरनेट फोरम्स'चा 'अविभाज्य घटक' पण त्यामुळे वैयक्तीक आकस ठेवणारे म्हणजे निव्वळ बालीश असं मला तरी वाटत. असो.
21 Nov 2009 - 5:48 am | सहज
अगदी.
>मत-मतांतरे हा तर इंटरनेट फोरम्स'चा 'अविभाज्य घटक' पण त्यामुळे वैयक्तीक आकस ठेवणारे म्हणजे निव्वळ बालीशपणा.
हे वाक्य म्हणजे प्रत्येक इंटरनेट फोरम्स (मसंवर)सर्व पानांवर मोठ्या अक्षरात लिहण्याजोगे.
शाब्बास रे नाईल्या!
21 Nov 2009 - 10:02 am | वेताळ
त्याला पण पाकिस्तानी विचारवंत खुप आवडतात.
वेताळ